मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असु दे Proud

मला नेमकं काय म्हणायचंय ते मला सांगता येत नाहीये पण तो पार्टच फार क्युट आहे.

१०० मार्क्स तुला रीया.

तीला वाट चालत असताना आलेला कंताळा घालवायच गमक सापडलय आणि त्याला नाही असं काहितरी जाणवलं मला त्या नेम चुकण्यातून Happy

आणि तरीही तो तिच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय.
नॉर्मली कोणतेही खेळ दाखवायचे झाले की बॉईज ते पर्फेक्टली खेळतायेत असं दाखवलं जातं पण यात मात्र ती एकदम पर्फेक्ट आहे आणि तो ते पर्फेक्शन एंजॉय करतोय.
मला फार आवडते ती अ‍ॅड Happy

बिग बझारची नवी अ‍ॅड की जुनीच आहे माहीत नाही पण पाहीली का...आग्गाव आजी आणि भारतीय चूळबूळ >> अणुमोदण.... मुळ्ळीच आवडली नाहीये ती जाहीरात...

कॅडबरीची नवीन बर्फातली जाहिरात छान आहे
>>
बिग बझारची नवी अ‍ॅड की जुनीच आहे माहीत नाही पण पाहीली का...आग्गाव आजी आणि भारतीय चूळबूळ >>

या दोन्ही अ‍ॅडची लींक द्या ना. मला नाही सापडल्या. Sad

ती अ‍ॅड फालतु आहे खरच.पण जाहिरातीत असं सार्वत्रिक सत्य दाखवणं जास्तच आवडलं.
सगळ्यांच्याच घरची स्थिती अशी असते पण आजी जरा आगाऊ बाई दिसते.कदाचित लैंगिक शिक्षणाची पुरस्कर्ती असावी.. Happy

आग्गाव आजी आणि भारतीय चूळबूळ >> http://www.youtube.com/watch?v=51vVKM08M3I घ्या...

ही आज्जी आवडते म्हणून ही ठीक ठाक वाटली http://www.youtube.com/watch?v=GL5SxKXvHfo

ही मॅजिक मॉप ची http://www.youtube.com/watch?v=FBY2qppiSC4

कॅडबरीच्या सगळ्याच आवडतात... निम्रतची आधीची नव्हती आवडली पण ही आवडली... मस्तंय खूप वेळा पाहीली तरी फ्रेश वाटते अ‍ॅड!!

ओक्के रिया! Happy

>>बिग बझारची नवी अ‍ॅड की जुनीच आहे माहीत नाही पण पाहीली का...आग्गाव आजी आणि भारतीय चूळबू

आज्जींचा एकंदरीत आविर्भाव पाहून आजोबा लवकर वर गेलेत ते बरं झालं असं वाटलं. ह्या आज्जी त्यांना उतारवयात भारी पडल्या असत्या Wink पण एकंदरीत जाहिरात आणि प्रॉडक्ट ह्यांचा संबंध अगदीच बादरायण वाटला.

आग्गाव आजी आणि भारतीय चूळबूळ <<<
टुकार अ‍ॅड आहे ती.

सिर्फ दो चमच वाली अ‍ॅड प्रचंड आवडलेली आहे. आजीचा परफॉर्मन्स एक नंबर त्यात. ती नर्स आजीने आणलेला डबा जेवते आणि दुसर्‍या दिवशी आजी येते तेव्हा तिला गुडमॉर्निंग म्हणते. त्यावर आजी उत्तरात गुडमॉर्निंग म्हणते त्या एका गुडमॉर्निंगमधे सर्व काही आहे. चक्क ही मला गु मॉ म्हणतेय याचे आश्चर्य, आज परवानगी देईल की काय याची आशा, आनंद सगळंच....
कोणी बनवलीये ही अ‍ॅड पाह्यलं पाहिजे.

काल क्रिकेटमॅचच्या मधे अजून एक आजी-आजोबांची जाहिरात पाहिली.
आजी - ज्योती सुभाष, आत खोलीत बसलेल्या असतात; आजोबा (कलाकार माहिती नाही) बाहेर बाल्कनीत उभ्या-उभ्या माफक व्यायाम करत असतात. दोघंही एकमेकांबद्दल प्रेक्षकांशी बोलतात. लटक्या तक्रारी, कसं फसवलं, आडून-आडून एकमेकांबद्दल काळजी घेणं, वगैरे. त्यांच्या वाक्यातून ते एकमेकांसाठी किती पर्फेक्ट फिट्ट कपल आहेत हे समजतं.
जाहिरातीची टॅग लाईन पण तशीच काहीशी आहे - जेव्हा आयुष्यभर तोलामोलाची साथ मिळते.. तेव्हा.. पुढे <काहीतरी. काहीतरी>

पूर्ण जाहिरात पाहता आली नाही, कारण दरम्यान पुढली ओव्हर सुरू झाली Angry

होंडाच्या नवीन कार ची तमिळ्मधली अ‍ॅड २/३ दिवस झी मराठीवर का येतेय ?
होंडा चे मार्केटिंग एक्झिक्यूटिवस दोन पेग लावूनच कामावर येतात की काय ?

ती सेट मैक्सची जाहिरात मस्तय

दिवे जातात तेव्हा एक आजी गाण गुणगुणत असते . मग दिवे येतात . गुणगुण बंद होते. आजोबा दूसरीकडून बघत असतात . गुणगुण बंद झालेली पाहताच समजून जाऊन मुद्दामहुन दिवे घालवतात . गुणगुण परत चालू होते
मस्त वाटल ती जाहिरात पाहून

एक कुठल्याशा विमा कंपनीची जाहिरात - मुलगी आणि बाप गाडीतून जात असतात. मुलगी फोनवर मैत्रिणीच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून तिचं सांत्वन करते. फोन ठेवल्यावर ती बापाला म्हणते 'तुमचं काही असं बरवाईट झालं तर मी लग्न नाही करणार; आई आणि बहिणीची काळजी घेईन.'
काय आगावूपणा!!
त्याच कंपनीच्या आणखी एक दोन अशाच धर्तीच्या जाहिराती आहेत आणि त्या सगळ्या अशाच आगावू आहेत. ह्या जाहिरातीच्या आधारे मी तरी ह्या कंपनीकडे माझा इन्शुरन्स नक्कीच काढणार नाही!!
OLX च्या जाहिराती लक्षवेधी असल्या तरी चंगळवादाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. अगदी स्पोर्टिंग स्पिरीटने घ्यायच्या म्हटल्या तरी पटत नाहीत.

काल क्रिकेटमॅचच्या मधे अजून एक आजी-आजोबांची जाहिरात पाहिली.<<<<<<
फेडरल बॅंक. त्याच्या तीन जाहिराती (वॉक, मेडिसिन, जोक) आहेत. तिन्ही मस्त आहेत.

http://www.youtube.com/watch?v=CCgHQXXqI1s

बाजूला उरलेल्या दोन जाहिराती येतात.

केबीसी ची कोहिमा -जानते सब है मानते कितने है... यहाँ सिर्फ पैसे नहीं दिल भी जीते जाते है.. सुपर बेस्ट आहे!! अमिताभ द ग्रेट.

केबीसी ची कोहिमा -जानते सब है मानते कितने है... यहाँ सिर्फ पैसे नहीं दिल भी जीते जाते है.. सुपर बेस्ट आहे!!>>> प्रचंड अनुमोदन. खरच बेस्ट आहे.

ह्या जाहिरातीच्या आधारे मी तरी ह्या कंपनीकडे माझा इन्शुरन्स नक्कीच काढणार नाही!!

>>> मी उलट म्हणेन. घरातल्या मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय करायचं याचा आधीच विचार करून ठेवलेला केव्हाही प्रॅक्टिकलच ठरतो!

श्रद्धा, येस्स! फेडरल बँक! Happy

डोकोमोची श्वानांना शर्ट शिवणारी मुलगी आणि रीचा शर्मा? काय ए हे नेमकं?

>> ती तिच्या कुत्र्याला बॉफ्रे चे शर्ट घालुन इट्स ओव्हर म्हणते. ब्रेकप करतांना अपमान करायचा एक प्रयत्न.

एखाद्या जाहिराती वर बंदी आणायची असल्यास काय करावे? किंवा आपला निषेध कसा व कुठे नोंदवावा?

>> तुम्हाला कोणत्या जाहिरातीवर बंदी आणायची आहे?

Pages