फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....
आता मेसेज होतात कमी नी फोनच जास्त
तरीही बिल आता आटोक्यात असतं
थँक्स, सॉरी चा रतिब लावलाय
पण शिव्या घालायला कोणीही नसतं
दिवसभर चहाचे लाखो कप रिचतात
एका कंटीगसाठी भांडणार्यांना फिदीफिदी हसतात
गाडीतलं पेट्रोलही टाकीभर वाहतय
वीकेंड असेच रूममध्ये पडल्या पडल्या संपतात
मॉलमधे आवडेल ती गोष्ट माझी होतेय
तुळशीबागेतली बार्गेनिंग मलाच वेडावतेय
वस्तू माझी, इच्छा माझी कोणाचाही कल्ला नसतो
कोणास ठाऊक चॉईस तरीही अनोळखी का वाटतेय
लंचमध्ये डब्बा आता शेरिंगविनाच संपतो
नाक्यावरला वडापाव कधी कधी खुणवतो
एका वडापावची ऑर्डर मोठ्या तोर्यात देते
पण मिर्चीविनाच घास आता जीवाला झोंबतो
आता पाऊस येतो तो अडोश्या आडूनच
मीही त्याला पहाते मग जराशी दुरुनच
त्याने सुद्धा ओळख दाखवायचं सोडलय
दिवस असेच वाहतात आठवणी भरुनच
सगळं काही ठिक आहे एकदा कळवावं म्हणलं
येते का माझी सय एकदा पहावं म्हणलं
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने
फक्त श्वासाशिवाय हृदय आता चालवावं म्हणलं.
-प्रियांका उज्ज्वला विकास फडणीस
(माझ्या लाडक्या कॉलेज फ्रेण्ड्संना समर्पित)
मस्तच गं रिया !
मस्तच गं रिया !
आवडली खूप!
आवडली खूप!
.
.
Avadalee! Mast jamaleeye!
Avadalee! Mast jamaleeye!
आजपर्यन्त तुझी सर्वात जास्त
आजपर्यन्त तुझी सर्वात जास्त आवडलेली रचना
धन्यवाद रिया
छान लिहिलस हो रीया
छान लिहिलस हो रीया पहिल्यांदाच कविता वाचून बर वाटल बाई.
एकदम खूप आठवणी जाग्या
एकदम खूप आठवणी जाग्या केल्यास......... आधीच सांगितलय तुला ही कविता खूप आवडली.....
एकेक कडवे म्हणजे जुनी चित्रेच डोळ्यासमोर उभी राहत आहेत.......
आवडलीच!
आवडलीच!
चांगली आहे .... . तु अजून
चांगली आहे ....
.
तु अजून ही उभी आहेस
त्याच आठवनींच्या वळणावर
्हातात बॅग घेऊन
बस ची वाट पाहत....
चल पुढे चाल आता
गेली ती बस निघून..
आयुष्याच्या वाटेवर
प्रत्येकाला चालावे लागते...
मस्त आहे ! आवडली .
मस्त आहे ! आवडली .
छानच आहे कविता... भावली
छानच आहे कविता... भावली एकदम....!!
मस्तच! खुप आवडली. कविता
मस्तच! खुप आवडली. कविता शक्यतो कधी वाचत नाही पण एवढे प्रतिसाद बघीतले आणि उत्सुकता वाटली, बघुया तरी काय आहे म्हनुण आलो आणि आवडली.
सर्व नविन प्रतिसादांबद्दल खुप
सर्व नविन प्रतिसादांबद्दल खुप खुप आभार


वैवकु
उदय ते जे लिहिलयेस ते तु लिहिलयेस का? मस्त आहे
आठवणीचे कप्पे परत
आठवणीचे कप्पे परत उघडले...>>>
खरय हे
मस्तच!
रिया - असे कुणाला रडवू
रिया - असे कुणाला रडवू नये.
उदयन् - सुरेखच आहे कविता.
छान आहे कविता फेसबुकामुळे
छान आहे कविता
फेसबुकामुळे बरेचसे कॉलेज फ्रेंड्स परत भेटतायत... मज्जा येत्येय
खरच सुंदर मस्तच
खरच सुंदर
मस्तच
Thanks
Thanks
पुन्हा वाचली. पुन्हा
पुन्हा वाचली. पुन्हा आवडली.
आताशी लिहत का नाहीस गं??
स्मिते तुझं लक्षच नाही बघ
स्मिते तुझं लक्षच नाही बघ आजकाल माझ्याकडे
http://www.maayboli.com/node/49126
बाकी आजकाल लिहिते पण इथे नाही टाकत ऑर कुठेच नाही टाकत
@ रिया - मला टायटल बघुन वाटले
@ रिया - मला टायटल बघुन वाटले की तू "मिष्टी" च्या माबो सोडुन जाण्यावर लगेच एक कवित पाडली आहेस.
कविता चांगली आहे.
अरे लै जुनी कविता आहे ही. आज
अरे

लै जुनी कविता आहे ही. आज वर आलीये
हृदयस्पर्शी लेखन
हृदयस्पर्शी लेखन
(No subject)
मी काही विनोदी बोललो का
मी काही विनोदी बोललो का रियाजी?
आवडली !
आवडली !
खूप छान रिया मी सुद्धा माज्या
खूप छान रिया मी सुद्धा माज्या college friends la अशीच मिस करतेय
धन्यवाद , आठवणीना उजाळा
फार काही बदलल नाहिये तुमच्या
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....
डोळे मात्र अलगद भरुन जातात पाण्याने..........
मस्त..
ज्यांच्या नसण्याने दुःख होईल
ज्यांच्या नसण्याने दुःख होईल असे मित्र मैत्रिणीच नव्हते कधी याचं वाईट वाटून घ्यावं का आनंद? असं वाटतंय हि कविता वाचून.
आवडली.
आवडली.
Pages