Submitted by RJ28 on 12 June, 2014 - 12:28
साद देती सह्यशिखरे
या मातीशी अमुचे नाते
दर्या कड्यांची ओढ सांगे
निसर्गा संगतीच आम्हा
स्वर्ग-सुखाची चाहूल लागे
हरपून भूक तहान
विसरुन देहभान
गाठणे गडमाथा
हाच अमुचा सन्मान
केवळ भटकणे अन् फिरणे
जरी असे हाच छंद
धडपडूनही न थांबणे
यातच अमुचा आनंद
सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची
करितो मनी साठवण
तरिही क्षुधा शांत न होई
फिरूनी येई आठवण
महाराष्ट्राचा इतिहास सांगत
सह्याद्री असे उभा खडा
त्याला भेटून येताना मात्र
ओलाविती अमुच्या नेत्र कडा
शिवछत्रपती दैवत अमुचे
आम्हीच त्यांचे मावळे खरे
शिव-शंभूचे पराक्रम सांगत
साद देती सह्यशिखरे
-सौ. अर्जिता आदित्य गोखले
मायबोलीवर ( किंबहुना लिखाण करण्याचाच) लिखाण करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.
तेव्हा अनुभवींच्या काही सुचना असल्यास वेलकम.
चू.भू. द्या.घ्या.
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! सगळ्या ट्रेकर्सना जवळची
मस्त!
सगळ्या ट्रेकर्सना जवळची वाटेल ही
पुलेशु
लिहित रहा
थँक्यू. रिया आता मी आम्ही
थँक्यू. रिया

आता मी आम्ही केलेल्या ट्रेक्स चं वर्णन लिहायला सुरुवात करणार आहे.
कवितेनी श्रीगणेशा केलाय.
अर्जिता, लेखाची वाट बघतोय !
अर्जिता, लेखाची वाट बघतोय !
(No subject)
मस्त!!!
मस्त!!!
@ हर्षा, मी_केदार, दिनेश, खूप
@ हर्षा, मी_केदार, दिनेश,
खूप खूप आभार.
लेख लवकरच लिहिणार आहे.
मस्तच.. भटकंती वॄतांत येऊ
मस्तच..

भटकंती वॄतांत येऊ द्या लवकर
छान आहे कविता आणि येऊ द्या
छान आहे कविता आणि येऊ द्या वृत्तांत लवकर .
कर्नाटकमधल्या सह्याद्री भ्रमंतीवर (ट्रेकिंग)कोणी लिहिले आहे का ?केमेनागुडी ,कुमारपर्वता ,माडिकेरी(कूर्ग) ,कुद्रेमुख ,श्रिंगेरी परीसर इत्यादी .
मस्त लिहिलंय भटकंती वॄतांत
मस्त लिहिलंय
भटकंती वॄतांत येऊ द्या लवकर>>>>+१
छान
छान
१ नम्बर
१ नम्बर
छान !
छान !
सगळ्यांना अनेक आभार्स
सगळ्यांना अनेक आभार्स
अरे वा, मस्त की
अरे वा, मस्त की