नमकहलाल

आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ - रसग्रहण, दिव्यबोध आणि तिरोभाव

Submitted by ब्रह्मांड आठवले on 7 July, 2014 - 11:12

भरतवर्षात चलच्चित्रपट जनतेस प्रिय झाल्याने कवींनी पार्श्वभागी वाजणा-या गीतांकरिता कविता लिहीण्यास सुरुवात केली. हिंदी नामक भाषेच्या चलचित्रपटांच्या सुवर्णकाळी अमिताभ बच्चन नामक देवाने जनतेस दर्शन देऊन बोध दिला. याकामी या दिव्यवाणीस एका पवित्र आणि आनंदी आत्म्याची साथ लाभली ज्यास सामान्य गण भप्पी लाहीरी या सामान्यनामाने ओळखत. अंजान या विशेषनामाने प्रत्यक्ष भगवंताचेच शब्द या स्वरसाजातून जनतेत रुजले ते असे..
प्रथम परीच्छेद (कडवे)

अरे अरे अरे ना ना ना...
आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ
आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ
हमें जो उठैइओ तो - 2, खुद भी रपट जैययो
हा खुद भी फिसल जैययो

Subscribe to RSS - नमकहलाल