बंगळूरू आणि आसपास स्थलदर्शनाची माहिती हवी आहे

Submitted by मंजूडी on 19 June, 2014 - 08:51

बंगळूरू आणि आसपास काय पहावे?

दोन ठिकाणांमधे खूप अंतर नको. कुटुंबातील सर्व वयाच्या माणसांना रीझवणारी, आनंद देणारी सहल व्हायला हवी. सहलीचा कालावधी ७ ते ८ दिवस.. त्याहून जास्त नको.

१.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-कोडाई
२.बंगळूरू-कूर्ग-काबिनी
या दोनपैकी तुम्ही काय सुचवाल?
पॅकेज देणारे माहितीतले कोणी टूर ऑपरेटर असतील तर सुचवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृंदावन गार्डन कोणे एके काळी अदभुत आश्चर्य होतं. आता त्यात काही राम राहिलेला नाही. आवर्जून टाळण्याचं ठिकाण आहे ते.>> + १

कूर्गमधेय होमस्टेचा चांगला अनुभव आहे. कूर्गमध्ये ताजी दळलेली कॉफी विकत घ्यायला विसरू नका. शिवाय कावेरी उगम अवश्य बघा (तलाकावेरी)

मोजकेच दिवस हातात असल्यामुळे बंगलोर(१ दिवस) - मैसूर (१ रात्र) -कूर्ग (३ रात्र) असा भ्रमंतीचा मार्ग नक्की झाला आहे.

लालबाग बोटॅनिकल गार्डन, बाणेरघाटा, शिवसमुद्रन फॉल्स, मैसूर झू, मैसूर पॅलेस, वृंदावन गार्डन आणि कूर्गमधले पटेल पॉईंट्स (थँक्स पग्या ), दुबारे एलिफंट कॅम्प इत्यादी बघण्याचे ठरवले आहे. >>

बँगलोरला लालबाग मध्ये काही प्रदर्शन नसेल तर बघण्यासारखे फार नाही. जूनी झाडं खुप आहेत. पण.......जवळच कॉर्पोरेशन सर्कल आहे, तिथे एका गल्ली मध्ये सिल्क साड्यांची फॅक्टरी आउटलेट्स आहेत. मेन रोडवर गवर्मेंचे प्ण दुकान आहे. एक संध्याकाळ MG रोडवर कावेरीमध्ये घालवच. त्याच रोडवर Trinity च्या दिशेला Central Cottage Industry चे शोरुम आहे. त्याला पण भेट दे. त्या रस्त्यावर कधी साड्या घेतल्या नाहीत पण वेळेची कमतरता असेल तर तिथेच बरीच दुकानं आहेत.

कुर्ग ला ३ रात्री रहायचे फिक्स झाले आहे का? नाहीतर बँगलोरमधील एक रात्र वाढव आणि श्रवण्बेळगोळा,हलेबीळ- बेल्लुर ला जाऊन येता येईल. वरच्या लिंकमध्ये बस पण आहे सकाळी नेऊन संध्याकाळी परत. पण जरा घाईघाईत होते. पण देवळं फारच सुंदर आहेत.

बँगलोर -मैसूर जाताना, मधे रस्त्यात एक कामत आहे (जनपद केंद्रा जवळ. त्यातही एक चक्कर टाक वाटल्यास) तिथे ब्रेकफास्ट उत्तम मिळेल. नंतर चन्नपटन्ना. एका मोठ्याशा दुकानात थांबून थोडी लाकडी वस्तुंची खरेदी आटप. (मला छान लाकडाची भात वाढतो तशी थापी मिळाली होती :-)). नंतर श्रीरंगपट्टानला मंदिर आणि टिपु सुलतानाचा पॅलेस आहे (कधी गेले नाही).
मैसूर झू च्या बाहेरही खरेदीची संधी आहे. Happy

कुर्गमध्ये २ रात्री काढून येताना दुबारे आणि तिबेट टेंपल बघता येईल. कुर्ग ला होमस्टे मध्ये राहशील तिथे जेवणाची सोय आहे की नाही ते बघून घे. रात्री गावात परत जावेसे वाटत नाही.
प्रवासाला शुभेच्छा.

कूर्ग ला एक दिवसाचे साईट सीइंग करवताना ड्रायव्हर ने संध्याकाळी एक धबधबा बघायला नेलं होतं मस्त जागा होती .. तिकडे नक्की जा, मला नाव आठवत नाही .. १०-१५ मिनीटं टेकडी उतरून खाली जावं लागतं आणि येताना चढ पण जागा छान आहे ..

बाकी मोनॅस्टरी, दुपारी कुठल्यातरी बागेत नेलं होतं त्या जागा ठीक ठीक .. दुबारे एलिफन्ट कॅम्प मुलं खूप एन्जॉय करतात ..

कूर्ग ला एक दिवसाचे साईट सीइंग करवताना ड्रायव्हर ने संध्याकाळी एक धबधबा बघायला नेलं होतं मस्त जागा होती .. तिकडे नक्की जा, मला नाव आठवत नाही .. १०-१५ मिनीटं टेकडी उतरून खाली जावं लागतं आणि येताना चढ पण जागा छान आहे ..>>>
अ‍ॅबी फॉल्स , फॉल्स कडे जाताना वाट पण छान आहे, घनदाट जंगलात वाटेत मिरीच्या वेली आहेत. मस्तच आहे ती जागा. अर्थात हे १० वर्षांपूर्वी होतं, आताही तसच असावं Happy

करेक्ट मीपु .. बहुतेक अ‍ॅबी फॉल्स् च नाव असेल .. मस्त आहे ती जागा ..

>> तलकावेरी

मला हे तालकावेरी असंच ऐकायला यायचं आणि (कावेरी) तालुक्याचं ठिकाण असंच वाटत होतं .. Lol

मंजूडी तुमचा कुठे राहायचा प्लॅन आहे कल्पना नाही पण क्लब महिंद्रा रिसॉर्ट ची जागा मात्र खूपच सुंदर आहे .. रिसॉर्ट तर्फेच एका कॉफी प्लँटेशन ची टुअर केली होती ती पण मस्त होती .. त्या प्लँटेशन वाल्यांच्या स्वतःच्या कॉटेजेस् ही होत्या .. एकदम सुंदर जागा .. खर्चाचा मात्र अंदाज नाही, नीट आठवत नाही ..

सगळेजणं त्या एम्जी रोडवरच्या कावेरीचं कौतुक करतायत खरं पण मला ते फार ओवरहाईप्ड वाटलं दुकान. काहीच्याकाही किंमती आहेत आणि दुकान बर्‍यापैकी बोअर दिसतं म्हणजे माल फार जुनाट वाटतो. कॉटेज इंडस्ट्रीचं दुकान मात्र आवडलं. मी तिथून काश्मिरी रग घेतला होता गेल्या वर्षी.

अदिती, थँक्यू व्हेरी मच!! Happy
तुझा असाच सविस्तर प्रतिसाद अपेक्षित होता आणि अपेक्षित माहितीही मिळाली Wink

सशल, मीपु, सायो थँक्यू Happy
कावेरी मलाही फारसं आवडलं नव्हतं. त्याऐवजी नल्लीमधे जायला मला जास्त आवडेल.

बंगलोरमधे तीन दिवस राहणार आहोत, पण नातेवाईकांकडे. त्यामुळे बाहेर फिरायला किती वेळ मिळेल त्यावर कुठे फिरायचं हे ठरवायचं आहे. ही सगळी ठिकाणं यादीत नोंदवून ठेवतेय.

कावेरी हे फक्त नेत्रसुख घ्यायला आहे. तिकडच्या काही वस्तु खरच सुंदर आहेत. कावेरीसारख्या कोरीवकाम असलेल्या मोठ्या मूर्ती दुसर्‍या दुकानात दिसत नाहीत.
तिकडे गिफ्ट द्यायला छोट्या वस्तु पण आहेत. म्हणूनच सेंट्रल कॉटेज ला पण भेट दे.
तिथे खाली केरळाचे कैराली पण आहे.

बँगलोरला ३ दिवस असशील तर साड्यांसाठी गांधीबाजारचे राजाराम चांगले आहे.

मंजुडी, कावेरी पेक्षा एक चांगल दुकान आहे राजामार्केटच्या सिग्नलच्या जवळ. त्यांच्याकडे ओरिजनल चंदनाच्या बर्‍याच वस्तू, पर्फ्युम्स, साबण मिळतात. चंदनाच्या लाकडांवर क.ग. चा स्टॅम्प असतो आणि त्याच बिलही देतात. गिफ्टसाठी खूप छान छान वस्तू असतात. दुकान गल्लीत आहे आणि छोट आहे पण वर्थ आहे. राजामार्केट आणि चिकपेट रविवारी दु. २ नंतर बंद असत. राजामार्केटात कुंदनचे दागिने मिळतील.

गुरुद्ववारच्या बाजूला एक ढाबा आहे तेथील पराठे आणि खिर / फिरनी नक्की खा. रात्री ११ पर्यंत वेटींग असत. पण खूप छान टेस्टी आहे.

नंदिनीचा कुंदा आणि आईस्क्रिम मला आवडत. तसच नंदिनीच्या इतर मिठायासुद्धा गिफ्ट देण्यासाठी नेऊ शकतेस. नंदिनीच तूपसुद्धा चांगल आहे. Wink

आरती., हे गुरुद्वारा नेमकं कुठे हेही सांगून ठेव इथे.
तिकडून बाफ बघेन तेव्हा हँडी माहिती उपलब्ध असेल Wink

अलसुर (Ulsoor) lake च्या बाजूला अहे. तेथे फेमस आहे, कुणालाही विचारल तरी सांगतील. त्या रोडच्या समोरच्या रोडवर साड्यांची शो रुम्स आहेत तसेच एक काश्मिरी दुकान आहे.

बंगळूरूला एवढ्या लांब जाताय तर हळेबिडू बघण्याचा नक्की विचार कर. तुला ही कल्पना पटली आणि इतर मेंब्रांना पटवून द्यायची असेल तर मार्को पोलोचे इथले फोटो दाखव त्यांना. Happy या इथे पण अजून माहिती आहे मायबोलीवरची.

बाद वे , जर उत्तम शिल्पकलेत स्वारस्य असेल तेर सोमनाथ्पूर चे मंदिर चुकवू नका. टिबेटन मोनॅस्ट्री पासून जवळ आहे. अप्रतिम ---- अगदी हळे बीड बेलुर दर्जाचे आहे.

अन खायला एम टी आर व विद्यार्थी भवन ( गांधी बाजार) मधील दोसा चुकवू नका. मी एअर पोर्ट हून थेट तिथे जातो Happy

आमचेही कूर्ग बॅ.ंगलोर सेल्फ ड्राईव्ह हॉलीडे चे चालले आहे. होम स्टे साठी हे पहा : http://www.homestaykodagu.com/home_stay/coorg_dale.htm खूप सुंदर जागा आहे., त्यांचे जेवण पण छान आहे अस ऐकल. आम्ही गेलो तर ईथेच राहणार आहोत.

कूर्गला जाणार असाल तर 'रामू अय्यप्पा' यांचा होम स्टे खूप भारी आहे. त्यांचा कॉफीचा मळा आहे आणि मध्यात घर आहे. त्यांची पत्नी आणि ते गरमागरम पोळी भाजी जेवायला वाढतात. शिवाय त्यांच्यासोबत एकत्र जेवण - जणू घरचेच अतिथी असल्याप्रमाणे वागवतात. एखाद दिवस त्यांचा कॉफीचा मळा पण फिर्वून आणतात. जाणार असल्यास सांगा, मी नंबर देईन.

Pages