Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36
बर्याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !
अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )
१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत
२) दम आलू
३) ग्रील्ड भेंडी
४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स
५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.
६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो
७) उतप्पा, सांबार आणि चटणी
८) अख्खा मसूर आणि भात
९) भाजूक तूकड्या
१० ) चटणी भाकरी
११) कोबीचे भानोले
१२) उकडपेंडी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा छान.. भाजूक तुकड्यांची
वा छान.. भाजूक तुकड्यांची रेस्पी कुठेतरी होती ना माबोवर?
दिनेश तुम्ही हे असले फोटो
दिनेश तुम्ही हे असले फोटो टाकून अत्याचार का हो करता?>>> आगदि आगदि...
भर्पेट जेऊन दुपारच निवांत मायबोलि बघायला बसलिये मि...आणी तुम्हि हे अस सगळ हे अस जेवण समोर आणून ठेवताय....काय बोलाव आता...
आगदी तोपासू .....
अरे काय भारीय एकेक... चार
अरे काय भारीय एकेक... चार वेळा फोटो वरखाली स्क्रॉल करून बघितले.. तरी स्साला पोट भरायला मागत नाही.. भाकरी तर आपला रोजच्या जेवणातला फेवरेट आयटम
अरे देवा..लंच टायमाला ही
अरे देवा..लंच टायमाला ही पोस्ट कुणी (आणि का) वर आणली..
सगळंच यम्मी दिसतंय...पण हादडावं कसं
मस्त फोटो. पाक कृती दिली तर
मस्त फोटो. पाक कृती दिली तर मजा येणार.
दिनेश दा, लय भारी मेन्यु
दिनेश दा,
लय भारी मेन्यु !!
एखाद्या सुगरणीच्या वरताण झालंय की सगळं>> हे मात्र खरे आहे !!
मस्तचं फोटो, दिनेशदा, कोबीचे
मस्तचं फोटो, दिनेशदा, कोबीचे भानोले ची रेसीपी काय आहे?
काय जबरी मेन्यु आहे दिनेशदा,
काय जबरी मेन्यु आहे दिनेशदा, भाजुक तुकड्या याची रेसेपि द्याना प्लिज .सकाळी सकाळी जिभ चाळवली आहे.
मला तर खुपच भुक लागलीये सर्व
मला तर खुपच भुक लागलीये सर्व पदार्थ पाहुन , भेंडी सोडुन सर्व पॅक क रुन पाठवा प्लीज.
अफलातून धागा! मझा आया!
अफलातून धागा! मझा आया!
ग्रिल्ड भेंडी अगदी मस्त दिसत
ग्रिल्ड भेंडी अगदी मस्त दिसत आहे
रेसिपी कुठे मिळेल आणि शेजवान पोटैटोची पण
दिनेश, तुम्हाला निसर्गात
दिनेश, तुम्हाला निसर्गात कॅमेरा वापरायला परवानगी आहे फक्त. जेवणाच्या टेबलावर फोटो काढायला तुम्हाला सक्त बंदी आहे.
ते दोन इंडोनेशीयन पदार्थ सोडून बाकी सगळे तोंपासू पदार्थ आहेत.
टोमॅटो ज्यूस कसा बनवायचा?
त्या भाजूक तुकड्या सोडुन बाकी
त्या भाजूक तुकड्या सोडुन बाकी सारे स्वाहा करायची तयारी आहे. जबरी मेन्यु आहे. टॉमेटो ज्यूस माझा प्रचन्ड आवडता.:स्मित:
इन्डोनेशियन भातावर मिर्चीची कलाकुसर जाम आवडली. एकेक कशाला सगळेच आणा इकडे हाणायला.
दिनेशदा. .सगळेच पदार्थ
दिनेशदा. .सगळेच पदार्थ तोंपासु. .कधी येऊ सांगा जेवायला?
ओ दिनेशदा.... आज उपासाच्या
ओ दिनेशदा.... आज उपासाच्या दिवशी पाहिले नेमके हे फोटो नि भुक खवळलीय
वा ! सगळे पदार्थ मस्तच
वा ! सगळे पदार्थ मस्तच दिसतायत.
ते भाजुक तुकड्या आणि कोबीचे भानोलेची रेसिपी द्या नं प्लीज.
हे असे फोटु सकाळी सकाळी
हे असे फोटु सकाळी सकाळी पाहायचे आनि ( न खाता) कामाला लागायचे
आता १० वा पण मला अख्खे मसुर आनि भात खावा वाटतोय
दिनेशदा, वॉव. मस्तच. पण असे
दिनेशदा, वॉव. मस्तच.
पण असे फोटो टाकणे म्हणजे दुष्टपणा नाही का?
भाजुक तुकड्या इकडे आहेत
भाजुक तुकड्या इकडे आहेत की...दिनेशदांच्या हटके रेसिपीज्च्या पाकॄ बरेचदा असतात. शोधा म्हणजे सापडेल. लागल्यास पण घ्या
क्या बात है, दिनेशदा. एक सो
क्या बात है, दिनेशदा. एक सो एक फोटोज.
डोळे निवले आन जिभ खवाळली>>>>>अगदी अगदी
दिनेश, तुम्हाला निसर्गात कॅमेरा वापरायला परवानगी आहे फक्त. जेवणाच्या टेबलावर फोटो काढायला तुम्हाला सक्त बंदी आहे. स्मित
ते दोन इंडोनेशीयन पदार्थ सोडून बाकी सगळे तोंपासू पदार्थ आहेत>>>>>माधव, जोरदार अनुमोदन.
अरे देवा, मी आत्ता सकाळी
अरे देवा, मी आत्ता सकाळी सकाळी बघितला हा धागा...काय त्रास आहे
दिनेशदा __________/\__________
छ्या... उगाच उघडला हा धागा...
छ्या... उगाच उघडला हा धागा... आता ८/१० वर्ष वाट बघावी लागणार.... तो पर्यंत निषेध
दिनेशदा, दुपारच्या जेवणात
दिनेशदा, दुपारच्या जेवणात एवढे सर्व पदार्थ दिल्याबद्दल धन्यवाद! पण सुरवात कुठुन करू हा प्रश्न पडला आहे.
ह्या परिपुर्ण मेजवानी नंतर एक स्वीट डिश तो बनती है! ती मिसतो आहे.
तुम्हाला माहिती आहे का,
तुम्हाला माहिती आहे का, पिम्परी चिन्चवड हे जगात भारी शहर आहे.
आणि मी राहतो त्या येरीयात फ्लॅट१चे रेटही कमी आहेत.
इकडेच या रहायला.
स्लर्प........ _____/\_____
स्लर्प........
_____/\_____
८/१० वर्षात रिटायर होणार मी..
८/१० वर्षात रिटायर होणार मी.. मग हाच उद्योग <<< हॉटेल आमच्या एरीयातच हव दुसरीकडे कुठेही चालणार नाही. ही धमकी आहे.
दिनेशदा, तुमच्या हातच खायला किती वाट पाहावी लागेल पण तरीही माझा रोजचा टीफिन तुमच्याकडे फिक्स.
झकास दिनेशदा, झकासच्या
झकास
दिनेशदा, झकासच्या प्रतिसादात पिंपरी चिंचवडच्या ऐवजी "विक्रोळी" टाका. कुर्ल्याहुन खुपच जवळ आहे.
दिनेशदा, मी तुम्हाला माझ्या
दिनेशदा, मी तुम्हाला माझ्या घरातली एक रूम फ्री मध्ये राहिला देते.
बघा विचार करा
उगाच दिनेश दा वर प्रेशर आणु
उगाच दिनेश दा वर प्रेशर आणु नका......... मी धंद्याचा विचार करतोय .. तुम्ही घर घ्या म्हणत आहे
आम्ही हॉटेल सुरु करतो मुंबई आणि पुणे यांच्या सुवर्ण मध्यावर माबो करांनी शनिवार रविवार जसा वेळ मिळेल तसे हॉटेलात या.. आणि मनसोक्त भरपेट खा.....
दिनेशदा, तुमच हॉटेल जनरल
दिनेशदा, तुमच हॉटेल जनरल बाझारमध्ये किंवा बेगम पेठमध्येच हॉटेल सुरु करा. इथे मराठी हॉटेल नसल्यामूळे खूप चालेल. नुसता व.पा, मिपा सुद्धा खूप खपेल. जास्त कष्ट नाही देणार तुम्हाला. बघा धमकीचा विचार करा.
Pages