गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
स्विमिंग पूलमधे, पार्किंग
स्विमिंग पूलमधे, पार्किंग लॉटमधे मगरी दिसणं नॉर्मल ??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे देवा. इथे (कात्रज) तलावात मगर दिसली तरी न्यूज होते
मी असे वाचले होते कि पूर्वी
मी असे वाचले होते कि पूर्वी भारतीय लोकांबद्दल समजूत होती कि हे भारतीय साप , हत्ती पाळतात.
इथे वाचले तर अस दिसतंय कि अमेरिकनलोकांच्या अंगणात मगरी, हायना कोल्हे, बलाढ्य खारी ,रॅकून असे प्राणी असतात. नाहीतर आमच्या पुण्यात सध्या चिमण्या पण नाही दिसत आजकाल.
बापरे!! गेल्या वेळी फ्लोरिडात
बापरे!! गेल्या वेळी फ्लोरिडात बिनधास्त फिरलो होतो, आजूबाजूला मगर आहे की नाही अंदाज घेत चालले/ फिरले पाहिजे हे माहिती नव्हते.
या मगरींनी माणसांवर हल्ला केल्याचे प्रमाण साधारण किती आहे? म्हण्जे खूप की अगदीच नगण्य?
ज्ञाती भटकी कुत्री फिरतात तशा
ज्ञाती भटकी कुत्री फिरतात तशा नाही काही फिरत मगरी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण अशी पार्किंग लॉटमध्ये मगर
पण अशी पार्किंग लॉटमध्ये मगर पार्क झाली असेल आणि लक्षात न येवून तिच्यावर कुणी धडपडलं तर ती काही करत नाही का? मगर हा मुका प्राणी आहे की ओरडतो पण?
किती ती मगरमारी... आपलं.
किती ती मगरमारी... आपलं. मगजमारी!!!!!
हा धागा बेस्ट आहे.
हा धागा मामीच्या धाग्यात
हा धागा मामीच्या धाग्यात गुंफलाय का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनश्री![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शूज मध्ये जेवण
लै भारी! नाव राखलेंत हो
लै भारी! नाव राखलेंत हो मांयबोलीचे........
धागा सुतार पक्षाचा लोकांचे भलतेंच हं !
खुप हसली वाचताना ... एखाद्या
खुप हसली वाचताना ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एखाद्या प्राणी हे असले प्रकार करत असताना त्याला बघत बसन म्हनजे मज्जाच मजा ...
एखादा माणूस असेल तर ती हल्ला
एखादा माणूस असेल तर ती हल्ला करणारच, कार असेल तर मगरच येइल की गाडीखाली.
मध्यंतरी तलावाच्या काठाकडे उडालेला गोल्फ बॉल आणायला गेलेल्या एका माणसावर मगरीनं हल्ला केल्याची बातमी वाचली होती.
केपी,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बाप रे! माझ्या पोस्टीमुळे
बाप रे! माझ्या पोस्टीमुळे फ्लोरिडातल्या रस्त्यांवर नागपुरातल्या म्हशींसारखा मगरींचा सुळसुळाट असतो असा समज झाला का? सॉरी हां! असं काही नाही. रस्त्यांवर फिरताना "मगर तर मागे लागणार नाही ना?" असा विचार करून चालावं लागत नाही.
अख्खं राज्य स्वाँम्पी आहे. बारिक्-मोठ्या नद्या, त्यांचे ओहोळ आणि छोटे-मोठे तलाव, दलदल या सगळ्यांमुळे मगरी भरपूर आहेत. पण त्या माणसांच्या भर वस्तीत क्वचितच दिस्तात. तेही तुमचं घर नदीतलावाजवळ, नदीतून फुटणार्या ओहोळाजवळ असेल तर.
घरच्या स्विमिंगपूल्सना सगळीकडून जाळीनं बंद केलेलं असतं. तरी काही नेबरहुड्समधे जाळीला असलेल्या उघड्या दारातून मगरी आलेल्या आहेत. तुफान पावसानंतर घराभोवती फ्लडिंग झालं तर मगरी दिस्तात. पण दैनंदिन आयुष्यात रोज मगरींशी इंच इंच लढत, स्वतःचा बचाव करत निभवावं लागतं असं अजीबात नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काठाकडे उडालेला गोल्फ बॉल
काठाकडे उडालेला गोल्फ बॉल आणायला गेलेल्या एका माणसावर मगरीनं हल्ला केल्याची बातमी वाचली होती. >>>>
बापरे......... धिस इज टु मच...मगरमच्च ची मचमच
मृण्मयी मगर चर्चेवरून
मृण्मयी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मगर चर्चेवरून मध्यंतरी यूट्यूबवर पाहिलेला भारतातल्या एका प्राणीसंग्रहालयतला व्हिडीओ आठवला. एक मांजर त्या मगरीच्या तलावापाशी निवांत जाऊन बसलं होतं आणि मगर जवळ आल्यावर त्याच्या नाकावर जोरात पंजे मारून त्या मगरीला त्याने पळवून लावलं...
मगर मुका प्राणी नाही. हिसिंग
मगर मुका प्राणी नाही. हिसिंग आवाज काढतं. घराजवळ राहणार्या एका मित्राच्या अंगणात आली होती. जवळपास ६ फूट लांब होती. आणि असेच हिसिंग करत होती. त्याने मगर पकडायला अॅनिमल कंट्रोलवाल्यांना बोलवलं. ते लोक तरबेज असतात. मगरीला मारायला तिच्या दोन डोळ्यांमधल्या सॉफ्ट स्पॉटमधे किंवा कवटी सुरू होते तिथे, डोळ्यांमागे, नेम धरून गोळी घालतात किंवा ट्रँक्विलायझर घालतात. त्यासाठी बर्यापैकी उत्तम नेम लागत असावा. ठराविक आकारापेक्षा लहान असेल तर विशिष्ट जागी सोडून येतात. नाहीतर मारतात. हे ज्ञान त्या अॅनिमल कंट्रोलवाल्यांकडून मित्राला आणि तिथून आम्हाला असं वहात आलंय.
प्रोफेशनल गेटरकॅचर्सपण असतात. फिश अँड वाइल्डलाइफ कॉन्झरवेशन कमिशनकडून परमिट काढून रिक्रिएशनल गेटरहंटिंग तसंच स्पर्धापण होतात.
>> लै भारी! नाव राखलेंत हो
>> लै भारी! नाव राखलेंत हो मांयबोलीचे........ धागा सुतार पक्षाचा लोकांचे भलतेंच हं ! <<
अहो पण खार आणि कायोटी (कंफ्युज्ड विथ हाईना) यांनी धाग्याचा टीआरपी वाढवला, त्याचं काय?
वर बीवर चा उल्लेख आलेला आहे, आमच्या नेबरहुडचा हा किस्सा - गावाचं नांव ज्या क्रीक वरुन ठेवलेलं आहे तो आमच्या सबडिविजनला वळसा घालुन जातो. बर्यापैकी वाहतं पाणी असतं जे पुढे जाउन नदिला मिळतं. तर हे बीवर आणि त्याचे कुटुंबीय वारंवार या क्रीकला बांध घालुन पाणी अडवतात आणि त्यांची खाण्या-पिण्याची (मासे इतर जलचर) सोय करतात...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॄण्मयी अगदी रस्त्यांवर नाही
मॄण्मयी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी रस्त्यांवर नाही पण एखादं पार्क/ हाइक/ ट्रेल , नवीन ठिकाणी फिरायला जाउ अशा जागा जिथे झाडं/ पाणी आहे तिथे जाणीवपूर्वक अॅलर्ट राहायला हवं असं म्हणायचं होतं.
इथले सगळे प्रतिसाद वाचून मला
इथले सगळे प्रतिसाद वाचून मला नेहमीच हसायला येतं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बरं आता सुतारपक्ष्याशिवाय इतर बर्याच प्राण्याची चर्चा चाललिये तर मला सांगा की गांधीलमाश्या कश्या पळ्वून लावायच्या? .
बेफिनी शेर रचून पळवलेल.
बेफिनी शेर रचून पळवलेल. तुम्हाला येतोका शेर रचता?.... नाहीतर खऱ्या शेराला विचारा येतो का? अवांतरा बद्धल क्षमस्व.:फिदी:
उप्स राज यांची कमेन्ट मी
उप्स राज यांची कमेन्ट मी चुकून "बी चा वावर" अशी वाचली![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
अमितव शु........इथे (पण) गहझहल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ठराविक आकारापेक्षा लहान असेल
ठराविक आकारापेक्षा लहान असेल तर विशिष्ट जागी सोडून येतात. नाहीतर मारतात. <<<<
मारली की लगेच तिची एक बर्किन बॅग करून घ्यावी.
>>मारली की लगेच तिची एक
>>मारली की लगेच तिची एक बर्किन बॅग करून घ्यावी.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चांगली कल्पना आहे! भारतात कसं बेकरीत आपलं साहित्य देऊन कुक्या स्वस्तात पडतात तसं काहीतरी करता येईल. गेटर आमची, तिची स्किन आम्ही पुरवली. आतातरी मेले बॅगेच्या किंमतीतले ते १०-१२ हजार डॉलर्स कमी करा.
(No subject)
>>>गेटर आमची, तिची स्किन
>>>गेटर आमची, तिची स्किन आम्ही पुरवली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑफीसात एकाने हा उपद्व्याप केला आहे. ८ फूट गेटर स्कीन + $३५०० देऊन बायकोसाठी एक वितभर लांबीची पर्स आणि स्वतःसाठी एक बेल्ट करून घेतला. (बाकीची उरलेली स्कीन शिंप्यानी ठेऊन घेतली म्हणाला).
खरंच?! घाट्याचा सौदा नाही का?
पण मी काय म्हणते. शिंपी
पण मी काय म्हणते. शिंपी भारतातून आणून त्याला इथे कामाला लावलं तर? महागडं लेबर वाचेल.
>>>घाट्याचा सौदा नाही
>>>घाट्याचा सौदा नाही का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नक्कीच.
पण आता शायनींग मारत फिरतो. पट्टा हे निमीत्त. मी गेटर कशी मारली ह्या बाता सांगणं हा मुख्य उद्देश.
>>मी गेटर कशी मारली ह्या बाता
>>मी गेटर कशी मारली ह्या बाता सांगणं हा मुख्य उद्देश.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
गीज (goose) हा केवळ उच्छाद
गीज (goose) हा केवळ उच्छाद आहे..
आता मी काही दिवस मृराज्यात जात आहे.. मृ एकादी मगर मारून कमरपट्टा करून ठेवता येईल का बघ..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>मृ एकादी मगर मारून
>>>मृ एकादी मगर मारून कमरपट्टा करून ठेवता येईल का बघ.. फिदीफिदी
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
गोगा, हा मगरपट्टा च.प. लेंग्यावर बरा दिसेल का?
Pages