Submitted by स्नू on 25 June, 2014 - 01:29
हे आहे माझ्या पुढच्या आठवड्याचे आहार नियोजन. हे नियोजन खालील गृहितकांवर आधारित आहे
काही गृहीतके :
1. मी दिल्लीला राहते. पालक, मेथी, शेपू अश्या गुणी पालेभाज्या येथे फक्त हिवाळ्यात मिळतात. बाकीचे 8 महीने केवळ फळभाज्य आणि पनीर, राजमा, छोले, डाळी यांच्या आधारे काढावी लागतात.
2. मी सकाळी 9 वाजता घरातून निघते आणि संध्याकाली 7 वाजता घरी परतते.
3. मी अत्यंत आळशी आहे. लग्नाआधी इकडची काडी तिकडे सुद्धा केलेली नाही.
4. दिल्लीत फक्त मी आणि माझा नवरा असे दोघच राहतो. आणि तो बराच समजूतदार असल्याने जेवण बनवण्याबाबत फारसा आग्रही नसतो.
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
नीधप.. तुझी हरकत नसेल तर
नीधप.. तुझी हरकत नसेल तर तुझाही तक्ता शेअर कर ना वर म्हणते आहेस तो..
अॅक्च्युअली तो रोजच्या
अॅक्च्युअली तो रोजच्या स्वैपाकाचा तक्ता आहे. असा नाहीये. माझं सांगताना चुकलं. आणि पिडीएफ इथे कशी लोड करतात ते मी विसरलेय. कुणी परत आठवण करून दिल्यास जमेल.
दुपारच्या जेवणात काहीतरी
दुपारच्या जेवणात काहीतरी प्रथिनयुक्त असेल अशी काळजी घे!!
तक्ता आवडला. मी पण असाच तक्ता
तक्ता आवडला.
मी पण असाच तक्ता बनवून स्वयंपाकघरात लावला आहे.
रात्री दोन किंवा एकच डिश मिल.
बिस्किटाला पर्याय : खाकरा /
बिस्किटाला पर्याय : खाकरा / ठेपला / लाह्या / वाफवलेले स्प्राऊट तिखटमीठमसाला लावून / राजगिरा बिस्किटे किंवा पुन्हा एखादे फळ.
दलिया उपमा , दलिया खिचडी, वरणफळं, डाळ-भाज्या घालून केलेली खिचडी असे वन डिश मील चे अनेक पर्याय वीकान्ताला करता येतील.
स्नू, तक्ता आवडला. असा तक्ता
स्नू, तक्ता आवडला.
असा तक्ता मला बनवून जेवण घ्यायला नक्कीच सोपे पडेल.
तक्त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद..
अपघाताने पाय जायबंदी झाल्याने
अपघाताने पाय जायबंदी झाल्याने हालचाल बंद , घरचा त्रास, नोकरी नसणे अशा अनेक गोश्टी एकत्र आल्याने माझी शुगर ४००. झाली होती.
पण सुदैवाने पुन्हा नोकरीत जॉइन झालो. बायको मुलगी परत आली. सध्या शुगरची गोळी बन्द आहे. शुगर नॉर्मल आहे.
१. रोज आठ ते दहा किमी चालतो.
२ चहा ब्ण्द. घेतला तर अगदी घोटभर. लेमन टी मात्र भरपुर.
३ दुपारी दवाखान्यातील पेशंटचे जेवण . त्यात तीन चपात्या, एक भाजी किंवा उसळ, वरण . नंतर बाजारात येते ते पॅक मधले मसाला ताक . २०० मिली.
४ सन्ध्याकाळी घरी चहा. चिरमुरे, चिवडा.
५. रात्री भरपूर दलिया खीर. टोन मिल्क वापरुन. भरपुर मिक्स मोड स्प्राउट शिजवुन. चपातीऐवजी दलिया खीर हा उत्तम पर्याय आहे.
६. ईडली वडा भजी पूर्ण बन्द. मीसळ घेतली तर एकच पाव खाणे.
७. अधुन मधुन जेवणात दही, टोमॅटो , काकडी ,
८ . रात्री दहा तॅ सकाळी दहा काहीही न खाणे.
सध्या शुगर नॉर्मल आहे.
लक्ष्मी तुम्ही नाश्त्याला काय
लक्ष्मी तुम्ही नाश्त्याला काय करता?
माझ्या डॉक्टरने मला प्रत्येक जेवणामधे मध्यम आकाराच्या ताटाचे ४ भाग करुन त्यातील एक भाग प्रोटीन, १ भाग ग्रीन/फळ भाजी, २ भाग सॅलड आणि २ पोळ्या अस खायला सांगितल. पण बर्याचदा फक्त भाजी पोळीच खाल्ली जाते
तक्ता छानच आहे. रोज खाउन झाल्यावर झोपण्याआधी आज सकाळ पासुन काय काय खाल्ले हे लिहुन काढले तर कुठे कमी जास्त झाले हे कळते आणि सुधारणा करता येते.
शनि/रवी चा मेनु हेल्दी केला पाहिजे (नंतर प्रत्यक्शात तो चेन्ज होईलच
)
नास्त्याला एखादे फळ / एक इडली
नास्त्याला एखादे फळ / एक इडली / कॅलॉगचा छोटा पुडा इ इ
पण बर्याचदा दोन कप लेमन टीवर भागत.
छानच आहे.. मी पण चार्ट फोलो
छानच आहे.. मी पण चार्ट फोलो करते, अधुन मधुन ब्रेक होतो मी रात्री दलिया / सोजी ताकातली फोडणी ची आणि गाजर काकडी च दह्यातल रायत करते...
हे कशासाठी? चौरस आहार एवढेच
हे कशासाठी? चौरस आहार एवढेच का वजन का इतर काही?
माझा असा चार्ट आहे + बरीच
माझा असा चार्ट आहे + बरीच व्हरायटी आहे. पण कसोशीने पाळला जात नाही. कधी आळशीपणा / थकवा / ओव्हर कमिट मुळे चालढकल होते. मला आयते खायला खूप आवडते. मुळात फुडी आहे. त्यामुळे खायला कधी ना नसते. आणि व्हेज-नॉन व्हेज सगळेच प्रकार आवडतात. त्यामुळे बाहेर खाणे खूप आहे. तक्ता केला तरी त्यात काटेकोरपणा आणि शिस्त नसते. आधी ती अंगी बाणवली पाहिजे
हे खूप छान आहे. तक्ता
हे खूप छान आहे. तक्ता बनवण्याची कल्पना मस्त आहे.
बाकी धनश्रीसारखं माझंही होतं. "कधी आळशीपणा / थकवा / ओव्हर कमिट मुळे चालढकल होते" +१
जामोप्या, लेमन टी कसा बनवायचा
जामोप्या, लेमन टी कसा बनवायचा ?
रात्री दलीया + कडधान्ये हे जरा पचायला जड नाही होत का?
ल.गो., कुठे फिरायला जाता ते
ल.गो., कुठे फिरायला जाता ते कशाला लिहिताय? दिवस चांगले नाहीत.
अ.बद्दल. क्ष.
माधव वीपु बघा लेमन टी
माधव वीपु बघा लेमन टी सांगीतला आहे!
मस्त! असं माझं कॅलेंडर भरलंय
मस्त! असं माझं कॅलेंडर भरलंय नाश्त्याच्या पदार्थांनी! ९ दिवस एकही पदार्थ रिपीट नाही!
मी घरून काम करते पण नाश्ता सकाळी ८ ला रेडी लागतो!
तक्ता छानच आहे.मेी काहेीच
तक्ता छानच आहे.मेी काहेीच खातनाहेीतरेी वजन कसेवाढ्ते?ला परिपुर्ण उत्तर. फक्त एकचशंका.दहेी, ताकास मज्जाव का आहे.?
माझं LDL/HDL हलल्यावर एका
माझं LDL/HDL हलल्यावर एका डायेशियन कडे गेले होते. तिच मत :
सोमवार ते शनिवार दर दिवशी दोनदा म्हणजे जेवणाच्या बारा वेळा. त्यात चार वेळा पालेभाजी , चार वेळा उसळी आणि चार वेळा फळभाज्या खाव्या. बाकी नाष्टयाला हलके पदार्थ म्हणजे सकाळी दुधाबरोबर पोहे उपमा ईडली वगैरे आणि संध्याकाळी भाज्यांच सूप, खाकरा वगैरे.
हे व्यवस्थित सांभाळल्यावर मग रविवारी काहीही (पिझ्झा, पॅटीस ) खा.
लेमन टी : दुध न घालता काळा
लेमन टी : दुध न घालता काळा चह करणे. मग त्यात लिंबु प्पिळायचा
अरे धन्स. मला गरज आहेच.
अरे धन्स. मला गरज आहेच. पूर्वी एकदा डायेटिशियन कडे जाऊन आले आहे. आता परत जायची वेळ आली आहे. खर्या अर्थाने वेळ मिळेपर्यंत असा तक्ता बनवायचा प्रयत्न करेन.
एक्ष्च्षहा माझा अगदी
एक्ष्च्षहा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय..... नियोजन आणि पुर्वतयारी असेल तर आठ्वडा सोपा जातो
मी आठ्वद्याचि भाजी आणायच्या आधि menu ठरवते ... चक्क exel मधे लिहुन आणि तेव्हाच पुर्वतयारी काय , किती आणि कधि ते ठरवते
इथे विविध विचार या विषयावर पाहुन खुप छान vaaTale
शाळेच्या डब्ब्यासाठी केलाय
शाळेच्या डब्ब्यासाठी केलाय तक्ता.... त्यातही आवड, हेल्दी आणि चविष्ट तरी झटपट होणारे तेपण वेगवेगळे पदार्थ रोज डोकेफोड करण्यापेक्षा... त्यासाठी तक्ता बरा पडतो!!!
डाएट साठी पण करावा का तक्ता??? विचारात पडलेली बाहुली... कारण धनश्रीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन.
@लगो- साखर टाकत नसाल अशी आशा
@लगो- साखर टाकत नसाल अशी आशा करतो...
लिम्बू प्रमाणात घ्या. लिम्बू रसाच्या अतिरेकाने एकास बहिरेपण आले आहे असे ऐकुन आहे. तरी काळजी घ्या.
अॅक्च्युअली तो रोजच्या
अॅक्च्युअली तो रोजच्या स्वैपाकाचा तक्ता आहे. असा नाहीये. माझं सांगताना चुकलं. आणि पिडीएफ इथे कशी लोड करतात ते मी विसरलेय. कुणी परत आठवण करून दिल्यास जमेल.
>> मला इथे http://www.maayboli.com/node/33570?page=3 सापडला. म्हणून इथे चिकटवते आहे. हाच ना तुझा तक्ता? (http://www.maayboli.com/files/u80/Monthly%20cooking%20plan.pdf)
हा हाच पण तो मॊडिफाय केलाय
हा हाच पण तो मॊडिफाय केलाय नंतर आणि सध्या चार्टप्रमाणे जात नाहीये. एक वर्ष शहराच्या आत बाहेर घालवल्यावर विस्क्टलेली घडी अजून बसवली नाहीये.
हा हाच पण तो मॊडिफाय केलाय
हा हाच पण तो मॊडिफाय केलाय नंतर
>> ओके. प्रथिने किंवा तत्सम घटकांचे प्रमाण कमीजास्त व्हावे म्हणून मॉडीफाय केला कि जस्ट फॉर अ चेंज?
कारण माझ्यामते या तक्त्याप्रमाणे चौरस आहार व्यवस्थित जातोय पोटात. फक्त सुप नाहीये यात. पण भाज्या सगळ्या जाताहेत पोटात.