Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43
शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.
विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किशोर मासिक नेमकं केव्हा सुरू
किशोर मासिक नेमकं केव्हा सुरू झालं ते मला माहित नाही पण आमच्याकडे ते आम्हाला वाचायला लावलं होतं. वाटेकडे डोळे लावून बसायचे मी. नशिबानं बहिणीला वाचनाची फारशी आवड नव्हती. त्यामुळे किशोर आल्या आल्या माझ्या ताब्यात यायचा. आणि माझी ब्रह्मानंदी टाळी लागायची.
वर्षभराचे अंक जमवून नंतर ते बाईंडिंग करून ठेवले होते. अशी आठ बाडं आमच्याकडे होती. पुढे ती एका बालवाचनालयाला दिली. पण तिथे पावसामुळे एकदा बरीच पुस्तकं खराब झाली त्यात आमची बाडंही गेली. खूप वाईट वाटतंय. घरीच ठेवायला हवी होती.
किशोरचे दिवाळी अंक तर खासच असत.
मी हिंदी कॉमिक्स जास्त
मी हिंदी कॉमिक्स जास्त वाचायचो.... ( अजुन ही वाचतोच ) राज, डायमंड कॉमिक्स...... चांदोबा ठकठक कमी मिळायच्या आमच्या इथे... चंपक वाचायचो
मला चांदोबातलं रामायण
मला चांदोबातलं रामायण वाचल्याचं आठवतंय.
किशोर आमच्याकडेही नियमितपणे यायचं. त्यात कॅप्टन नेमोच्या कादंबरीचा अनुवाद वाचला होता तो आठवतोय.
किशोर, कुमार, चांदोबा, चंपक,
किशोर, कुमार, चांदोबा, चंपक, ठकठक, अमृत, लोकप्रभा, षटकार, चाचा चौधरी, फास्टर फेणे, गलिव्हरचे प्रवास, सिंदबादच्या सफरी, हातिमताई, ईसापनिती, पंचतंत्र, सिंड्रेला, हिमगौरी, अरेबिअन नाईटस, अकबर-बिरबल, कालिदास तथा तेनालीरामन ... आणि या सर्वांचे तात रामायण-महाभारत !
- ईति बालसाहित्य वाचनसीमा विसावे शतक आणि नव्वदीचे दशक !
बादरायण सम्बन्धाबद्दलची गोष्ट
बादरायण सम्बन्धाबद्दलची गोष्ट आधी चान्दोबातच वाचली होती.
अजुन एक गोष्ट होती... एक माणसाच्या डोक्यावर एक चक्र अव्याहत फिरत असत...रक्ताच्या चिळकान्ड्या वै. दुसरा माणुस अथक परिश्रमाने त्या माणसापर्यन्त जाउन पोहोचातो तर ते चक्र या दुसर्या माणसाच्या डोक्यावर बसत आणि पहिला मुक्त होतो...अशी काहीशी कथा होती. खुप उद्वेग,भय, दु:ख अस वाटल होत... त्या वयात!
कॅप्टन नेमोच्या कादंबरीचा
कॅप्टन नेमोच्या कादंबरीचा >>>> 20,000 leagues under the sea चा अनुवाद. हो, फारच सुरेख होता तो. प्रत्येक भाग एकदम थरारक असे. भा रा भागवतांनी केला होता. त्याचं नाव मात्र आठवत नाहीये. समुद्रातील रहस्य वगैरे टाईप काहीतरी होतं बहुतेक.
भारांचा Wizard of Oz चा अनुवादही कसला सुंदर होता. जाई आणि टाटू, चेटकी अन नेटकी, ती माकडं ... एकदम अदभुत! आणि अत्यंत रसाळ भाषेत. हा अनुवाद आहे याची अजिबात जाणिवही न होऊ देणारा.
माझे एक काका ठकठक आणून
माझे एक काका ठकठक आणून द्यायचे दर महीन्याला अगदी आठवी नववी पर्यंत, त्यावरून माझे भाऊ चिडवायचे पण
दिपी द ग्रेट आठवतोयं, आणि चंपक मधला चिकू, मधल्या पानावर गोष्ट असायची चिकूची.
किशोरमधिल इसापच्या कथा आणि
किशोरमधिल इसापच्या कथा आणि हौसा कथा देखिल मस्त असत.
शंकासमाधान हे सदर देखिल छानच होते.
किशोर पहिल्यांदा दिवाळी अंक
किशोर पहिल्यांदा दिवाळी अंक म्हणूनच प्रसिद्ध झाला. त्यातल्या पहिल्या अंकात मान्यवरांचे " आमचे चौदावे वर्ष " अशी लेखमालिका होती. त्यात सुनील गावस्कर, लता मंगेशकर यांचे लेख होते.
मुलांसाठी मासिकं हा प्रकार नंतर सुरु झाला. त्यापुर्वी लोकसत्ता मधे रविवारी बालजगत अशी पुरवणी असायची.
गंमत जंमत असा एक रेडीओवरचा कार्यक्रमही होता. शनिवारी आणि रविवारी असे तो. त्यात श्रुती साडोलीकरचे " झिन चॅक झिन" असे गाणे वाजवत असत.
कुमार नावाचे पण एक छोटे मासिक असे.
माझ्या पुतण्याला "चंपक" चे भारी वेड होते. त्यातल्या एका शब्दावरून त्याने परीक्षेत चीकू असे लिहिले होते आणि त्याचा अर्धा मार्क कमी केला होता. आम्ही अजून त्याला चिडवतो त्यावरून.
छान आठवणींच्या रम्य प्रदेशात
छान आठवणींच्या रम्य प्रदेशात घेऊन जाणारा धागा.....
चांदोबात प्रसिद्ध होणारी ती विक्रम वेताळची क्रमशः कथा.... पहिल्या पानावरचे ते वेताळाला खांद्यावर घेतलेल्या विक्रमादित्याचे चित्र आणि ते वर्णन, मस्त धमाल यायची वाचताना.
मोठयांना फसवण्यासाठी शत्रुपक्षाच्या पुस्तकामधे घातलेला मित्रपक्षातील चांदोबा, चंपक. भारी उपद्व्याप केले होते.
आत्याकडे किशोरच्या अंकांचे बाइंडिंग केलेले संकलन होते, ते पण आठवतेय.
सानेगुरुजींच्या मुलांसाठी असलेल्या कथा १० भाग होते. करुणा देवी, दु:खी, चित्रा आणि चारु अशी बरीच..
सिंदबादच्या सात सफरी,गलिव्हर ट्रैवल्स सगळे एकापेक्षा एक.
हे चंपक चांदोबा ठकठक मासिके
हे चंपक चांदोबा ठकठक मासिके / पाक्षिके मला फार महाग वाटायची त्यावेळी. म्हणजे हातात घेतला की फडशा उडाला, तेवढ्यासाठी त्यांची पाच-सहा जी काही किंमत होती ती मोजणे जिवावर यायचे. अर्थात ते पैसे आईच द्यायची पण वाचनाची कितीही आवड असली तरी बजेट फिक्स होते ते गंडायचे. त्यामुळे मग सुट्टी पडली की लायब्ररी लावायचो. अर्थात, तेथील पुस्तके म्हणजे - हसणारा पोपट आणि गाणारा कावळा, सोनेरी केसांची राजकुमारी आणि हिरव्या दाढीचा राक्षस, धाडसी प्रताप आणि हुशार गणू वगैरे .. दुर्दैवाने बालसाहित्य वाचायच्या वयातून बाहेर पडलो आणि वाचनाची आवड खल्लास झाली.
चांदोबातल्या क्रमशः कथा
चांदोबातल्या क्रमशः कथा (विक्रम वेताळ बहुतेक), आणि बोधिसत्वाच्या आठवतायत. जंगल , तसेच राजघराण्यातील लोकांचे ड्रेस हे चांदोबात पाहिल्यासारखे असतील तरच खरे वाटायचे !
सानेगुरुजींच्या मुलांसाठी
सानेगुरुजींच्या मुलांसाठी असलेल्या कथा १० भाग होते. >>> हो हो, हे ही वाचलेय मी .. पण यातले फारसे आठवत काहीच नाही
सानेगुरुजींची लेखन शैलीही
सानेगुरुजींची लेखन शैलीही हटके, जाते, येते ऐवजी जात्ये, येत्ये असे असायचे.
साने गुरुजींच्य गोड रडक्या
साने गुरुजींच्य गोड रडक्या गोष्टी ना? ते माझ्याकडेही होतं.
victor hugo les miserables चा अनुवाद दु:खी नावाने होता. तो मुलांनी कशाला वाचायचा असा प्रश्न आता पडतोय.
तेरेखोलचे रहस्य नावाची एक
तेरेखोलचे रहस्य नावाची एक कादंबरी किशोरमध्ये वाचलेली आठवते. शिवाय 'चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी'चा अनुवाद.
ठकठकमध्ये एक अंडे, एक झाडू आणि एक पंखा नावाची चित्रकथा वाचली होती. त्यात एका मुलीचं लग्न होतं तेव्हा तिला तिचे वडील या गोष्टी सोबत देतात, त्या अर्थातच जादूच्या असतात. मग एक दिवस योगायोगाने तिला कळतं की आपला नवरा आणि त्याचे दोस्त हे खरे लांडगे (वेअरवुल्व्ज?) आहेत आणि तिला खाणार आहेत. तेव्हा या गोष्टींच्या मदतीने ती त्यांच्यावर मात करून पळून येते. ही गोष्ट वाचताना मला चक्क भीती वाटली होती. ठकठकमधलं दिपू दि ग्रेट बोअर व्हायचं कधीकधी. मध्ये एकदा ठकठकचा दिवाळी अंक पाहिला तेव्हा शुद्धलेखन वगैरे एकूणच दर्जा घसरलेला दिसला होता.
मोठयांना फसवण्यासाठी
मोठयांना फसवण्यासाठी शत्रुपक्षाच्या पुस्तकामधे घातलेला मित्रपक्षातील चांदोबा, चंपक. भारी उपद्व्याप केले होते. :
आत्याकडे किशोरच्या अंकांचे बाइंडिंग केलेले संकलन होते, ते पण आठवतेय. >>>
बालहंस, चाचा चौधरी, सुपर
बालहंस, चाचा चौधरी, सुपर कंमांडो ध्रुव, नागराज, मॅण्ड्रेक, बिल्लू, पिंकी, चन्नी चाची (हे सदर सरीता मधे यायचे फक्त तेच वाचायला आवडायचे). मराठी चंपक आणि चांदोबा एकदम पुचाट आणि कैच्याकै वाटायचे हिन्दी समोर.
किशोर, चांदोबा, चंपक, आनंद...
किशोर, चांदोबा, चंपक, आनंद... यांच्या सोबतीला कुमार देखिल होता. आकार साधारण पणे 'अमृत'चा (अगदी खरं सांगायचं तर सध्याच्या लोकप्रीय असलेल्या Readers Digest सारखा). आम्ही रहायचो कुडाळात, पण कुडाळच्या वाचनालयात हा अंक कधीही मिळाला नाही. पण सुट्टीत (दिवाळी आणि उन्हाळी) 'मालवण'ला मावशीकडे गेलो की, तिथल्या वाचनालयातून 'कुमार'चे अंक आणून वाचत असू... आता नक्की आठवत नाही, पण अशाच लहान मुलांच्या मासीकातून 'फास्टर-फेणे, गोट्या ...' भेटले... काही काळ हे दोघेही वर्तमान-पत्रांच्या रविवार पुरवणी तून भेटीला येत असत, पण कुडाळ पर्यन्त येणारी वर्तमान पत्रं (सन १९७४ ते ७९-८०) ही खूपच अनियमीत असायची (कारण वर्तमान पत्रांची 'डाक-आवृत्ती' मिळायची), त्यामूळे वाचनात खंड पडायचा, आणि विरस व्हायचा...
माझ्या आठवणी प्रमाणे ही कसर विनयने (परदेसाई/ गोष्टी गावाचे) दहाविची परीक्षा झाल्या नंतरच्या सुट्टीत (१९७८-७९) कुडाळ्च्या लायब्ररी मधे ही पुस्तके (फास्टर फेणे, गोट्या, चिंगी...) उपलब्ध झाल्यावर भरुन काढली. आणि मी स्व्तः हि पुस्तकं कॉलेजची शेवट्ची परीक्षा झाल्यावर माझ्या सवडीने वाचून काढली...
मला चंदामामा ज्यास्त आवडायचे.
मला चंदामामा ज्यास्त आवडायचे. त्यातली चित्र काढायला आवडायची. त्यातल्या बायकांची चित्रं मस्त असायची.
चंपक हा दुसरा नंबर...
आणि बरीच होती पण ती काही आठवतच नाहीयेत.
साउथ वाल्या बायकांची चित्रे
साउथ वाल्या बायकांची चित्रे जास्त होतीत त्यात
मामी, १. >> एकदम थरारक असे.
मामी,
१.
>> एकदम थरारक असे. भा रा भागवतांनी केला होता. त्याचं नाव मात्र आठवत नाहीये.
सागरकैद! मस्त लेखमाला होती. लेखक प्रोफेसर असतो. आणि तो क्याप्टन नेमोच्या पाणबुडीवर कैदेत सापडतो. नॉटिलस तिचं नाव. पुढे नेमो पाणबुडी घेऊन कुठल्यातरी समुद्रातल्या अतिप्रचंड भोवऱ्यात जायला निघतो. तेव्हा खलाश्यांत काही भांडणे होतात. त्यावेळी क्याप्टन काही जणांना सोडून जायची मुभा देतो. त्यात प्रोफेसर तिथून निघतात. इथे कथा संपते.
क्याप्टन नेमोचा उच्चार इथे इंग्लंडमध्ये नीमो असा होतो हे वाचून अंमळ गम्मत वाटली होती!
२.
>> भारांचा Wizard of Oz चा अनुवादही कसला सुंदर होता. जाई आणि टाटू, चेटकी अन नेटकी, ती माकडं ...
>> एकदम अदभुत! आणि अत्यंत रसाळ भाषेत. हा अनुवाद आहे याची अजिबात जाणिवही न होऊ देणारा.
खूप रसाळ अनुवाद होता. त्याचं नाव अजब देशात असं काहीसं होतं. काय एकेक पात्रं होती. पत्र्या मारुतीच्या सांध्यात तेल घालायला मिळालं की तो खूष व्हायचा! तसा रडूबाई होता. तो रडला की गंजायचा, म्हणून जाई नेहमी त्याला रडं आवरायला सांगायची. बागुलबुवामधला पेंढा नीट केला की त्याची तब्ब्येत ठीक व्हायची. चेहरा विस्कटला तर नाक, कान, डोळे इत्यादि अवयव जाई रंगवून काढायची. मग तो ठीक व्हायचा! कन्सेप्ट भारी आहेत!
तो सोनेरी रस्ता पुढे चेटकिणीकडे जातो हे जाईला कोणी सांगितलेलं असतं ते आठवत नाहीये. मात्र चेटकिणीचा माकडं बोलवायचा मंत्र आठवतोय :
(डाव्या पायावर उभं राहून) चक्का चक्का काकड कू
(उजव्या पायावर उभं राहून) पक्का मक्का माकड मू
(दोन्ही पायांवर उभं राहून) झिझ्झी झिझ्झी झुक झुक
३.
तुम्हाला चांदोबातल्या मायासरोवर आणि भल्लूक मांत्रिक मालिका आठवतात का?
आ.न.,
-गा.पै.
ह्या सगळ्या मासिकांमध्ये ठकठक
ह्या सगळ्या मासिकांमध्ये ठकठक सगळ्यांत जास्त आवडायचं..
श्रद्धा तू सांगितलेल्या दोन्ही गोष्टी आठवत आहेत. तेरेखोलचे रहस्य नावचं पुस्तक पण आलं होतं पुढे.
ठकठकमधलं दिपू दी ग्रेट, बन्या, टीमू वगैरे आठवतं आहे.. हे आवडायचं तिन्ही.. शिवाय सांगा पाहू, ओळखा बरं, पुढे काय? अश्या नावांची कोडी असायची.
ह्यावर्षी ठकठकचा दिवाळी अंक आणायला गेलो होतो पण आलाच नाही म्हणे!
कृपया मुलांच्या
कृपया मुलांच्या मासिकांबद्दल आणि त्यातल्या गोष्टींबद्दल लिहा. सागुंच्या पुस्तकांबद्दल नको आणि कोणत्याही इतर पुस्तकांबद्दल नको.
मी चंपक आणी ठकठक फार कमी
मी चंपक आणी ठकठक फार कमी वाचले.
चांदोबा महिन्याचे रेग्युलर वाचले.
शेजारी काकांना वाचनाची आवड होती.
त्यामुळे मलाही बराच फायदा झाला.
तेरेखोलचे रहस्य नावाची एक
तेरेखोलचे रहस्य नावाची एक कादंबरी किशोरमध्ये वाचलेली आठवते. शिवाय 'चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी'चा अनुवाद. >>> आमचं 'किशोर' वय संपल्यावरचं असणार हे.
गामा, तुमची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. हे सगळे डिटेल्स आठवताहेत. मंत्र लक्षात आहे अजूनही?
किशोर हे सरकारी
किशोर हे सरकारी पब्लिकेशन.
डायनॉसॉर हा प्रकार त्यातून सर्वप्रथम कळला होता.
चांदोबा, www.chandamama.com या साईटवर ऑफिशियली उपलब्ध होता. सर्व जुन्या अंकांसकट. आज नेमकी ती साईट उघडत नाहिये.
इंद्रजाल कॉमिक्स अन त्यातले वेताळ, मेंड्रेक, फ्लॅश गॉर्डन इ. हीरोज माझे लाडके होते.
इटकू पिटकू मिटकू मी आजन्म
इटकू पिटकू मिटकू मी आजन्म विसरू शकत नाही.. किशोरमधलेच होते ना ते?
किशोरला पत्रं पाठवण्याचा
किशोरला पत्रं पाठवण्याचा पत्ता होता : नीलम, वरळी असा. आता जाता येता ती बिल्डिंग दिसते. पण जेव्हा पहिल्यांदा इथे रहायला आल्यावर पाहिली तेव्हा मज्जाच वाटली होती.
किशोर - कॅमल रंगस्पर्धाही असायची प्रत्येक अंकात.
किशोरच्या एका दिवाळी अंकात 'बिली आणि ठेंगूजी' नावाची चित्रमालिका होती. त्यात बिली आणि ठेंगूजी छोटे होतात आणि एका खोलीत ठेवलेल्या अनेक पिंपातील विविध स्वादाची सरबतं पितात असं चित्रं होतं. ती रंगित सरबतं कित्ती तोंपासू दिसत होती. अजूनही ते चित्रं माझ्या डोळ्यापुढे आहे.
इटकू पिटकू मिटकू मी आजन्म
इटकू पिटकू मिटकू मी आजन्म विसरू शकत नाही.. किशोरमधलेच होते ना ते? >>> हो.
Pages