मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूतान याच देशाचा दौरा का बरं ?

याचंही कौतुक व्हायला पाहीजे होतं. दूरदृष्टी, चीनवर दबाव ठेवण्याचं कौशल्य, विदेशनीतीचा मास्टरस्ट्रोक इत्यादी.
आपल्याला काय, भूतानला फिरायला गेलो तर तिथं उभ्या राहू पाहणा-या अडाणी उद्योगसमूहाच्या वीजप्रकल्पात गेस्ट हाऊस मिळू शकेल.

इब्लिस | 11 June, 2014 - 10:55

बेफिकीर, या माणसाचे काय करावे हे आपण सांगावे. माझी खोडी काढली तरच मी उत्तरे देईन असे आपल्याला आश्वासन दिले होते. तेव्हा आता उत्तर देऊ का याला समजेल अशा भाषेत?

मौनीबाबा, पप्पू, राजमाता हे (त्यातल्या त्यात इथं लिहीता येईल असं. फेसबुक वरचं तर नकोच) दहा वर्षे अमृततुल्य होतं का ?

विचारवंत | 11 June, 2014 - 01:30 नवीन

इब्लिस | 11 June, 2014 - 10:55

बेफिकीर, या माणसाचे काय करावे हे आपण सांगावे. माझी खोडी काढली तरच मी उत्तरे देईन असे आपल्याला आश्वासन दिले होते. तेव्हा आता उत्तर देऊ का याला समजेल अशा भाषेत?

चिनूक्स | 11 June, 2014 - 01:31 नवीन

तुम्ही सगळं हे लेखनस्पर्धेतही लिहाल का कृपया? म्हणजे लिहाच.

>>> या दोन पोस्टी लागोपाठ आल्याने काहीच समजेना.

<<तुम्ही सगळं हे लेखनस्पर्धेतही लिहाल का कृपया? म्हणजे लिहाच. >> Lol

विज्ञानदास, धन्यवाद. कृपया पाठपुरावा करा ह्या प्रकरणाचा.
आणखी ही कोणी, ज्यांना ह्या क्षेत्रातलं कळतं त्यांनी दिवसाकाठी थोडा वेळ ह्यासाठी द्यावा, ही विनंती.

बेफी, तिकडे सगळी सिरीयल संपल्यावर विचारतात पिंट्या कोण तसे इथे इतके दिवस झाल्यावर विचारतायत
जागता पहारा ठेवणारे तुम्ही कोण?

या धाग्याचे नाव बदलून

मोदी सरकारवर गरळ ओका

असे करा आता

>>
असे केल्यास तुम्हाला इथे कसे येता येईल खेळाडू म्हणून? तुम्हाला प्रेक्ष ग्यालरीत बसावे लागेल::फिदी:

<< दुसर्‍या CPCB च्या चार्ट्(७)मधले आकडे हे त्याच pdf नुसार आहेत असाही कुठे उल्लेख समोर येत नाही.साल २०१२ आणि १३ चे रिपोर्ट जरी CPCB वर उपलब्ध नसतील तरी इतर संस्था व प्रायव्हेट रिसर्च मधून जी माहीती हातात येते त्यातून साबरमती नदी भयानक प्रदूषित अजूनही आहे आणि होते आहे असे दिसते.BOD चे आकडे तिथे जास्तच आहेत. ३.५ किंवा ४.० असे आकडे आणि २०१३ चे रिपोर्ट्मधले आकडे यात जवळपास २०० ते ३०० युनिट्स चा फरक दिसतो आहे.म्हणजेच, CPCB चे रिपोर्ट एकतर चूकीचे आहेत किंवा जाणून-बुजून फेरफार केलेले दिसताहेत>>

विज्ञानदास,
अजून एक म्हणजे, त्या Increasing-decreasing trend वाल्या रंगीबेरंगी तक्त्यामध्ये साबरमतीचं नाव का नाहीये? मी ३-४ दा शोधलं तरी दिसलं नाही.
(गुप्तहेर मोड ऑन)

साती, 'तुम्ही' कोण नव्हे, 'आपण' कोण! Happy

चिनूक्स - स्पर्धेत लिहिल्यानंतर 'कसा नामोहरम केला दुसर्‍याला' हे समाधान मिळणार आहे का? तसेच, त्या लेखांखाली असे वाद झालेले चालणार आहे का? तसेही, तेथे लिहा हे तेथेच सांगणे (माझ्यामते) पुरेसे आहे, ते येथे सुचवण्यात काय हशील आहे? तुमचा प्रतिसाद(सुद्धा) ह्या धाग्यापुरता अवांतरच ठरला आहे.:-)

साबरमती नदी भयानक प्रदूषित अजूनही आहे आणि होते आहे असे दिसते.BOD चे आकडे तिथे जास्तच आहेत.

लोक्स,
पुण्यातली मुठा नदी आणि मुंबईची मीठा यांचा पण अभ्यास वाचा जरा, अत्यंत दयनिय परिस्थिती आहे. नद्याच्या प्रदूषणाला जेवढे सरकार जबाबदार तेवढेच तिथले नागरिकही असतात.

<<पुण्यातली मुठा नदी आणि मुंबईची मीठा यांचा पण अभ्यास वाचा जरा, अत्यंत दयनिय परिस्थिती आहे. >>

हो,पण पुण्यातले नेते "मित्रों, मेरी साबरमती इतनी स्वच्छ है, इतनी सुंदर है...मैं मां गंगा को भी इतनीही सुंदर बनाके दिखाऊंगा" असं म्हणताना दिसले नाहीत कुठे.
आणि दिसले तर त्यांचं पण पितळ उघडं केलं पाहिजे.
आणि दुसरा भुरटी चोरी करतो म्हणून आम्ही दरोडा घातला तरी चालेल ह्या लॉजिकला काय अर्थ आहे?

किरणकुमार ये हुई न बात. भरपूर अनुमोदन.

येकदम बरुबर बघा. २००५ चा प्रलय मिठीला मिठी मारल्यानेच झाला होता. महाराष्ट्रात कुणाचे सरकार होते तेव्हा? मिठीत जो प्रचन्ड कचरा सापडला, त्यातच दिसले सर्व काही.

नुसतेच प्रशासन नव्हे तर बेजबाबदार नागरीक पण त्याला जबाबदार असतात.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/hrd-ministe...

यापैकी आवडलेला मुद्दा अर्थात एक पूर्ण दिवस खेळासाठी (अन्यथा त्या शारिरीक शिक्षण विषयाची अवस्था अत्यंत दयनीय असते)

मिडडे मीलमध्ये ताक देण्याचा विचार चांगला आहे, पण ते ताक मुलांपर्यंत सुस्थितीमध्ये पोहोचू दे! अन्यथा एका पेला पाण्यात चमचाभर ताक घालून पोरांना दिलं जायचं!!

मिड डे मीलमध्ये ताक देण्याचा विचार असेल तर अत्यंत धोक्याचा आहे तो.
यापूर्वी शाळांतून दूध देण्याचे प्रयोग झालेले आहेत. असंख्य विषबाधेच्या केसेस त्यातून निर्माण झाल्या होत्या त्यामुळे सध्या सर्व आहार ड्राय दिला जातो व शाळेत तो खाण्यापूर्वी एखादा तास शिजवला जातो. मुळात दुग्धजन्य पदार्थ इन्फेकशनला अत्यन्त व्हल्नेरेबल असतात. पूर्वी शाळातून दूध दिले जाई तेव्हा ते डेअरीमधून पुरवले जायचे त्यात फॅट लागावे म्हणून शेतकरी युरिया व इतर रासायनिक द्रव्ये मिसलत असत / अजूनही मिसळतात. मध्यन्तरी पूर्न दूध रसायने मिसलून बनवण्याचे रॅकेट पकडले होते. तेव्हा बर्‍याच सहकारी डेअर्‍यांचे कलेशन एक्दम रोडावले होते.
शिवाय घरच्या गृहिणीकडूनही विसरभोळेपणाने दुधे नासतात. शाळेत तर तो सार्वजनिक कारभार ....

सध्या मीड डे मधला मेन्यु डायट एक्सपर्टनी बनवलेला असून त्यात सर्व पोषक घटक मिळतील अशी त्याची रचना आहे. त्यामुळे दुधाचे पदार्थ आणून त्यात अनर्थ ओढवून घेऊ नये असे माझे मत्त हाये.

मिर्चीताई,
गुप्तहेर मोड ऑन(हे भारिये Happy ) न करता सांगतो,तिकडे खाली नाव आहे नदीचं. डेटा मध्ये,साबरमती नदीचा ग्राफ वगैरे.तक्त्याच्या बहेर आहे ते त्यामुळेच.

किरण्,चूक साबरमतीच्या डेटाबद्दल चाललीये म्हणून तिची चर्चा करायची.म्हणायला आणि बघायला गेलं तर भारतातल्या सगळ्या नद्यांना प्रदूषण आहे.कुठली नदी सांगू... जानेवारीत पंचगंगा बघायला या.कित्येक किलोमिटर इक्कॉर्निया पसरलेला असतो.असं वाटतं हिरवा-जर्द रस्ताच आहे.पण पाण्याखाली हाल चालू असतात.पुण्यात मुळा-मुठा या वर्षातून एकदाच वाहतात्,पावसाळ्यात...वर्षभर मात्र पाणी सोडून सगळं त्यातून वाहतं.पुण्याचं खडकवासल्यवर चालून जातं.पण ज्या नद्यात बारमाही पाणी असतं त्यांचं काय्? धरणातून सोडतात पाणी त्याचं काय?त्यांच्यात प्रचंड घाण मिसळते,आणि तेच पाणी आम्ही वापरत असतो... प्रश्न सगळ्यांच नद्यांचा आहे. विशेषत: ज्यावर वीज-निर्मिती केंद्रं आहेत अशा नद्यांचा... कारण पाणी सतत सोडलेलं असतं त्यातून.

किरणराव,आणि नद्यांच्य प्रदूषणाला नगरीक जबाबदार असले असे कसे.दररोज मिसळलं जाणरं सांडपाणी त्याचं नियोजन कसं करायचं,अगदी घरात सूध्दा..समजा की त्यांना हे माहितीच नाहिये . तेवढा वेळ नसतोही आजकाल..त्याला ते साठवून ठेवू शकत नाहीत... किंवा जमिनीत मुरवूही शकत नाहीत.जिथं शहराचं सांडपाणी नदीत मिसळतं तिथे कॉर्पोरेशनचे सांडपाणी प्रक्रिया युनिट असणे आवश्यक बाब आहे.पण त्याचा खर्च,देखभाल जास्त म्हणून म.न.पा. लक्ष्य घालत नाही.म.न.पा ऐकत नाही म्हणून लोकं कंटाळून सोडून देतात तो नाद आणि तिच परंपरा(!) बनते

सिंग यांचे सैन्यापासूनचे एकूनच वर्तन पाहता ते 'हिशेब ' चुकता करण्याचेच काम करतील असे दिसते. मुळातच कोणत्याही नोकरशाहीतून राजकारणात शिरलेल्या नोकरशहांच्या कामावर असतानाच्या शेवटी शेवटी तरी निष्ठा पक्षपाती नसतील काय. ? सरकार पक्षाचे असले तरी प्रशासन सर्वांचे नसते काय ?

रॉबीनहूड | 11 June, 2014 - 13:49

>> ह्या पोस्टला अनुमोदन. दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याची भिती वाटते. Sad

दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याची भिती वाटते. >>
पुर्वी शाळेमध्ये १ ते ४ च्या विद्यार्थ्यांसाठी दुध मिळायचे (बहुतेक रंगीत आणि गोड होते ते) तेंव्हाही एक-दोन वेळेस विषबाधा झाल्याचे आठवतय. (कोणीही दगावलं नव्हतं पण उलट्यांचा त्रास झाला होता)

विज्ञानदास,
मी ह्या तक्त्याबद्दल बोलतेय. ह्यात निळ्या रंगाने दाखवलेल्या नद्या म्हणजे decreasing trend आणि केशरी रंगाने दाखवलेल्या नद्या म्हणजे increasing trend ना. पण ह्यात साबरमती नाही दिसली.

pollution trend.png

हे पाहिलं पण हाच ग्राफ ऑड मॅन आउट वाटतोय. बाकीच्या माहितीशी जुळत नाहीये.
trend in Sabarmati.png

शिवाय Economic Times मध्ये उल्लेख केलेले आकडे CPCB च्या नेमक्या कुठल्या रिपोर्ट्मधून घेतले आहेत हे कळत नाहीये.
http://economictimes.indiatimes.com/slideshows/nation-world/real-picture...

"Back in 2010, the river was branded as the third most polluted in the country by the Central Pollution Control Board (CPCB), with the highest volumes of F.Coli in the country. F.Coli in these stretches was found to be 2.8 million MPN (most probable number) in every 100 ml of the river."

रॉबिनहूड, ताकाला अनुमोदन.

साबरमती की सफाई का सच
http://www.janjwar.com/2011-05-27-09-00-20/25-politics/4953-sabarmati-ke...

मोदी व भाजपा फक्त खोटे बोलून सत्तेवर आले आहेत.काँग्रेसचे लोक नव्या बाटलीत जुनी दारू भरुन विकतात .भाजप यांच्यापेक्षा दहा पट धुर्त आहे ,बाटलीही जुनी ,दारुही जुनीच, फक्त टोपण बदलायचं व लोकांना फसवायचं. सध्या देशात आलेलं वीज संकट याचेच द्योतक आहे .बिगरभाजप राज्यांना कोळसा मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहे. युपीतले अनेक प्रकल्प कोळश्याअभावी बंद आहेत. भाजपकडे सत्ता असुनही राज्यांना कोळसा देत नाहीत...

येस्स...तो तक्ता..त्यात नाहीये साबरमतीचं नाव,कालपण शोधलं चारवेळा...का? माहीत नाही.कदाचीत खाली ग्राफ दिला आहे म्हणून नसावं नाव त्यात.. तो खालचा 'ऑड' कसला ग्राफ..ऑड बनवलाय त्याला आकडे बदलून... CPCB चे बरेच रिपोर्ट अपडेटेड वाटले नाहीत. ३-४ असे BOD कुठल्याही नदीचे असत नाहीत.(अर्थात शहरामधून जाणार्‍या) ही व्हॅल्यू एवेढी खाली आहे की बिसलरीचा |BOD सुध्दा त्यापेक्षा जास्त असू शकेल.. Light 1 Lol

CPCB चे रेपोर्ट बघण्याऐवजी खासजी संशोधन संस्था किंवा इतर संस्थांचे रेपोर्ट पहायला हवेत.एखाद्या अशा संस्थेशी पत्रव्यवहार केल्यासच उत्तरे मिळतील. बाकी पेपरवालेपण न बघताच छापतात.

2.8 million MPN म्हणजे तसे पाणी अगदी शुध्द करुन पिले तरी मेलेल्या F.Coli चा ज्युस पिल्यसारखेच आहे. Proud
काहीतरी अ‍ॅक्शन घ्यायला हवी चूकीच्या रोपोर्ट्वर.

Pages

Back to top