या जेवायला ! दोन पदार्थ जास्तीचे वाढलेत.

Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36

बर्‍याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !

अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )

१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत

२) दम आलू

३) ग्रील्ड भेंडी

४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स

५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.

६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो

७) उतप्पा, सांबार आणि चटणी

८) अख्खा मसूर आणि भात

९) भाजूक तूकड्या

१० ) चटणी भाकरी

११) कोबीचे भानोले

१२) उकडपेंडी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश तुम्ही हे असले फोटो टाकून अत्याचार का हो करता?
एकदा करून खायला घाला प्लिज, त्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. Proud

वा वा ! मस्त तोंपासु फोटोज !
ती चटणी भाकरीतली भाकरी टेम्टींग दिसतेय , पण ती तळल्यासारखी का वाटते ?

उदय, सगळे खायचे.. ( फाजील लाड नाही होणार कुणाचे )

दक्षे.... ८/१० वर्षात रिटायर होणार मी.. मग हाच उद्योग !

जाई. धन्स

श्री.. पिवळा मका आणि वर लोणी..

दिनेश दा.....हॉटेल उघडु .... मी गल्ल्यावर बसतो तुम्ही किचन मधे बसा (च) Happy

मी भेंडी आणि टॉमॅटो नाही खात Sad

तोपांसु...

दक्षे.... ८/१० वर्षात रिटायर होणार मी.. मग हाच उद्योग !
>>>
माझ्या शेजारी घर घ्या प्लिज प्लिज प्लिज!
नाहीतर मला असलं (हेच) साग्र संगित जेवण खायला तरी घाला.....
पुण्य मिळेल Proud

सगळेच फोटोज मस्त आहेत!
टोमॅटो ज्यूस मस्तच दिसतोय. खूप अ‍ॅसिडिक नाही होत का? एभाप्र (मी स्वतः कधी घेऊन नाही पाहीला Uhoh )

आतापासूनच क्लायंटेल मिळतंय ! मज्जा आहे.

योकु... नाही होत अ‍ॅसिडीक.. विमानातले माझे फेव्हरीट ड्रिंक. खुप रिफ्रेशींग !

वा, सुरेख पदार्थ आणि फोटोज. ग्रील्ड भेंडी सुंदरच!
खसखसवाली भाकरी पहिल्यांदा वाढा.

टोमॅटो ज्यूसमध्ये Green Tabasco, Red pepper sauce, मिरपूड, लिंबाचा रस आणि थोडे वूस्टर सॉस मिसळून घेतो.

Mouthwatering!
I have a deal. I will sing one self made gajhal everyday in exchange for one dinner.
Deal?

अमेय.. टोमॅटो ज्यूस... इतालियन वगैरे असेल तर मस्तच चव येते.
विजय.... गझल न ऐकवण्याबद्दल आनंदाने वाढेन.

अश्विनी... आपल्याकडचे टोमॅटो जरा सपक चवीचे असतात. काही टोमॅटोंना मूळचीच चव छान असते.
एकदा चव घेतली तर नक्कीच आवडेल.

मनस्मि... आता पुढच्या वेळी नक्की !

मनस्मि... जो ना कभी खायी होगी ना देखी होगी... अशी अनोखी स्वीट डिश दोन तीन दिवसात सादर करीन म्हणतोय !

चवीने खाणार त्याला दिनेशदा देणार Lol
हे उकडपेंडी काय आहे ?

दा तुम्ही रॅटटुई (?) पाहीलात का बावर्ची उंदीर - स्वयंपाक ही कला आहे आणि त्या कलेचे तुम्ही मास्टर Happy

दिनेश.जी

बघूनच पोट भरलं. दोन घास जास्तीचे नाही हो, दोन ताटं जास्तीची वाटली
( आपल्या त्या ह्यां ना बोलवा, असंबांना.. अरेबियन संधीसाधू बायका हो ! तुटून पडतील अशा चविष्ट जेवणावर...चापुसाए )

वा दिनेशदा! एखाद्या सुगरणीच्या वरताण झालंय की सगळं!!
त्यांची चव नाही घेताहेत याचा कित्ती त्रास होतोय काय सांगू Sad

डोळे निवले आन जिभ खवाळली Happy

उकडपेंडी नॉट लुकिंग लाईक खानदेशी उकडपेंडी.
दिनेशदा,
कणिक भाजून मग उकड काढायची, फोडणीवर. तांदळाची उकड कोकणात तशी ही गव्हाची आमच्याकडे. तुमची जरा जास्तच भगराळी दिसतेय. थोडी असट हवी.

आभार दोस्तांनो,

राजू.. ती कच्ची केळी.

नितीन, असे चित्रपट मी सोडत नाही. पेनेलोप क्रुझ आणि ऐश्वर्या रायचे पण असे चित्रपट बघितलेत मी. ( ऐश्वर्याचा चित्रपट जगातील मोजक्याच लोकांनी बघितला असावा. )

इब्लिस.. हा मोकळ भाजणी सारखा प्रकार असतो. चिंचेचे पाणी शिंपडून शिंपडून परतायचा पण गिच्च नाही करायचा. दूर्गाबाई भागवतांच्या रेसिपीने. आता तूमच्या पद्धतीने पण करून बघीन. ( भारतातल्यासारखी कणीक नाही मिळत इथे. )

Pages