Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
माझं असं म्हणणं आहे की
माझं असं म्हणणं आहे की देशातली सर्वाधिक प्रामाणिक व्यक्ती मी आहे. माझं असं मत आहे की आप चोर आहे. त्यांनी स्वतःच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सदस्यांची केलेली चौकशी ही धूळफेक आहे. कोअर कमिटी बनवताना त्यांनी मी व मला माहीत असलेल्या प्रामाणिक व्यक्तींना समितीत घेतलेलं नाहीये..
महत्वाचं.. देशातली सर्वाधिक
महत्वाचं..
देशातली सर्वाधिक प्रांमाणिक व्यक्ती या नात्याने मी आवाहन करतो की ज्यांना खरोखर भ्रष्टाचारविरोधी लढा लढायचा आहे त्यांनी माझ्याकडे यावं. मी ठरवेन कोण प्रामाणिक आणि कोण नाही ते. त्यासाठी अंतर्गत चौकशी आयोग नेमेन. त्याचे अधिकार मला माहीत प्रामाणिक लोकांच्या असलेल्या कोअर कमिटीकडे असतील. जे कुणी आमच्या बरोबर येणार नाहीत ते सर्व चोर आहेत. त्यांचा भ्रष्टाचार विरोधी लढा हे एक ढोंग आहे.
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल ज्यांच्याविरुद्ध आरोप करताहेत त्या सर्वांनी अंतर्गत चौकशी करून निर्दोषत्व साबीत करण्याला आपची काही हरकत असेल का ? उदा. गडकरी.
मोदींनी चौकशी करून ते निर्दोष असल्याचं सांगितलंच आहे. अजित पवारांची चौकशी शरद पवारांनी करावी, अखेलिश यादवांची मुलायमसिंह यादवांनी करावी. हे देखील मान्य व्हायला पाहीजे. कारण संसद चोर आहे म्हणणा-यांनी, जनलोकपाल आंदोलन आम्ही म्हणतो तसाच हवा म्हणणा-यांनी हा धडा घालून दिलेला असल्याने आता तो एक बेंचमार्क म्हणून प्रस्थापित झालेला आहे असं समजण्यास हरकत नाही. काँग्रेसने हे केलं असतं तर लोकांनी फार मनावर घेतलं नसतं. त्यांनी सरकारच्या अधिकारात नेमलेल्या घटनात्मक आयोगालाही कुणी सिरीय्सली घेत नाही. नंतर सीबीआय, पार्लमेंटरी चौकशी समिती नेमली जातेच.
मिर्चीताई तुमच्या चौकशीला
मिर्चीताई
तुमच्या चौकशीला लोक हास्यास्पद म्हणू शकतात असं विजय कुलकर्णी देखील सुचवताहेत. तुम्ही म्हणताय की कायदेशीर नोटीस का द्यायची ? अशी अपेक्षा ठेवण्याचं कारण मागेच संदर्भासहीत दिलं आहे. हस्तक्षेप डॉट कॉमवर केजरीवाल हे संघाचे हस्तक असल्याचा आरोप केला गेला. तसंच जनलोकपाल बिलासाठीच्या आंदोलनातल्या अनेकांचा संघाशी संबंध असल्याचा लेख प्रसिद्ध झाल्यावरून भूषण यांनी त्या संकेतस्थळाच्या संपादकांना नोटीस दिलेली आहे.
म्हणून माझी अशी कल्पना झाली की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन आहे त्याच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर इतर लोक जे करतात तेच आप करणार नाही. असो. तुम्हाला तेच करायचं असेल तर शुभेच्छा ! थोडक्यात काय तर वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही !
<थोडक्यात काय तर वेगळ्या
<थोडक्यात काय तर वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही !>
त्याही हेच सुचवताहेत. आपची एखादी गोष्ट खटकली तर तीच बाकीच्या लोकांची का खटकत नाही हीच लाइन ऑफ डिफेन्स आहे पहिल्यापासून.
आधी आमच्यासारखे सोवळे कोणी नाही पासून आम्ही त्यांच्यापेक्षा जरा कमी ओवळे आहोत वर आलो. दुसर्यांसाठी तयार केलेले नैतिकतेचे मानदंड भलतेच कठोर पण स्वतःला ते लावून घ्यायचे नाहीत.
सत्तेत यायची संधी मिळण्याआधीच यांच्या नैतिकतेवर शिंतोडे उडत आलेले आहेत. एकाही गोष्टीत आमचं चुकलं असं म्हटलेलं नाही. (उदा: बेदीबाईंनी प्रवासखर्चातून समाजसेवेसाठी पैसे कमावले म्हणे. त्यांना नैतिकतेवरच भाषणे द्यायला लोक बोलवायचे. ते लोक काही यांच्या समाजसेवेसाठी देणगी द्यायला तयार नव्हते. मग या असे पैसे वळवायच्या. वर त्यांच्याच पैशाने उडत उडत जाऊन त्यांना नैतिकतेचे डोस द्यायच्या.) आता बेदीबाई आमच्या नाहे म्हटले तरी त्यावेळी त्यांचे समर्थन केले होतेच. अशी एक नवे अनेक उदाहरणे आहेत.
आधीचे सगळे उडीद काळे आहेत म्हणून तुम्हीच सांगता. ते पचवायची सवय आम्हाला झाली आहे. त्यात हे सावळे उडीद आल्याने नक्की काय फरक पडणार? आम्ही ते सात्त्विक म्हणून सेवन करू आणि अपचन होणार.
मून, आधी तुम्हाला धन्यवाद.
मून,
आधी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही अधूनमधून प्रोत्साहन देताय, बरं वाटतं. लिहायला उत्साह मिळतो. (खोटं कशाला सांगा?)
गापै,
<<मी म्हणतोय तो दुवा तुम्ही इथे उधृत केलाय! तिथली चर्चा तुमच्या युक्तिवादास पूरक नाही!>>
तो दुवा इथे द्यायच्या आधी मी वाचलाय. तुम्ही तोच दुवा दिला आहे हे कळण्यासाठी मला दुवा उघडून तर पहायला पाहिजे ना? मी उघडला नाही असं लिहिलंय की.
तिथली चर्चा उलटसुलट आहे. माझ्या युक्तीवादास पूरक आहे असं कुठे म्हटलं आहे मी? थेट विश्वास कशावरच नका ठेवू. तुम्हाला जी बाजू पटते तिच्यावर विश्वास ठेवा.
<<अरविंद केजरीवाल ज्यांच्याविरुद्ध आरोप करताहेत त्या सर्वांनी अंतर्गत चौकशी करून निर्दोषत्व साबीत करण्याला आपची काही हरकत असेल का ? उदा. गडकरी. >>
आब्र,
आपची हरकत असण्याचा संबंधच कुठे येतो इथे? गडकरींचा पक्ष त्यांना निर्दोष मानत असावा म्हणूनच तर तिकीट मिळालं, कितीतरी खात्यांचं मंत्रीपद मिळालं. प्रतिपक्षाचे लोक आरोप करतात म्हणून लोक आपल्या लोकांना काढत सुटले तर एकाही पक्षात एकही सदस्य उरणार नाही.
प्रश्न त्याच्यापुढे चालू होतो. आप म्हणत आहे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या बाहेर प्रश्न सोडवणार नाही. असं दमानिया/गांधींवर आरोप करणारे का नाही करत? केस करा, कोर्टात पुरावे सादर करा.
दमानियांवर काय आरोप आहेत हेही तुम्हाला माहीत नसताना (तुम्हीच लिहिलंय हे मागे!) तुमची अपेक्षा आहे की आपने त्यांना काढून टाकायला हवं होतं. त्या दोषीच असतील इतका ठाम विश्वास तुम्हाला वाटतोय आणि आप ने काढून टाकलेल्या १५ उमेदवारांबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही ह्यावरून काय समजायचं? असो.
तुमच्या बाकीच्या पोस्टस आणि मयेकरांची पोस्ट ह्यात (मला तरी) फक्त त्रागा दिसतोय त्यामुळे पुढे जाऊया.
विकु,
<<केवळ मंत्र्यांच्या तोंडी आदेशावरून पोलिस छापा टाकू लागले तर अनर्थ होईल.>>
खरंतर पोलिसांची इच्छा असेल तर मंत्र्याच्या आदेशाचीसुद्धा गरज नसावी.
"Under Section 42 of the NDPS Act, a person may be arrested without a warrant, on the suspicion of the commission of a drug-related offence. "
हे वाचण्यात आलं आहे. इथे कुणी कायदेतज्ञ असतील तर प्लीज हे खरं आहे का सांगा.
सांगून-सवरून छापा मारला तर ते लोक सावध नाही का होणार?
सगळे व्हिडिओज आणि तिथल्या रहिवाशांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर मला अजूनही वाटतं मिडियाने आणि बाँग्रेसींनी ह्या प्रकरणाला उगीच रेसिझ्म वगैरेचा रंग दिला आहे. शिवाय, भारतींनी त्या नायजेरियन बायांना सर्वांसमोर युरिन सँपल्स द्यायला लावले, कॅविटी सर्च करायला लावला, धक्काबुक्की केली असले गंभीर आरोप असतील तर त्याचे व्हिडिओज का नाही दाखवत मिडिया आपल्याला? काय ते खरं कळून जाईल ना.
<<जनलोकपाल च्या मुद्द्यावर राजीनामा देण्याचा निर्णय आततायीपणाचा होता असं अजूनही वाटतं. >>
सहमत. आततायीपणा होताच तो. नको तिथे तत्वनिष्ठा दाखवायची खरंच गरज नव्हती.
<<बेल न भरता तुरुंगात जाण्याच्या केजरिवालांच्या निर्णयामागची कारणे लिहाल तर बरे होईल.>>
लिहिते सविस्तर लवकरच.
ह्यासंबंधात मी युरोंना प्रश्न विचारला होता. <<मानहानी केस आणि बेल नाकारणं ह्याविषयी माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे. ह्या प्रसंगापूर्वी कधी केजरीवालांनी बेल बॉण्ड भरण्याचा नाकारल्याची घटना तुम्हाला माहीत आहे का?>>
पण बहुतेक युरो सुद्धा 'पालथ्या घड्यावर पाणी' टाकण्यात अर्थ नाही म्हणून गायब झाले असावेत किंवा कामात व्यस्त असावेत
एक साधा हिशोब बघा पटला तर
एक साधा हिशोब बघा पटला तर ...
आम आदमी पार्टीचे देशभरातील सदस्य ... किमान २ लाख असेल ..
दिवसाला १० रुपये एका सदस्याचा खर्च (चहा तरी देतील) = २,००,००० * १० = २०,००,०००/- ( वीस लाख रुपये)
एका दिवसाचे २० लाख रुपये तर एका महिन्याचे ? = २०,००,००० * ३० = ६,००,००,०००/- (सहा करोड रुपये)
आनि एका वर्षाचा खर्च = ६,००,००,००० * १२ = ७२ करोड
हा झाला फक्त एका वर्षाचा खर्च ते ही फक्त २ लाख कार्यकर्त्यांचा.. किमान खर्च अपेक्षित धरलेला आहे..
मग पार्टी चालवायला किती खर्च येत असेल ? अंदाजा लावा...
( हे मी फक्त आम आदमी पार्टी संदर्भात नाही सगळ्याच पार्ट्यांबद्दल बोलत आहे)
मिर्ची ताई <<पण बहुतेक युरो
मिर्ची ताई
<<पण बहुतेक युरो सुद्धा 'पालथ्या घड्यावर पाणी' टाकण्यात अर्थ नाही म्हणून गायब झाले असावेत किंवा कामात व्यस्त असावेत स्मित>>>
ट्रेडिग डेक्सवरुन सारखे सतत लिहीता येत नाही त्यामुळे उत्तरात विलंब होतो. तुमच्या आआप च्या सपोर्ट बद्द्ल म्हणाल तर त्या साठी मला व्यक्तीशः काहीही राग नाही. माझा शाळेपासुन चा मित्र तुमच्या इतकाच आप समर्थक आहे त्याचे आणि माझे हेच वाद चालु असतात.
रिलान्स च्या गॅस प्राइसिंग चा तुम्ही विचारलेला प्रश्न आणि वरील प्रश्न याचे उत्तर मी वेळ मिळाला की लगेच देतो. विज्ञानदास यांनी एक प्रश्न विचारला होता त्यालाही अजुन उत्तर दिलेले नाही.
सगळे एकाच धाग्यावर लिहीले तर चालेल का?
<<ट्रेडिग डेक्सवरुन सारखे सतत
<<ट्रेडिग डेक्सवरुन सारखे सतत लिहीता येत नाही त्यामुळे उत्तरात विलंब होतो. तुमच्या आआप च्या सपोर्ट बद्द्ल म्हणाल तर त्या साठी मला व्यक्तीशः काहीही राग नाही. माझा शाळेपासुन चा मित्र तुमच्या इतकाच आप समर्थक आहे त्याचे आणि माझे हेच वाद चालु असतात.>>
वाटलंच तसं मला. काहीच हरकत नाही. वेळ होईल तेव्हा सावकाश लिहा.
आणि तुमच्या मित्राला माझ्यावतीने माबोच्या सदस्यत्वाचं आमंत्रण द्या. मला धागा लढवायला भागीदार मिळेल.
कुठल्याही धाग्यावर लिहा. आपशी संबंधित काही दुसर्या धाग्यावर लिहिलंत तर मी इथे डकवेन. चालेल ना?
उदयन,
माहितीच्या अधिकारानुसार एक पत्र टाकून बघा की. उत्तर मिळेल असं वाटतं.
(माझ्या माहितीत) आप हा एकच पक्ष माहितीच्या अधिकाराखाली (RTI) यायला तयार आहे. असे दुसरे पक्ष पण असतील तर प्लीज इथे लिहा.
आप साठी काम करणार्यांमध्ये स्वयंसेवा म्हणून काम करणार्यांची संख्या मोठी असावी. माझ्या माहितीत अनेक आहेत असे. पदरचा खर्च करून प्रचार, माहितीपर व्हिडिओज बनवणे,व्यंगचित्रे बनवणे,अनुवाद करणे,ज्या ज्या पद्धतीने आणि जितका वेळ देणं शक्य आहे तेवढं करत आहेत.
मिर्चीताई माझ्या इथे पोस्ट्स
मिर्चीताई
माझ्या इथे पोस्ट्स वाढू लागल्या आहेत. मी दमानिया, गांधी यांना काढून टाकावे असं कुठं म्हटलेलं आहे हे दाखवाल का ? तसंच विजय कुलकर्णी पण संदिग्ध प्रश्न मला का विचारताहेत हे कळत नाही. मला जे म्हणायचं आहे ते विस्तृतपणे आणि शक्य तिथे संदर्भ देऊन लिहीलेले आहे. माझी भूमिका ब-यापैकी मांडून झालेली आहे आणि त्यात मीडीयाने केजरीवालांना हिरो बनवलेलं आहे हा आणि अनेक मुद्दे अनुत्तरीत आहे. या अर्थाच्या इतर संकेस्थळावरच्या चर्चाही डकवलेल्या आहेत. थोडक्यात, मी एकटाच नाही असा विचार करणारा..
मिर्चीताई जाता जाता.. तुम्ही
मिर्चीताई
जाता जाता..
तुम्ही तुम्ही अंतर्गत चौकशीला पर्याय काय या प्रश्नाचं उत्तर मी गडकरींनी केलं तसं करावं असं दिलं होतं. चौकशीसंदर्भातल्या पोस्टला ब-याच काळाने आप वरच्या आरोपांची जंत्री देऊन या आरोपांचं काय करायचं हे विचारलं, म्हणून पुढच्या पोस्टमधे व्यवहार्य काय आहे ते मत दिलं. जे आरोप महत्वाचे नाहीत असं तुम्हाला वाटतं त्याची का फिकीर करताय असा माझा प्रश्न होता, त्यावर तुम्ही पुन्हा चौकशीच केली नाही तर कसं कळणार...असा गोल गोल प्रकार चालू असल्याने माझी अशी विनंती आहे की तुमच्यावरच्या आरोपांबाबत तुमचं एक धोरण ठरवा. तुमच्यावर २७० रु चोरीचे आरोप होताहेत हा तुमचा त्रागा असेल तर उत्तरांचे संदर्भ बदलून प्रतिवाद करण्यापेक्षा ही प्रश्नोत्तरं जोडून वाचावेत. आता विपर्यास होऊ लागल्याने मी थांबतोय. पण आताचे तुमचे अनेक युक्तीवाद जनलोकपाल दरम्यान चालू असलेल्या आणि नंतरही हिट अॅण्ड रन आरोपसत्रांदरम्यान इतर अनेकांना लागू पडू शकतात. आजवर हातात कागद नाचवण्यापेक्षा कुठल्याही कायदेशीर पटलावर ही कागदपत्रं ठेवल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही. त्या संदर्भातल्या पोस्टस मागे आहेत.
माझ्या मते आप सारख्या नैतिक दृष्ट्या स्वच्छ असणा-या आणि इतरांना, संसदेला चोर म्हणणा-यांनी वेगळे आदर्श घालून देण्याची गरज होती. जे इतर करतात तेच तुम्ही करताय तर एकाची भर पडली हा निष्कर्ष इथल्या चर्चेत निघतो, म्हणजे तसं सिद्ध झालं असं मात्र माझं म्हणणं नाही. इतरही ठिकाणी थोड्या वेगळ्या चर्चा होऊ शकतील.
मिर्ची, १. >> तिथली चर्चा
मिर्ची,
१.
>> तिथली चर्चा उलटसुलट आहे. माझ्या युक्तीवादास पूरक आहे असं कुठे म्हटलं आहे मी? थेट विश्वास कशावरच नका
>> ठेवू. तुम्हाला जी बाजू पटते तिच्यावर विश्वास ठेवा.
चर्चा, वादविवाद, युक्तिवाद या गोष्टी बोध व्हावा म्हणून करायच्या असतात. तुम्ही दिलेल्या दुव्यातून नेमका विपरीत बोध होतो आहे. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत नियमबाह्य कामकाजाचा आग्रह धरला. तो मान्य न झाल्याने राजीनामा देण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग उरला नाही असा माझा निष्कर्ष निघतो.
२.
>> ह्या गोष्टीवरून राजीनामा देणं ही चूक होती हेही मान्य. पण तो 'गुन्हा' नव्हता, हेही तितकंच खरं.
मान्य. ती चूक होती पण गुन्हा नव्हता हे खरंय.
अवांतर : वोह गलती थी मगर गुनाह नाही था. तो फिर आसारामबापूनेभी लडकीकी गलती ऐसा कहा तो इतना गुस्सा कायको निकाला उनपे? बाकी चालू द्या.
आ.न.,
-गा.पै.
<<जे आरोप महत्वाचे नाहीत असं
<<जे आरोप महत्वाचे नाहीत असं तुम्हाला वाटतं त्याची का फिकीर करताय असा माझा प्रश्न होता, त्यावर तुम्ही पुन्हा चौकशीच केली नाही तर कसं कळणार...असा गोल गोल प्रकार चालू असल्याने माझी अशी विनंती आहे की तुमच्यावरच्या आरोपांबाबत तुमचं एक धोरण ठरवा. >>
सगळ्यात आधी - मी म्हणजे आप नव्हे !
आपची धोरणं तेच ठरवणार. मी फक्त माझ्या वाचनातून/ऐकण्यातून मला काय जाणवतंय ते लिहितेय.
आपला ह्या मुद्द्यावर खरंच गोल गोल प्रकार चालू आहे. मी माझी भूमिका ३-४ मुद्द्यांमध्ये स्पष्ट करायचा प्रयत्न करते -
१. आपच्या नेत्यांवर अनेक जण असंख्य आरोप करत आहेत. प्रत्येक वेळी तो आरोप करणार्या व्यक्तीवर मानहानीचा दावा ठोकणं आणि त्यांना कोर्टात खेचणं हे प्रॅक्टिकल नाही. (तुमची ही अपेक्षा असावी असं वाटतंय)
आधीच मर्यादित असलेले रिसोर्सेस (पैसा, वेळ, मनुष्यबळ) ह्या कामात अडकले तर बाकीच्या कामांमध्ये काय वापरणार?
अशा आरोपांचं एक उदाहरण म्हणजे मोदींनी केजरीवालांना पाकिस्तानी एजण्ट म्हणणं. ह्या आरोपात कसलंही तथ्य नाही असं आपवाल्यांना वाटलं तर ते ह्यासाठी अंतर्गत लोकपाल ही नेमणार नाहीत किंवा मानहानीचा दावा ही करणार नाही. इग्नोरास्त्र वापरतील.
२. काही आरोप ज्यात कदाचित तथ्य असण्याची पुसटशी का होईना पण शक्यता आहे असं वाटलं तर त्यासाठी अंतर्गत लोकपालाकरवी तपासणी करायची. (संबंधित आरोपांचे पुरावे, कागदपत्रे वगैरे)
आरोपांमध्ये तथ्य आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीला काढून टाकायचं. १५ उमेदवार अशा पद्धतीने काढले आहेत.
पण आरोप बिनबुडाचे आहेत असं आढळलं तर त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा. उदा.- दमानिया, मयंक गांधी
३. ह्यापुढे जाऊन कुणी कोर्टात केस केली, पुरावे सादर केले तर त्याला आप चा विरोध कुठे आहे? आणि समजा असलाच तर असा विरोध असण्याला महत्व काय? कायदा सर्वांना सारखाच.
कोर्टात दोषी ठरवलेल्या कुठल्या उमेदवाराला आप ने अजून सांभाळल्याचं माहीत असेल तर इथे लिहा. मला अशी व्यक्ती माहीत नाही.
मला वाटतं, माझी भूमिका ह्यापेक्षा स्पष्ट शब्दांत नाही मांडू शकणार. तुम्हाला अजूनही माझा मुद्दा लक्षात आला नसेल तर क्षमा करा. लेखनदोष समजा.:)
<<त्यात मीडीयाने केजरीवालांना हिरो बनवलेलं आहे हा आणि अनेक मुद्दे अनुत्तरीत आहे. >>
हे मान्य झालंच आहे की. मिडियानेच केजरीवालांना नायक बनवलं आणि मिडियानेच खलनायक बनवलं !
माझ्या मते त्याचा एकमेव अर्थ असावा- काँग्रेसला संपवण्यासाठी भाजपाने केलेली खेळी.
सवड मिळाल्यास हे दोन व्हिडिओ बघा.
१. ऑपरेशन केजरीवाल - लोकसभा निवडणूकीच्या आधीचा व्हिडिओ आहे. त्यात केजरीवाल कसे हिरो आहेत, ते मुख्यमंत्री बनणार तर भ्रष्ट काँग्रेसींचे कसे धाबे दणाणले आहेत, काँग्रेसी कसे फायली फाडत फिरत आहेत वगैरे दाखवलं आहे.
२. "नायक बना खलनायक" ह्याची लिन्क आत्ता सापडत नाहीये. मिळाली की टाकते.
गापै,
<<केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत नियमबाह्य कामकाजाचा आग्रह धरला. तो मान्य न झाल्याने राजीनामा देण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग उरला नाही असा माझा निष्कर्ष निघतो.>>
राजीनामा देणं हे आततायीपणाचं होतं, चूक होतं हे जवळजवळ सगळ्यांनाच मान्य आहे. त्यांच्यापुढे राजीनामा न देता कारकीर्द चालू ठेवण्याचा मार्ग होता, आणि तो त्यांनी घ्यायला हवा होता.
बाकी ते आसारामबापूंचं चूक आणि गुन्हाचं जे उदाहरण दिलंय त्याला काहीच अर्थ नाही. वैम. दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या गांभीर्याच्या आहेत.
आता केजरीवालांच्या
आता केजरीवालांच्या बेलप्रकरण/तिहारजेल-नाट्यप्रवेशाबाबत लिहिते.
मला खटकलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट केजरीवालांनी ह्याआधी सुद्धा अनेकदा केलेली आहे तीच गोष्ट अशी अचानक अतिमहत्वाची का झाली असावी?
१. RTI activist Kejriwal arrested, released - जानेवारी २०११ ची घटना आहे. त्यावेळी अटक केलेल्या आठ जणांपैकी ७ जणांनी बॉण्ड सही करून दिल्याने त्यांना लगेच सोडून दिलं. केजरीवालांनी बॉण्ड भरायला नकार दिला.
"The seven others were released after they signed a bond but Ramon Magsaysay Award winner Kejriwal refused to do so. He was freed on Saturday evening."
२. Kejriwal refuses to seek bail in defamation case - जून २०१३ ची घटना आहे. सरकार 'दलाल' आहे, वीजकंपन्यांशी हातमिळवणी करतं अशा अर्थाचं वक्तव्य करून सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती.
At the protest, people set afire electricity bills, alleging there was collusion between government and discoms in the capital to increase tariffs and help private companies earn more.
शीला दिक्षितांच्या अधिकार्याने मानहानीचा दावा केला होता. पण तेव्हाही केजरीवालांनी बॉण्ड भरण्यास नकार दिला होता.
"Refusing to seek bail, Kejriwal told the court that he does not want bail and he was ready to face the consequences. He added that giving a surety would imply there was a chance he might flee, which was not the case."
तेव्हा न्यायाधीशांनी गरज असेल तेव्हा कोर्टात हजर राहण्याचं अंडरटेकिंग लिहून घेऊन त्यांना सोडून दिलं होतं.
Defamation: Court releases Arvind Kejriwal on undertaking to appear
ह्या दोन घटनांव्यतिरिक्त ही इतर वेळी केजरीवालांनी जमानत घेण्यास नकार दिला आहे.
मग आत्ताच आपण त्याला ड्रामा..नौटंकी..नाट्यप्रवेश वगैरे विशेषणे का लावतोय???
माझ्यामते सोप्पं उत्तर - आपल्यावर प्रसारमाध्यमांनी असलेच शब्द पुन्हापुन्हा आदळवले आहेत. आपल्याला सत्य न दाखवता फक्त एकच व्यक्ती आणि एकच फेक मॉडेल दाखवत राहिले आहेत.
बीबीसी वर बातमी होती - Arvind Kejriwal: India campaigner jailed in defamation case
टाइम्स ऑफ इण्डियामध्ये बातमी होती - Street drama back after Arvind Kejriwal opts for jail over bail in libel case
खरंतर हे लिहिल्यावर ह्या बेलबॉण्ड प्रकरणात आणखी काही लिहायची गरजच नाही. पण जमानत न घेण्यामागे केजरीवालांची काय भूमिका आहे (जे वाचण्यात आलंय) आणि मला ती योग्य का वाटते ह्याविषयी जमलं तर आज रात्री किंवा उद्या लिहिते.
आधीच्या प्रकरणात जामीन दिला
आधीच्या प्रकरणात जामीन दिला नाही म्हणून पुन्हा एकदा तसेच करणे योग्य कसं काय ठरू शकतं?
आणि जामिन दिला नाही म्हणून रवानगी तुरंगात झाली तर तक्रार नसावी.
आणि पुन्हा एकदा
He added that giving a surety would imply there was a chance he might flee, which was not the case>>>
आम आदमी आहात तर स्पेशल ट्रीट्मेंटची अपेक्षा कशाला?
जो नियम सर्वांना आहे तोच तुम्हालाही, exception कशाला हवयं?
माझ्यामते सोप्पं उत्तर -
माझ्यामते सोप्पं उत्तर - आपल्यावर प्रसारमाध्यमांनी असलेच शब्द पुन्हापुन्हा आदळवले आहेत. आपल्याला सत्य न दाखवता फक्त एकच व्यक्ती आणि एकच फेक मॉडेल दाखवत राहिले आहेत.
>>>
आपला सुद्धा मिडीयानेच वर आणलय यावर दुमत नसावं. आणि जर प्रसारमाध्यमांनी एक बाजू उचलून धरली असेल म्हणून ते फेक कसे काय ठरतात?
विरोधासाठी विरोध हे एक निगेटिव्ह राजकारण नाही का? किमान आता जे आपचे आमदार/खासदार आहेत त्यांनी तरी काम करुन दाखवावे.
मिर्ची तुमच्या गॅस च्या
मिर्ची
तुमच्या गॅस च्या प्रष्नावर उत्तर. समजण्यास सोपे जावे म्हणुन एक उदाहरण....
आमच्या वडलाच्या सोसायटीत (पवई लेक पासुन १०० मीटर वर). बोर लावला. ( बागेसाठी पाण्याला). त्याच सुमारस, माझ्या काकानी पण विजापुर, कर्णाटक (दुश्काळी भाग) शेतात बोर टाकुन घेतला. वडलाच्या सोसायटीला २०,००० रु खर्च आला तर काकाना ५०,००० पेक्षा जास्त खर्च आला. कारण पवईत २० फुटावर पाणी लागल तर विजापुर ला ३०० फुट खाली जाव लागल. ३०० फुटा साठी one time cost and daily operating cost ही २० फुटा पेक्षा जास्त आहे. (जरी दोन्ही कडुन पाणीच मिळत असले तरी )
तसेच. बांगलादेशातिल जमिनीत वर असलेला गॅस काढायला क्रुष्णा नदीच्या खाली असलेल्या गॅस काढण्यापेक्षा नक्कीच कमी खर्च येणार. त्यामुळे बांगलादेश ला गॅस कितिला काढुन दिला ही तुलना योग्य न्हवे. सौदी अरेबियात कच्चे तेल काढायला $३ प्रती बॅरेल लागतात, तोच दर Bombay high ला दिला तर ONGC चे दिवाळे निघेल. ( ही जागा अरबी समुद्रात आहे मुम्बई पासुन १०० किमी लाम्ब).
दुसरी गोष्ट, केजरिवाल नी आरोप केला होता के क्रुष्णा खोर्यातुन गॅस काढयला $0.80/BTU खर्च येतो तर रिलायन्स गॅस $१/BTU का नाही विकत . why to pay $4 or $8/ BTU
हे म्हणजे तुमचे २ कोटी चे घर आहे आणी ते maintain करायला जर महिना २ हजार खर्च यत असेल तर आपण काय २००० भाडे घेणार का? 2 कोटी invest केले तर बाजार भावाप्रमाणे भाडे घेणार ना..
रिलाय्न्स नी ५००० कोटी invest करुन हा project पुर्ण केला आहे तर ते पैसे निघयला नकोत ?
सध्या ११६ गॅस काढयचा project मधील फक्त ५-६ project चालु अहेत. म्हणुन देशाला $१६ च्या दराने गॅस आयात करावा लागतो. योग्य मोबदला दिल्याशिवाय ह्या कंपन्या गॅस काढणार नाहीत. ( ह्या charitable कंपन्या नाहीत.). हा तिढा सोडवण्यासाठी मनमोहन सिंगच्या सरकार्नी रंगराजन नावाची समिती स्थापन केली. ह्या समितिचे काम होते की कंपन्यना योग्य किंमत मिळावी आणी सगळे project चालु व्हावे आणी देशाला महाग गॅस विकत घ्यावा लागु नये. ह्या समितिने सगळ्या project चा अभ्यास करुन रिलायन्स ला $८ दर द्यावा असे ठरवले. गॅस दर किती असावा या बाबात दुमत असु शकते पण बांगलादेश ला $२ ला विकतात म्हणुन भारताला पण $२ ला विकावा, किवा रोजचा खर्च $०.८० यतो म्हणुन $१ विकावा ( investment laa ignore करा) असे म्हणने हे बालिशपणाचे लक्षण आहे. खास करुन IIT सारख्या विद्यापिठात शिकलेल्या माणसाकडुन.
मी रिलायन्स चा समर्थक नाही किवा माझ्याकडे रिलायन्स चे शेअर पण नाहित. एकच अपेक्षा आहे की भारताने कमीत कमी गॅस आयात करावा ज्यामुळे import-export difference कमी होईल आणी महागाई कमी होण्यास मदत होईल तसेह हे project चालु झाले तर लोकाना रोजगार पण मिळेल .
अत्ताच रिलायन्स ला सरकारनी $५७८, ०००,००० चा फाईन लावला आहे. कारण कळल्यावर त्याबद्दल सविस्तर लिहिन.
मिर्ची, तुम्ही कळकळीने आप आणि
मिर्ची, तुम्ही कळकळीने आप आणि एके यांच्या समर्थनार्थ लिहित आहात याबद्दल कौतुक
दिल्ली निवडणूकांच्या वेळेस मी आपच्या प्रभावाने भारावून गेलो होतो.
आणि दिल्ली ऑफिस मधे फोन देखील केला होता की पक्ष जॉईन करणे आणि निवडणूकीचे तिकिट मिळणे यासाठी काय निकष आहेत. कारण पक्ष नविन असल्याने हे जाणून घेण्याची उत्सुकता होती, अजुनही आहे.
मला खटकलेल्या गोष्टी येथे देत आहे, (काही मुद्दे आधीच चर्चेत येऊन गेले आहेत)
१. भाजपचा विरोध आणि त्याला काँग्रेसप्रमाणेच समजणे.
२. दिल्ली मधे सत्ता स्विकारणे (याला तुम्ही आधीच उत्तर दिलेले आहे)
३. अण्णा हजारे यांचा पुरेपुर वापर करून घेऊन त्यांना योग्य ते श्रेय न देणे (निदान सत्तेत आल्यावर उल्लेख करणे, त्यांची भेट घेणे, इ. करणे अपेक्षित होते)
४. दिल्लीतल्या यशाने हुरळून जाऊन केंद्रातल्या निवडणूकांमधे तातडीने उडी घेणे आणि मोदींविरोधातच उभे राहणे.
५. सारखे सारखे गरीब चेहरा करून म्हणणे की "हम तो राजनीती करने के लिये आये ही नही हैं" (स्वगत : तुमची इच्छा असो नसो, तुम्ही जो मार्ग पत्करला आहे त्यामधे तुम्हाला थोडीबहुत राजनीती ही करावीच लागणार. आठवा नायक चित्रपटातला शेवटचा प्रसंग)
इति,
सध्या ११६ गॅस काढयचा project
सध्या ११६ गॅस काढयचा project मधील फक्त ५-६ project चालु अहेत.<< महत्वाचा मुद्दा याचं कारण थोडक्यात लिहीलत तर बर होईल.लोकांनाही कळेल काय आहे की उगाचच बंद ठेवलेत.
प्रॉफिट मार्जीनचा मुद्दा पटण्यासारखा आहे. रिलायन्सला फाईन बहुदा टारेगेट पेक्षा कमी गॅस काढल्यामुळे केला गेला आहे. मटाला सविस्तर आहे बातमी .
बेल बाँड मधे केजरीवाल यानी
बेल बाँड मधे केजरीवाल यानी जेल मधे जाण्याचा निर्णय स्वतः घेतला होता. त्यांच्य म्हणण्या प्रमाणे बेल बाँड देंणे म्हणजे माफी मागणे आणि आपली चुक झाली असे कबुल करणे होय. त्यांनी हा निर्णय घेतला होता तर तिहार जेल बाहेर रस्त्यात बसुन रास्ता रोको कशासाठी चालु होते. आम आदमीला त्रास देण्यासाठी?
यात आणि खळ् खट्याक मधे फरक तो काय?
सलिल शहा यांनि उत्तर लिहीले आहे तेच परत लिहीण्यात काही मतलब नाही. भारत आणि बांग्लादेशला एकाच विहीरीतुन गॅस मिळत नसेल तर हा अपप्रचार कशासाठी? यात काय राजकारण आहे?
रिलायंस च्या बाजुलाच महानदि बेसिन मधे ओ एन जी सी उत्खनन करते आहे त्यांनी $ १३ चा दर मागितला आहे. त्यांच्यावर केस का नाही दाखल करत?
प्रकरण न्यायालयात आहे तेव्हा न्यायालय तज्ञांचे अहवाल मागवेलच तरी ज्या मुद्यावरुन केस चालु केली आहे तो टीकणे कठीण आहे. यात रंगराजन समिती ने बनवलेला अहवाल सुध्दा सगळी गृहीतके जमेस धरुन बनवलेला आहे किंवा नाही हे सुध्धा समजेल. गॅस स्वस्त मि़ळावा या साठी प्रयत्न व्हावेत हे मान्य आहे पण राजिनाम्याच्या दिवशी केस करुन सनसनाटी निर्माण करणे हे काही समजत नाही.
या गॅसच्या आधिच्या दर आकारणीला जमेस घरुनन चालु होणारे यांच्याच भावाचे मेगा विज प्रकल्प कॉस्ट एस्केलेशन मुळे वादात आले आहेत. खरा वाद हा तेथुनच सुरु झाला आहे.
सध्या तरी जास्त दर देवुन आणि परकिय चलन वाया घालवुन आपण कोणाच्या तुमड्या भरत आहोत?
चर्चगेट स्टेशनवर आपच्या
चर्चगेट स्टेशनवर आपच्या कार्यकार्ट्यांनी केलेल्या मोडतोडीची भरपाई कधी देणार केजरीवाल? या तोडफोडीचे व्हिडीओज पण आहेत युट्युबवर. आम आदमीला त्रास देणारीच पार्टी आहे ही.
<<आम आदमी आहात तर स्पेशल
<<आम आदमी आहात तर स्पेशल ट्रीट्मेंटची अपेक्षा कशाला? जो नियम सर्वांना आहे तोच तुम्हालाही, exception कशाला हवयं?>>
एखाद्या आरोपामध्ये अटक झाल्यावर सुद्धा जामिन भरून बाहेर येणं किंवा जामिन नाकारून तुरुंगवास स्वीकारणं हे दोन पर्याय/हक्क प्रत्येक नागरिकापुढे असतात. (अजामिनपात्र गुन्हे सोडून)
केजरीवालांनी (आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्या त्यांच्या साथीदारांनी) कायमच दुसरा मार्ग स्वीकारला आहे. जेव्हा कोणीही 'अरविंद केजरीवाल' ह्या नावाच्या व्यक्तीला ओळखतही नव्हतं तेव्हाही त्यांनी हेच केलंय आणि आता माजी मुख्यमंत्री असतानाही हेच केलंय.
ह्यात स्पेशल ट्रीटमेंट कुठे आली? उलट त्यांनी स्पेशल ट्रीटमेंट नाकारली आहे.
जामीन देणं म्हणजे सध्याच्या तपासयंत्रणा किंवा न्यायव्यवस्थेतून पळवाट शोधण्यासारखं आहे. ते का करायचं?
<<आधीच्या प्रकरणात जामीन दिला नाही म्हणून पुन्हा एकदा तसेच करणे योग्य कसं काय ठरू शकतं?>>
वर लिहिल्याप्रमाणे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्या ह्या समूहाचं तत्व आहे की जामिन घ्यायचा नाही. तुरुंगवास झाला तरी चालेल. अण्णा आंदोलनातही अण्णा, केजरीवाल वगैरेंनी हेच केलं होतं.
"The 74-year-old Hazare and two key members of his team - Mr Kejriwal and Manish Sisodia - have been sent to seven days in judicial custody because they refused to apply for bail after being arrested in the capital today"
पण तेव्हा आपण ह्या गोष्टीचं कौतुक केलं होतं. जामिन न देता तुरुंगवास पत्करणं योग्य वाटलं होतं. तिहार जेलच्या बाहेर असंख्य लोकांनी जाऊन आपलं समर्थन दर्शवलं होतं.
मग आता आपली दृष्टी का बदलली? आता आपल्याला आपच्या समर्थकांनी तिहारच्या बाहेर जाणं हे अराजक का वाटतंय?
जामिन न घेण्याचा ह्या लोकांचा निर्णय मला स्वतःला योग्य का वाटतो ते लिहिते.
बीबीसी मध्ये आलेली ही बातमी वाचा.India jail-born man bails mother after 19 years
खुनाच्या आरोपात कानपूरच्या विजयकुमारीला १९ वर्षांपूर्वी अटक झाली. अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाही. हा आरोप खोटा आहे असं त्या स्त्रीचं म्हणणं होतं(असं प्रत्येक आरोपी म्हणतो हे मान्य)
अटक झाल्यावर जामिन घेऊन तिला बाहेर येता आलं असतं. पण त्यासाठी लागणारे १०,००० रूपये तिच्याकडे नव्हते. नवर्याने तिला टाकून दिलं. अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तुरूंगातच बाळंतपण झालं. काही महिन्यांनी तिने मुलाला तूंगाबाहेर पाठवलं. त्या मुलाने वेगवेगळ्या ज्युवेनाइल होम्स दिवस काढले. मग आईला जामिनावर सोडवण्यासाठी १०,०००रूपये गोळा करण्यासाठी दिवसरात्र काम केलं आणि जामिन देऊन तिला सोडवून आणलं !
न जाणो अशा किती विजयकुमारी/कुमार तुरुंगात आयुष्य कंठत असतील. त्यांच्या कुटुंबाची वाताहत होत असेल. मुलं आईवडिलांच्या मायेला वंचित राहत असतील.
"There are an estimated 300,000 inmates in India's prisons, 70% of whom are yet to face trial. And many of them have spent a long time in custody.
It is a reflection of India's shambolic and sluggish legal system where it can often take years for a case to be heard and a trial to be concluded" हे पटतंच.
१०,००० रूपये भरून जामीन घेणं केजरीवालांना जड नाही. पण ते अशा लोकांचा आवाज बनून लढत आहेत.
(तरीही जेव्हा गडकरी प्रकारात ते तुरुंगात गेले तेव्हा माझ्याही मनात हा विचार येऊन गेला होता की सगळेच मुद्दे घेऊन एकाच वेळी कसं लढता येईल? निवडणूकीत जागा कमी मिळाल्या हे सत्य आहे. आता अशा अन्याय होणार्या लोकांविरुद्ध लढा म्हणून आत्ताच तुरुंगात जाणं म्हणजे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड न देता पळ काढण्यासारखं वाटतं.
पण ही पहिलीच वेळ नसून ह्याआधीही त्यांनी प्रत्येक वेळी हेच केलंय हे जेव्हा समोर आलं तेव्हा मला जास्त कौतुक वाटलं. प्रतिकूल परिस्थितीतही तत्वावर ठाम रहायला फार निर्धार आणि बळ लागतं.)
इच्छुकांनी हे लेखही वाचा.
१. केजरीवाल की जेल यात्रा मील का पत्थर
२. फरगेट केजरीवाल -आऊटलुक - कायद्याशी संबंधित नसलेल्यांना हा लेख जरा क्लिष्ट वाटू शकतो. मला वाटला.
३. Law is old and Media is sold – Arvind Kejriwal fighting two demons together
केजरीवाल उच्च न्यायालयात जामिन नव्हे तर पर्सनल बाँड भरून बाहेर आले, हे सत्य (मला) फक्त ह्या एकाच बातमीत दिसलं. बाकी सगळे चढाओढीने 'केजरीवाल की हार' 'आखिर केजरीवालने बेलबाँड भर ही दिया' चा खोटा ढोल वाजवण्यात मग्न होते.
"There can't be anymore shame for a nation - if its leading media houses don't have least knowledge about the difference between bail bond and personal bond." हे पटलं.
४. पर्सनल बाँड आणि बेल बाँड ह्यातला फरक इथे समजावून सांगितला आहे - यह है पर्सनल बॉन्ड और बेल बॉन्ड का फर्क
केजरीवाल तुरुंगात गेले त्याच्या दुसर्या दिवशी योगेंद्र यादव ५०००रूपयांचा जामिन देऊन बाहेर आले, अशी खोटी बातमी बरेच चॅनेल्स दाखवत होते. पण यादवांनी सुद्धा पर्सनल बाँडच दिला होता. जामीन नाही.
"इस तरह मीडिया द्वारा गलत सूचनाएं देने से आम लोगों में न्यायिक प्रक्रिया और उपबंधों के बारे में भ्रम पैदा हो रहे हैं।"
मिडियाने खरंच थोडं जबाबदारीने काम करायला हवंय. नाहीतर आपल्यालाच सतर्क राहून सगळ्या बातम्यांच्या मागचं सत्य शोधत फिरावं लागेल.
<<आपला सुद्धा मिडीयानेच वर
<<आपला सुद्धा मिडीयानेच वर आणलय यावर दुमत नसावं. आणि जर प्रसारमाध्यमांनी एक बाजू उचलून धरली असेल म्हणून ते फेक कसे काय ठरतात?>>
दुमत नाहीच. आणि ते चूक होतं असंही माझं मत आहे.
प्रसारमाध्यमांनी कोणाचीच बाजू उचलून धरायला नकोय. त्यांनी फक्त आणि फक्त बातम्या द्यायला हव्या आहेत.त्यासाठी माध्यमे स्वतंत्र असायला हवी आहेत. उद्योगपतींच्या ताब्यात असताना हे कसं शक्य आहे?
ह्या मुद्द्यावरून आठवलं. अंबानींनी ४००० कोटी देऊन नेटवर्क१८ विकत घेतल्यावर CNN-IBN च्या राजदीप सरदेसाई आणि इतर काहींनी राजीनामा दिला.
परवा ह्यासंबंधी Inside the Network18 takeover हा लेख वाचण्यात आला. जरूर वाचा.
"Throughout the run-up to the November-December state assembly elections and its aftermath, Ambani had been angered by the attacks made on him by Arvind Kejriwal, leader of the Aam Aadmi Party (AAP)."
"At this juncture, a call to Sardesai seemed like a good idea. After all, RIL indirectly owned Network18. “They wanted a complete blackout of Kejriwal and AAP,” said another Network18 official who was privy to the conversation but did not want to be identified. “Rajdeep refused, saying it was just not possible. He stood by the spirit of journalism. So they were miffed that the channel had not boycotted the AAP.”
"Pressure was mounting on Bahl, too. According to an RIL official who is now part of the takeover team at Network18 but refused to be identified, Manoj Modi, the right-hand man of Mukesh Ambani, reached out to Bahl. “Modi was furious. He was like—‘tum humko dacoit bulate ho, tum chilla rahe ho ki hum crony capitalist hai. Agar aisa tha to dacoit se paise mangne kyon aye the? Tum kaun se doodh ke dhule ho?’"
प्रसारमाध्यमे स्वतंत्र आहेत ??
<<किमान आता जे आपचे आमदार/खासदार आहेत त्यांनी तरी काम करुन दाखवावे.>>
आपचे आमदार/खासदार व्यवस्थित काम करत आहेत, असं दिसतं. प्रसारमाध्यमे हे दाखवत नाहीत.
मोहल्ला सभा हा 'स्वराज' चा किंवा काही बाबतीत सत्ता लोकांच्या हातात देण्याचा महत्वाचा भाग आहे. गंमत म्हणजे भाजपा मोहल्लासभांच्या विरोधात प्रचार करत आहे.
विरोधासाठी दिलेली कारणे तर अतिशय हास्यास्पद आहेत.
"भाजपा का कहना है कि स्वराज के नाम पर नागरिकों को सशक्त करने के लिए मोहल्ला सभा बनाने का दावा एक छलावा है।"
"वर्ष 2010 में भाजपा ने आवासीय वार्ड कमेटी (आरडब्ल्यूसी) के माध्यम से स्थानीय विकास में लोगों को सहभागी बनाने की योजना बनाई थी। मोहल्ला सभा इसकी नकल है, लेकिन इसका उद्देश्य खतरनाक है। इसके माध्यम से आप अपने राजनीतिक सहयोगियों को पुरस्कृत तथा समुदाय का राजनीतिकरण करने की कोशिश कर रही है। इसका विरोध जरूरी है।' - संजय कौल, मुख्य प्रवक्ता, दिल्ली प्रदेश भाजपा।"
बाँग्रेसींकडून विरोध होणारच. आमदार निधीत ४ कोटी मिळतात हे लोकांना कळू द्यायचं, त्यातनं लोकांच्या गरजा भागवायच्या....मग स्वतःच्या घरावर माड्या कशा चढणार? पुढच्या निवडणूकीसाठी तिकीट कसं मिळणार? घोर पाप !
महेश, कौतुकाबद्दल धन्यवाद
महेश,
कौतुकाबद्दल धन्यवाद
<<दिल्ली निवडणूकांच्या वेळेस मी आपच्या प्रभावाने भारावून गेलो होतो.>>
वोईच तो गडबड है !
आपला इतकं दणदणीत यश मिळाल्यामुळे बरेच लोक आपकडे आकर्षित झाले होते. पण जितक्या वेगाने आकर्षित झाले होते त्याच्या दुप्पट वेगाने नंतर लांब गेले.
मला तेव्हा आप माहीतही नव्हती. आधीही लिहिलंय की मला राजकारणाची किळस यायची. काहीच वाचत्/बघत्/ऐकत नव्हते. दिल्लीत आप निवडून येणं, नंतर राजीनामा देणं ह्या गोंधळाचाही मला काहीच पत्ता नव्हता.
लोकसभा निवडणूकांच्या प्रचारादरम्यान इथल्या लोकांनी काही विचारलं तरी सांगता यायचं नाही. अगदीच अडाणी असल्याची भावना आली. म्हणून पहिल्यांदा राजकारणासंबंधी जुजबी माहिती तरी ठेवू या या विचाराने एकदा युट्युब उघडलं आणि इण्डिया टुडे कन्क्लेव्ह मधील मुलाखती पाहिल्या. त्यादिवशी मला केजरीवाल ही व्यक्ती इतर राजकारण्यांपेक्षा वेगळी आहे हे मनापासून वाटलं.
तेव्हापासून खणून काढून त्यांची मागची (जवळजवळ) सगळी भाषणे/मुलाखती पाहिल्या.कुमार विश्वासांच्या पण बर्याच मुलाखती पाहिल्या.
हे लोक योग्य मार्गावर आहेत ह्या गोष्टीसाठी माझ्यापुरती मी आश्वस्त आहे.:)
तुमचे मुद्दे -
१. भाजपचा विरोध आणि त्याला काँग्रेसप्रमाणेच समजणे.
---> भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ! नाही पटत? अनेक उदाहरणे देता येतील. आत्ता तेवढा वेळ नाही.
दिल्लीमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनी मिळून सरकार स्थापन केल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.
Operation Delhi: BJP, Congress MLAs meet secretly in Delhi five-star hotel
हा व्हिडिओ पहा. दोन भाग आहेत. कालची बातमी आहे.
२. दिल्ली मधे सत्ता स्विकारणे (याला तुम्ही आधीच उत्तर दिलेले आहे)
३. अण्णा हजारे यांचा पुरेपुर वापर करून घेऊन त्यांना योग्य ते श्रेय न देणे (निदान सत्तेत आल्यावर उल्लेख करणे, त्यांची भेट घेणे, इ. करणे अपेक्षित होते)
---> भेट झाली आहे. Kejriwal meets Anna at Maharashtra Sadan
अण्णांनी अनेकदा विसंगत विधाने केली आहेत, केजरीवालांच्या विरोधात बोलले आहेत. केजरीवालांनी अण्णांबाबत अवमानकारक उद्गार काढल्याचं एकदाही आढळलेलं नाही.
४. दिल्लीतल्या यशाने हुरळून जाऊन केंद्रातल्या निवडणूकांमधे तातडीने उडी घेणे आणि मोदींविरोधातच उभे राहणे.
---> दिल्लीत काँग्रेसला नेस्तनाबूत केल्यावर पुढचं लक्ष्य भाजपा असणं स्वाभाविक होतं. आणि भाजपाचा चेहरा मोदी होते. मोदींविरुद्धही कधीही वैयक्तिक गोष्टींवर बोलल्याचं माझ्या वाचण्यात आलेलं नाही. त्यांच्या खोट्या गुजरात मॉडेलवर, भांडवलशाहीवरच बोलायचे ते.
५. सारखे सारखे गरीब चेहरा करून म्हणणे की "हम तो राजनीती करने के लिये आये ही नही हैं" (स्वगत : तुमची इच्छा असो नसो, तुम्ही जो मार्ग पत्करला आहे त्यामधे तुम्हाला थोडीबहुत राजनीती ही करावीच लागणार. आठवा नायक चित्रपटातला शेवटचा प्रसंग)
---> हे मान्य. राजकारण शिकावंच लागणार. पण तत्वांची मोडतोड न करता हे कसं जमवतात हेच बघायचं आता.
त्यांचं "मेरी औकात ही क्या है' हे म्हणणंसुद्धा मला अज्जिबात आवडत नाही
ऑन अ सिरीयस नोट, असं म्हणणं खरंच थांबवावं त्यांनी.
साहिल शहा,
तुमच्या मुद्द्याबद्दल नंतर लिहिते. कामंधामं बघते जरा आता.
युरो, तुमची पोस्ट पण वाचली
युरो, तुमची पोस्ट पण वाचली नाहि अजून. नंतर वाचते.
(No subject)
<<<तसेच. बांगलादेशातिल जमिनीत
<<<तसेच. बांगलादेशातिल जमिनीत वर असलेला गॅस काढायला क्रुष्णा नदीच्या खाली असलेल्या गॅस काढण्यापेक्षा नक्कीच कमी खर्च येणार. >>
साहिल,
२२ मे, २००९ ला रिलायन्सने सरकारला लिहिलेल्या पत्रात स्वत: च लिहिलं होतं की गॅस काढायला एका युनिटला ०.८९४५$ इतका खर्च येतो.
ह्या लिन्कवर केजरीवालांनी २५.०६.२०१४ ला (म्हणजे काल) मोदींना लिहिलेलं पत्र वाचता येईल. त्यामध्ये रिलायन्सला येणारा खर्च १$ पेक्षा कमी असल्याचे तीन दाखले/पुरावे दिले आहेत. वाचून पहा.
बरं हे जर खोटं असतं तर आत्तापर्यंत बाँग्रेसी आणि रिलायन्सने हा मुद्दा कसा खोटा आहे ह्यावर रान उठवलं असतं. पण प्रॉडक्शन कॉस्टबद्दल १-२ लेख सोडले तर फारसं कुणी बोलताना दिसलं नाही.
<<गॅस दर किती असावा या बाबात दुमत असु शकते पण बांगलादेश ला $२ ला विकतात म्हणुन भारताला पण $२ ला विकावा, किवा रोजचा खर्च $०.८० यतो म्हणुन $१ विकावा ( investment laa ignore करा) असे म्हणने हे बालिशपणाचे लक्षण आहे. खास करुन IIT सारख्या विद्यापिठात शिकलेल्या माणसाकडुन. >>
१$ ला विकावा, असं केजरीवालांनी म्हटलेलं कुठे वाचलं तुम्ही? कोणीही योग्य फायदा घेणारच, पण १$ पेक्षा कमी खर्चासाठी ८$ ?? ३७५ % फायदा !!!
हा पैसा तुमच्या-माझ्या खिशातून जातोय. अशा पद्धतीने महागाई कशी कमी होईल?
तरीही नेमका किती खर्च येतो ह्याबद्दल कुणाच्या वाचनात अधिकृत आकडा आला तर इथे लिहा प्लीज.
RIL cost of bringing gas from offshore to onshore is below $1
सुरूवातीचा खर्च म्हणजे विहिरी खणणं, पाइपलाइन्स वगैरे गोष्टींचा खर्च सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये वसूल झाला असल्याचं कुठेतरी वाचलंय. लिन्क देते सापडल्यावर.
<<गॅस स्वस्त मि़ळावा या साठी प्रयत्न व्हावेत हे मान्य आहे पण राजिनाम्याच्या दिवशी केस करुन सनसनाटी निर्माण करणे हे काही समजत नाही.>>
केजरीवालांनी अंबानींवर केस १२ फेब्रुवारीला केली आणि राजीनामा १५ फेब्रुवारीला दिला. शिवाय अंबानींचा मुद्दा त्यांनी सत्तेत आल्यावर नाही काढला. ऑक्टोबर २०१२ ला त्यांनी अंबानी आणि केजी गॅस घोटाळ्याबद्दल पत्रकार परिषद भरवली होती. ही परिषद प्रसारित केली म्हणून रिलायन्सने प्रसारमाध्यमांवरच मानहानीचा दावा दाखल केला!
त्यावेळी 'प्रसारमाध्यमांवर का दबाव आणता? माझ्यावर दावा करा' असं सांगणारं केजरीवालांनी अंबानीला लिहिलेलं पत्र वाचा.
युरो आणि इथले (गायबलेले ) इतर अर्थतज्ञ ह्यांना एक विनंती आहे - अंबानी विरुद्ध तक्रारी/कांगावा आप करतंय,असं चित्र डोळ्यासमोरून काढून टाका. ४-५ दिवसांपूर्वी CAG ने केजी बेसिन स्कॅमबद्दलचा रिपोर्ट दिला आहे. त्यात रिलायन्स देशाला म्हणजेच आपल्याला कशा-कशा पद्धतीने लुटत आलं आहे ह्यावर सविस्तर विवरण दिलं आहे. कॅगच्या ह्या महत्वाच्या रिपोर्टवर कुठल्याही चॅनेलवर चर्चा होताना दिसत नाहीये. मिडिया मुठ्ठी में चा फायदा. मला मूळ रिपोर्टची लिन्क कुठे सापडली नाही. म्हणून आपच्या संकेतस्थळाची लिन्क दिली आहे.
तर कृपया तुम्ही लोकांनी हा रिपोर्ट सवडीने वाचा आणि काय बोध होतोय तो आम्हाला समजावून सांगा.
CAG has found the following:
1) Reliance hugely overestimated the reserves
2) Reliance hugely increased its capital expenditure, which is cost recoverable
3) Most of the procurement made was over-invoiced
4) Reliance miserably failed to adhere to its production commitments
5) Reliance did not relinquish its fields as required by the contract
6) Reliance did not pay the full profit petroleum to the Government
केजी बेसिन घोटाळा हा देशातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठ्ठा घोटाळा आहे असं म्हटलं जातंय !
बाकीचं ठाऊक नाही पण रिलायन्स
बाकीचं ठाऊक नाही पण रिलायन्स घोटाळेबाज आणि भ्रष्ट मार्गाने उभी राहीलेली कंपनी आहे.त्यामुळे कुणीही तिच्यावर दोषारोप केले तर ते मान्य असावेत.जर खरोखरच सातचा फरक (म्हणजे ८$ गॅस लावला असेल तर) मार्जीनला असेल तर सरकारची चाल आहे असं म्हणावं लागेल.कुठेतरी माहीती प्रमाणे नैसर्गिक साठ्यांवर(पेट्रोलियम संबंधिअत) सरकारचा अधिकार असतो.मग रिलायन्सलाच सरकार टेंडर देत असेल तर का>? इतर कंपन्या नाहीचेत का?किंवा रिलायन्साला काम देऊन त्याच्याकडून पैसे काढणं हे का?
विज्ञानदास, तुमच्या वरील
विज्ञानदास,
तुमच्या वरील संदेशाशी पूर्ण सहमत. रिलायन्स चोर कंपनी आहे.
आ.न.,
-गा.पै.
Pages