Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेदे आता गर्जू लागली आहे की
मेदे आता गर्जू लागली आहे की वर्षभर तिने भलत्याच आदित्यच्या प्रेमामुळे ह्या आदित्यला चार हात दूर ठेवल्याचे सगळ्यांना सांगणार! >>>>
निदान त्यामुळे तरी देसायांच डोक चाललं तर 'रात्रीची' वाट पहावी लागणार नाही , सार कुटुंब मायनस आदे-मेदे पिक्निक ला जातील .
माझा अंदाज - मेघना आदे
माझा अंदाज -
मेघना आदे फिरायला जातील... आदेचा अॅक्सिडेंट होईएल. इकडे मेघनाची पेटी आर्चुला सापदेल...
) किंवा कोमात जाईल. मेघनाला दिवस जातील. थोडे दिवस आर्चु तिचा कोणाचं बाळ आहे म्हणून छळ करेल मग ती प्रूव्ह करेल की आदेचंच बाळ आहे (कसं ते माहीत नाही) आदेची सेवा करून त्याला कोमातून बाहेर काढेल आणि आपल्या बाळाला राक्षसी असल्याच्या आरोपातून बाहेर काढेल 
आदे मरेल (काश इथे मेघना मरेल लिहिता आलं असतं
मला एकदा त्या नव्या वळणाची जाहिरात पाहिला हवी मगच पर्फेक्ट अंदाज बसेल असं वाटतय
>>>>>>>>>निदान त्यामुळे तरी
>>>>>>>>>निदान त्यामुळे तरी देसायांच डोक चाललं तर 'रात्रीची' वाट पहावी लागणार नाही
.
इच्छा तेथे मार्ग
परंतु इथे तीच तर नाहीये
झपाटलेला माणूस दिवस कि रात्र पाहत नाही
मालिका कुठल्यातरी खतर्नाक
मालिका कुठल्यातरी खतर्नाक मूर्ख वळणावर जाणार हे नक्की
नक्षीदार पेटी, राक्षसी बाळ, कबाब मधे रोज एक नवी हड्डी, घरच्यांना सगळ्ळं सांगायचा बेत असं साहित्य जमा केलय
आता कोणती पांचट रेसिपी खिलवणार ते बघायचं शिल्लक आहे
अरे मला कुणीतरी आधी हेच
अरे मला कुणीतरी आधी हेच सान्गा, की आदे-मेदे मध्ये कबाब मे हड्डी का येत असते दररोज? म्हणजे घरच्याना आधीच पत्ता लागला होता का मेदे जमिनीवर आणी आदे बेडवर असे वेगवेगळे आराम करतात?( आराम करतात हे फारच सभ्य वाक्य लिहीले आहे, समजून घ्यावे)
का त्या ढालगज, भोचक अर्चुने यान्च्या रुममध्ये छुपा कॅमेरा बसवलाय? की आणखीन काही? कारण साबुन्च्या कृपेने ही मालीका मधूनच ट्रेलर सारखी बघावी लागते. ते दर अर्ध्या मिनीटाला चॅनेल बदलतात. मध्येच रेशीम गाठी आणी मध्येच माझे मन तुझे झाले. आता काही दिवसानी दोन्ही सिरीयलच्या हेरॉइनी एकत्र होतील बहुतेक.
आणी ही अतीशय पाणचट व पाचकळ मालीका असल्याने मला मुलीसमोर लावता येत नाही,
रश्मी... घरच्या लोकांचे
रश्मी... घरच्या लोकांचे नॉर्मलच आहे वागणे, त्यातून त्यांना वाटत आहे आताच दोघे काही दिवस बाहेर जाऊन आलेत(एकदा विजया आणि आर्चू असे बोलल्याही होत्या) मग कशाला हवाय एकांत! पण त्यांना कल्पना सुद्धा नाही आदे-मेदे मधे काय चालू आहे ते.
अरे! तुम्ही सगळे इतके बेचैन
अरे! तुम्ही सगळे इतके बेचैन का होताय? आत्ता कुठे १८०+ एपिसोडनंतर वटपौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर 'हम दिल दे चुके सनम' ची कहाणी संपुन मालिका सुरु झाली आहे. आदे आणि मेदे यांच्या एकदाच्या रेशिमगाठी (?) जुळल्या ना! मग संपला 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा.
मग इतक्यात वैतागलात? मालिका आणखी किती वर्ष चालु शकते हे वेगळे सांगायला नको आहे! मालिका संपायला आपल्याला अजुन काहीशे एपिसोड/ कित्येक वर्ष वाट पहायची आहे. तेव्हा धिर धरा.
>>>>>>>>अरे! तुम्ही सगळे इतके
>>>>>>>>अरे! तुम्ही सगळे इतके बेचैन का होताय? आत्ता कुठे १८०+ एपिसोडनंतर वटपौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर 'हम दिल दे चुके सनम' ची कहाणी संपुन मालिका सुरु झाली आहे. आदे आणि मेदे यांच्या एकदाच्या रेशिमगाठी (?) जुळल्या ना! मग संपला 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा.
मग इतक्यात वैतागलात? मालिका आणखी किती वर्ष चालु शकते हे वेगळे सांगायला नको आहे! मालिका संपायला आपल्याला अजुन काहीशे एपिसोड/ कित्येक वर्ष वाट पहायची आहे. तेव्हा धिर धरा.
.
देवा मला दूरदृष्टी दे
मला पण समजून घ्यायचे आहे
घरातले सर्वजण इतके टक लावून काय पाहत असतात
सोनाली मला मग असे वाटतेय की
सोनाली मला मग असे वाटतेय की आता अर्चु आणी विजयाला फिरायला जायला मिळाले नाही म्हणून त्या असा वचपा काढत असाव्यात.:फिदी:
(No subject)
छळवाद आहे नुसता. हल्ली मेदेचं
छळवाद आहे नुसता. हल्ली मेदेचं ते छापील एक्सप्रेशन परत आलंय. फक्त पुढे काय झालं ही चिरंतन उत्सुकता असल्याने बघावी लागते. येत्या काही दिवसांत साबा रहायला येणार आहेत. तेव्हा मात्र भक्तीभावाने लावणार ही सीरियल. सासूबै कशा असतात हे दाखवायला!
(No subject)
रश्मी हल्ली दोन महीने माझे मन
रश्मी हल्ली दोन महीने माझे मन तुझे झाले, बेकार झालीय म्हणून मी मधेच कधीतरी बघते नाहीतर माझी आवडती होती ती मालिका.
एक गंमत वाटली रश्मी तुझ्या
एक गंमत वाटली रश्मी तुझ्या पोस्टची, दोन्ही हिरॉईन्स एक होण्याची तसं झालं तर आदित्य देसाई खुश होईल माझे मनच्या शुभ्राला बघुन, लॉटरी लागेल त्याला पण मेघनाला बघुन तिथला शेखर डोक्याला हात लाऊन बसेल, माझ्या डोळ्यासमोर आलं हे सर्व. (दोघींची अदलाबदल झाली तर असं इमॅजिन केलं मी).
सिरियल आहे का येड्यांचा बाजार
सिरियल आहे का येड्यांचा बाजार तेच कळंना झालंय आजकाल.
दक्षिणा
दक्षिणा
बुगु बुगु बुगु बुगु जय हो
बुगु बुगु बुगु बुगु
जय हो बाबाजी, जय हो
अन्जू मी अजूनही बघते
अन्जू मी अजूनही बघते मामतुझा..उलट आता रन्गत आलीय, नन्दिनीचे खरे रुप शेखर समोर उघड करण्या करता शुभ्रा सासुची मदत घेऊन जी मस्त हेरगिरी करते ते पहाण्यासारखे आहे. शुभ्राचा कणखरपणा मला आवडला, नाहीतर त्या असावा सुन्दर मधली बावळट्ट ईश्वरी अन्किता आणी तिच्या आत्याचे घाणेरडे चाळे उगाच देवत्वाचा आव आणुन सहन करते.:राग:
ईश्वरीच्या जागी ही शुभ्रा असती तर त्या एन के ची मदत घेऊन अन्किता ही आरवच्या मुला/मुलीची नव्हे तर एन केच्या बाळाची आई होणार आहे असे सिद्ध करुन अन्किताला हाकलली असती.
सॉरी बरेच अवान्तर झालेय, पण रेशीमगाठी आणी होणार सून च्य ऐवजी आता या दुसर्या सिरीयल ( मी फक्त माझे मन तुझे झालेच बघते) कधीतरी वेगळा विषय म्हणून बर्या वाटतात.
हो रश्मी सोमवारपासून परत
हो रश्मी सोमवारपासून परत बघते. मेघना आणि शुभ्राची तुलना करता, दिसणं आणि अभिनय दोन्ही शुभ्राचा कितीतरी पटीने सरस आहे. सॉरी फॉर अवांतर.
चला २००० पूर्ण करून टाका
चला २००० पूर्ण करून टाका म्हणजे .. नवीन बाफ उघडता येईल... शिरेल तशीच चालू राहीलच..
शिरेल मी पहात नाहीये
शिरेल मी पहात नाहीये
आदित्यचा भाऊ त्याला खुशीत आला
आदित्यचा भाऊ त्याला खुशीत आला की आदे म्हणतो. पुरावा की काय म्हणतात तो ...:फिदी:
शिरेल मी पहात नाहीये <<< ती
शिरेल मी पहात नाहीये <<< ती कोणीच पाहत नसावेत. पण दोन बाफ भरून तिसरा सुरू करायची वेळ आली , एवढी चर्चा तर झाली...
बाबाजींचा चेहरा वाकडा खरच
बाबाजींचा चेहरा वाकडा खरच झालाय का?
परत नाटक तर नाही ना????
नाटकच आहे ते. कारण नंतरही तो
नाटकच आहे ते. कारण नंतरही तो मेदेच्या आईला मेदेच्या खोलीत जाऊन बस म्हणून सांगत होता.
आदित्यचा भाऊ त्याला खुशीत आला
आदित्यचा भाऊ त्याला खुशीत आला की आदे म्हणतो. पुरावा की काय म्हणतात तो >> आद्या का आदे, मला आद्या ऐकू आलं
आद्या
आद्या
मालिकांमधून होणाऱ्या
मालिकांमधून होणाऱ्या सिनेमाच्या जाहिरातीवर मटामध्ये आलेला हा लेख वाचा.
>>>>>>>मालिकांमधून होणाऱ्या
>>>>>>>मालिकांमधून होणाऱ्या सिनेमाच्या जाहिरातीवर मटामध्ये आलेला हा लेख वाचा.
.
मार्केटिंग सफल होतेय मग थांबवा कशाला?
असापण चिखलात दगड फेकल्यावर अंगावर चिखल उडणारच … आधीच कथानक संपल्यावर खतपाणी घालून पुढील दोन वर्षे मालिका सहज लांबते , इथे प्रेक्षकांनी हात पाय वर करून काय दाखवतील ते बघायलाच हवे , किंवा एकदा सुरु केली न मग बघू शेवटपर्यंत हीच भूमिका ठेवलेय .
आणि ज्याप्रमाणे तू तिथे मी , भाग्यलक्ष्मी , जानकी किल्लेदार यांच्या मालिका सुरुवातीलाच कथेचा अभाव असून तीन वर्ष चालल्या त्याप्रमाणे प्रेक्षक काही हे समाजाने मूर्खपणाचे आहे, अर्थात जे बघितले जाते तेच दाखवणार
रश्मी ती 'असावा सुन्दर.. '
रश्मी ती 'असावा सुन्दर.. ' मालिका 'उतरण' या हिन्दी मालिकेची कट टु कट मराठी कॉपी आहे.
Pages