ट्रायथलॉन

Submitted by हर्पेन on 9 July, 2014 - 04:03

हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.

ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.

1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.

Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run

2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.

Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run

3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.

Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)

4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.

Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)

ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX

आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्‍या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.

ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.

तसेच भाग घेऊ पाहणार्‍या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.

भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून तरी भाग घेतला नाही. भाग घेण्याची आणि त्यासाठी तयारी करण्याची भारी इच्छा आहे.

सध्या तरी तसा वेळ मिळत नाहीये. Sad

मध्ये रेडिओ सिटी वर ट्रायथलॉन ची प्रॅक्टिस करुन घेणार्‍या एका कोच / सल्लागाराची मुलाखत होती.
नाव लक्षात नाही आता.

पुण्यात अशा स्पर्धेचे आयोजन करणारी एम आय इनिशिएटिव्हज नावाची एक संस्था आहे.
ही त्यांचे चे.पु. वरचे पान
https://www.facebook.com/pages/Thonnur-Lake-Triathlon/258882474236941#!/...

आणि हा वेबसाईट पत्ता http://miiinitiatives.wordpress.com/category/triathlon/

दिर्घ आणि अतीदिर्घ पल्ले वाचून डोळे पांढरे झाले. Uhoh
सध्या फिटनेस आणि एन्ड्युरन्स वाढवायच्या मागे आहे मी. जवळच्या जिम मधे जाते. नव्या दमानी परत एन्ट्री मारणार पळण्यात.

एक स्पर्धा म्हैसूर जवळ थोन्नुर / टोण्णूर येथे होणार आहे, ज्यात मी भाग घेणार आहे.
https://www.facebook.com/pages/Thonnur-Lake-Triathlon/258882474236941

ही स्पर्धा १० ऑगस्ट रोजी आहे.

गूगल मॅप वर पाहिले असता, हा थोन्नुर / टोण्णूर तलाव श्रीरंगपट्ट्णमच्या पुढे दिसतो. म्हैसूरहून थोन्नुर / टोण्णूर पर्यंत आम्हाला व सायकली नेण्याची सोय आयोजक करणार आहेत. तरीही म्हैसूर मधे कोणत्या उपनगरात राहावे, तसेच त्या सुमारास असलेले हवामान, वातावरण ई. बद्दल माहिती कोणी देऊ शकेल काय?

कोणी तो तलाव बघीतला आहे का?

इन्ना, सई आता वाचलेत न, म्हणजे हा विचार झाला आता उच्चार करा मी हे करणारच म्हणून आणि मग आचार करा, हाकानाका!

खास नवख्यांसाठी कमी अंतरे देखिल असतात / आहेतच.

ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. >>> माझं थोडं confusion होतय. ट्रायथलॉन म्हणजे १०० mtrs पळणे, एक throwing event (Short put, Discuss etc) आणि Long jump असेही काही असते ना?

मागच्या आठवड्यात स्टेट लेव्हल Athletics competitions झाल्या त्यात ट्रायथलॉन मधे १०० mtrs पळणे, Short put आणि Long jump असे combination होते.

'मी नताशा', मी तरी तसे कधी ऐकले नाहीये, अर्थात तीन क्रीडाप्रकार एका मागोमाग केले असता त्याला तांत्रिकदृष्ट्या ट्रायथलॉन म्हणू शकतो. पण सर्व सामान्य पणे पोहोणे, सायकलिंग आणि पळणे हे आणि अशा क्रमाने करण्याला ट्रायथलॉन म्हटले जाते. पुर्वी काही वेळा त्यात कनोईंगचा ही समावेश होत असे.

अधिक माहीती
http://en.wikipedia.org/wiki/Triathlon

हर्पेन माझी गाडी सहा सात किमी पळायच्या पुढे जाईना तेव्हा मुळात काही तरी सुधारायची गरज आहे अस वाटल त्यामुळे ब्रेक के बाद सब सुधारके पळनेको आएंगे. Happy सध्या स्टॅमिना अन फिटनेस.

इन्ना, ते 'अ‍ॅथ्लेटिक इन्साईट'च्या वेबसाईट वर असलेले सगळे व्हिडियो बघायला जमले का?

कोणीच मायबोलीकर नाहीयेत का ट्रायथलॉन केलेले???

मी रवीवार दिनांक १० ऑगस्ट रोजी म्हैसूर येथे होणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या स्पर्धेत भाग घेतोय. माझी उलटी गणती चालू झाली आहे.

तयारी बर्‍यापैकी झालेली असली तरी मनात धाकधुक आहे.

आपल्या शुभेच्छा मोलाच्या आहेत आणि त्यामुळे हव्या आहेत. धन्यवाद Happy

आयर्न मॅन स्पर्धा, भारतातल्या कोण्या व्यक्तीने पहिल्यांदा पुर्ण केली असेल तर अनु वैद्यनाथन हिने
तिच्या मुलाखतीचा हा दुवा
https://www.youtube.com/watch?v=3YinDDfwu6o

मी नताशा.. तुम्ही म्हणत आहात ते अ‍ॅथलॅटीक्स मधले ट्रायथलॉन म्हणता येईल.. हेप्टॅथलॉन किंवा डेकॅथलॉनच्या धर्तीवर... ज्यात ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्डवर असलेल्या खेळांचा सहभाग होतो..

हर्पेन म्हणत आहेत ते ट्रायथलॉन पोहणे, पळणे आणि सायकलिंग ह्याचा समावेश असलेले आहे..

हर्पेन स्पर्धेसाठी शुभेच्छा...

पुण्यातल्या एमआयइनिशियेटीव्हनी घेतलेल्या ट्रायथलॉन मध्ये भाग घेतला होतात का? परत असतील त्यांच्या स्पर्धा यंदा पण..

धन्यवाद हिम्सकूल,

पुण्यातल्या एमआय इनिशियेटीव्हनी घेतलेल्या ट्रायथलॉन मध्ये भाग घेतला होता ना.
त्यांची एक स्पर्धा टिळक तलावावर पोहोणे आणि प्रभात रस्त्यावर पळणे आणि सायकलींग अशी होती त्यावेळी स्प्रिंट अंतर मधे घेतला होता.

त्यांनीच आयोजलेली दुसरी स्पर्धा पोहोणे भुगावच्या मानस लेकमधे व सायकलिंग लवासा रस्त्यावर टेमघर धरणाच्या थोडे पुढे जाऊन परत यायचे आणि आंदगाव येथे पळायचे अशी होती. त्या वेळी ऑलिम्पिक अंतरामधे भाग घेतलेला.

आता ही पण ओपन वॉटर म्हणजे तलावात पोहायची स्पर्धा आहे. आणि अंतर लांब पल्ला

http://www.bushwalking.org.au/FAQ/FAQ_ExpensiveRunningShoes.htm

ह्या धाग्यावरचा स्टीव्ह ज्युरेक आणि आर्नुल्फोचा पळतानाचा फोटो बघ. दोघेही दिलखुलास एन्जॉय करत आहेत पळणे - हा फोटो त्यांच्या ५० मैलाच्या मॅराथॉन दरम्यान घेतलेला आहे

बापरे ! अतिदिर्घ म्हणजे थट्टाच आहे.
पण ज्याला पोहणे फारसे जमत नाही ते बाद या स्पर्धाप्रकारातून.

एक शंका - याचा सिक्वेन्स पोहणे, सायकलिंग, धावणे असाच असतो का? आणि पोहण्याच्याच पोशाखात (आणि ओल्या अंगाने) मग सारे क्रिडाप्रकार करायचे का?

ऋन्मेऽऽष,

ज्याला पोहोणे जमत नाही त्यांच्या साठी ड्युएथ्लॉन असते ज्यात फक्त सायकलींग आणि पळणे असते.

ट्रायथलॉनचा क्रम, पोहणे, सायकलिंग, धावणे असाच असतो.

पोहोण्यानंतर सायकलींग चालू करायच्या आधी आपण जो वेळ लावू तो आपल्याला स्पर्धा पूर्ण करायाला लागणार्‍या एकंदरीत वेळेमधे मोजला जातो. (त्याला ट्रांसिशन पिरीयड म्हणतात)
त्यामुळे जरी, कपडे बदलणे, अंग पुसणे हे सर्व करत बसलात तरी चालते पण वेळ मोडू नये म्हणून बहुतांश स्पर्धक ड्रायफिट कापडाचा पोशाख घालतात व लगेचच पुढे जातात. काही पट्टीच्या स्पर्धकांकडे ट्रायथलॉन सूट देखिल असतात. ओलेत्या अंगावरच वरून एक टी शर्ट अडकवला की झाले, असे करूनही बरेच जण पुढे जातात. अर्थात पोहोण्याच्या वेळेस असलेली टोपी काढून हेल्मेट हे घालावेच लागते.

काही जण सायकल चालवताना पॅडेड शॉर्ट्स वापरतात.
तर असे बरेच पर्याय असतात आणि प्रत्येक जण आपापल्या सोयीने काय ते करतो.

ही शर्यत चेंज ओव्हरच्या वेळेस बघायला जाम मजा येते.. प्रत्येकाचे वेगवेगळे फंडे असतात चेंज करतानाचे.. कित्येक जण तर पोहून बाहेर आले की डायरेक्ट सायकल वर टांग टाकून सुटतात.. आणि बसल्या बसल्याच हेलमेट घालणे, शर्ट बदलणे असले प्रकार करतात... आणि नंतर सायकल सोडून पळायला सुरु करताना पण भारी प्रकार करत असतात..

लंडन ऑलिम्पिक्सची वुमेन ट्रायथलॉन जबरी झाली होती.. फोटो फिनिश होता रिझल्स साठी..... आणि मेन ट्रायथलॉन मध्ये पण एकदम काटें की टक्कर झाली होती..

हर्पेन, स्पर्धेसाठी शुभेच्छा Happy

कालच सकाळच्या पुरवणीत बातमी वाचली. पुण्याच्या डॉ. निशित बिनिवाले ह्याने 'चँलेंज रोथ २०१४' ही ट्रायथलॉन स्पर्धा सलग १४ तास १९ मिनिटं ५० सेकंदांत पूर्ण केली. जर्मनीत झालेल्या ह्या स्पर्धेत ३.८६ किमी पोहणे, १८०.२५ किमी सायकलिंग आणि ४२.१९५ किमी रनिंग करावे लागते.
बिनिवालेने १ तास १९ मिनिटे ३ सेकंदांत पोहणे, ७ तास २५ मिनिटे ४४ सेकंदांत सायकलिंग आणि ५ तास २१ मिनिटं १५ सेकंदांत धावणे पूर्ण केले.

तसेच त्याने ऑस्ट्रियातील आयर्नमॅन ही स्पर्धाही पूर्ण केली आहे त्याचे हे वृत्त.

हर्पेन तुला खुप शुभेच्छा!!

तुझा ट्रायथलॉन वृत्तांत ऐकण्यास उस्तुक आहे.

Pages