Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आप मुळे पहिल्यांदा कळलं की ४
आप मुळे पहिल्यांदा कळलं की ४ कोटीचा आमदार निधी असतो आणि तो ह्या कामांसाठी वापरता येतो
आप मुळे कळ्ळं?
आप मुळे कळ्ळं?
मिर्ची बाई भयाण विनोदी आहेत.
मिर्ची बाई भयाण विनोदी आहेत. अरविंद केजरीवालने त्यांना भारीच प्रेमात पाडलंय. असो, जेव्हा डोळे उघडतील तेव्हा इथे लिहिलेले परत एकदा वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल किती हास्यास्पद लिहिताय ते.
साधना, दिल आया गधीपे तो परी
साधना,
दिल आया गधीपे तो परी क्या चीज है?
पण त्यांच्या जिद्दीला अभिवादन! ज्या हातघाईने खिंड लढवताहेत, त्यावरून त्यांना बाजीप्रभू म्हणायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
मिर्ची , मी आधीच्या
मिर्ची , मी आधीच्या प्रतिसादात एका परिच्छेदात लिहिलेली वाक्य वेगवेगळी/सुटीसुटी का वाचताय?
एकदा इंडिया अगेन्स्ट करप्शन, केजरीवाल, अण्णा हे सगळे वापरले गेले असण्याची शक्यता व्यक्त केल्यावर पुढच्या वाक्यांत वापरणारा आणि वापरला गेलेला बदलणार का?
साधना म्हणताहेत तसं केजरीवालच्या भारी प्रेमात पडलायत का?
----
याआधी दिलेल्या काही लिंक्स (विवेकानंद केंद्र,इ.इ. आणि आताचा बिझिनेस स्टँडर्डमधला लेख) एकत्र वाचले तर काय चित्र समोर उभे राहते?
१२ गोष्टी लिहील्या आहेत
१२ गोष्टी लिहील्या आहेत त्यातली कुठली करायची ते कोण आणि कसे ठरवणार? त्यातली १ च गोष्ट ४ कोटी मधे होउ शकते.
जरी कुठली करायची हे ठरले तरी कुठे करायची कोण ठरवणार? पार्क असेल तर सर्वांना आपल्या घरासमोर पाहीजे पण कचरापेटीचे काय करणार.
प्रत्येक गोष्टीचे असे अति-लोकशाहीकरण करणे म्हणजे तद्दन मुर्खपणा आहे.
सुप्रभात , मंडळी. आज तिकडे
सुप्रभात , मंडळी.
आज तिकडे १२६ नवीन आणि इथे ४८ नवीन. खूपच मनावर घेतलंय...
भरतजी, तुम्ही दिलेली लिंक गूगलवर सापडत नव्हती काल. धन्यवाद त्यासाठी.
हस्तक्षेप डॉट कॉम ची साईट सापडली. त्यावर दोन लेख सुंदर आहेत. शोधावे लागतील.
एक याहू ग्रुप च्या डिस्कशनची लिंक होती, द्यावी की न द्यावी ?
केज़रीवाल नि आपला शुभेच्छा
केज़रीवाल नि आपला शुभेच्छा .देशाच्य़ा विकासासाठी काँग्रेस सत्ता धारी नि आप विरोधी हो चांगले राहिले असते.
आप मुळे पहिल्यांदा कळलं की ४
आप मुळे पहिल्यांदा कळलं की ४ कोटीचा आमदार निधी असतो आणि तो ह्या कामांसाठी वापरता येतो>>
कुठल्या शाळेत शिकला आहात? नागरिकशास्त्र खरंच नव्हतंच का? बरं, शाळेचं राहू देत, शिकलेलं आपण विसरून जातो पण कुठल्या भागात लहानाचे मोठे झालाय? त्या भागात शाळा (खाजगी नव्हे, सरकारी! जिथे कुणालाही फी न भरत शिकता येतं), बागा, रस्ते, रस्त्यांवर लाईट, स्मशान, पीएचसी, बस् स्टॉप यापैकी काहीच नव्हतं का? कुठल्या पक्षाचे लोक आहेत ते जाऊ द्यात. स्थानिक लेव्हलवर जो माणूस काम करतो त्याला कधीच मत दिलं नाहीत का? वरील सोयी नसतील तर त्या आमदाराला कधी पत्र लिहून, प्रत्यक्ष भेटून याची मागणी केली नव्हती का? त्याने मागणी फेटाळल्यावर खासदाराकडे मागणी नेली नव्हती का? त्यानेही दाद दिली नसेल तर पाच वर्षांनी आमदार--खासदार बदलण्यासाठी मतदान केलं नव्हतं का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/38405?page=1#comment-3161320
पल्टिमास्टर पब्लिक ...
कोणे एके काळी अशा टोप्या
कोणे एके काळी अशा टोप्या महाराष्ट्रामध्ये शाळकरी मुलांच्या गणवेषाचा भाग होत्या, इतक्या रोजच्या जीवनमानातली वस्तू आहे
----- १९८०-८२ ह्या काळात मी अशा गान्धी टोप्या (sangamner, nagar) शाळेमधे बघितल्या आहेत.
सोमनाथ भारती रात्री उठून नागरिकांच्या मदतीला गेले तर सगळे त्यांच्यावरच आरोप करत सुटलेत अरेरे
------ रात्री उठून केले काय तर निव्वळ मिडीआ च्या साक्षीने गोन्धळ? किती आकान्ड तान्डव केला होता कॅमेर्या समोर? सत्य काय आहे हे तपासायची ही कुठली पद्धत ? तुम्ही आणि टोळी जबरदस्तीने लोकान्चे (हे मी अनेक ठिकाणी वाचले आहे - खरे असेल तर अत्यन्त हास्यास्पद आहे) सॅम्पल्स गोळा करत होता ?
सोमनाथ भारतींनी जे केलं ते योग्य केलं असं माझं मत आहे (बायस्ड? कल्ट? म्हणू शकता.)
------ पुर्णत: असहमत. ते न्याय मन्त्री होते आणि किमान कायद्याची माहिती असायला हवी, मी त्या रात्रीचे व्हिडीओ बघितले आहेत, कुठेही सोमनाथ भारती योग्य आहे असे दुरान्वयेही वाटत नाही. एक पोलिस अधिकारी warrent शिवाय धाड नाही टाकू शकत याबाबत दुमत नसावे. हे साहेब TV camera च्या समोर अधिकार वाणीच्या स्वरात आदेश देत होते... 'मै लॉ मिनीस्टर बता रहा हू... ', त्या नन्तर कृष्ण वर्णिया सम्बधित अनेक वर्षे बाद झालेला शब्दप्रयोग ते करतात...
त्या व्हिडीओ मधे तो पोलिस अधिकारी अत्यन्त नम्रपणे अनेक वेळा नकार देत होता (साब हम ऐसा नही कर सकते), त्याचे टाळके ठिकाणावर होते. (असे का करता येत नाही यासाठी दुसरी कायदे शीर बाजू आहे.... उद्या हेच लोक बोम्ब पोलिसी अत्याचार म्हणुन बोम्ब मारतील.)
मिडीआ वाट्टेल ते लिहीत असेलही पण ते फुटेज तर खोटे नाही सान्गत? त्याच मुद्द्यावर केजरीवाल हे उपोषणाला बसतात म्हटल्यावर काय म्हणावे? केजरीवाल यान्च्या कडे चागले ४-५ दिवस होते 'कायदेशिर' माहिती समजावुन घ्यायला. पण कॅमेर्याची सवय झालेल्या व्यक्तीला आणि पक्षाला सारासार विचार करावासा वाटला नाही.
केज़रीवाल नि आपला शुभेच्छा
केज़रीवाल नि आपला शुभेच्छा .देशाच्य़ा विकासासाठी काँग्रेस सत्ता धारी नि आप विरोधी हो चांगले राहिले असते
----- सचिन पगारे साहेब लोकसभा निवडणुका सम्पल्यात :स्मित:.. ४४ खासदार असल्याने काँग्रेस या राष्ट्रिय पक्षाला विरोधी पक्ष म्हणुनही मान्यता मिळवता आलेली नाही :अरेरे:, अर्थात अण्णा द्रमुक पेक्षा दोन खासदार जास्त.... त्यामुळे तुम्हाला आणि मला आता तब्बल पाच वर्षे वाट बघावी लागणार काँग्रेस सरकार आणण्यासाठी.
ओ उदय जी.....नाव बदला हो ..
ओ उदय जी.....नाव बदला हो .. ... तुम्ही सारखा स्टँड बदलतात बुवा..........लोक कंफ्युज होउन राहिलीणा भाउ... तुमच्यामुळे ते विज्ञानवाले बाबा.... मला बोलत आहेत
कोणे एके काळी अशा टोप्या
कोणे एके काळी अशा टोप्या महाराष्ट्रामध्ये शाळकरी मुलांच्या गणवेषाचा भाग होत्या, इतक्या रोजच्या जीवनमानातली वस्तू आहे >> हि फार जूनी गोष्ट नाहिय. अजूनही गावाकडे बरेच लोक गांधी टोपी वापरतात.
गांधी टोपी माझ्या शाळेच्या गणवेषाचा भाग होती. १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारीला आम्ही नवीकोरी गांधी टोपी वापरायचो कारण डोक्यावर टोपी असणार्यालाच तिरंग्याला अभिवादन (सॅल्यूट) करता येतो.
अवांतराबद्दल क्षमस्व.
१९८०-८२ ह्या काळात मी अशा
१९८०-८२ ह्या काळात मी अशा गान्धी टोप्या (sangamner, nagar) शाळेमधे बघितल्या आहेत. << बरोबर्,पण आजही काही शाळांमध्ये या टोप्या सक्तीच्या आहेत आणि आजच्या युगातही मुलं का-कू न करता फॉलो करतात. रिअली बॅड..
एक याहू ग्रुप च्या डिस्कशनची लिंक होती, द्यावी की न द्यावी ?<< द्या आता एवढ्या लिंका-रामायण झालंचे तर.
आआपच्या विचारांच्या पाठी आम्ही उभे आहोत... नेहमीच उभे होतो...इतर पक्षांकडून आपण आज जेव्हढे हस्यास्पद बनवले गेलो आहोत-इतकी वर्ष,त्यापे़क्षा हे तिप्पट चांगले. जरा मागे वळून पाहीलेच तर ते पक्षच आपल्या जनतेवर हसताना दिसतील...त्यांनी उडवलेली खिल्ली चालते वाटतं अशी शंका की खात्री नेहमीच वाटते...
नंदिनीजी,
मगाशी गेल्या पासष्ट वर्षात काय झालं यावर धागा काढू असे म्हटले होते,त्याचे पुढे काय झाले? आम्ही तयार आहो.
द्या आता एवढ्या लिंका-रामायण
द्या आता एवढ्या लिंका-रामायण झालंचे तर. >>> कुणी बघतंया की नाही, कळायला मार्ग नाही
कुठल्याही मंत्र्याला कुणाच्या घरात घुसून मै लॉ मिनिस्टर हुं असं म्हणून गोंधळ घालता येत नाही. त्याच्याविरोधात भादंवि प्रमाणे कारवाई व्हायला पाहीजे. कायदामंत्री झाला म्हणून त्याने कायदा हातात घ्यायला कशाला पाहीजे ? तसंच ज्यांच्याविरुद्ध कारवाई करायची ती व्यक्ती दुस-या देशाची डिप्लोमॅट होती आणि तिला जिनिव्हा करार लागू होता. दिल्ली हे राज्य कशा प्रकारे बनलेलं आहे हे सत्तेवर आल्यावर अचानक कळलं का याबद्दल मी मागे सविस्तर लिहीलेलं आहे, त्यामुळे हा मुद्दा का यावा याचं आश्चर्य वाटलं. अनेक मुद्यांना बगल दिली गेली आहे...तर मग चर्चा करण्यात रामरहीम नाही.
मिर्ची हे वाचा एकदा
मिर्ची हे वाचा एकदा
हा मुद्दा का यावा याचं
हा मुद्दा का यावा याचं आश्चर्य वाटलं. अनेक मुद्यांना बगल दिली गेली आहे... <<< +१०० हाच विचार करतोय...
असे बरेच मुद्दे आहेत आब्रजी... तिकडे सातीताईंच्या धाग्यावर पाहीलंत तर ढिगानं सापडतील. तसंही इकडे आपच्या नावानं ठणठणपाळ करणारे तिकडे भाजपा/काँग च्या नावाने बोटं मोडतात.अरे मग नेमकं पाहीजे काय आहे तुम्हा लोकांना?? खासदाराने आम्ही सांगितल्यावर कामं करायची का? हे दोन्ही धागे म्हणजे एकमेकांच्या प्रतिसादांचं 'कॉन्ट्राव्हर्शियल अॅक्ट' वाटायला लागलंय..
कुणी बघतंया की नाही, कळायला मार्ग नाही<< बघतोय बघतोय..निदान काही माणसं तर बघताहेत नक्कीच निश्चित...निश्चिंत असा...
ओ उदय जी.....नाव बदला हो ..
ओ उदय जी.....नाव बदला हो .. ... तुम्ही सारखा स्टँड बदलतात बुवा..........लोक कंफ्युज होउन राहिलीणा भाउ... तुमच्यामुळे ते विज्ञानवाले बाबा.... मला बोलत आहेत स्मित
------ कंफ्युज होणे शक्य आहे... दोन उदय आहेत, एका उदयचा अस्त झाल्यावर दुसरा उगवतो (वेळेत ११:३० तासान्चा फरक आहे).
काही एक स्टँड घ्यायला खुप वेळ लागतो, पण सहसा बदलत नाही - अर्थात काही नवी खात्रीलायक मजबुत माहिती समोर आल्यास नक्कीच बदलतो...
<<मिर्ची बाई भयाण विनोदी
<<मिर्ची बाई भयाण विनोदी आहेत. अरविंद केजरीवालने त्यांना भारीच प्रेमात पाडलंय. असो, जेव्हा डोळे उघडतील तेव्हा इथे लिहिलेले परत एकदा वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल किती हास्यास्पद लिहिताय ते.>>
हो क्का? विनोदी लेखन वाचून पोटात दुखलं का तुमच्या? सॉरी बर्का.
हे कसं वाटतंय?
"In yet another shocking incident of crime against women, a tribal woman was allegedly gang-raped by ten people, including her husband and relatives, paraded naked and forced to drink urine in front of her minor son following a land dispute."
किंवा हे ?
"BJP-leaning candidate held for testing voters’ loyalty-
To prove that they had voted for a candidate who lost the gram panchayat elections, 100 people were allegedly forced by him and his campaign manager to put their hands in boiling oil in north Gujarat’s Sabarkantha district on Tuesday night."
काय म्हणताय, नुसत्या बातम्यांनी छान नाही वाटत? सचित्र हवंय?
(* वाचकांच्या सूचनेनुसार इथलं प्रचि काढून टाकलंय. पण काळजी करू नका. ह्या लिन्कवर टिचकी मारा. तुमच्या करमणूकीत काही कमी पडणार नाही ह्याची हमी.)
हे कसं वाटतंय? प्रगत भारताचं प्रगत चित्र !
असलं वाचून तुमची करमणूक होतेय ना? मग वाचा की हेच. इथे काय करताय?
बलात्कार/खून/मुलांचं लैंगिक शोषण/मोठमोठे घोटाळे असलं सगळं करणार्या नेत्यांच्या प्रेमात तुम्ही पडू शकत असाल, मी नाही.
<<साधना म्हणताहेत तसं
<<साधना म्हणताहेत तसं केजरीवालच्या भारी प्रेमात पडलायत का?>>
केजरीवालांबद्दल आदर आहे, आणि असं वाटणारी मी एकटी नाही. दिल्लीत सो कॉल्ड नौटंकी/सावळा गोंधळ सगळं करूनही १ कोटी १८ लाख लोक त्यांच्यासोबत आहेत. आणि नवीन सरकारकडून भ्रमनिरास झाला की हा आकडा वाढत जाईल.
<<प्रत्येक गोष्टीचे असे अति-लोकशाहीकरण करणे म्हणजे तद्दन मुर्खपणा आहे.>>
हो? मग आपण जाहीर करून टाकूया की भारत हा लोकशाही असणारा देश नाही. आम्ही संस्थानिक, राजे-रजवाडे पोसतो. त्यांनी पाठीवर चाबकाचे फटके मारले तरी त्यांचीच हांजी हांजी करतो.
<<कुठल्या शाळेत शिकला आहात? नागरिकशास्त्र खरंच नव्हतंच का?>>
तुम्ही अजून नागरिकशास्त्राच्या पुस्तकातच अडकलायत होय? कठीण आहे.
आमदार-खासदार एवढी छान छान कामं करतात तर का हो सत्ता बदललीत? आणि आजपर्यंत राजधानीत ह्या मुलभूत सुविधा का नाहीत ह्याचं उत्तर तर अजूनही दिलेलं नाही तुम्ही.
खरंच पत्रकार आहात का हो तुम्ही? की दिवसरात्र फक्त ना.शा. चं पुस्तकच वाचत बसता?
<< तुम्ही आणि टोळी जबरदस्तीने लोकान्चे (हे मी अनेक ठिकाणी वाचले आहे - खरे असेल तर अत्यन्त हास्यास्पद आहे) सॅम्पल्स गोळा करत होता ? >>
पुरावा द्यावा.
<<त्या व्हिडीओ मधे तो पोलिस अधिकारी अत्यन्त नम्रपणे अनेक वेळा नकार देत होता>>
अतिशय विनोदी वाक्य.
सगळे पोलिस वाईट नसतात हे जरी मान्य केलं तरी तिथे ड्रग आणि सेक्स रॅकेट पोलिसांच्या संगनमताशिवाय चालू होतं का हा प्रश्न राहतोच.
<<आआपच्या विचारांच्या पाठी आम्ही उभे आहोत... नेहमीच उभे होतो...इतर पक्षांकडून आपण आज जेव्हढे हस्यास्पद बनवले गेलो आहोत-इतकी वर्ष,त्यापे़क्षा हे तिप्पट चांगले. जरा मागे वळून पाहीलेच तर ते पक्षच आपल्या जनतेवर हसताना दिसतील...त्यांनी उडवलेली खिल्ली चालते वाटतं अशी शंका की खात्री नेहमीच वाटते...>>
अनुमोदन.
<<कुठल्याही मंत्र्याला कुणाच्या घरात घुसून मै लॉ मिनिस्टर हुं असं म्हणून गोंधळ घालता येत नाही. >>
घरात घुसल्याचा पुरावा? तिथले रहिवासी तर वेगळंच सांगत आहेत.
<< तसंच ज्यांच्याविरुद्ध कारवाई करायची ती व्यक्ती दुस-या देशाची डिप्लोमॅट होती आणि तिला जिनिव्हा करार लागू होता. >>
अहो, त्या व्यक्तीनेच नंतर सोमनाथ भारतींची मदत घेऊन 'आम्हाला बळजबरीने ह्या धंद्यात आणलं जातं अशी तक्रार केली'
These women in their complaints have said that they were brought to India under the garb of providing jobs but were pushed into flesh trade.
Their passports have been taken away and the persons told them that even the police and the Ugandan High Commission will not help them and that they should compromise if they want to survive. The women have complained that they were being held hostage by a drug mafia.
जाई, धन्यवाद लिन्कसाठी. एवढा
जाई, धन्यवाद लिन्कसाठी.
एवढा विनोदी लेख मी मिसला असता नाहीतर.
कृपया मुलींची चित्रे काढून
कृपया मुलींची चित्रे काढून टाकावी त्या ऐवजी दुसरे चित्र देता येतील
कृपया मुलींची चित्रे काढून
कृपया मुलींची चित्रे काढून टाकावी त्या ऐवजी दुसरे चित्र देता येतील>> +१.
पागारे, इब्लिस व विकु भजती
पागारे, इब्लिस व विकु भजती त्या थोर गांधीवंशा
मिरची पुजे अरविंदा, गोसो आळविती संघा
हे थोर भक्त माबोवरचे, नित्य ते (वि)स्मरावे
राजकारणी ज्वर वाढता, झक्कि-आमृत चाखावे
कृपया मुलींची चित्रे काढून
कृपया मुलींची चित्रे काढून टाकावी त्या ऐवजी दुसरे चित्र देता येतील
------- सहमत, कृपया हे चित्र काढावे.... अत्यन्त दुर्दैवी घटनेबद्दलची चित्र दाखवणे टाळता येणे शक्य होते.
सन्माननिय विचारवन्त (हा आय डी नाही.... तुम्ही, मी आणि सर्व):
केजरी, केजू, भगोडा... ; राजकुमार, युवराज, पप्पू ; मोदी, मोद्या, फेकू, फेकूचन्द असे एकेरी उच्चार, नावविशेष टाळता येतील का? वाचकाला वाचताना मिठाचा खडा जाणवतो आणि लिहणार्याचा मुळ सन्देश वाचकापर्यन्त पोहोचत नाही. समोरच्याला तुच्छतेने वागवले (हिणवले) म्हणजे आपला मुद्दा खरा ठरत नाही. हे आणि असे प्रत्येक बाफ वरच आढळुन येते... हे टाळल्यास मायबोलीवर पण "अच्छे दिन आ गये..." असे म्हणता येइल.
विषयन्तरासाठी क्षमस्व.
<< तुम्ही आणि टोळी जबरदस्तीने
<< तुम्ही आणि टोळी जबरदस्तीने लोकान्चे (हे मी अनेक ठिकाणी वाचले आहे - खरे असेल तर अत्यन्त हास्यास्पद आहे) सॅम्पल्स गोळा करत होता ? >>
पुरावा द्यावा.
----- जानेवारी मधे बहुतेक सर्व वर्तमान पत्रात या बातम्या आल्या होत्या.
http://wssnet.org/2014/01/20/wss-condemns-the-violence-vigilantism-by-aa...
http://indianexpress.com/article/india/politics/we-were-groped-beaten-by...
कृपया ती चित्रे काढुन टाका
कृपया ती चित्रे काढुन टाका किंवा आक्षेपार्ह भाग पिक्सिलेटेड करा. फार डिस्टर्बिंग चित्रे आहेत ती.
धन्यवाद.
मिर्ची यांचा चित्र देण्याचा
मिर्ची यांचा चित्र देण्याचा उद्देश वाईट नाही. ही चित्र इथून हटवून काय होईल ?
निर्भया केस मधे नाट्यरुपांतर, चित्रातून, अॅनिमेशन मधून काय काय झालं हे साद्यंत दाखवण्यात येत होतं. त्या वेळी समाज रस्त्यावर उतरला तसा आता का उतरत नाही ? या चित्रांना ठळक प्रसिद्धी मिळतेय कारण ही उत्तर प्रदेशातली आहेत. निर्भया केस च्या वेळी दिल्लीत शीला दीक्षित यांचं सरकार होत. मी आधी सुद्धा या धाग्यावर म्हटलंय की राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांमधेही हे प्रकार राजरोस घडताहेत. निहालचंदचं उदाहरण तर डोळ्यात झणझणीत अंजन घालायला पुरेसं आहे. पण या राज्यात घडणा-या प्रकारांना मीडीयाला फारसा रस नाही. अखिलेश या भ्रमात आहेत की आपल्याला ५ वर्षांसाठी सरकार चालवायला मिळालेलं आहे. केंद्राकडून हे सरकार बरखास्त करण्यात येऊ शकतं हे त्यांनी गृहीत धरलेलं नाही. प्रदेश भाजपकडून वारंवार तशी मागणी होतेय. त्यासाठी बदायूं केसचा वापर होतोय.
निर्भया केस मुळे शीला दीक्षित यांचा पराभव झाला. विकासकामांमुळे ते गेलं नाही. शीला दीक्षित यांच्या कारकीर्दीत जेव्हढी विकासकाम झाली तेव्हढी अन्य कुठल्याच राज्यांत झाली नाहीत. ज्या नकारात्मक बाबी आहेत त्या सत्तापरिवर्त्ननानंतरही तशाच राहताहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत गुजरात कमी नाही. अदानी अंबानींना काय काय मिळतंय हे बघत रहा. दिल्लीत सत्ता बदलली तरी त्यात गुणात्मक फरक काहीच नाही. केजरीवालांनी पाण्याचं बिल कमी केलं पण ते अधिकृत नळजोडाला आणि ठराविक पाणीवापराला. जे लिमिट दिलं होतं त्यात कुणाचंच भागणार नव्हतं. दिल्लीत गरीब जनतेकडे अधिकृत नळजोड नाहीत. अधिकृत जोड घेतले तर २० लीटर पाण्यात भागणार् होतं का ? त्यापेक्षा जास्त पाणीवापर झाला तर जास्तीचे दर, म्हणजेच अधिकृत जोड कोण घेणार ? लोक नाराज झाले ही वस्तुस्थिती आहे.
वीजेबाबत हे सरकार जे काही करतंय त्याने चांगले संदेश जाणार नाहीत हे सांगायला तज्ञाची गरज नाही. इथं काहीही वाद घाला, २००४ साली संपूर्ण मीडीयाची ताकद लावूनही अटलबिहारी सरकारला पाय उतार व्हावं लागलं होतं. आता भाजपाचे लोक म्हणतात अच्छे दिन आनेवाले है की नही हे ५ वर्षांनी ठरवा. आताच नको. पण अच्छे दिनाच्या निर्णयांचा वास लागावा असा कोणता निर्णय घेतला गेलाय ? रेल्वेच्या ज्या भाडेवाडीवरून मोदींनी प्रधानमंत्र्यांना असभ्य भाषेत पत्र लिहीण्याचा वगैरे उद्योग केला होता तेच तर ते आज करताहेत. जनता माफ नही करेगी वाल्या स्लोगन त्यांनी गुंडाळल्या असल्या तरी जनता विसरलेली नाही. यू टर्न मारणा-यांना जनता कशी माफ करेल ? खरं तर ज्यांनी या सरकारला मत दिलेलं आहे त्यांना आता ओरडण्याचा काहीही हक्क राहीलेला नाही. कारण प्रचारामधे एव्हढा खर्च होतोय हे डोळ्यांना दिसत असताना तो खर्च कुणाकडून आणि कसा वसूल होईल याचा विचार केला नसेल तर त्याचं हे फळ त्यांना मिळालेलं आहे.
मला मिर्चि टिप्पण्या काही
मला मिर्चि टिप्पण्या काही आवडल्या
नंदिनी यानच्या टिप्पण्या कमाल कॉमेडी आहेत
Pages