अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चं मार्जिन होतं १५,०००० मतांचं. निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तितकीच मतं कमी पडली होती.बसप आणि सप यांच्य मतांमधे फारसं अंतर नव्हतं. काँग्रेसला देखील लक्षणीय मतं पडली होती. थोडक्यात सप + बसप + काँग्रेस अशी फाटाफूट होऊनही भाजपचा उमेदवार फक्त १५००० मतांनी जिंकून आला हे चिंताजनक होतं
>> काय ते आकडा एकदा निश्चित करा. पंधरा हजार की दीड लाख.

जर केजरीवाल तिथून उभे राहीले नसते आणि जर विरोधकांनी एकजूट केली असती तर मोदी निवडून आले असते का ?<<< आधीच लिहिलं होतं, मोदी कसाही निवडून आला असता. गुजरतमधील सीट त्याने ऑप्शन म्हणून ठेवलीच होती.

पण मोदी विरोद्ध लढण्याच्या खटपटीमध्ये केजरीवालने पूर्ण पक्षाच्या संघटनेकडे, प्रचाराकडे, आणि निवडणुकीकडे जे काय दुर्लक्ष केलंय त्याला तोड नाही. अगदी विकु म्हणतात तशी ही स्टेटमेंट म्हणून लढवली असती तरी ४००+ उमेदवारांच्या प्रचारापेक्षा याना स्वतःच्याच टीआरपीची जास्त पडली होती. आप जेव्हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून लड्।आयला उतरते तेव्हा सर्वसामान्यांबद्दल काडीचीही आस्था न दाखवता निवडणुका लढवते हा दुट्टप्पीपणा मल तरी पटत नाही.

मेडीया चा आप ला विरोध होता हे भारतात तरी कुणी ऐकून घेणार नाही. निवडणूक ऐन रंगात आली असताना लुटुपुटीचं एक भांडण केलं गेलं. नाहीतर अण्णांचं आंदोलन झाल्यापासून मीडीया सातत्याने सावलीसारखा केजरीवाल, आम आदमी पक्ष यांच्या सोबत होता. मोदींपेक्षा जास्त सेवा आम आदमी पक्षाची केलीय मीडीया ने.

पुण्यप्रसून वाजपेयी आणि केजरीवाल यांच्यातल्या संभाषणाचा व्हिडियो व्हायरल झाला होता. त्यात पुण्यप्रसून वाजपेयी कोणते मुद्दे दाखवायचे याचं अ‍ॅप्रूव्हल केजरीवालांकडून घेताना दिसत होते. कुठला मुद्दा दिवसभर चालवायचा कुठला नको, कशाने व्होटर्स प्रभावित होतील याची चर्चा त्यात होती. अर्थात हे स्टिंग ऑपरेशन कुणी केलं ही शंका आहेच. हा व्हिडीओ का अपलोड केला हे कळत नाही.

संशयाला बळकटी देणारा मेडीयाचा टक्का एकपेक्षाही कमी होता. पण सगळा मीडीया एकवटून दुस-या पक्षाला संधीही देत नाही हे संशयास्पदच.

http://www.youtube.com/watch?v=DhPsMlTurIA

http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Arvind-Kejriwal-is-an-...

भाजपेयींचे हे लुटुपुटीचे युद्ध. पण तरी देखील काही मुद्दे दुर्लक्षिता येत नाहीत.
http://www.youtube.com/watch?v=pf7GV1eYe1o

www.youtube.com/watch?v=DhPsMlTurIA

काय ते आकडा एकदा निश्चित करा. पंधरा हजार की दीड लाख. >>
समजा आकडा निश्चित केला नाही, तर खरा आकडा तुम्हाला माहीत नाही का ? की तो बदलणार आहे ?

निश्चित आकडा १५,००० आहे आणि तो खूप वेळ चर्चिला गेलेला आहे. शंकेला वाव नसावी. असो.

मोदी वाराणसीतून निवडून आले असते की नसते हा मुद्दा वेगळा आणि वाराणसी सुरक्षित मतदार संघ आहे की नाही हा मुद्दा वेगळा. गुजरातच्या बाहेर पहिल्यांदाच निवडणूक लढवताना कुणीही सुरक्षित मतदारसंघ शोधेणार. पंचरा हजार (अक्षरी) हे मार्जिन सुरक्षित म्हणता येतं का ? जर पीएम साठीचा उमेदवार इथून पडला असता तर गुजरातमधून निवडून येऊनही पक्षातूनच मोठी चर्चा सुरू झाली असती.

बरं, मग?

एविएम मशिन बद्दल......... निवडनुक आयोगच्या साईट वर जा तिथे पहिलेच लिन्क आहे

To,
The Chief Electoral officer,
Uttar Pradesh,
Lucknow.
Subject: Complaint of Shri Kaisar Khan in connection with uploading photos with
EVMs on social networking website-regarding.
Sir,
With reference to the report submitted by the District Election Officer,
Varanasi, vide letter no. 222/Elec-2014 dated 21.05.2014, in connection with the case of
uploading photos with EVMs on social networking website by Shri Ankit Gourav Srivastava
s/o Shri Avdhesh Kumar Srivastava, Sector Magistrate for Sector number 14 of 390-Varanasi
Cant AC, I am directed to state that the Commission has recommended that Shri Avdhesh
Kumar Srivastava, Sector Magistrate for Sector number 14 of 390-Varanasi Cant AC should
immediately be suspended from his post and disciplinary proceedings should also be initiated
against him for dereliction of duty.

अचानक खूप धागे वेगाने वर आल्याने हा धागा कधी नव्हे इतका मागे गेल्याचं पहिल्यांदाच दिसलं...

<<मिर्ची, तुम्ही आपच्या प्रवक्त्या नाही, त्यामुळे मी मागच्या पानावर मांडलेल्या "कोणी कोणाला वापरले?" या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नाही. पण असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का?>>

पडला ना. त्याचंच तर उत्तर लिहिलंय.
मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी भाजपा ने IAC ला वापरून घेतलं, त्यातनं आप निर्माण झाली. हे कदाचित अनपेक्षित होतं. पण तरी सुरूवातीला दिल्लीतून काँग्रेस नेस्तनाबूत होईपर्यंत भाजपाने आप ला पाठिंबा दिला. नंतर जेव्हा आप भाजपाविरुद्ध उभं राहिलं तेव्हा मात्र आपली PR machinery वापरून आप ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत.
तुम्हाला काय वाटतं?

त्यांनी ८५००० रूपये भाडं देऊन मुलीच्या परिक्षेच्या कारणासाठी घर ठेवलं होतं ह्यात वैयक्तिकरित्या मला काही वावगं वाटत नाही.
Over 90 former MPs, 22 former ministers seek more time to vacate government accommodation in Delhi
ह्याबद्दल काय म्हणाल??
शपथविधीच्या आठवड्यात अनेक खासदारांसाठी (सुमारे १८०) दिवसाला १०,००० रूपये भाडं असणार्‍या पंचतारांकित हॉटेल्समध्ये खोल्या घेतलेल्या होत्या. सुमारे १.२ कोटी रूपये खर्च झाला म्हणे.

तिकीटवाटपाबद्दल मला काही माहीत नाही. तेव्हा मी आप ला फॉलो करत नव्हते.पण केजरीवालांची तत्वे पाहिली तर गडबड झाली नसेल असं वाटतं. (हो, माझा अजून विश्वास आहे त्यांच्यावर)

<<केजरीवाल सगळ्या प्रश्नांची अगदी सोपी उत्तरे शोधत आले आहेत. भ्रष्टाचार बंद झाला की सगळा पैसा जनकल्याणाला मिळेल. लोकपालसारखी एक पॅरॅलल यंत्रणा उभारली की भ्रष्टाचार बंद. >>

भ्रष्टाचार आटोक्यात आला तर सगळे नाही तरी बरेच प्रश्न मिटतील असं वाटतंय खरं. (नाइव्ह अ‍ॅटिट्यूड?) राजीव बजाजचा एक व्हिडिओ पाहिला होता - Corruption is a thousand-headed monster
फार काही नाहीये त्याच्यात. पण मुद्दा पटला.
आणि अजून एक महत्वाचं म्हणजे केजरीवाल कधीही असा दावा करताना दिसले नाहीत की मी सगळी परिस्थिती बदलून दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे की जनतेचे प्रश्न जनतेला जास्त चांगल्या पद्धतीने कळतात. आणि सगळ्यांच्या सहभागाने चांगली उत्तरे मिळू शकतात. "मैं अकेला कुछ भी नहीं कर सकता, सब को साथ आना होगा" असं ऐकलंय त्यांच्या मुलाखतींमध्ये.
कुणी कुणी "मोदी आनेवाला है" चा व्हिडिओ पाहिलाय? केजरीवाल म्हणत आहेत त्याच्याशी ड्रास्टिक कॉन्ट्रॅस्ट ! मला निवडून द्या, मी देश सुधारेन.
"क्यों कटते शीष जवानों के,
क्यों जाते प्राण किसानों के,
महंगाई नागिन सी डसती,
ताले बंद दुकानों के
हर आंख का तारा नमो नमो,
हर देश का नारा नमो नमो
हर एक पुकारा नमो नमो
बस एक सहारा नमो नमो"

असं एका माणसामुळे देश सुधारणार आहे का? निवडणुकीनंतर किती जवान मारले गेलेत? पहिल्या वाक्याचीच हवा फुस्स.

धीरजभौ,
तुमच्या सूचनेवर रेफरेण्डम घेण्यात येईल Wink

<<तुमचे मुद्दे खोडले की तुम्हीच उलट रागात येऊन लिहिता असे दिसते. >> Uhoh
अजून विचारवंतांवर पण रागावले नाहीये मी, तुमच्यावर का रागवीन?
आणि अजून तुम्ही मुद्दे खोडले नाहीयेत. नुसत्या शंका काढताय.

<<म्ह्णून म्हणतो ज्या प्रश्चाच्या उत्तराची गरज इथे नाही, ते प्रश्न का आणायचे.हा बाफ वर मोदी अन भाजपावर दर पोस्ट मध्ये नेण्यापेक्षा आप आणि केजरीवालवर ठेवा की !>>
हे कसं शक्य होईल?. सध्या भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे कुठेही तुलना करायची झाली की भाजपाशीच केली जाणार. काँग्रेसबद्दल मला अजिबात काही माहीत नाही. मी ह्यापूर्वी कधीही राजकारणात रस घेतलेला नाही. कुणी काँग्रेसबद्दल लिहीत असेल तर लिहू दे की.
गुजरात मॉडेलला, अंबानी-अदानींना, मोदींनी केलेल्या दिशाभूलीला विरोध ही आपची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आप विषयी बोलताना हे विषय निघणं अपरिहार्य आहे. आणि त्यात वावगं का?
सातीच्या धाग्यावर आपविषयी लिहिणं योग्य नव्हतं. म्हणून तर हा प्रपंच.

<<हेच अमेठीबाबतही म्हणता येईल. कुमार विश्वास हे उघडपणे भाजपच्या बाजूने होते.>>
माझ्याकडून ह्या वाक्याचा १००% विरोध Happy

आपचे खासदार भगवंत मान ह्यांनी इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी इराकला जाऊन वाटाघाटी करण्याची तयारी दाखवली आहे.
Bhagwant said, "the situation has come to such a pass that Punjabis are going to troubled Iraq for living leaving behind Punjab and our government needs to introspect that why our children are going to such risky places to earn living and it showcases that Punjab is becoming worst than Iraq."
राजकारणाचा स्टंट? की इमोशनल फूल ? Happy

आता केजरीआलांच्या ४९ दिवसांच्या कारभारातून काय संदेश गेला ते पाहूयात.

जर आपण आपसमर्थकांचं हे म्हणणं मान्य केलं की आविंद केजरीवाल यांना राजकारणात पडण्याची आवश्यकता वाटू लागली होती, पण अण्णा विरोध करत होते म्हणून फूट पडली... तर केंद्राने अण्णांपुढे झुकत एक लोकपाल पास केलेले असतांना त्याच मुद्यावरून राजीनामा देणे हे पुन्हा वर्तुळाकार फिरून तिथेच आल्यासारखे होतेय जिथून राजकारणात यायची पार्श्वभूमी सुरू होते. जर जनलोकपाल बिलच महत्वाचं होतं तर राजकारणात पडण्याची अजिबातच आवश्यकता नव्हती. अण्णा हजारेंनी महाराष्ट्रात अकरा वेळा आंदोलनं करून यश मिळवलेलं आहे. फक्त जनलोकपाल हाच मुद्दा असता तर त्या निमित्ताने संघटन मजबून करण्याला अडीच वर्षे मिळाली असती. लोकांना भ्रष्टाचाराविरुद्ध कुणीतरी उभं राहतंय हे महत्वाचं होतं. ज्या माणसाला परीवर्तन संस्था संयमाने उभी करता येते, आयएएस आयआयटी सारख्या परीक्षांमधे यश मिळवण्याइतका संयम आहे त्याला घाईघाईत निर्णय घ्यावासा का वाटला असावा ?

<<तर केंद्राने अण्णांपुढे झुकत एक लोकपाल पास केलेले असतांना त्याच मुद्यावरून राजीनामा देणे हे पुन्हा वर्तुळाकार फिरून तिथेच आल्यासारखे होतेय जिथून राजकारणात यायची पार्श्वभूमी सुरू होते.>>

ते लोकपाल नसून 'जोकपाल' होतं असं त्यासाठी लढणार्‍यांचं म्हणणं आहे. मी मागे एक लिन्क दिली आहे. त्यात दोन्हींतला फरक सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.

भाजपा आप च्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
Rajesh Garg, AAP MLA from Rohini, said, "We have been approached by the BJP on many occasions. They extended me an offer and I have a video of that."

निवडून आल्यावर भाव कमी केले ते विशिष्ट दिवसांसाठी. कायम सोल्युशन तर नव्हतंच ते.
वीज कंपन्यांवर आऱोप करताना अंबानींवर जे आरोप केले, हिट अ‍ॅण्ड रन पत्रकार परिषदांमधूनजे आरोप केले ते तडीस नेण्यासाठी एक कार्यकारी पद हाती आलं होतं. जर केजरीवालांनी ठरवलं असतं तर अंबानींना पूर्ण एक्स्पोज करून दिल्लीचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करता आली असती. जरी पोलीस खातं त्यांच्याकडे नसलं तरी मुख्यमंत्री हे पद संवैधानिक पद असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यावर उत्तर द्यावं लागलं असतं. त्यावर कोर्टात जाता आलं असतं. अर्थात हे सगळं इच्छा असल्यास. नाहीतर लाखो बहाणे होतेच आणि ते वापरलेतच.

आरोप करणे आणि ते तडीस न नेणे याचा अर्थ काय असू शकतो ?
ते ही प्रत्येक वेळी हातात कागद नाचवत ?

गडकरीं विरोधातले आरोप तर थेट कोर्टातच करायला हवे होते. उलट गडकरींनी आरोप केल्यानंतर पुरावे देण्याचे सोडून तुरंगवास भोगणे वगैरेचा अर्थ काय असू शकतो ?

कुमार विश्वास संदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करू शकता, पण कारण समजलं नाही, कारण कुमार विश्वास यांनी आपमधे असताना एकदा नाही अनेकदा मोदींचं, भाजपचं समर्थन केलं आहे. निवडणुकीदरम्यान केजरीवाल आणि विश्वास यांच्यातले मतभेद तीव्र झाले होते अशा बातम्या होत्या. विश्वास यांनी त्याला दुजोरा दिला होता. मतभेदाची कारणं भाजपाचं समर्थन हे नसून केजरीवाल यांनी उमेदवारांचा प्रचार न करणे, वाराअसीतून उभे राहणे, अमेठीत न फिरकणे ही होती.

अचानक राजीनामा सत्र सुरू होण्याची कारणं लगेचच समजणार नाहीत. पण वेगळ्या नजरेने पाहील्यास लोकांचा भ्रमनिरास झाला आहे असं समजण्यास हरकत नाही.

राजीनामा देण्यात गडबड झाली हे तर त्यांनी सुद्धा मान्य केलंय. त्यासाठी जनतेची माफीसुद्धा मागितली आहे.
आपण गुन्हे माफ करू शकतो तर चूक का नाही माफ करू शकत?

<<अर्थात हे सगळं इच्छा असल्यास. नाहीतर लाखो बहाणे होतेच आणि ते वापरलेतच.>>
बहाणेच वापरले ह्याचा पुरावा काय? हे आपलं गृहितकच आहे ना.

<<आरोप करणे आणि ते तडीस न नेणे याचा अर्थ काय असू शकतो ?>>
ते काम पोलिस आणि कोर्टाचं नाही का? ह्यांच्याकडे असलेले पुरावे ते देतीलच ना.

<<उलट गडकरींनी आरोप केल्यानंतर पुरावे देण्याचे सोडून तुरंगवास भोगणे वगैरेचा अर्थ काय असू शकतो ?>>
आब्र, पुरावे नव्हते म्हणून तुरूंगात नाही गेले ते. तेव्हा बेल न देण्याचा उद्देश वेगळा होता. ह्यावर नंतर सविस्तर लिहीन.

आता आजसाठी रामराम.

राजीनांमा देण्यात गडबड झालेली नसून गृहीतक चुकलं असा संदेश गेला. जनलोकपाल बिलावरून रस्त्यावर झोपणे आणि संघर्ष करणे यातून जनतेची सहानुभूती आणखी वाढत जाईल आणि जर राजीनामा दिला तर देशातला बिग्गेस्ट हिरो होऊन एक ताकद बनण्याचा हिशेब त्यामागे होता, ज्यात ते साफ चुकले. अजूनही त्यांच्या प्रत्येक कृतीमधे सनसनाटीपणा असतो, ब्रेकींग न्यूज मधे येण्याचा, चर्चेत राहण्याचा हव्यास दिसून येतो आणि संपूर्ण रोख स्वतःला सहानुभूती मिळावी याकडे असतो. पण त्यातून आप हा पर्याय सक्षम नाही असा मेसेज जात चालला आहे.

प्रत्येक रॅलीच्या वेळी कुणी न कुणी विरोध करणे, काळी निळी शाई टाकणे, नेत्यांना काळे फासणे, रॅली वर हल्ले करणे, गुजरात भवन ऐवजी गुजरातभाजप आणि लखनौ भाजप च्या कार्यालयावर मोर्चे नेणे. त्या वेळी लढाईची आयुधं दोन्ही पक्षांकडे असणे.. हे कशाचं लक्षण आहे ? जर ४९ दिवसांत राजीनामा देण्याची चूक झाली तर किमान पुढे तरी निर्णय घेताना प्रगल्भता दिसावी. महाराष्ट्रात जरी सेवादलाच्या कारकर्त्यांनी आपला उचलून धरलेले असले तरी उत्तर भारतात दिल्ली वगळता अजूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा टेकू आहे अशा चर्चा आहेत.

वर ज्या लेखासाठी प्रशांत भूषण यांनी एका ऑनलाईन वृत्तपत्राला नोटीस दिल्याची लिंक दिलेली आहे त्यावरच्या इतर बातम्या रोचक आहेत.

त्याला घाईघाईत निर्णय घ्यावासा का वाटला असावा ?<<<
१-Need Of Situation-आत्ता नाही तर कधीच नाही...
२-बदल घडवण्यासाठी पक्ष स्थापना महत्वाची,सिस्टमध्ये उतरण्याचा एकमेव मार्ग.

राजकारणाचा स्टंट? की इमोशनल फूल ? <<< उताविळपणाचा कळस... रोजीरोटी मिळवण्यासाठी कोणी कुठेही जाऊ शकतो... भारताची लोकसंख्याच इतकी आहे की मोदी तरी काय करणार? Happy

मेधा पाटकरांनी टीका केलेली आहे, योगेंद्र यादव यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, ते सोडणार होते पण सद्या तरी पक्षात आहेत, स्टार प्रचारक शाजिया ने पक्ष सोडला होता, त्यांचं मन वळवण्यात येत आहे. कारण निवडणुकीच्या वेळीच दिलं होतं. ही नावं अशी आहेत ज्यांच्यावर दगाफटका करण्याचा आरोप लावतायेत नाही. गोपीनाथ बद्दल अंदाज आला नाही असं म्हटलं जातं. पण त्यांनी निधी दिला होता. हाच पक्ष यांना का आपलासा वाटला ?

दिल्लीचं राज्य सोडण्यामागे लोकसभा निवडणुका असल्याचं घडामोडींवरून दिसून येतं. त्या निवडणुकीत नेमकं काय केलं याबद्दल ज्याचं त्याचं निरीक्षण वेगवेगळं असू शकेल !!!

टैम प्लीज.

<त्यांनी ८५००० रूपये भाडं देऊन मुलीच्या परिक्षेच्या कारणासाठी घर ठेवलं होतं ह्यात वैयक्तिकरित्या मला काही वावगं वाटत नाही.
Over 90 former MPs, 22 former ministers seek more time to vacate government accommodation in Delhi
ह्याबद्दल काय म्हणाल??
शपथविधीच्या आठवड्यात अनेक खासदारांसाठी (सुमारे १८०) दिवसाला १०,००० रूपये भाडं असणार्‍या पंचतारांकित हॉटेल्समध्ये खोल्या घेतलेल्या होत्या. सुमारे १.२ कोटी रूपये खर्च झाला म्हणे.>

एकंदरितच लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर टीका (तीही कोणत्याही थराला जाऊन, विशेषतः लोकपाल आंदोलनाच्या काळात,) करणार्‍यांनी (किंवा त्यांच्या समर्थकांनी) आपला वागण्यासाठी त्याच लोकप्रतिनिधींच्या वागण्याचे दाखले द्यावेत हे पटत नाही. आधी सरकारी वाहने नकोत, सरकारी घर असले तर ते साधेच हवे हे सगळे आठवायला लागावे इतके जुने नाही.
असो.

विज्ञानदास +१

<<जनलोकपाल बिलावरून रस्त्यावर झोपणे आणि संघर्ष करणे >>

हे कधी घडलंय??

<<अजूनही त्यांच्या प्रत्येक कृतीमधे सनसनाटीपणा असतो, ब्रेकींग न्यूज मधे येण्याचा, चर्चेत राहण्याचा हव्यास दिसून येतो आणि संपूर्ण रोख स्वतःला सहानुभूती मिळावी याकडे असतो. >>

किती गृहितकं! ह्या सगळ्याचा काहीच पुरावा नाहीये कुणाकडे. प्रामाणिकपणे करत असतील असा विश्वास ठेवू या की जरा. नमोंच्या भूलथापांवर नाही का ठेवला?

<<मेधा पाटकरांनी टीका केलेली आहे,>>

लिन्क द्याल का?

योगेंद्र यादव आणि नवीन जयहिंद नावाच्या जुन्या आप कार्यकर्त्याचं पटत नाही. त्यावरून त्यांची जुंपली होती. यादव ग्राउंड लेवल कार्यकर्त्यांमध्ये फार लोकप्रिय नाहीत असं ऐकलं होतं. शिवाय गुरगाव मधल्या मतांचा त्यांचा अंदाज चुकला. त्यावरून गुरगाव युनिटमध्ये गडबड चालली होती. पक्षासाठी दोघेही महत्वाचे असावेत, असं वाटतंय.
बाहेर पडलेल्या कुणीही (बिन्नी, अश्विनी सोडले तर) केजरीवालांबद्दल काही वाईट बोलल्याचं ऐकण्यात नाही. पक्षात वेगळे विचार असतील तर अंतर्गत कलह आहे म्हणायचं, नाहीतर केजरीवाल सुप्रिमो आहेत, हुकुमशहा आहेत म्हणायचं...गंमत आहे.

मयेकर,
बाकीचे लोकप्रतिनिधी दरमहा भाडं भरत आहेत का? आपला पैसा उडवत आहेत ना.

मिर्ची
रस्त्यावर झोपण्याचा समारंभ सा-या देशाने पाहीलेला आहे. २६ जानेवारीच्या आधी मफलरमॅन आणि सहकारी थंडीत दिल्लीच्या रस्त्यांवर जिथे गणराज्यदिनाच्या सोहळ्याची तयारी करतात तिथे झोपून चक्का जाम करत होते. हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यापर्यंत खूप कमी बातम्या येताहेत. तीच गर मेधा पाटकरांच्या वक्तव्याची. याउलट आमची मतं आस्तीत जास्त निरीक्षणावरून बनलेली आहेत. मीडीया एकही बातमी दुस-या बाजूने देत नसतांना. असो.
ही मतं आहेत आणि मान्य करायलाच पाहीजेत असं नाही. परंतु गृहीतकं तुमची असू शकतात ही शक्यता गृहीत धरून देखील विचार करून पहा...

हर्षुकाका चिडलेले तसेच सोमनाथदादाही चिडले का?
http://www.ndtv.com/video/player/the-buck-stops-here/nailed-by-judicial-...

आमच्यासारखे नैतिक-सोवळे कोणी नाही, आमच्यासारखे शहाणे कोणी नाही आणि त्या काही ना काही छापलेल्या टोप्या यातलं सगळ्यात जास्त काय खटकतं ते ठरवणं कठीण आहे.

मिर्ची , तुमच्या पेशन्सला सलाम!!
बाकी लोकांचा सध्याचा पवित्रा बघता एकच वाक्य परत परत आठवते.
People get the government that they deserve.

Pages