Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांगकाम्या बाळु' चा पण धडा
सांगकाम्या बाळु' चा पण धडा होता..त्यात बाळु स्वत: चे डोक ना वापरता लोक जे सांगतीन ते एकायचा..आणि एकदा तो मांजरीचे पिल्लू केळ्याच्या पानात बांधून आणतो.>>>>>>>>>. आणि दोरीला बांधुन जिलेब्या....
<<<< जिलब्यांचं आठवत नाही पण जी आठवते ती गोष्ट अशी होती- बाळूकडे मामा पैसे देतात. बाळू पैसे घेऊन घरी येताना त्याच्या हातातून वाटेत कुठेतरी पडतात. आई म्हणते, असे नीट खिशात ठेवायचेत ना? पुढच्या वेळी आई दूध आणायला सांगते. बाळू दुधाचा तांब्या खिशात ओततो आणि घरी येतो. आई म्हणते, अरे, तांब्या नीट डोक्यावर ठेवून आणायचा ना? पुढच्या वेळी मामा त्याच्याकडे लोण्याचा गोळा देतात. बाळू लोण्याचा गोळा डोक्यावर ठेवतो आणि घरी येतो. उन्हाने सगळे लोणी वितळून चेहर्यावरून ओघळत असते. आई म्हणते, असे लोणी केळीच्या पानात गुंडाळून आणायचे ना? पुढच्या वेळी मामा एक छानसे कुत्राचे पिल्लू देतात. बाळू कुत्र्याच्या पिल्लाला केळीच्या पानात करकचून बांधून आणतो. ते गुदमरून मरते. आई म्हणते, अरे पिलाला खांद्यावरून आणायचे ना? पुढच्या वेळी गाढव आणायचे असते. तेंव्हा तो गाढवाला खांद्यावरून वाहण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच्या आणि गाढवाच्या मागे गावातली सगळी पोरे गंम्मत बघत पळत राहतात.... एका श्रीमंत घराण्यातली एक छोटी मुलगी गच्चीतून हे मजेशीर दृश्य दाखवण्यासाठी आई-बाबांना हाक मारते. वास्तविक ती मुकी असते आणि डॉक्टरांनी सांगितलेले असते की ती मनापासून खूप हसली तरच बोलू लागेल. बाळूने तिला हसवले आणि ती बोलू लागली. म्हणून तिच्या आईवडिलांनी बाळूला भरपूर द्रव्य आणि एक उमदा घोडा भेट दिला. बाळूला आता सगळे बाळासाहेब म्हणून ओळखू लागतात... हुश्श्य!
हा बी बी वाचताना शाळेत
हा बी बी वाचताना शाळेत बसल्याच फीलीन्ग येतय.
गजा लेका तु मराठीत उच्च शिक्षण घ्यायचा ते चुकुन विन्जिनिरीन्ग मधी घुसलास बघ.
तुला बरच काही आठवतय.
घड्याळाची एक कविता होती.
त्यात रविवारी मुले लवकर उठुन आवरुन शाळेत जात नाहीत म्हणुन चिडलेल्या घडाळ्याचं चित्र होतं.
सुगीचे दिवस दुसरीत होती.
मराठीचा पहिलाच धडा.
गणीताच्या पुस्तकात शि द फडणीस यांची मस्त चित्रे असायची.
गणीताच्या पुस्तकात शि द फडणीस
गणीताच्या पुस्तकात शि द फडणीस यांची मस्त चित्रे असायची. <<< झकास, हो हो. त्या चित्रांमुळे गणिताचे पुस्तक आवडायचे. त्रिकोणी चेहर्याचा दूध घेऊन पळणारा दूधवाला वगैरे.. फडणीसांची होती का ती चित्रं? सही. या निवडीसाठी पाठ्यपुस्तक मंडळाला धन्यवाद.
तिसरीला एक हत्तीचा धडा होता त्यात त्याला पाण्यात डुंबायचे असते पण नदीत पाणीच नसते अशी गोष्ट होती.
<<< नरेश, हो तो धडा आठवला. त्यात नारिंगी रंगाचे हत्ती, डोह वगैरे होते. पाण्याच्या ठणठणाठामुळे "आम्हाला डुंबायला मिळत नाही." अशी तक्रार हत्ती आधी डोहाकडे, तिथून पावसाकडे, असे करत करत शेवटी माणसाकडे येतात. मग माणूस 'आम्ही झाडे तोडणार नाही.' असे वचन देतो. असे काहीतरी होते ना त्या धड्यात? नाव आठवत नाही. **** कहाणी असं काहीतरी होतं.
ता.क.: 'पावसाची कहाणी' होतं का?
` ते रावे हेरावे ' या बालांनो
` ते रावे हेरावे ' या बालांनो मधे होतं होय! धन्स भरत. या बालांनो या रे या -- -- -- सुंदर ती दुसरी दुनिया. एवढच आठवत होतं.
बाळासाहेब म्हणून ओळखू
बाळासाहेब म्हणून ओळखू लागतात>> मस्त
हिरक्णी ची कविता आठवते का ़ओणाला मला हवि आहे
सांगकाम्या बाळु: अगदी अगदी
सांगकाम्या बाळु: अगदी अगदी हीच गोष्ट..करकचून बांधणे याचा वाक्यात उपयोग करायलाही यायचा तेव्हा. आंबेडकरांचा धडा होता का? दलितान्वर झालेल्या अन्यायाचा?
शिवाय एक कविता आठवते 'घननीळ सागराचा घननाद येत कानी , घुमती दिशादिशात लहरीमधील गाणी' , आम्ही ही कविता 'ए दिल मुझे बता दे' च्या चालीवर म्हणायचो..अजूनही पूर्ण कविता पाठ आहे :-)..
अती अवांतर: उगाचच भूगोलाचा टुंड्रा प्रदेश का आठवतोय
भूगोलाचा टुंड्रा प्रदेश का
भूगोलाचा टुंड्रा प्रदेश का आठवतोय <<< आठवतोय.
शिवाय रेनडीयरला बर्फाळ प्रदेशातील कामधेनू म्हणतात, असाही एक प्रश्न कारणे द्याला यायचा ना? आणि इग्लू लोक चरबी आणि मांसाचा साठा नक्की कसा करत असतील याविषयी लईच उत्सुकता होती.
युगांडा पण....
युगांडा पण....
नववीला आधीच्या जीवशास्त्रात
नववीला आधीच्या जीवशास्त्रात मांसाहारी फुल होते. मी त्या इयत्तेत पोचेपर्यंत अभ्यासक्रम बदलला.
४००
४००
शिवाय एक कविता आठवते 'घननीळ
शिवाय एक कविता आठवते 'घननीळ सागराचा घननाद येत कानी , घुमती दिशादिशात लहरीमधील गाणी' , आम्ही ही कविता 'ए दिल मुझे बता दे' च्या चालीवर म्हणायचो..अजूनही पूर्ण कविता पाठ आहे स्मित..>> अगदी
घननीळ सागराचा घननाद येत कानी , घुमती दिशादिशात लहरीमधील गाणी
आकाश तेज भारे माळा वरी दिसावे, भटकी चुकार होडी पाण्यात संथ धावे
वाळुत चालताना रेखाक्रुती किनारा **************
असेच काही तरी होते थो डे आठवले मस्त
आकाश तेज भारे मांडावरी
आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संथ धावे
वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा..जवळी असून पाणी अत्रूप्त तो बिचारा..
टुंड्रा प्रदेश आणि इग्लू
टुंड्रा प्रदेश आणि इग्लू यांचे मला जबरदस्त आकर्षण वाटतं अजूनही मध्ये काही वर्षापूर्वी डिस्कव्हरीवर बघितलं होतं थोडसं.
पृथ्वीचे प्रेमगीत ही कवितापण
पृथ्वीचे प्रेमगीत ही कवितापण आम्हाला होती कुसुमाग्रजांची.
एकंदर वरदा आणि स्वाती यांचा
एकंदर वरदा आणि स्वाती यांचा मराठीचा अभ्यासक्रम माझ्या अभ्यासक्रमासारखाच होता इतकं नक्की
त्या दोघींनी टाकलेल्या सगळ्या कविता मला होत्या (आणि त्या वाचल्यावर मला आठवल्या :फिदी:)
गजान न, जबरदस्त मेमरी आहे!
गजान न, जबरदस्त मेमरी आहे!
तुम चा सर्व अभ्यासक्रम आम्हाला होता....
झाडाची माया, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, पहिला धडा हे सर्व नावं वाचल्यावर अंधुक-अंधुक आठवायला लागलय...फार मस्त वाटतय... जुने बालभारती आता कुठे मिळतील का?
जुने बालभारती आता कुठे मिळतील
जुने बालभारती आता कुठे मिळतील का? > +१
़जी.ए.कुलकर्णींची एक कथा
़जी.ए.कुलकर्णींची एक कथा आठवतेय....दहावीत होती मला वाटतं....अश्वत्थाम्यावर होती....रक्ताचे पिंपळपान असं नाव होतं बहुतेक....
बाबल्या चितेतुन पळाला हा धडा
बाबल्या चितेतुन पळाला हा धडा आम्हाला बारावीला होता. वाचताना आणी शिकताना बेन्च वरुन खाली पडायची वेळ आली होती.
एक डॉयलॉग जबरी होता, तो कायम आठवतो. "अर, आयुक्ष मन्जी आळवावर्च पाणी, कवा काय होईल त्याचा काय भरोसा?"
"कोन र ह्यो तिरपागड्या डोक्याचा? ह्या वक्ताला पानी मागुन र्हायलाय?"
ह्या फेस बुकावर आहे बहुतेक तो धडा, पण मी फेसबुक पन्खा/ मेम्बर नसल्याने मला बघता येत नाही. कुणी आहे का फेसबुक मेम्बर इथे?
https://www.facebook.com/pages/bablya-chitetun-palala/196913397040349
Radhika_P वळीव" नावाचा एक धडा
Radhika_P
वळीव" नावाचा एक धडा होता....(लेखक ?..इयत्ता...८ वी ?)
त्यात उन्हळ्या अचानक पाउस सुरु होतो ... तो वळीवाचा तत्त्पुरता पण तुफानी पाऊस... म्हातारी इकडे गावातल्या घरात आहे....
वळीव : लेखक : शंकर पाटील
खूपच सुंदर धडा होता तो. ग्रामीण भाषेतील न एकलेले शब्द होते त्यात. म्हाताºयाला म्हातारीची वाटणारी काळजी त्यातून त्यांचे एकमेकांशी असणारे प्रेम यातून लक्षात येते. या धड्यातील अजूनही काही संवाद माझ्या लक्षात आहेत. ‘पायाळू माणसाला इजेचे भय असते...’, 'लिंब इजंला धार्जिणा असतो' . या धड्यात आलेले अनेक ग्रामीण शब्द खूप वेळा वाचल्यानंतर त्यांचा अर्थ समजायचा. यानंतर शंकर पाटील यांनी लिहिलेली पुस्तके वाचण्यात आली. ‘धिंड’, शिरगणती, टारफुला तसेच त्यांची कथाकथन सुंदरच.
मराठीतील अजून एक धडा आवडायचा :
‘बचेंगे तो और भी लढेंगे’ : दत्ताजी शिंदे व नजीबखान यांच्या झालेल्या लढाईचे वर्णन. धड्यातील ऐतिहासिक शब्द त्यामुळे एक वेगळीच भाषा वाचत आहोत का? असे वाटायचे. नजीबखानने धारातीर्थ पडलेल्या दत्ताजीला उद्देशून काढलेले ‘क्यँु पाटील और भी लढेंगे’ हे उद्गार व त्यावर दत्ताजीचे ‘क्यू नही...बचेंगे तो और भी लढेंगे...’ हे वीराचे वाक्य मनात कायचे कोरले गेले.
वळीव : लेखक : शंकर पाटील खूपच
वळीव : लेखक : शंकर पाटील
खूपच सुंदर धडा होता तो. ग्रामीण भाषेतील न एकलेले शब्द होते त्यात. म्हाताºयाला म्हातारीची वाटणारी काळजी त्यातून त्यांचे एकमेकांशी असणारे प्रेम यातून लक्षात येते. या धड्यातील अजूनही काही संवाद माझ्या लक्षात आहेत. ‘पायाळू माणसाला इजेचे भय असते...’, 'लिंब इजंला धार्जिणा असतो' . या धड्यात आलेले अनेक ग्रामीण शब्द खूप वेळा वाचल्यानंतर त्यांचा अर्थ समजायचा. यानंतर शंकर पाटील यांनी लिहिलेली पुस्तके वाचण्यात आली. ‘धिंड’, शिरगणती, टारफुला तसेच त्यांची कथाकथन सुंदरच.
मराठीतील अजून एक धडा आवडायचा :
‘बचेंगे तो और भी लढेंगे’ : दत्ताजी शिंदे व नजीबखान यांच्या झालेल्या लढाईचे वर्णन. धड्यातील ऐतिहासिक शब्द त्यामुळे एक वेगळीच भाषा वाचत आहोत का? असे वाटायचे. नजीबखानने धारातीर्थ पडलेल्या दत्ताजीला उद्देशून काढलेले ‘क्यँु पाटील और भी लढेंगे’ हे उद्गार व त्यावर दत्ताजीचे ‘क्यू नही...बचेंगे तो और भी लढेंगे...’ हे वीराचे वाक्य मनात कायचे कोरले गेले.
सुगीचे दिवस दुसरीत
सुगीचे दिवस दुसरीत होती.
मराठीचा पहिलाच धडा.
>>>>> दिवस सुगीचे सुरू जाहले ओला चारा बैल माजले हीच का?
>> नववीला आधीच्या
>> नववीला आधीच्या जीवशास्त्रात मांसाहारी फुल होते. मी त्या इयत्तेत पोचेपर्यंत अभ्यासक्रम बदलला
घटपर्णी ना?
हो, वळीव आम्हालाही होता.
मलाही बर्याच कविता आणि धडे
मलाही बर्याच कविता आणि धडे आठवले वरचं सगळं वाचल्यावर..
बरीचशी नावं वर येऊन गेली आहेत पण मला आठवणार्या कवितांचा उल्लेखः
पाणपोई (९वी ला होती)
येई भाई.. येथ पाही.. घतली ही पाणपोई..
धर्मजाती कोणती ती.. भेद ऐसा येथ नाही..
(ह्या एक भारदस्त नाट्यसंगिताची चाल लावली होती माझी मीच.. म्हणून आठवतेय..)
हे डाळिंबाचे दाणे वेड्या.. घात तुझा करीती..
कवटी तू कवठावरली.. फोडलीस एका काळी..
ती चोच आज बोथटली..
करीतोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यावरती..
हे डाळिंबाचे दाणे वेड्या..
पडता वानरांचे अनुमोदन.. स्वये पुसे रघुनंदन..
त्या वेळी मी एका टारगट मुलाची वापरलेली पुस्तके वापरायचे. त्याने या कवितेत "पडता" आणि "पुसे" यांचे सरळ सरळ अर्थ घेऊन शिवाय गुढघ्यावर बसलेल्या हनुमानाच्या खाली काहीतरी पडतंय आणि रामाने त्याचा शेला पुढे केलाय असं चित्र तिथे काढलं होतं.
अजुन एक म्हणजे ११वीला 'अंगण' असा एक धडा होता जो खुप बोरींग होता. आमच्या एका मित्राने ग्रुपमध्ये 'अंगण' या शब्दाऐवजी 'ढुं%ण' हा शब्द घालुन संपूर्ण धडा वाचुन दाखवला होता. तेव्हापासुन त्या धड्याचे वाक्य-न-वाक्य पाठ आहे.
इंग्रजीच्या पुस्तकात एक सी-लॉयन एका पार्टीत शिरतो असा एक धडा होता; इतर इयत्तांमध्ये कधीतरी बांबी (इथे हरणाचं चित्र फारच गोड होतं), रॉबीनहूड, डेट अ डेट (खजुराविषयी), इम्मॉर्टल आईज (नेत्रदानावर - ९वी ला) असं काहीबाही आठवतंय.
पाचवी इंग्रजीला वन.. टू.. थ्री.. फोर.. फाईव्ह..
वन्स आय कॉट अ फिश अलाईव्ह अशी कविता आठवतेय.
आणि वन फॉर अ पेनी अशी एका कवितेची ओळ पण.
उध्वस्त धर्मशाळा पण आठवतेय.
'कोलंबसचे गर्वगीत' आणि 'आम्ही कोण' या विशेष आवडीच्या.
कधीतरी पु.लंच्या 'रेडिओवरील भाषणे व श्रुतिका' मधील काही भाग होता. तो आमच्या बाईंनी फार बकवास शिकवला होता.
संस्कृतमध्ये "जम्बुफलानि पक्वानि.. पतन्ते विमले जलम.. तस्य मत्स्यम न खाद्यंते.. जलमध्ये डुबुक डुबुक" आणि "साहित्यसंगितकलाविहिनः साक्षातपशू: पुच्छविशाणहिनः.. तृणं न खादनपि जिवमानः.. तद भागधेयं परमं पशूनाम" हे आठवतंय. देव-वन-माला आणि अस्मद- युष्मद अजुनही तोंडपाठ आहेत.
मराठीत विभक्ती प्रत्यय आणि गण (कारीकेसकट) तोंडपाठ आहेत.
'कशाले काय म्हणु नही' हि कविता आठवतेय.
मस्त नॉस्टॅलजिक वाटतंय..
इ. १० वी च्या जुन्या संस्कृत
इ. १० वी च्या जुन्या संस्कृत पाठ्यपुस्तकात 'स्थालपिष्टाष्टकम ' अशी सुभाषितमाला होती ती कुणाला आठवतेय का?
"समस्तानि धान्यानि मान्यानि लोके वयं नास्महे किं मुदैवैकशूर्पे ?"अशी सुरुवात होती. थालिपीठाच्या पिठातली आम्ही सगळी वेगवेगळी धान्ये असूनही आनंदाने एकत्र येऊन अनेक कष्ट ( कष्ट- धान्य भाजून दळले जाते हे त्याचे कष्ट) झेलल्यावरच स्वादिष्ट थालिपीठ नशीबी येते. तसंच आपल्या देशातील विविध प्रकारचे लोक एकत्र आले आणि झटले तरंच देशाची उन्नती होईल असा असा भावार्थ असलेली फार सुंदर सुभाषितमाला होती ती.
रिया.....रियुटले....माझ्याकडु
रिया.....रियुटले....माझ्याकडुन प्रचंड मोदक, चॉकलेट्स काय हव ते.... आपण समकालीन.....
माझ्या आईला 'निळा पक्षी' ही
माझ्या आईला 'निळा पक्षी' ही कविता होती, कोणाला पूर्ण येते का ? कॉपीराईट मुळे लिहिता नाही येणार माहीत्ये, सुरूवात लिहिली तरी कदाचित आठवेल आईला
त्या घननीळ सागराचा उल्लेख मी
त्या घननीळ सागराचा उल्लेख मी आधी केला होता
अनू
कधी येऊ मोदक खायला?
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक,
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक, यात या गोश्टीची मोठ्या लोकांनी चिरफाड केलेली असते. १०ला होती बहुतेक. बालकवींची पारवा कविता पण छान होती.
क्रिया, हो आठवला तो धडा.
क्रिया, हो आठवला तो धडा. 'म्हातारी आणि भोपळा या गोष्टीवरील चर्चासत्र' असे काहीतरी लांबलचक नाव होते त्याचे. बालकथांमधील घटनांचे बालमनावर कसले परिणाम/संस्कार होत असतील यावर गंभीर चर्चासत्र झाडणार्या त्या विद्वानांची चांगली खिल्ली उडवली होती.
आम्हाला ११/१२ वीला होता हा धडा.
Pages