गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ
तुमच्याकडे खार, ससा, बदक विथ फॅमिली, हरीण, सुतारपक्षी वगैरे >>>
तेच की. कसल भारी. फोटोग्राफीला पण भरपुर स्कोप.
देवा! डोंबलाचा फोटो. ससे तर
देवा! डोंबलाचा फोटो. ससे तर सगळ्यात बदमाष. खारींना तर बदडुन काढले पाहीजे.
आमच्याकडे रात्री जिन्यात येऊन
आमच्याकडे रात्री जिन्यात येऊन कुत्रे भुंकत. म्हणून मी बिल्डिंगच्या बोर्डवर लिहीले - " कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लाईट रात्री बंद ठेवण्यात येतील." आणि काय आश्चर्य! अंमलबजावणी व्हायच्या आत कुत्रे गायब! कुत्र्यांना वाचता येतं हा नवाच शोध लागला. परदेशात तर खारीलाही वाचता येत असेल, ट्राय करा.पॉवर ऑफ पुणेरी पाटी कुत्र्यांच्या भॉट्सप वरही पोचलेली दिसते.
ज्याचा जळत त्यालाच कळते ना
ज्याचा जळत त्यालाच कळते ना सीमा
दोन आठवड्यापूर्वी
दोन आठवड्यापूर्वी मित्रांबरोबर बाहेर अंगणात जेवायला बसलो होतो तेंव्हा अशा सारखा दिसणारा एक अतिशय किळसवाणा पाणी अचानक समोरून गेला.
http://www.travelblog.org/Photos/5563301
माझ्याबरोबरच आणखी चौघांनी पाहिला आणि हा हैनाच असणार असे आम्हाला वाटले. फोटो काढायच्या आत तो झाडीत अदृश झाला. पण हैना हा प्राणी अमेरिकेत असतो हेच शक्य दिसत नाही आणि त्यातही बोस्टनची हवा त्याला मानवणारच नाही
न्यू इंग्लंड भागात हैनासारखा दिसणारा दुसरा कुठला प्राणी असतो का? हा प्राणि पाहिल्यावर घराच्या अंगणात येणार्या प्राण्यांचं कौतुक वगैरे सगळे संपले आहे.
अंगणात हैना येतो? तुम्ही
अंगणात हैना येतो? तुम्ही लोकं काय जंगलात राहता का? इतके कसे प्राणी पक्षी येतात तुमच्याकडे? हैना म्हणजे तरस ना? लई बेक्कार.
लाफींग हायना दिसतोय
लाफींग हायना दिसतोय
अंगणात हायना? बापरे..
अंगणात हायना? बापरे..
अश्विनी! इथे अगदी गजबजलेल्या
अश्विनी! इथे अगदी गजबजलेल्या सबब्र्ज( विभाग) सुधा बरेच नॅचरल रिझरवॉयर असतात.... शिवाय घराच्या आजुबाजुला भरपुर झाडही असतात..प्राण्ञा.ना लपायला बरिच जागा असते.माझ्या समोरच्या घ्रराच्या मागेच अस रिझरवॉयर आहे..एक्दा तिकडून इकडे येताना एक हरीण कुठल्यातरी गाडिचा धक्का लागुन जखमी झाल आणि माझ्या यार्डात नेमक टुल-हॉउस च्या मागे ़जावुन पडल... फॉल स.न्पुन थ.न्डि सुरु बारिकसा स्नोही झालेला. यार्डात जायचे दिवस आणि कारण दोन्हीही नाही .. स्नोब्लोअरचा क्लिनि.न्ग रॉड आणायाला टूल हाउस मधे गेल्यावर कळल. बिचार आधिच गेलेल..
मग काय मस्त व्हील बार्बेक्यु
मग काय मस्त व्हील बार्बेक्यु का?
नाही वो! टाउन वाले येवुन
नाही वो! टाउन वाले येवुन घेवुन गेले..
हायना?? बापरे.. आमच्या घराजवळ
हायना?? बापरे.. आमच्या घराजवळ कोल्हा पाहिलाय ४,५ वेळा. शाळेजवळून अस्वल जाताना दिसलंय.
यात काय..................
यात काय.................. आमच्या इथे तर बिबळा येतो
प्राजक्ता ईईई अस्वल!!
प्राजक्ता
ईईई अस्वल!! तुम्हा लोकांना खास जंगली जनावरं बघायला जायला नको कुठे. रात्री दारावर टकटक झाली आणि दार उघडल्यावर समोर अस्वल दिसलं तर?
उदयन, आपल्याकडे बिबळे लोकांना
उदयन, आपल्याकडे बिबळे लोकांना उचलूनच नेतात मनुष्यवस्तीत घुसले तर. त्यांच्या वस्तीत मनुष्य घुसलाय ना.
अजय हायनाच ( तरस) आहे की तो.
अजय हायनाच ( तरस) आहे की तो. लान्डगा आणी तरस हे अतीशय लबाड आणी भयानक प्राणी.
अवान्तरः परवा अॅनिमल प्लॅनेट वर बघीतले. चित्त्याने इम्पालाची शिकार केली. त्याची मान तोन्डात धरुन त्याला फरपटत नेत होता. बाजूला टाकले तेवढ्यात एक येड तरस तिथे आले, आणी गुरगुरत त्याने चित्त्याला पळवले. ते तरस आणी चित्ता दूर जातो न जातो तेवढ्यात इम्पाला झटकन उडी मारुन पसार झाले. माझी हसून जाम वाट लागली.
तरस कायम दुसर्याच्या शिकारीवर जगते. प्रसन्गी त्यान्चा कळप सुद्धा मोठ्या हिन्स्त्र प्राण्याना भारी पडतो.
अवान्तराबद्दल क्षमस्व.:स्मित:
या खारी आणि ससे फार अनॉयिंग
या खारी आणि ससे फार अनॉयिंग असतात. खारी तर महाबेरकी . काहीही उपाय केले तरी त्या हाणून पाडतात. सगळ्या फुला-भाज्यांच्या रोपाचा सत्यानाश करतात
आमच्याकडे बदकं, ससे, खारी, हरणं याला अॅडिशन म्हणून हल्ली कासवं येतात !! घर रस्त्याच्या एन्ड ला आहे. त्याच्यपुढे जवळच पाँड अहे. त्यात ही कासवं राहतात, सध्या त्यांचा अंडी घालायचा सीझन आहे. पॉन्ड च्या काठावर खड्ड्यात बरेच ठिकाणी अंडी किंवा अगदी लहान , तळहातावर २-३ मावतील इतकी लहान कासवे दिसतात.! बाकी सगळे प्राणी भयंकर उपद्रवी असले तरी ही कासवं फार क्यूट वाटतात !
तूम्ही सगळे अॅक्च्युअली किती
तूम्ही सगळे अॅक्च्युअली किती लकी आहात
मैत्रेयी, कासवं वॉव!!!!!!!!!!!!!!
खारी तर मला फार आवडतात. काश माझ्या घरी पण येत असत्या त्या :स्वप्नात रमलेली बाहुली:
तूम्ही सगळे अॅक्च्युअली किती
तूम्ही सगळे अॅक्च्युअली किती लकी आहात>>+११११
एक ग्लोबल गटग केले पाहिजे या एरियांतून!!!
रीया, पुण्यात आमच्या घरी
रीया, पुण्यात आमच्या घरी येतात. आम्ही त्यांना पाणी आणि काहीतरी खायला ठेवतो. रोज येतात. प्रयत्न करुन बघ.
यांच्या इथे खार, हरिण तरस
यांच्या इथे खार, हरिण तरस येते.... नाहीतर भारतात........ झुरळ . पाली.. नाकतोडा, कुत्रे...मांजरी येतात
हो आणि बोनस म्हणुन "मच्छर"
हो आणि बोनस म्हणुन "मच्छर" देखील येतात
उंदिर विसरलात उदयन!
उंदिर विसरलात उदयन!
ते आमच्या घरात येत
ते आमच्या घरात येत नाही........ सुमेधी यांच्या घरात येतात
(No subject)
सुमेधी नाही रे सुमेधाव्ही!
सुमेधी नाही रे सुमेधाव्ही!
सुमेधी नाही रे
सुमेधी नाही रे सुमेधाव्ही!>>>>करेक्ट
कासवं येतात? किती क्युट
कासवं येतात? किती क्युट
हायना? हायला!!!
खारी तर मला फार आवडतात. काश
खारी तर मला फार आवडतात. काश माझ्या घरी पण येत असत्या त्या
>> आमच्याकडे रोज किमान २५ तरी खारी येतात. खाऊपिऊ साठी.
आणि घरातच २ खारी पाळलेल्या आहेत त्या ७ दिवसांची पिल्ले असल्यापासुन.
पियू पळून नाही का जात
पियू पळून नाही का जात त्या?
परत येतात? दो-चार इधर भेज दो...सिरियसली
माझ्याकडे सध्या ससे आहेत..
Pages