स्वर सुमनांजली

Submitted by हिम्सकूल on 22 July, 2014 - 09:20
ठिकाण/पत्ता: 
ज्योत्स्ना भोळे सभागृह, तिसरा मजला, हिराबाग, पुणे ३०

येत्या शनिवारी दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ६ ते ९ ह्या वेळेत "स्वर सुमनांजली" ह्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, पुणे येथे करण्यार आले आहे.

माझे आजोबा श्री. म. ना. कुलकर्णी ह्यांनी नुकतेच ८५ व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि नुकतीच गुरु पौर्णिमा देखील झाली आहे.

तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

कार्यक्रमात आजोबांचे ज्येष्ठ शिष्य रघुनाथ खंडाळकर आणि तीन ताज्या दमाचे शिष्य सुरंजन खंडाळकर, रश्मी मोघे व चैतन्य जोगाईकर त्यांची कला सादर करणार आहेत. सगळ्या सुगम रचना आजोबांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत, तर शास्त्रीय चीजा ह्या पारंपारिक आहेत.

सर्वांना ह्या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण..

माहितीचा स्रोत: 
मीच...
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 26, 2014 - 08:30 to 11:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. कार्यक्रमास अनेक शुभेच्छा !
रेकॉर्ड करणार असाल तर यूट्यूब/ साउंड क्लाउड वगैरे अपलोड करा नक्की.

....

सगळ्या सुगम रचना आजोबांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत>>>>>क्या बात है!! मस्तच!
कार्यक्रमास खुप खुप शुभेच्छा!!!!! Happy