फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....
आता मेसेज होतात कमी नी फोनच जास्त
तरीही बिल आता आटोक्यात असतं
थँक्स, सॉरी चा रतिब लावलाय
पण शिव्या घालायला कोणीही नसतं
दिवसभर चहाचे लाखो कप रिचतात
एका कंटीगसाठी भांडणार्यांना फिदीफिदी हसतात
गाडीतलं पेट्रोलही टाकीभर वाहतय
वीकेंड असेच रूममध्ये पडल्या पडल्या संपतात
मॉलमधे आवडेल ती गोष्ट माझी होतेय
तुळशीबागेतली बार्गेनिंग मलाच वेडावतेय
वस्तू माझी, इच्छा माझी कोणाचाही कल्ला नसतो
कोणास ठाऊक चॉईस तरीही अनोळखी का वाटतेय
लंचमध्ये डब्बा आता शेरिंगविनाच संपतो
नाक्यावरला वडापाव कधी कधी खुणवतो
एका वडापावची ऑर्डर मोठ्या तोर्यात देते
पण मिर्चीविनाच घास आता जीवाला झोंबतो
आता पाऊस येतो तो अडोश्या आडूनच
मीही त्याला पहाते मग जराशी दुरुनच
त्याने सुद्धा ओळख दाखवायचं सोडलय
दिवस असेच वाहतात आठवणी भरुनच
सगळं काही ठिक आहे एकदा कळवावं म्हणलं
येते का माझी सय एकदा पहावं म्हणलं
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने
फक्त श्वासाशिवाय हृदय आता चालवावं म्हणलं.
-प्रियांका उज्ज्वला विकास फडणीस
(माझ्या लाडक्या कॉलेज फ्रेण्ड्संना समर्पित)
मस्त.. माझ्याही मित्र -
मस्त.. माझ्याही मित्र - मैत्रिणींना एकवावीशी वाटतेय.. सहीच्च..
छानच.........
छानच.........
प्री यु रॉक्स आवडली
प्री यु रॉक्स
आवडली 
नॉस्टॅल्जिक करणारं लेखन! पण,
नॉस्टॅल्जिक करणारं लेखन!
पण, हे सगळं दरवेळी 'होत' जातं असं नाही वाटत मला.. आपणही जबाबदार असतोच हे होण्याला
यात्री + १........ आपणच
यात्री + १........
आपणच टिकवायचं असतं आपल्याला हवं हवंस वाटणारं सगळं........ ते फक्त एका सादेसरशी परत मिळतं..... बघ प्रयत्न करून
छान लिहिलय रीया. !!!!
छान लिहिलय रीया. !!!!
ग्रेट. छान लिहीलय ...
ग्रेट. छान लिहीलय ...
छान रिया मस्तच लिहिलंय...
छान रिया
मस्तच लिहिलंय...
छान लिहिलंय रीया. आवडलं.
छान लिहिलंय रीया. आवडलं.
चांगली आहे.
चांगली आहे.
वा छान
वा छान
वा!! प्रि खुप आवडली
वा!! प्रि खुप आवडली
पण कोणी ठरवून वागत नसत अस,
पण कोणी ठरवून वागत नसत अस, कालपरत्वे जबाबदाऱ्या वाढत जातात आणि स्वतालाच वेळ देणे कठीण होत जात रिया भा पो.
जुन्या स्मृतीना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
प्रि, खरंच कुणी जातं का असं
प्रि, खरंच कुणी जातं का असं लांब? भेटण्याचे बहाणे, ठीकाणे वेगळी असतील आता कदाचित.. पण ते 'सख्ख्य' राहातंच ना गं...
जबरी रे ....जीयो
जबरी रे ....जीयो
रिया , अग हाक मारलीस की येतील
रिया , अग हाक मारलीस की येतील बघ सगळे.
आणि जात नाहीत कोणी कुठे, तिथेच असतात मनात.
छान
छान
मस्त मस्त लिहिले आहे तुम्हि
मस्त मस्त लिहिले आहे तुम्हि !!
छान लिहल आहे रिया....आठवणीचे
छान लिहल आहे रिया....आठवणीचे कप्पे परत उघडले...
छान आहे रीया. एकदम मनातल.
छान आहे रीया. एकदम मनातल. गेल्या दोन दिवसात माझ्या कॉलेज ग्रुपच्या मैत्रिणींचे फोन सुरु झालेत. त्यामुळे जास्त भावली असेल.
मनातली आठवणींची हुरहुर कवितेत
मनातली आठवणींची हुरहुर कवितेत छान उतरली आहे....... मस्त
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना अनेक अनेक धन्स !



केदारदादाला हजार मोदक
नेहमी कारणं असली / भांडण झाली कीच दुरावा वाढतो अस नाहीये
नव्या जबाबदार्या, बदलेल्या प्रायोरिटीज हे ही कारण असतंच.
एका सादेसरशी माझे सगळे मित्र परत येतीलच. हीला एक सादच जमजावी
प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा खुप खुप आभार

काळ कसाही बदलला तरी कॉलेजचं स्थान प्रत्येकाच्या जीवनात स्पेशलच असतं ना!
ते स्थान, ते दिवस मिस करतेय
छान लिहिलंय रिया , अग हाक
छान लिहिलंय
रिया , अग हाक मारलीस की येतील बघ सगळे.
आणि जात नाहीत कोणी कुठे, तिथेच असतात मनात.>>>>>+१
मस्त मस्त .... आवडले
मस्त मस्त .... आवडले
रिया आवड्ली ग आणि हाक मारली,
रिया आवड्ली ग आणि हाक मारली, यावंसं वाटलं तरी जगाच्या चारी कोपर्यात विखरलेले जीव येऊ शकणार नाहीत या जाणीवेने थोडं खट्टूही व्हायला झालं
मस्त मांडलंयस
रिया आवड्ली ग आणि हाक मारली,
रिया आवड्ली ग आणि हाक मारली, यावंसं वाटलं तरी जगाच्या चारी कोपर्यात विखरलेले जीव येऊ शकणार नाहीत या जाणीवेने थोडं खट्टूही व्हायला झालं
मस्त मांडलंयस
मस्तच, आवडेश
मस्तच, आवडेश
खूप छान,अगदी युनिव्हर्सल.
खूप छान,अगदी युनिव्हर्सल.
nice one
nice one
मस्तं....
मस्तं....
Pages