Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फक्त कोकणात?? जगभरातील व्हिगन
फक्त कोकणात?? जगभरातील व्हिगन लोक खोबरेल तेल वापरतात. केरळात नॉन-व्हिगन लोक पण वापरतात.
व्हिगन आणि खोबरेल तेल संबंध
व्हिगन आणि खोबरेल तेल संबंध समजला नाही. सर्च केलं तर कॅनोला, ओलिव्ह, तीळ, शेंगदाणा अशी सगळी तेलं व्हीगनच आहेत ना? http://www.isitvegan.com/2014/03/31/is-canola-oil-vegan/
कोकणात खोबरेल तेल, फणसाचे गरे
कोकणात खोबरेल तेल, फणसाचे गरे तळण्यासाठी वापरतात विशेषतः. बाकी बहुतेक शेंगदाणे तेल वापरतात.
अन्जू , काही
अन्जू ,
काही भाज्यांमधे,माशाच्या आमटीला,मासे तळण्यासाठी पण खोबरेल तेलवापरतात.
thanks Arundhati, I have made
thanks Arundhati,
I have made that moong Dose ...come out really nice! thanks for the suggestions and link.
मोड आलेले मूग फ्रिजमधे ३-४
मोड आलेले मूग फ्रिजमधे ३-४ दिवस चांगले राहतात का? जास्त झाले
हो सगळी तेल व्हिगनच पण खोबरेल
हो सगळी तेल व्हिगनच पण खोबरेल तेल गोठते त्यामुळे ते बटर सारख वापरतात. म्हणून ते खो. तेलाच महात्म्य. (त्यावर काहीतरी प्रोसेस असणार अर्थात, मला पूर्ण माहिती नाही)
ओके, बटरला सबस्टीट्युट का.
ओके, बटरला सबस्टीट्युट का. आता झेपलं. पण ब्रेड आणि खोबरेल तेल काही केल्या एकत्र इम्याजीन नाही होते
मोड आलेले मूग फ्रिजमधे ३-४
मोड आलेले मूग फ्रिजमधे ३-४ दिवस चांगले राहतात का? >>> हो. घट्ट झाकणाच्या हवाबंद डब्यात ठेवा.
स्वाती२,
जेवणानंतर गोड म्हणून १ किलो गाजरांचा हलवा ५-६ जणांना भरपूर होतो.
४ पौंड = साधारण पावणे दोन किलो. हिशोब करून ठरवा.
थँक्स ललिता
थँक्स ललिता
खोवलेला ओला नारळ फ्रिजमध्ये
खोवलेला ओला नारळ फ्रिजमध्ये किती दिवस टिकतो? मी स्वैपाकात नारळ वापरत नाही कधी. एरवी चटणीसाठी नारळ आणलाच तर चटणीपुरतं खोबरं काढून बाकी करवंटी तशीच फ्रिजरमध्ये ठेवते.
यावेळी कधी नव्हे ते उरलेला नारळ (अंदाजे अर्धी करवंटी) खवून ठेवलाय? फ्रिजात की फ्रिजरमध्ये कुठे ठेवू जर लगेच वापरायचा नसेल तर?
अच्छा देवकी ओके, मला खरंच
अच्छा देवकी ओके, मला खरंच नव्हतं माहिती. आमच्याकडे फणसाचे गरे तळताना वापरतात. शाकाहारी असल्याने मासे वगैरेबाबत माहिती नाही.
अल्पना खवलेले खोबरे मी फ्रीझरमधेच ठेवते. पण लाईट जात नसतील तर १५ दिवस टिकायला हवं.
आमच्याकडे नारळ उतरवले की दोन
आमच्याकडे नारळ उतरवले की दोन तीन नारळ एकदम फोडले जातात,. त्यामुळे ते सगळे खवून घेते आणि फ्रीझरमध्ये टप्परवेअरच्या डब्यामध्ये घट्ट झाकून ठेवला की चांगला राहतो. पण असा फ्रीझमध्ये ठेवलेला नारळ मी वाटणात वगैरे वापरते. उप्पीट पोह्यावर वरून घेण्यासाठी दडप्या पोह्यांसठी हवा असेल तर मात्र ताजाच खवून घेते.
धन्यवाद ललिता. ५ पौड गाजरांचा
धन्यवाद ललिता. ५ पौड गाजरांचा हलवा केला. भाताच्या मुदाळ्याने मुदी पाडल्या, व्यवस्थित पुरला.
बापरे, काय काय भयानक खातात
बापरे, काय काय भयानक खातात आवडीने कोकणातले लोक?
साती अमितव, कोकोनट स्प्रेड
साती
अमितव,
कोकोनट स्प्रेड म्हणून जे असते ते खूप गुळगुळीत वाटलेले ओले खोबरे असते तेल नाही.
खोबरेल तेल बटर प्रमाणे सॅच्युरेटेड फॅट आहे पण त्यात कोलेस्टोरॉल नसतो. अजून एक वेगळेपण म्हणजे फॅटी अॅसिड चेन्स सॉर्ट आणि मिडियम लेन्थच्या असतात. त्यामुळे बटर पेक्षा चांगले, शिवाय वनस्पतीजन्य. खोबरेल तेल रुम टेंप प्रमाणे गोठलेले ते द्रवरुप अशा वेगवेगळ्या अवस्थेत असते. बाकी कॅलरीज ना फरक नाही. पण आजकाल इथे क्युअरऑल म्हणून बराच बोलबाला आहे. अर्थात शेवटी सॅच्युरेटेड फॅट म्हटले की १०% पेक्षा जास्त वापर केव्हाही वाईटच.
नारळाची करवंटी उलट करून
नारळाची करवंटी उलट करून फ्रीजमध्ये ठेवता येते. ७-८ दिवस आरामात राहतो. रोज वापरत नसाल तर खवून डीप फ्रीज करणे उत्तम.
चिन्नु नारळाची करवंटी फ्रिजात
चिन्नु नारळाची करवंटी फ्रिजात ठेवली तर नंतर खोवता येत नाही
अल्पना - नारळ्खोवून घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रिजर मध्ये चिक्कार टिकतो. अगदी १५ दिवस सुद्धा. मी तसाच वापरते.
हो गं दक्षु. मी कापून तुकडे
हो गं दक्षु. मी कापून तुकडे वाटणात घालते. खवलेला नारळही स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत ठेवला तर राहतो. पण नारळ खवून दोन दिवस तरी कागदावर पसरवून पंख्याखाली वाळवावा लागतो. पण मग ताज्या खवल्या नारळाची चव येत नाही. तरी त्यातल्या त्यात बरे.
मी आगर आगर च्या पट्ट्या
मी आगर आगर च्या पट्ट्या आणल्या आहेत. त्या कशा वापराव्यात आणि प्रमाण काय असते ह्याबद्दल कोणी सांगू शकेल का?
भिजवलेली कणिक तीन दिवसानंतर
भिजवलेली कणिक तीन दिवसानंतर खराब होते काय करु?माझ्याकडुन पीट जास्त होत नेहमी.
कणीक भिजवण्यासाठी कोरडं पीठ
कणीक भिजवण्यासाठी कोरडं पीठ घेतल्यावर त्यातलं अर्धं पीठ पुन्हा डब्यात भरून ठेवा आणि मग तेल, मीठ, पाणी इत्यादी घालून कणीक भिजवा.
भिति वाट्ते कमी होते की काय
भिति वाट्ते कमी होते की काय पण फ्रीज मध्ये तिसर्या दिवशी फसफसते का बर?
मोठाच प्रश्न आहे खरा...
मोठाच प्रश्न आहे खरा...
सीमा, कणीक जास्तीत जास्त
सीमा, कणीक जास्तीत जास्त दुसर्या दिवसापुरती भिजवा. तसेच फ्रीज चेक करुन घ्या कूलींग कमी होतंय का बघण्यासाठी.
१-२ दिवस वाटीने मोजुन कणीक
१-२ दिवस वाटीने मोजुन कणीक घ्या. पोळ्या मोजा. आणि एकदा अंदाज आला की मग नाही कमी पडणार किंवा उरणार.
आता असच करते.
आता असच करते.
कणके संबंधीचं प्रश्न होता,
कणके संबंधीचं प्रश्न होता, सध्या पुण्यात जर कणीक आदल्या दिवशी मळून ठेवली - रात्री ८-९ ला आणि सकाळी उठून पोळ्या केल्या ७ च्या आसपास तर कणीक बाहेर - फ्रीजमधे नाही - खराब होईल का ?
फ्रीजमधे ठेवली कणीक की मला पोळ्या चांगल्या जमत नाहीत - आधीचं उल्हास तशातली गत.......
बाहेर ठेवली तर खराब होईल. पण
बाहेर ठेवली तर खराब होईल.
पण रात्री मळून एअरटाइट डब्ब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवली तर खराब नाही होणार. कणिक भिजवल्यावर, डब्ब्यत ठेवायच्या आधी कणकेवर एक तेलाचा हात फिरवून घ्या. आणि सकाळी पोळ्या करायच्या आधी अर्धा तास कणिक बाहेर काढून ठेवा. म्हणजे मग ताज्या कणकेसार्खी होते कणिक.
मी कणकेसाठी घट्ट पीठ मळते .
मी कणकेसाठी घट्ट पीठ मळते . कधीतरी २ दिवसाच एक्दम . मग तेन्व्हा अर्धा गोळा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीझर् मध्ये ठेवते. दूसर्यादिवशी रात्री फ्रीझमध्ये ठेवते. सकळी उठल्याबरोबर बाहेर काढून ठेवतढ, साधारण ३० मिनिटात पोळ्या करायला घेते. फ्रीझमध्ये ठेवल्याने थोडे पाणी सुटते , त्याने कणिक थोडी मउ होते.
सीमा , कणिक फ्रीझमध्ये ठेवतानाच , शक्य असल्यास गोळे करून मोजुन ठेवा . उरलेले पीठ फ्रीझर्मध्ये टाका. टिकायला पाहिजे .
Pages