गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
हायना ...बापरे ! कासवं ? खरंच
हायना ...बापरे !
कासवं ? खरंच क्यूट
अतिशयच अवांतर : मी आठ-नऊ वर्षांची असताना आत्येभावाने पाळलेल्या छोट्या कासवाला निव्वळ कुतूहल म्हणून हवाबाण हरडे खाऊ घातले होते कासव कदाचित 'काय ह्या मुलीचा त्रास' असेही म्हणाले असेल पण टपाटप खायचे खरे पाण्यात टाकल्या गोळ्या की. नशीब काही झाले नाही त्याला !
बॉस्टन आणि हाइनाज एकत्र
बॉस्टन आणि हाइनाज एकत्र गूगलून बघितलं. भलतेच प्राणी आले.
>>तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ फॅमिली, हरीण, सुतारपक्षी वगैरे >>>
तेच की. कसल भारी. फोटोग्राफीला पण भरपुर स्कोप
केपी, तुला सरडापण स्कोप देतो असं लक्षात आलं आहे.
खरंच, फक्त कासवं उच्छाद देत नाहीत असं वाटतं. फ्लोरिडात आर्माडिलो प्रचंड प्रमाणात झालेत. घराच्या फाउंदेशनपर्यंत बिळं खणतात. आत्तापर्यंत रोडकिलमधे साप, ससे, हरणं, कासवं, रानमांजरी बघितल्या होत्या. आजकाल आर्माडिलोसगळ्यांत जास्त दिस्तात.
न्यु इंग्लंडातले प्राणी इथे
न्यु इंग्लंडातले प्राणी इथे पहा.
झालं! आता हे आर्माडिलो म्हणजे
झालं! आता हे आर्माडिलो म्हणजे काय ते गुगलून बघणं आलं.
हा चिलखत घातल्या सारखा
हा चिलखत घातल्या सारखा दिसतोय.
गुगलून बघा. चिलखत घातलेला
गुगलून बघा. चिलखत घातलेला उंदीर म्हणजे आर्माडिलो.
आर्माडिलो >> बाप्रे कसला घाण
आर्माडिलो
>>
बाप्रे
कसला घाण आणि खतरनाक दिसतोय हा
भितीच वाटली बघुन
अशुद्धलेखन करणा-यांवर
अशुद्धलेखन करणा-यांवर सोडण्यास अत्यंत उपयुक्त वाटतो आर्माडिलो
रिया फ्रेन्ड्स सिरीयल बघ झी
रिया फ्रेन्ड्स सिरीयल बघ झी कॅफेवर. मला त्यातला रॉस म्हणला की आर्माडिलोच आठवतो.:फिदी: अॅनिमल प्लॅनेट वर पाहिला होता याला. शेपटी हलवत जाम तुरुतुरु पळतो तो.:फिदी:
सन्दर्भः- रॉस ज्यु दाखवलाय आणी त्यान्च्या धर्मग्रन्थात आर्माडिलो विषयी सान्गीतलेले असते.
अगो भारीये हवाबाण हरडे.:हहगलो: त्याला बिचार्याला आयुष्यात पहिल्यान्दा काहीतरी चविष्ट नमकीन मिळाले.
रश्मी, ओके... पाहिलाच हवं
रश्मी, ओके... पाहिलाच हवं
अगो, तुझ्यामुळे मलाही कासवाला हवाबाण हरडे खायला घालून बघायची खुमखुमी येतेय
पियू पळून नाही का जात
पियू पळून नाही का जात त्या?
>> नाही जात
दो-चार इधर भेज दो...सिरियसली
>> पिल्लं झाली कि देते.
माझ्याकडे सध्या ससे आहेत..
>> आमच्याकडे सासरी होते म्हणे लग्नाआधी. पण त्यांना (आणी त्यांच्यामुळे इतरांना) खरुज झाली म्हणुन सोडुन दिले. मी चक्कर मारते तुझ्याकडे.
आमची कामाची जागा...
आमची कामाची जागा...
रश्मी., चविष्ट नमकीनची शक्यता
रश्मी., चविष्ट नमकीनची शक्यता नाकारता येत नाही
रीया.,कशाला उगीच भलते प्रयोग कासवाच्या पचनसंस्थेवर. लहान असताना वेड्यासारखं वागतो त्याचं आता काही होऊ शकत नाही
सन्दर्भः- रॉस ज्यु दाखवलाय
सन्दर्भः- रॉस ज्यु दाखवलाय आणी त्यान्च्या धर्मग्रन्थात आर्माडिलो विषयी सान्गीतलेले असते.>>> नाही, त्याला हनुक्काबद्दल त्याच्या भाच्याला सांगायचं अस्तं आणि दुसरा कुठलाच कॉश्च्युम मिळत नाही म्हणून तो अर्माडिलो बनून येतो. अख्खा एपिसोड भन्नाट आहे.
अगो, आणखी अतिशय अवांतर:
अगो, आणखी अतिशय अवांतर: आमच्याकडे आजोबांनी काढलेली BP ची गोळी खारुताईने गट्टम केलेली. काही झालं नाही तिला. बरेच फाजो मुकाट्याने टाळून पोस्ट लिहितोय.
Ago, You are right ! mhanun
Ago, You are right !
mhanun ch control karatey
>>नाही, त्याला हनुक्काबद्दल
>>नाही, त्याला हनुक्काबद्दल त्याच्या भाच्याला सांगायचं अस्तं आणि दुसरा कुठलाच कॉश्च्युम मिळत नाही म्हणून तो अर्माडिलो बनून येतो.
भाचा नाही, रॉसचा मुलगा, बेन. फक्त आर्माडिलोचा भाग बघायचा असेल तर इथे आहे.
अजय तरस नसून कायोटि असण्याची
अजय तरस नसून कायोटि असण्याची शक्यता अधिक आहे. सध्या न्युजमधे पण त्याबद्दल ऐकले होते.
कबूतर नावाचा महा डान्बिस
कबूतर नावाचा महा डान्बिस पक्षि येतो का तुमच्याकडे
येत असल्यास पळवून लावायला काय करता ??
माझी आख्खी फूलझाड ( गुलाब , जाई , मोगरा वगैरे ) ह्याच्यामुळे ऊध्वस्त झाली आहेत
http://www.boston.com/news/lo
http://www.boston.com/news/local/massachusetts/articles/2010/02/17/for_c...
ह्यात म्हटल्याप्रमाणे कोल्हा आणि लांडगा ह्यांचे संमिश्र असू शकेल. म्हणून तरसासारखा वाटला असेल.
कबुत्र आपली फटक्याच्या
कबुत्र आपली फटक्याच्या बंदुकीताल्या केपा असतातना त्याच्या आवाजाला फार घाबरतात. लहानपणी कबुत्र झाडावर बसली की दोनचार केपा मारल्या की थवा उडायचा. त्या केपांनी घरादाराच, शेजाऱ्यांच डोकं उठतं हे अडेड advantage.
अन्यथा महा लोचट प्राणी. धावत गळा दाबायला गेलो तरी उडत नाहीत मेली (कबुत्र हो)
खार नामक प्राणी आवडतो
खार नामक प्राणी आवडतो त्यांच्यासाठी
What's so cute about squirrels ?
It's just a rat in cuter costume !
-Carrie Bradshaw ( Sex and the city ).
कासवं>>> क्युट तरस>> अरे
कासवं>>> क्युट
तरस>> अरे बापरे. सांभाळुन.
जाई., कबुतरांच्या त्रासासाठी जाळी आणि बर्ड स्पाईक्स हाच उपाय आहे. इतर सर्व उपाय करुन थकले.
ही जाळी फारशी दिसुन येत नाही. आणि बाल्कनी मधे बंद करायचे नसल्याने कठड्यावर आणि एसीच्या बॉक्सवर ( जिथे पक्षी पर्चिंग करु शकतील अशा ठिकाणावर ) बर्ड स्पाईक्स लावुन घेतले. आता बाल्कनी बंद नसुनही कबुतर येत नाहीत.
इतरही पक्षी घरांवर बसत असल्यास पक्षी बसु शकतील अशा ठिकाणी बर्ड स्पाईक्स लावुन बघायला हरकत नाही. ( सुतार पक्षासाठी उपयोगी नाही )
धन्यवाद सावली
धन्यवाद सावली
कबुत्रांवर दक्षीने पी एच डी
कबुत्रांवर दक्षीने पी एच डी केली आहे. तिला विचारा. कबुतर घालवायचे १०१ उपाय वगैरे पुस्तक काढण्यात बिजी नसल्यास सांगू शकेल
आमच्याकडे काही दिवसांपुर्वी सुतार पक्ष्याचीच ठोक ठोक ऐकु आलीय पण अजून छपरात आहे की झाडावर याचा परफेक्ट अंदाज न आल्यामुळे मूग गिळून बसलो आहोत. होप की त्याला आमचं घर न आवडता आम्च्या शेजारच्याचं आवडावं (जे त्याने कस्टमाइज्ड करून बांधून घेतल्यामुळे कम्युनिटीत पण बरेच लोकांना आवडतं ;))
अरे वा खारी फार जिव्हाळ्याचा
अरे वा खारी फार जिव्हाळ्याचा विषय दिसतोय इथे. यावर्षी ७०-८० चेरीज ची त्यांना पार्टी दिली असं समजायचं. प्लॅस्टीकचे घुबड झाडावर ठेवणे हा उपाय सोपा आणि इफेक्टीव्ह आहे पण त्यामुळे पक्षी झाडावर यायचेच बंद होतात म्हणे. जे माझ्या लेकीला अजिबात चालत नाहीये. त्यामुळे अख्ख्या चेरीवर बहर आल्यानंतर फिश्नेट टाकणे हा उपाय पुढल्या सीझनला करण्यात येईल.
अजय - मला वाटते की ती कायोटी असेल. आमच्या कॉलनीत आधी आमचंच घर शेवटचं होतं. शेजारचे प्लॉट्स अजून विकले गेले नव्हते तेव्हा कायोटी नेहमी दिसायच्या. रात्री ऐकू पण यायच्या. पण गेल्या ४ वर्षात बरीच घरे झाली आणि मग हळूहळू कमी झाल्या.
कायोटीज दिसायला इतके कुरुप
कायोटीज दिसायला इतके कुरुप नसतात पण, हाइनाज सारखे. बर्यापैकी कोल्ह्यासारखेच दिसतात.
>>कायोटीज दिसायला इतके कुरुप
>>कायोटीज दिसायला इतके कुरुप नसतात पण, हाइनाज सारखे. बर्यापैकी कोल्ह्यासारखेच दिसतात.>> +१
धनश्री, माझ्या वहिनीच्या दारच्या चेरी रॅकूनने झाडावर चढून फस्त केल्या.
कायोटीज दिसायला इतके कुरुप
कायोटीज दिसायला इतके कुरुप नसतात पण, हाइनाज सारखे. बर्यापैकी कोल्ह्यासारखेच दिसतात.>> normal असेल तर ठिक आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या पाठच्या झाडीत एक लूत भरलेला कायोटि होता तो अतिशय विचित्र दिसत असे त्याला wild life वाले येऊन पकडून घेऊन गेले होते. New England मधले कायोटि वेगळे असतात असे म्हणतात.
बापरे! मला भितीच वाटायला
बापरे! मला भितीच वाटायला लागली हे सगळे वाचून एवढे सगळे प्राणी बॅकयार्डात येता? तुमच्या इथे बॅकयार्ड भरपुर मोठे असते का? आणी घराला फेन्स नसते का?
Pages