भरतवर्षात चलच्चित्रपट जनतेस प्रिय झाल्याने कवींनी पार्श्वभागी वाजणा-या गीतांकरिता कविता लिहीण्यास सुरुवात केली. हिंदी नामक भाषेच्या चलचित्रपटांच्या सुवर्णकाळी अमिताभ बच्चन नामक देवाने जनतेस दर्शन देऊन बोध दिला. याकामी या दिव्यवाणीस एका पवित्र आणि आनंदी आत्म्याची साथ लाभली ज्यास सामान्य गण भप्पी लाहीरी या सामान्यनामाने ओळखत. अंजान या विशेषनामाने प्रत्यक्ष भगवंताचेच शब्द या स्वरसाजातून जनतेत रुजले ते असे..
प्रथम परीच्छेद (कडवे)
अरे अरे अरे ना ना ना...
आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ
आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ
हमें जो उठैइओ तो - 2, खुद भी रपट जैययो
हा खुद भी फिसल जैययो
आज रपट हा हा आज रपट जैययो तो हमें ना उठैइओ
द्वितीय परीच्छेद
बरसात में थी कहा बात ऐसी पहली बार बरसी बरसात ऐसी - 2
कैसी यह हवा चली, पानी में आग लगी, जाने क्या प्यास जगी रे
भीगा यह तेरा बदन, जगाए मीठी चुभन
नशे में ज़ूमे ये मन रे, कहा हू मैं मुझे भी यह होश नही
हा हा हो हो - 2, (आज बहक जाए तो होश ना दिलाईयो - 2)
होश जो दिलाईयो तो - 2, खुद भी बहक जैययो
आज रपट हा हा आज रपट जैययो तो हमें ना उठैइओ
तृतीय परीच्छेद
(बादल में बिजली बार बार चमके
दिल में मेरे आज पहली बार चमके) - 2
हसीना डरी डरी, बाहों में सिमट गयी, सीने से लिपट गयी रे
तुझे तो आया मज़ा, तुझे तो आई हसीन, मेरी तो जान फसी रे
जानेजिगर किधर चली नज़र चुराके
हा हा हो हो - 2, (बात उलझ जैययो तो आज ना सुल्झैयो - 2)
बात जो सुल्झैयो तो - 2, खुद भी उलझ जैययो
आज रपट हा हा आज रपट जैययो तो हमें ना उठैइओ
अंतीम परीच्छेद
बदल से छम छम शराब बरसे सावरी घटा से शबाब बरसे-2
बूँदों की बजी पायल, घटा ने छेडी ग़ज़ल, ये रात गयी मचल रे
दिलों के राज़ खुले, फ़िज़ा में रंग घुले, जवां दिल खुलके मिले रे
होना था जो हुआ वही अब डरना क्या
हा हा हो हो - 2, (आज डूब जाए तो हमे ना बचाईयो - 2)
(हमे जो बचाईयो तो - 2), खुद भी डूब जैययो
आज रपट हा हा आज रपट जैययो तो हमें ना उठैइओ
आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ, (हा हा हो हो - 2)
रसग्रहण, दिव्यबोध आणि तिरोभाव
प्रथम परीच्छेद (कडवे)
नायक अरे अरे ना ना म्हणत आहे म्हणजेच त्याला अतीव आश्चर्य झालेले असून जे काही घडते आहे त्यासाठी तो आंतरिकदृष्ट्या तयार नसावा. पण तो कशासाठी तयार नाही याचं कोडं आपणास उलगडते ते म्हणजे नायक म्हणत आहे की जर आज घसरून पडलो तर मज उठवू नका नाहीतर आपणही घसरून पडाल. यावरून नायक कनवाळू असून स्वत:स त्रास झाला तरी इतरांना तो होऊ नये हीच त्याची इच्छा असल्याचे दिसून येते. स्वत:स ठेच इतरांसाठी शहाणा असा हा आपला नायक ज्या चिखलात घसरला आहे तो चिखल अत्यंत निसरडा आहे हे त्याला कळून चुकलेले आहे.
द्वितीय परीच्छेद
पूर्वी असा पाऊस कुठे होता, ही हवा कुठली, पाण्यात आग कशी काय लागली, ही कुठली तहान लागली असे प्रश्न नायक जमान्यास विचारत आहे. अर्थातच हा चिखल अनीतीचा, भ्रष्ट आचरणाचा आणि कलियुगाचा असून आत्मा कष्टी झालेला आहे. आत्मा या दूषित वातावरणात होरपळत असून प्रभूकृपेची बरसात नायकाला अपेक्षित आहे. भक्तिरसात नायक इतका डुबून गेला आहे. की त्यास नरकयातनाही गोड वेदनांसारख्या भासत आहेत. एका अनामिक नशेत त्याचं मन तरंगते आहे, झुलते आहे, त्यास आता आत्मभान नाही की स्थळकाळ वगैरेंची जाणीव राहीलेली नाही.
तृतीय परीच्छेद
उपस्थित गणहो
लैकिकार्थाने आपणास जसे वाटते आहे तसे हे प्रकरण नाही. ढग म्हणजे संशयाचे, नकारात्मक घटनांचे मळभ. असे मळभ भरून आलेले असता अचानक विद्युल्लता चमकावी तशा दिव्ह कल्पना नायकापर्यंत येत आहेत , त्याच्या ह्रदयात दिव्य कल्पनांनी पहिल्यांदाच उचंबळ आलेला आहे. निराशेचे मळभ दूर जात असता, नियती रुपी सुंदरी लाजत लाजत, दचकत बिचकत आंदोलित गतीस प्राप्त होऊन नायकास शरण जात त्याच्या बाहुपाशात विसावलेली आहे. ती म्हणते आहे तुझी तर मज्जा झाली, माझा तर जीव टांगणीला लागला ना !
अशा रीतीने आत्मिक तेजाने भक्तीची पूजा आराधना केल्याने नियतीचे मथवणे साध्य होते असा नायकास दिव्य साक्षात्कार झालेला आहे आणि तो जडावस्थेस प्राप्त जाहला आहे..
अंतीम परीच्छेद
हे दिव्य गण, हे प्रिय साधक, हे दिव्य वाचक आपणास आता या कडव्याचा तिरोभाव काय विदीत करावयाचा ? किंकिणीच्या किणकिणाटातून आपणास तो कधीच पोहोचलेला आहे. भक्तगणहो, आपण अनुलेखन न करता या अंतिम उता-यात असलेल्या दिव्य संदेशाचे जे रसग्रहण केले असेल त्याचे अलेम्बिक पद्धतीने अवगुंठन करून गूढार्थ कथन करावा ही नम्र विनंती.
नेत्रकर्णशांती http://www.you
नेत्रकर्णशांती
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=WlkJtvpcAsU
(No subject)
गब्बरसिंगचा एक निबंध येत असतो
गब्बरसिंगचा एक निबंध येत असतो की तो कसा कलेचा चाहता होता. लोकांनी मरताना हसत मरावे म्हणुन कसे त्याने कालिया आणि दोघांना मारण्याआधी हसवले, इ.
अगदी त्या निबंधाची आठवण आली वाचून. _/\_
अगदी त्या निबंधाची आठवण आली
अगदी त्या निबंधाची आठवण आली वाचून.>>>>
__/\__
एका असामान्य प्रतिभेबरोबर गरीबाची (गब्बरशी) तुलना.. थट्टा करताय ना महेशराव ?
आग लागो त्या रसग्रहणाला. जरा
आग लागो त्या रसग्रहणाला. जरा डोळे बंद करुन अमिताभ आणि स्मिता पाटीलचा तो रोमान्स आठवा. नळीवर जर लिंक सापडली तर द्या. इतक्या रोमेंटीक गाण्याच इतक गद्य रसग्रहण का करताय ? पावसाळा लांबलाय म्हणुन ?
या गाण्यात स्मिता पाटील
या गाण्यात स्मिता पाटील म्हणजे काहीतरी भलताच प्रकार आहे.
घरातल्या एखाद्या काकू किंवा मावशीने पावसात असल्या गाण्यावर नाच केल्यावर जसे वाटेल तसे वाटते
घरातल्या एखाद्या काकू किंवा
घरातल्या एखाद्या काकू किंवा मावशीने पावसात असल्या गाण्यावर नाच केल्यावर जसे वाटेल तसे वाटते >>>
डोण्ट अंडरएस्टीमेट द पावर ऑफ कॉका / कॉमा
कॉमन काकू , मावशी
.
.
कवींनी पार्श्वभागी वाजणा-या
कवींनी पार्श्वभागी वाजणा-या गीतांकरिता कविता लिहीण्यास सुरुवात केली.
>>>
पार्श्वभूमीवर म्हणा हो , हे फारच भयंकर आहे ::फिदी:
Nishabvul, blog chi link
Nishabvul, blog chi link denyacha karan kalu shakel ka?
Mahesh yana nibandh athavala
Mahesh yana nibandh athavala he ek vel thik ahe. Pan kahich n vacharata ashi link deun kay sangayache ahe ? He rs fakt mauj maja mhanun kele ahe. Gane aikat asatana adhatma ani shabd yanche fusion samor ale. Link denya sathi majhe swathache sahitya dhigane aahe. Sumar likhan vachanyasathi velhi nahee ani asha sumar lekhakanchya uthal pratikriyela mahatva dyalahi.
Ajun kunala kahi athavale ka?
.
.
ब्रह्मानंद आठवले , हा प्रकार
ब्रह्मानंद आठवले , हा प्रकार काय हाय .....
Mandar joshi; tuzyasarakha
Mandar joshi; tuzyasarakha falatu nahee prakar. Admin chya viput tuzi garal vachunn alo . office madhe २ paishache tari kam karat ja.
मी तुमचा लेख वाचला आणि मला
मी तुमचा लेख वाचला आणि मला त्याचाशी साधर्म्य असलेला ब्लॉग आठवला म्हणून मी ती लिंक शेअर केली . त्यामागे काही प्रमोशन करण्याचा हेतू नव्हता. असेल तुमचे ढिगाने लेख. माझा त्याचाशी काही संबंध नाहीये. माझ्या लिंक शेअरिंग मुळे अशी प्रतिक्रिया मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मी आता ती लिंक delete केली आहे. यापुढे योग्य ठिकाणीच प्रतिक्रिया देण्याची काळजी घेईल. धन्यवाद.
तिसर्या परिच्छेदात नायकाला
तिसर्या परिच्छेदात नायकाला दिव्य साक्षात्कार झाला आहेच त्यामुळे अंतिम परिच्छेदाच्या पहिल्या दोन ओळीत तो जे म्हणतोय त्याला अत्यंत गुढ अर्थ आहे. संशयाचे, नकारात्मक घटनांचे मळभ दूर झाल्यामुळे आता जे ज्ञान त्याला मिळत आहे ते दारूप्रमाणे शुध्द आहे, आणि त्याला मादकतेचा सहवास आहे, त्या ज्ञानाच्या कणाकणात संगीतातील पवित्रता आहे. त्या दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्याला सर्व विश्वातील गुढ गोष्टींचे आकलन झाल्यामुळे जे व्हायचे ते होणार मग घाबरायचे कशाला हा दिव्य संदेश पुढील दोन ओळींद्वारे तो आपणास देत आहे. दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीमुळेच आज आपण ह्या अज्ञानी जगात बुडालो तरी काही नाही कारण आपण तरून जाऊ शकतो हे त्याला माहित आहे पण इतर कोणाला ते जमणार नाही म्हणुन तो इतरांना तसे करण्यास परावृत्त करत आहे.
Nisha bagul net milaya nantar
Nisha bagul net milaya nantar spashtach lihito. Pratikriya yogya thikanee yogyach dya Tumhee koni ka asena.
चिखलात दगड फेकला तर आपल्याच
चिखलात दगड फेकला तर आपल्याच अंगावर शिंतोडे उडतात हे विसरले मी. Anyways मला ही गोष्ट अजून वाढवायची नाहीये. पूर्णविराम
असेच काही नाही काही . योग्य
असेच काही नाही काही . योग्य कोनातून दगड फेकल्यास आपणही वाचतो आणि चिखल दुसर्याच्या अंगावरही उडतो. तंत्र म्हत्वाचे
nishabagul यांना अनुमोदन
nishabagul यांना अनुमोदन
ब्र.आ. एवढे चिडताय काय राव ?
ब्र.आ. एवढे चिडताय काय राव ? स्पोर्ट्समनशिप च्या अंगाने घ्या की !
मी जो निबंध म्हणत होतो तो खुप काळ झाला सोशल मिडियात फिरत आहे,
तुमचे लिखाण साधारण त्या धर्तीचे वाटले म्हणुन म्हणालो.
http://www.unp.me/f8/gabbar-singh-characterization-152139/
रॉहू
रॉहू
रॉहू सगळेच प्रतिसाद लै भारी.
रॉहू
सगळेच प्रतिसाद लै भारी. आपल्याला आवडले.
माने. खासच !!
पण हा धागा काही चालणार नाही
जिवावर आलं होतं उत्तर द्यायच. ते विचारवंत अॅडमिनच्याओकापूत रांगोळ्या काढतात आणि इकडे दुस-या आयडीने टाईमपास करतात काय, धागा वादग्रस्त व्हावा म्हणून जी जानसे प्रयत्न काय करतात, त्यांच्या वैरिणीशी सहमत होतात काय... विसरलाय का जोशी?
@ निशा बागूल
मी तुमच्या जागी असतो आणि मला असं वाटलं असतं की इथून हे कॉपी केलं आहे तर मी सरळच विचारणा केली असती. पण तेव्हढा विश्वास असायला हवा होता. हे घुमा फिराके फारच हास्यास्पद असतं. साधर्म्यच दाखवायचं तर दोन शब्द या धाग्यावरच्या लिखाणाबद्दल (टुकार आहे, भिकार आहे वै) दिसले असते. बाकी तुमचा चिखल कुठल्या बागेतला आहे, त्यात तुम्ही कशा आपटल्या आणि तुमची कशी अवस्था झाली यावर हे फोट्ट्फोट्ट होतं हाही योगायोगच की.. अशा चिखलात जाऊन त्या बागेतली फुलं तोडायची तयारी माझी तरी नाही. ढुंकूनही पाहीलेलं नाही कधीच... इतकं सांगितल्यावर पटलंच असेल.
काय महेशराव, तुमची खिलाडू वृत्ती बघतोच आहे की कधीचा... वारंवार भरून येतंय.
हे तिरोभाऊ कोण? लेख अन
हे तिरोभाऊ कोण?
लेख अन प्रतिसादात कुठेच दिसेनात.
तिरोभाव शब्दार्थ शोधा
तिरोभाव
शब्दार्थ शोधा