Submitted by मुग्धमानसी on 25 February, 2014 - 04:57
ही अंतरेच सारी माझ्या तुझ्यातली पण
व्यापून अंतरांना उरतेच तू नि मीपण!
मी अंतरात माझ्या मोजीत बैसते रे
पाऊल एकटीचे मापीत बैसते रे
मी पोचते जरा अन् तू पावलात एका
जातोस लंघूनी हे मम भोवतीचे कुंपण...
तू बोललास माझ्या कानी उगाच काही
नसतेच ऐकले तर असते अजुन प्रवाही
पण थबकले तिथे मी, तेथेच थांबले मी
आता वहायचे तर, आहे कुठे ते जलपण?
ती वेळ योग्य होती, संधी सुयोग्य होती
आले उधाणूनी मी, तू वेचलेस मोती...
मोत्यांस वेचताना भिजलास ना जरासा?
ते तेवढेच... बाकी सारेच कोरडेपण!
आता उजाडताना मी रोज साद देते
माझ्यातल्या तुला मी हटकून मात देते
सगळ्याच अंतरांना अलवार जोडणारा
सेतू उभारते मी ह्र्दयी तरंगणारा...
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास पुजिणार्या
रामास कल्पिता मी हसतो मनात रावण!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण थबकले तिथे मी, तेथेच
पण थबकले तिथे मी, तेथेच थांबले मी
आता वहायचे तर, आहे कुठे ते जलपण?>>>>>.. मस्त आवडली
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास पुजिणार्या
रामास कल्पिता मी हसतो मनात रावण!>>ही कल्पना आवडली फार
अनेकदा वाचली गं! मानसी आयेम
अनेकदा वाचली गं!
मानसी आयेम जेलस ऑफ यू
कसलंच लिहितेस अगं!
मस्त आवडली
मस्त आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
सलाम आहे तुला!!
सलाम आहे तुला!!
सई>>> कस्चं कस्चं
सई>>> कस्चं कस्चं

सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास पुजिणार्या
रामास कल्पिता मी हसतो मनात रावण!<< टटॉप क्लास समारोप
कविता नेहमीप्रमाणेच अतिउत्तम
प्रस्तावनेचा मतलाशेरही उत्तम
बाकी कोरडेपणाचे कडवे सर्वाधिक आवडले ...अर्थही ग्रेट आहेच त्याचा पण चारही ओळी मिटरमध्ये पक्क्या बसल्या म्हणून जास्त मजा आली त्या कडव्यात मलातरी
असो
शुभेच्छा
धन्यवाद वैवकु.
धन्यवाद वैवकु.
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास पुजिणार्या
रामास कल्पिता मी हसतो मनात रावण
उत्तम कविता............
छान....
छान....
सुंदर विचार, शब्दही साजेसे
सुंदर विचार, शब्दही साजेसे आहेत. एक अतिशय उत्तम भावगीत ऐकत असल्याचा फील येतोय.
आता लय मीटर या विषयीचा विचार सुरू व्हावा. कविता तुमच्या ठायी आहेच, मंत्र साध्य झालाय, तंत्राकडेही माफक लक्ष पुरवल्यास काव्य अजून उजळून निघेल.
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास
सीतेस त्यागूनी त्या पुतळ्यास पुजिणार्या
रामास कल्पिता मी हसतो मनात रावण!>>खूपच आवड्ले
केवळ अप्रतिम. खरच एखादं सुरेख
केवळ अप्रतिम. खरच एखादं सुरेख भावगीत वाचल्याचा अनुभव येतो आहे.
धन्यवाद सर्वांना. अमेय>>>
धन्यवाद सर्वांना.
अमेय>>> प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. तंत्र म्हणजे मात्रा, व्याकरण, अलंकार वगैरे ना? खरंय तुमचं. त्याचाही अभ्यास करायला हवा. प्रयत्न करेन. तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
(No subject)