Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्यु, तू म्हणतेस ती गोष्ट
ट्यु, तू म्हणतेस ती गोष्ट पहिली की दुसरीच्या पुस्तकांत होती. गोष्टींचे म्हणून एक पुस्तक असायचे. अजून मिळतात ती पुस्तकं. तेव्हा आपल्याला इतिहास हा विषय नव्हताच.
स्मशानातलं सोनं आणि लाल चिखल या दोन्ही धड्यांना आम्ही वर्गात रडलो होतो. खासकरून आमच्या गीतेसरांनी ज्या शब्दांमध्ये त्या धड्यामधील कित्येक बाबी आम्हाला समजवल्या होत्या. "जगणं असंही असू शकतं बरं का" अशी सुरूवात करून त्यांनी आम्हाला तेव्हा अप्रिचित असलेल्या अशा कित्येक समाजवर्गातील जीवनाचे किस्से ऐकवले होते.
एक धडा होता झुल म्हणुन नायक
एक धडा होता झुल म्हणुन नायक शहरातुन गावातल्या घरि येतो,घान ,गरिबी बघतो आणि लगेच जातो...आटवते का>>>>>> तो बेगड होता...प्रकाश..बौद्धवाडा....त्याचा बाप...भावंड....आई ने त्याच्यासाठी ठरवलेली मामाची खेडवळ मुलगी...त्याला आवडत असलेली शहरातील शोभा....गावातील आणि घरातील घाण न आवडल्याने त्याचे लवकर परत जाणे...आणि त्याचं सामान पोहोचवत असताना बैलाच्या शिंगाला लावलेल्या बेगडा बद्दल बापाचे विचार करणे....असा सारांश आहे...पण धडा जबरदस्त होता
उंदीर आणि राजाची गोष्ट आणि
उंदीर आणि राजाची गोष्ट आणि अजुन एक ` मी खीर खल्ली तर बुड घागरी ' . दोन्ही मस्त होत्या.
अरे हो, विसरले होते. छान छान
अरे हो, विसरले होते. छान छान गोष्टी असायच्या पहिली / दुसरीत तेव्हा या गोष्टी होत्या. बहिरी ससण्याची पण गोष्ट आठवते....चित्रासकट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उंउनदीर आणि राजाची गोष्ट आणि
उंउनदीर आणि राजाची गोष्ट आणि अजुन एक ` मी खीर खल्ली तर बुड घागरी ' . दोन्ही मस्त होत्या.
>>
अहो हे कधीचं सांगताय? हे १९६०-७० च्या दशकातले धडे आहेत
ओवी, आपण एकाच अभ्यासक्रमाचे
ओवी, आपण एकाच अभ्यासक्रमाचे असणार, तू उल्लेख केलेले सर्व धडे मला आठवतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा हा धागा मस्तच आहे. गजा
वा वा हा धागा मस्तच आहे. गजा छान.. जुन्या आठवणीत नेलस..
बालभारतीची पुस्तकं म्हणजे माझ्या खूपच आवडीची. पाचवी पासूनची सगळी बालभारती पुस्तकं मी अजून जपून ठेवलीयत.. पहिलीच्या गणिताच्या पुस्तकावरची फडणीसांची चित्रे जाम आवडायची. ते पण आहे अजून ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सातवीला 'हळद उन्हाची' नावची
सातवीला 'हळद उन्हाची' नावची विंन्दांची कविता होती. कुणाला आठवतेय का?
झाड्याच्या शेंड्या वरती हळद उन्हाची सळसळते' अशी काहीतरी सुरुवात होती.
आणि पतंगावर पण एक कविता होती ना?
हा पतंग की पाखरु म्हणे मज आभाळी चल फीरु..
नववीला शान्ता बाईंची 'पैठणी' नावाची सुरेख कविता होती.
किती छान धागा आहे. कितीतरी
किती छान धागा आहे. कितीतरी ओळखीची ठिकाणे येऊन गेली प्रतिक्रियांमधे.
नीलू - बालभारतीची पुस्तके जपून ठेवलीयेत!! गुड जॉब. स्कॅन करून इथे टाकता येतील का?
ओवी - आपण बहुतेक एकाच बॅचच्या किंवा निदान एकाच अभ्यासक्रमातल्या.
तू लिहिलेल्या सगळ्या कविता/धडे आठवताहेत. आमच्या शाळेत मराठी शिकवणार्या सगळ्याच शिक्षिका भारी होत्या. काय जादू करून शिकवलं देव जाणे पण आता शाळेची सुखद आठवण म्हणजे कोणत्यातरी वर्षातला मराठीचा तासच असतो.
शि. द. फडणीसांच्या
शि. द. फडणीसांच्या चित्रांमुळे गणिताचं पुस्तक खूप आवडायचं.
२-३ कविता आठवल्या एक तुतारी
२-३ कविता आठवल्या
एक तुतारी द्या मज आणुनि ,, फु़ंकिन मी ती स्वप्रणाने,,, भेदुन टाकीन सारी गगने...
लई फेमस अशी
ओळखलत का सर मला ,,
आनि कोलंबसाची एक कविता >>>> ही बहुधा १० वी ला होती..
सागरा किनारा तुला पामराला
ह्यातले बरेच शब्द चुकीचे पन असतील...
नीलू, पुस्तकातली काही पानं
नीलू, पुस्तकातली काही पानं तरी टाकता येतील का इथे? धन्यवाद!
अजून काही आठवतात
वल्हव रे नाखवा कविता बहुतेक वसंत बापट यांची.
माझा खाऊ मला द्या धडा
ईंजिनदादा, ईंजिनदादा, आज ये अंगणा, वासुदेव - या कविता
भूमिगत - एका क्रांतिकारकाची कथा
आम्ही तुम्हाला हवे आहोत का? - बेवारस प्राण्यांविषयी धडा, बहुतेक अनिल अवचट यांचा
एक निर्झर आणि समुद्र असाही धडा होता
वळीव - शंकर पाटील यांची कथा
स्नेही - विंदा करंदीकर
समतेचे तुफान उठले, कसा मी कळेना - कविता विंदा करंदीकर
आवडतो मज अफाट सागर - कविता कुसुमाग्रज
आवा चालली पंढरपुरा - तुकाराम
नळ हंस यांचा संवाद यावरही एक कविता होती
बालभारतीच्या कार्यालयात जुनी पुस्तके मिळतील का?
वल्हव रे नाखवा <<< वल्हवा रे
वल्हव रे नाखवा <<<
वल्हवा रे वल्हवा रे वल्हवा रे नाव
वल्हवली वल्हवली
मोकाट पिसाट वारा आला
येऊ द्या रे येऊ द्या रे
अशीही एक कविता होती आणि त्या गाण्यावर आम्ही आमच्या स्काऊट मध्ये नृत्य केलं होतं. बांबूच्या कांबींची नाव बनवली होती आणि जाड पुठ्ठे आणि काठ्या वापरून वल्ह्या बनवल्या होत्या. पण गंमत अशी झाली की रंगीत तालीम करतानाच आमची होडी दुरुस्त करण्यापलीकडे दारुणरित्या मोडली होती आणि आम्हाला मुख्य कार्यक्रमात विनाहोडीचेच नुसत्या वल्ह्या घेऊन नृत्य करावे लागले होते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नीलू, सही! आता भेटलो की मी ती पुस्तके गबागबा वाचून काढीन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनश्री, सगळी पुस्तके स्कॅन
धनश्री, सगळी पुस्तके स्कॅन करणे जरा अवघडच आहे पण चीकूने सांगितलेल्या कविता/पाने जमेल तसे टाकत जाईन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गजा..घरीच ये कसा मग वाच गबागबा
>> गबागबा>> हा काय पेटंट शब्द आहे
बालभारतीची पुस्तके स्कॅन करून
बालभारतीची पुस्तके स्कॅन करून त्यांच्या वेबसाईटवर टाकली आहेत असे समजते....
नववीला शान्ता बाईंची 'पैठणी'
नववीला शान्ता बाईंची 'पैठणी' नावाची सुरेख कविता होती>>>>>>>>. आजीची पैठणी त्यावर सोन्याच्या चौकडा आणि नारळाचे डिझाईन...पेटीत तळाशी ठेवलेली पैठणी अस काहीसं वर्णन होतं ना???
नळ हंस यांचा संवाद यावरही एक
नळ हंस यांचा संवाद यावरही एक कविता होती<<<<
नल राजा एका हंसाला पकडतो व त्याने आपणाला सोडावे म्हणुन तो हंस नल राजाची विनवणी करत असतो.
"म्हातारी उडता नयेचि तिजला माता मदिया असी, कांता काय वदो नवप्रसव ती साता दिसांची जसी" त्यातील हे कडव आम्ही शार्दूलविक्रिडीत वृत्ताच्या उदाहरणात वापरायचो.
बालभारतीच्या साइटला पुस्तके
बालभारतीच्या साइटला पुस्तके विकत मिळू शकतील असे म्हटले आहे.त्यांच्या अर्काइव्ह विभागात.अंतरजालावर काही ठिकाणी स्कॅन केलेली पुस्तक-पाने आहेत.काही सोप्या आणि नेहमीच्या कविता पहायलाही मिळतात. उदा.पैठणी,ऊन हिवाळयातील शिरशिरता,शरदागम वगैरे... माझ्याकडे असणार्या पुस्तकातून काही कविता/धडे जे दुर्मिळ आहेत स्कॅन करून टाकेन.फक्त तो धडा/कविता अंतरजालावर उपलब्ध नसावा.तरच मजा येईल.
विज्ञानदास कृपया लाल चिखल
विज्ञानदास
कृपया लाल चिखल टाका....
विज्ञानदास, धन्यवाद. आज
विज्ञानदास, धन्यवाद.
आज इतक्या वर्षानंतर तुम्च्यामुळेच हा धडा वाचायला मिळाला.
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद विज्ञानदास....
मी खुप दिवसांपासून शोधत होतो धडे.... मी भंगार बाजार, जुनी पुस्तके मिळायचे ठिकाणी सुद्धा जाउन पुस्तके शोधली होती.... पण भेटली नाही....
विज्ञानदास तुम्ही कृपया पूर्ण पुस्तकाची image टाकू शकता का ? नाही तर एक एक धडा तरी टाका....
शालेय जीवन पुन्हा थोडसं जगु....
पुन्हा एकदा मी तुमचा खुप आभारी आहे विज्ञानदास....
विज्ञानदास>>>> खुप खुप
विज्ञानदास>>>> खुप खुप आभार...
काही पुस्तके आहेत.सगळी टाकणे
काही पुस्तके आहेत.सगळी टाकणे अवघडच आहे थोडे...पण जसे म्हणालो दुर्मिळ धडा असेल आणि तो माझ्याकडे असलेल्या पुस्तकात असला तर डेफीनीटली स्कॅन टाकेन त्याचा..
आभारी आहे..
विज्ञानदास तुमच्याकडे
विज्ञानदास तुमच्याकडे "पाड्यावरचा चहा" आहे का ? असल्यास कृपया टाकता का ?
विज्ञानदास तुमच्याकडे
विज्ञानदास तुमच्याकडे "पाड्यावरचा चहा" आहे का ? असल्यास कृपया टाकता का ?
पाड्यावरचा चहा हाही एक मस्त
पाड्यावरचा चहा
हाही एक मस्त धडा होता..वारली आदिवासी चा.खरंच असेल तर टाका स्कॅन कॉपी.
एका छोट्या झाडांची मूळं रुसून
एका छोट्या झाडांची मूळं रुसून बसतात कारण त्यांना त्याच झाडाच्या पानांचा खोडाचा हेवा वाटत असतो. आपणही जमिनीवर असावं असं मूळांन वाटतं. मग एक दिवस माळी चुकून झाडाला केलेलं खळं तसाच ठेवून जातो. मग सूर्य वाढतो आणि मूळांना कळतं की जमिनी च्या आतच असणं चांगल.
हा धडा कोणता? कितवीत होता? मला फार आवडायचा.
सौभाग्य मरण आले आजीचे माझ्या
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले>>>>>>इथे
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले >>> अस आहे
मयुर आभार हि कवित इथे टाकल्यबद्द्ल:स्मित:
पाड्यावर्चा चहा मजकडे नाहीए..
पाड्यावर्चा चहा मजकडे नाहीए.. कदाचित नीलू म्हणून आहेत त्या देऊ शकतील.५ किंवा ६ वीचा धडा होता.मला चित्र आठवतय फक्त...एक चश्मेवाल्या बाई आणि एक पत्रकार ओवरीवर बसलेत...चहा घेत... मिळालाच तर टाकतो...
बाप्रे लाल चिखल अम्च्यवेळी
बाप्रे लाल चिखल अम्च्यवेळी अभयासक्रमातुन काढुन टाकला होता तो धडा!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण पुस्तके न वीन छापुन आलेली नसल्याने जुनेच पुस्तक होते माझ्याकडे.
वाचुन खूप रडले होते!
अंकु- ते कोलंबस्चे गर्वगीत!
किनारा तुला पामराला
Pages