Submitted by मंजूडी on 19 June, 2014 - 08:51
बंगळूरू आणि आसपास काय पहावे?
दोन ठिकाणांमधे खूप अंतर नको. कुटुंबातील सर्व वयाच्या माणसांना रीझवणारी, आनंद देणारी सहल व्हायला हवी. सहलीचा कालावधी ७ ते ८ दिवस.. त्याहून जास्त नको.
१.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-कोडाई
२.बंगळूरू-कूर्ग-काबिनी
या दोनपैकी तुम्ही काय सुचवाल?
पॅकेज देणारे माहितीतले कोणी टूर ऑपरेटर असतील तर सुचवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिवसमुद्रम धबधबा बघायला जा
शिवसमुद्रम धबधबा बघायला जा जमलं तर. ५-६ वर्षापूर्वी मला आवडलेला, सद्यस्थिती लोक सांगतीलच.
मी पहिला ऑप्शन सुचवेन. अंतरं
मी पहिला ऑप्शन सुचवेन. अंतरं खूप जास्त नाहीयेत. आम्ही बंगळूरू-मैसूर-ऊटी ही ट्रिप ४ दिवसांत केली होती.
.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-क
.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-कोडाईंं>> हे ठिक आहे. कूर्ग लांब पडेल शिवाय प्रेक्षणीय स्थळं कमी होतील. अंतरं कमी असल्याने सलग प्रवास कमी होतो.
मंजुडी, केसरटीसीची टूर खूप
मंजुडी, केसरटीसीची टूर खूप छान आहे. पिकनीकच्या धाग्यावर मी त्यांचा नंबर दिला आहे.
उद्या डिटेलमध्ये लिहीन.
बंगरुळला इस्कॉन मंदीर...पहाच
बंगरुळला इस्कॉन मंदीर...पहाच नक्की. विश्वेश्वरय्या म्युझियम... लाल बाग बॉटॅनीकल गार्डन....जरा जास्त वेळ काढून पहायलाच हवं सगळं..
बेंगलोर-मैसूर-बंदीपूर-ऊटी असा मार्ग आहे. ऊटीवरून परत येताना बंदीपूर पाहण्यापेक्षा बंदीपूर पाहून ऊटीकडे जाणे चांगले.
बंदीपूर बघणार असाल तर बंदीपूरची रिझर्वेशन सोय आधी पहा.आदल्या संध्याकाळी बंदीपूर रेस्ट हाऊसला रहावे आणि पहाटेपासून बंदीपूर बघावे.पावसाळा चालू आहे. बंदीपूरला प्रवेश आहे का याची चौकशी करून जा. बाकी रस्त्यावर गाडी थांबवू नये..हत्तींचे कळप वगैरे असतात.इतर पूर्वसूचना पाहून जा.(हे जर बंदीपूर बघणार असाल तर.) म्हणजे बघाच आता एवढ्या लांब चाललात तर!
टूर ऑ. घेणार असाल तर प्रश्नच मिटला.चांगल्या टूर ऑपरेटरला माहीती असतेच शक्यतो.पण आपला होमवर्कपण हवाच..
मैसूर-ऊटीचे डिटेल्स नंतर देईन..
मंजूडे, मी पहिला ऑप्शन
मंजूडे, मी पहिला ऑप्शन सुचवेन. KSTDCच्या टूर्सचीपण एकदा चौकशी कर. त्यांचं हॉटेल वृंदावन गार्डनमधे असल्यामुळे गार्डन इतरांसाठी बंद झाल्यावरही फिरता येतं. त्यांच्या बाकी सोयीपण चांगल्या असतात. (होत्या म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.)
बंगलोर जवळ वाँडरला नावाचे थीम
बंगलोर जवळ वाँडरला नावाचे थीम पार्क आहे मुलांना अगदी बेस्ट. एक दिवसाचा प्लॅन होतो. वेव्ह पूल, राइड्स व सर्व खूप छान आहेत. उटी खूप कमर्शिअल जाहे आहे आता. बाकी कमर्शिअल स्ट्रीट ला शॉपिन्ग. बागा वगैरे छान आहेत. चालायला लागते पण बागेत. विधाना सौधा छान आहे. पब कल्चर अ नुभवता येइल.
बंगळुरु २ ,म्हैसुर ३ ,हसन २
बंगळुरु २ ,म्हैसुर ३ ,हसन २ पुरेसे आहेत .
कावेरी दुकानातून चंदनाच्या
कावेरी दुकानातून चंदनाच्या वस्तू आणि बंगलोर सिल्क साड्या मस्त. कमर्शिअल स्ट्रीट वर एक कामत आहे तिथे ग्लास इडली. ल हानांना गंमत वाट्ते.
मृण्मयीला (होत्या सकट)
मृण्मयीला (होत्या सकट) अनुमोदन. पण लेटेस्ट माहिती पहा. KSTDC is really good.
वा!! मस्त उपयोगी माहिती देताय
वा!! मस्त उपयोगी माहिती देताय लोकहो..
आरती. मृण वेका, KSTDC शोधते. खात्रीशीर आहे ना नक्की?
अमा, येस्स! ग्लास इडली मस्त असते. शिवाय एम.जी.रोडवर निरुद्देश फिरत राहणे हाही एक मस्त विरंगुळा आहे. माझं फक्त बँङलोर बघून झालंय.
ऑप्शन १ बेष्ट आहे. बंडीपुर
ऑप्शन १ बेष्ट आहे.
बंडीपुर भारी आहे. वाटेत हत्ती हरणे हमखास दिसतात.
कावेरी दुकानातून चंदनाच्या वस्तू आणि बंगलोर सिल्क साड्या मस्त + १०
KSRTC चा contact no. dete.
KSRTC चा contact no. dete. Banglore cha aahe. Khup chan trip arrange karun detat. Hotels Govt. reg. asatat aani swacha sudha.
Mr. Narasimha - +919844414815.
आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांची ट्रीप आम्ही यांच्याकडून अरेंज करून देतो.
http://karnatakaholidaysonline.erponline.net/BusTripBookingPassengerCT.a... ही केसटीडी ची लिंक पाहा.
मी आजच बंगलोर - kodaikanl -
मी आजच बंगलोर - kodaikanl - उटी असे फिरून आले आहे . आम्ही ५ दिवसांसाठी गेलो होतो . ७-८ दिवसात खूपच चांगली होईल . कधी करणार आहात ट्रीप ? आमचे म्हैसूर आधीच झाले होते त्यामुळे ते केले नाही .
मोजकेच दिवस हातात असल्यामुळे
मोजकेच दिवस हातात असल्यामुळे बंगलोर(१ दिवस) - मैसूर (१ रात्र) -कूर्ग (३ रात्र) असा भ्रमंतीचा मार्ग नक्की झाला आहे.
लालबाग बोटॅनिकल गार्डन, बाणेरघाटा, शिवसमुद्रन फॉल्स, मैसूर झू, मैसूर पॅलेस, वृंदावन गार्डन आणि कूर्गमधले पटेल पॉईंट्स (थँक्स पग्या ;-)), दुबारे एलिफंट कॅम्प इत्यादी बघण्याचे ठरवले आहे.
याव्यतिरीक्त चुकवू नयेत अश्या काही स्थलदर्शनाच्या जागा असल्यास सांगा.
तसेच खाण्यापिण्याची खास ठिकाणं आणि खरेदीची माहिती (खास करून मैसूर सिल्क), टिप्स यांचं सहर्ष स्वागत आहे.
बाकी रस्त्यावर गाडी थांबवू
बाकी रस्त्यावर गाडी थांबवू नये..हत्तींचे कळप वगैरे असतात.इतर पूर्वसूचना पाहून जा.>>>> आम्हाला हे माहित नव्हते. आम्हालाही वाटेने जाताना अजस्त्र हत्तींचा कळप दिसला होता काही अंतरावर. मुक्तपणे चरत होता. आम्ही ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली. मी आणि मोठा पुतण्या गाडीच्या काचा खाली करुन त्यातून मुंडकी, हात बाहेर काढून फोटू काढू लागल्यावर ५ मिनिटांनी ड्रायव्हर अस्वस्थ झाला आणि पुतण्याला दटावून आत घेतला. लेकी बोले सुने लागे प्रमाणे मी पण आत झाले आणि गाडी पुढे नेली.
मंजू, कुणाला गाडी लागत असेल तर उटीच्या घाटात काळजी घेणे. मला एरव्ही गाडी लागत नसली तरी तेव्हा ४-५ ठिकाणी गाडी थांबवावी लागली होती आणि नवर्याला पाण्याची बाटली घेऊन माझ्या दिमतीला, माझं डोकं आणि मला धरुन ठेवायला उतरावे लागले होते. त्या बेंट्समुळे गरगरुन गरगरुन पार गळपटून जायला झालं होतं बाकी जाऊ, दीर, पुतण्याला काहीच झालं नव्हतं.
अगं ऊटीला नाही जाणार आहोत.
अगं ऊटीला नाही जाणार आहोत.
अरे हो की!
अरे हो की!
म्हैसुरमधे एकच रात्र? पॅलेस
म्हैसुरमधे एकच रात्र? पॅलेस नाही बघणार?
सोबत मुले असल्यास बंगलोर
सोबत मुले असल्यास बंगलोर मध्ये विश्वेश्वरैया सन्ग्रहलय बघायला जाच . म्हैसूरला जाताना श्रीरंगपट्टण येथेही जाता येईल .
केपी, तिने पॅलेस लिहिलंय.
केपी, तिने पॅलेस लिहिलंय.
इस्कॉन नाही पाहणार? वेल,
इस्कॉन नाही पाहणार?
वेल, मैसूर एकच रात्र? मैसूरला वृंदावन गार्डन बोरींग आहे.गाणी फारच बोरींग लावतात.शिवाय रात्रीचा वेळ आणि आउटसाईडला असल्याने येण्या-जाण्यात वेळ जाणार.जाणे-येणे मिळून तीन-साडेतीन तास...म्हणून वृंदावनपेक्षा दोन पॉईंट्स सुचवतो. बघा...
१-सेंट फिलोमन्स् चर्च-इकडे तुम्हाला खूप सुंदर ख्रिस्तीयन कलाकारी पहायला मिळेल.चर्चच्या खाली एक रेस्ट्रीक्टेड भाग आहे,तिथे 'दा विन्ची कोड'चा सीन फील घेता येईल.
शिवाय अगदी समोर एक दुकान आहे जिथे बर्याच वस्तू अगदी कपडे,साड्यांसह मिळतात.
२-कृष्ण-राज सागर धरण किंवा मग जगनमोहन पॅलेस किंवा रेल्वे म्युझीयम-आता यात सोयीचं जे वाटेल किंवा सगळेच नेट वरुन अंतर,प्रवेश,केव्हा चालू असतं याची माहीती घेउन बघून या. मुलांना यातच जास्त इंटरेस्ट असतो.
खरेदी बाबत बेंगलोर आणि मैसूर महागडे आहेत.तेव्हा खरेदीत वेळ घालवण्याऐवजी(ती तुम्ही मुंबई ठाण्यात पण करु शकता,पुलंचा सल्ला पाळा
)
जेवढे स्पॉट बघता येतील ते पहावेत.
अवांतरः-बाणेरघाटा-एलीफंट कँपला कृपया प्लॅस्टीक आत नेऊ नये.नेलेच तर तिथेच टाकून येणे टाळा. नो आरडा-ओरडा इन जंगल.नो ओव्हरकाँफिडन्स..बंदीपूरला लोकं बघीतलेत.जंगलात शिरलं की त्यांचं काहीतरी जागं होतं.आणि माहीती नसताना काहीही धाडस करतात...मग हत्ती मागं लागला की फाटते.
सो बी अवेअर् अँड दॅट यू आर देअर गेस्टस्.
कदाचीत या गोष्टी माहीती असतील पण जंगलमध्ये शिरलं की अॅड्रेनलीन पातळी वाढते.
आणि काय करु काय नको होतं.. असो. बाकी,बॉन वोयाज.. 
विज्ञानदास, इस्कॉन बघण्यात रस
विज्ञानदास, इस्कॉन बघण्यात रस नाही.
वृंदावन गार्डनला काय बोरींग आहे ते तरी बघून येऊ. रेल्वे म्युझियम यादीत आहे.
बंगलोर, मैसूरमधल्या खरेदीची क्वालिटी, रेट आणि व्हरायटी मुंबई ठाण्यात मिळणारच नाही. भरपूर अनुभव आहे. शेवटी 'समाधान' हे सापेक्ष आहे.
माहितीबद्दल धन्यवाद!!
वृंदावन गार्डनला काय बोरींग
वृंदावन गार्डनला काय बोरींग आहे ते तरी बघून येऊ.<< बघा ब्वा.. तुमचा निर्णय... तरीही मी म्हणेन की दुसरा ऑप्शन निवडायचा निर्णय घेतला तर धरण पाहून या.
बाकी 'खरेदी समाधान सापेक्षते'चा सिद्धांत पटतो.
महिलावर्गाचं अनभिषिक्त वर्चस्व त्यावर.आम्ही त्याबाबत मायनॉरीटी क्लासवाले लोकं

वृंदावन गार्डन कोणे एके काळी
वृंदावन गार्डन कोणे एके काळी अदभुत आश्चर्य होतं. आता त्यात काही राम राहिलेला नाही. आवर्जून टाळण्याचं ठिकाण आहे ते.
कूर्गला कुठेशी मुक्काम?
मामी, सुचवा. अजून ठरतंय.
मामी, सुचवा. अजून ठरतंय. ग्रूपमधल्या बर्याच लोकांना होम स्टे हवा आहे.
कूर्ग - ऑरेंज काउंटीत
कूर्ग - ऑरेंज काउंटीत कॉटेजेस विथ स्विमिंग पूल आहेत. फार मस्त आहेत.
होमस्टे ऑप्शनही छान. बरेच फॅमिली मेंबर्स असतील तर एखादा पूर्ण बंगलो विथ पूल वगैरेही बघता येईल.
orange countyche charges
orange countyche charges amhala parawadnare nahit
मंजूडी, प्रवासाला शुभेच्छा.
मंजूडी, प्रवासाला शुभेच्छा. सगळेजण मस्त मज्जा करा, दणकून शॉपिंग करा
वृंदावन गार्डन कोणे एके काळी
वृंदावन गार्डन कोणे एके काळी अदभुत आश्चर्य होतं. आता त्यात काही राम राहिलेला नाही. आवर्जून टाळण्याचं ठिकाण आहे ते.
>>>खरयं मामी. गेला नाहीत तरी काही हुकणार नाहिये.
कुर्गला गेलात तर विराजपेठ जवळ एक जुना लाकडी पॅलेस आहे नल्कनड म्हणून तो बघा. दुबरे कँप भिकार आहे.
मैसुरला रात्री ७ वाजता साउंड-लाईट शो नक्की बघा.
Pages