ह्यापूर्वी कोणत्याही कथेवर असा चर्चा धागा निघाला होता की नाही मला कल्पना नाही.
पण मी लिहिलेल्या आधुनिक सीता ह्या कथेवर अनेकांची वेगवेगळी मते आहेत. ती मते प्रत्येकाला मोकळेपणाने मांडता यावीत आणि त्या सर्व मतांबद्दलची चर्चा एकाच जागी व्हावी म्हणून हा वेगळा धागा.
कथेचे २९ भाग लिहून झाल्यावर मी हा चर्चा धागा काढला आहे.
मी ही कथा लिहित असताना मूळ कथेचा बेस तर वापरलाच होता पण त्याशिवाय मी त्यात मला पटतील अशा काही गोष्टी अधिक लिहिल्या. काही ठिकाणी विचार आणि लेखन स्वातंत्र्य घेतले. ते कुठे कसे घेतले का घेतले ते शेवटच्या काही भागांमध्ये लक्षात येईलच सगळ्यांच्या पण ते सगळ्यांना कळण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांची मतं काय आहेत ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. अर्थातच कथेच्या ठरलेल्या साच्यात फरक पडणार नाहीच आहे. इथे ती तशीच लिहिली जाणार जशी ती कागदावर लिहिलेली आहे.
तरीही ज्या कोणाला कथेचे नाव पटत नाही, कथानायिकेचे वागणे पटत नाही. कथेच्या खलनायकाचे किंवा नायिकेच्या पतीचे किंवा माहेरच्यांचे वागणे पटले नाही किंवा ही कथाच पटत नाही त्या सगळ्यांनी इथे मनसोक्त लिहावे. एखाद्या प्रसंगात खलनायकाच्या किंवा नायिकेच्या कथेतल्या वागण्यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे तेही लिहावे. खरेतर तेच जाणून घेण्यासाठी हा धागा मी काढला आहे. ही कथा आणखी वेगळी झाली असती का कशी होऊ शकली असती हा अंदाज घेण्याचा हा प्रयत्न.
प्रत्येकाला/ प्रत्येकीला त्याचे/तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ते इतरांच्या मते चूक असो की बरोबर. तूच चूक किंवा मीच बरोबर, तुझे विचार असे बदलायला हवेत, किती बुरसटलेले विचार किंवा असे होते काय कधी असे वाद कृपया इथे करू नयेत. मायबोलीवरच्या इतर आयडीज सोबत वैयक्तिक लाथाळ्याही करू नयेत ही विनंती.
ही कथा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळी कशी झाली असती ते शोधण्याचा हा माझा प्रयत्न आहे असे समजा हवे तर.
तर चला लिहिते व्हा ...
तरीही ज्या कोणाला कथेचे नाव
तरीही ज्या कोणाला कथेचे नाव पटत नाही, कथानायिकेचे वागणे पटत नाही. कथेच्या खलनायकाचे किंवा नायिकेच्या पतीचे किंवा माहेरच्यांचे वागणे पटले नाही किंवा ही कथाच पटत नाही त्या सगळ्यांनी इथे मनसोक्त लिहावे. एखाद्या प्रसंगात खलनायकाच्या किंवा नायिकेच्या कथेतल्या वागण्यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे तेही लिहावे. खरेतर तेच जाणून घेण्याची माझी इच्छा आहे>>>>>
आणि मग कथेच्या खाली काय लिहायचे? कारण, प्रत्येक भागाच्या खाली प्रतिसाद द्यायची सोय आहे. तिथे लोक त्या त्या भागाबद्दल काय वाटते ते लिहू शकतात. कथा आवडली, कथानायिकेचे वागणे पटले नाही पटले, कथेचे शीर्षक आवडले नाही आवडले, कथेमध्ये लॉजिकल चुका आहेत नाही आहेत. हे वाचकांना लिहिण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि ते त्या कथेच्या खालीच लिहिणे जास्त योग्य नाही का? प्रत्येक कथा कादंबरीला असा वेगळा धागा काढत बसलं तर मग गुलमोहरमध्ये प्रतिसाद देण्याची सुविधा असल्याचा उपयोग काय?
अर्थातच कथेच्या ठरलेल्या साच्यात फरक पडणार नाहीच आहे. इथे ती तशीच लिहिली जाणार जशी ती कागदावर लिहिलेली आहे.>>> मग पूर्ण कथा एकदम टाईप करून प्रसिद्ध केलीत तर उत्तम असेल ना. २९ भाग झालेत ऑलरेडी. अजून किती भाग अपेक्षित आहेत?
अरे बापरे! आधी २९ भाग, मग
अरे बापरे! आधी २९ भाग, मग महाचर्चा आणि मग उरलेले शेवटचे भाग? अगदी संध्याकाळची मराठी सिरियल बघितल्यासारखं वाटतय
माझं मत - कथा अंमळ लांबली आहे आणि इतके दिवस चालु असल्यामुळे त्यातली उत्सुकता संपुन गेली. तुमचं लिखाण चांगलं आणि शुद्ध आहे. कथानक मोठं असलं तर त्यात जरा 'ट्वीस्ट' असले आणि पटापट पुढे सरकलं तर इंटरेस्ट वाढतो.
माझा टिका करण्याचा हेतु नाही. ह्या अनुभवानंतर अजून छान लेखन कराल ही सदिच्छा.
पु.ले.शु.
मला असे वातते कि तुम्हाला
मला असे वातते कि तुम्हाला सीता ह्या शब्दाचा अर्थाच नाही कलाला. कितीही त्रास झाला तारीही पतिव्रत असते ती सीता. जीच्य्या मानात आपल्या नवरना।ईहीहीएदुसरी व्यकेती येत नाही ती सीता.
मग आज आधुनीक काळात असे होउ शकते का? तर हो असे जिथे होइल तिच तर सीता. नाही तर बाकी सगळे सामन्य.
तुमची नाईका ही सीता असुच शकत नाही. ती एक अती सामन्य बाई आहे जी परिस्थीतीला शरण गेली आहे. सो हे नाव मला पट्ले नाही. ही सीतीसीतेची नाही.
ह्यापूर्वी कोणत्याही कथेवर
ह्यापूर्वी कोणत्याही कथेवर असा चर्चा धागा निघाला होता की नाही मला कल्पना नाही.
पण मी लिहिलेल्या आधुनिक सीता ह्या कथेवर अनेकांची वेगवेगळी मते आहेत. ती मते प्रत्येकाला मोकळेपणाने मांडता यावीत. आणि त्या सर्व मतांबद्दलची चर्चा एकाच जागी व्हावी म्हणून हा वेगळा धागा. >> कितीही तूप लाऊन सांगितलं तरी अंतस्थ हेतू 'माझी कथा लई भारी आणि तुम्ही तिच्याबद्दल बोला' असाच आहे हे धडधडीत दिसत आहे. चांगली म्हणा वाईट म्हणा, आवडली म्हणा नावडली म्हणा पण बोलाच बाई माझ्या कथेबद्दल मग 'माझ्या कथेवर माझे फॅन किती हिरिरिने चर्चा करत आहेत' हे पाहून मला मायबोलीवरील एक प्रसिद्ध आणि प्रथितयश लेखिका झाल्याच्या विचाराने कश्या गुदगुल्या होतील असे वाटले ना.?
आवरा!!!
प्रत्येकाला/ प्रत्येकीला त्याचे/तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ते इतरांच्या मते चूक असो की बरोबर. >> बाकीच्या धाग्यावर ईतरांच्या नावाने गरळ ओकतांना आणि त्यांचे कसे चुकले हे पटवून सांगतांना नाही हा सुविचार आठवला तुम्हाला.
पूर्णपणे अनावश्यक
पूर्णपणे अनावश्यक धागा.
नंदिनीला अनुमोदन! कथेच्या खाली प्रतिसादांची सोय असताना वाचकांना वेगळे काय अपेक्षित आहे हे लिहिण्यासाठी वेगळा धागा काढण्याची आवश्यकता नाहीच.
कथालेखकाने लेखनस्वातंत्र्य घेऊन कथा लिहून काढावी. कथेबद्दल वेगवेगळे विचार मांडले गेले तर त्यांचा सकारात्मक उपयोग पुढील लेखनात करावा. अनावश्यक प्रतिसादांचा सहज अनुल्लेख करता येतो. हे तंत्र मायबोली, तत्सम वेबसाईट, ब्लॉग इत्यादी लेखनासाठी वापरणे हिताचे आहे.
हुप्पाहुय्या, गुलाबी आणि
हुप्पाहुय्या, गुलाबी आणि नंदिनी यांना पूर्ण अनुमोदन...
ही पूर्ण कथा एका दुसर्या
ही पूर्ण कथा एका दुसर्या कथेवरून घेतली आहे. मग हे ओरिजिनल तरी आहे का?
अमा -
अमा - http://www.maayboli.com/node/44940
मायबोलीवर आजवर मी एकही
मायबोलीवर आजवर मी एकही दिर्घकथा वाचली नाहीये. यामागचे कारण माझा आळस वा नावड वा क्रमशाची नकोशी हुरहुर यापैकी काहीही असेल.
पण कधीतरी काही कथांवरचे प्रतिसाद सहज वाचतो, एखादी मोठी कथा काय किती लोक वाचतात आणि ती कथा कशी आहे याचा अंदाज घ्यायला. कोणी सांगावे प्रतिसाद वाचून कदाचित मलाही माझा आळस झटकून कथा वाचावीशी वाटावी एवढाच हेतू.
या कथेचे भाग खूप काळापासून बघतोय, लोक त्यातील कॅरेक्टर बद्दल त्याने काय असावे आणि काय कसे वागावे अशी समरसून चर्चा करत आहेत, पुढचा भाग कधी, लवकर टाका याची विचारणा करत आहेत, याचा अर्थ लिखाणाची शैली नक्कीच वाचणेबल आहे एवढे नक्की. आणि माझ्यासारख्याला याचेच जास्त कौतुक वाटतेय की एवढ्या भागानंतर वाचक मिळवत राहणे कमाल आहे. हि कौतुकाची पोस्ट कथा न वाचल्याने त्या खाली आजवर कधी टाकली नव्हती पण आज हा वेगळा धागा काढल्याने इथे टंकतोय.
या धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास हा धागा जर उलटसुलट वा नकारात्मक प्रतिसादांना वैतागून काढला असेल तर ते फारसे पटले नाही. एखादा विरोधात येणारा प्रतिसाद प्रामाणिक असो वा मुद्दाम खुसपट काढायला, जर कोणी आपले लिखाण वाचून तो देत असेल तर त्या प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.
पण जर हा धागा कुठल्याही प्रकारची चर्चा घडवायला काढला असेल वा यातून आपल्याला लिखाणाला स्फुर्ती मिळणार असेल तर मायबोलीवर असा धागा नसावा असा काही नियम नसावा.
जाताजाता - कालदेखील मी असाच आणखी एक धागा पाहिला होता, तिथे जे सांगितले तेच इथे सांगतो. जर कुठल्याही कलाकृतीवर वादच घालत बसला तर कोणीही हरो वा जिंको, नुकसान शेवटी कलाकाराचेच होते. त्यामुळे या वादात कला मेली नाही पाहिजे हे बघितले पाहिजे.
कथा वाचली नसली तरी वरची पोस्ट ही मायबोलीचा सभासद, वाचक आणि लेखक या तिन्ही भुमिकांतून लिहिली आहे. सोबतीला आपला हितचिंतकही आहेच.
पुढील लिखाणाला शुभेच्छा.
wel अमा -
wel
अमा - http://www.maayboli.com/node/44940
How can I read other stories from this site? This one is nice and your adaptation and expansion is also likeable.
We lived in Saudi long time ago, heard such stories. Keep writing.
wel अमा -
wel
अमा - http://www.maayboli.com/node/44940
How can I read other stories from this site? This one is nice and your adaptation and expansion is also likeable.
We lived in Saudi long time ago, heard such stories. Keep writing.
joojooly1, तुम्ही तो बीबी
joojooly1,
तुम्ही तो बीबी पुर्ण वाचलात का?
त्याखालचे प्रतिसाद वाचले का?
नसतील तर ते वाचायचे कष्ट घ्याल का?
तिथे प्रतिसादात लिंक दिलेली आहे तो प्रतिसाद स्किप झाला का तुमच्याकडुन?
काय राव उगाच खुसपट काढायला म्हणून प्रश्न विचारतात लोकं
आणि
अमा, तुम्ही सुद्धा? तुम्ही या कथेचे सगळे भाग पहिल्यापासुन वाचले होते का? असते तर हा प्रश्न कसा पडला? कारण तेंव्हाच वल्लीने ती कथा देऊन हे सांगितलं होतं की या कथेचा उत्तरार्ध आहे जे मी लिहीतेय ते....
आणि तुम्ही पहिल्यापासुन नसेल समजा वाचली तर आत्ता हे प्रश्न विचारायचं कारण काय?
बेसिक क्लिअर नाहीये या कथेमागचं तर पेपर सोडवायला कशाला घ्यायचा?
तुम्ही माझा प्रतिसाद समजुन घ्याल म्हणून तुम्हाला उद्देशुन मुद्दाम लिहिलं. गैरसमज करुन घेणार नाही अशी अशा वाटते
खरे तर ही कथा फक्त काही
खरे तर ही कथा फक्त काही ओळींची असतांना उगाच लांबड लावली आहे असे पदोपदी ही कथा वाचतांना जाणवते.
ईथे लेखिकेला टार्गेट करायचे नाहीये पण हा "येडी घालून कढी करणे" सारखा प्रकार चालू आहे असे प्रकर्षाने जाणवले
मला सुद्धा कथा थोडी
मला सुद्धा कथा थोडी लांबल्यासारखी वाटली , पण कथा आवडली आणी भाग जरा लवकर आले तर जास्त बरं होईल.
कथेचा लवकर शेवट करा .
कथेचा लवकर शेवट करा . पु.ले.शु
Hi Riya Oh! Sorry, wrong
Hi Riya
Oh! Sorry, wrong link. I meant this link given by Radhika1. Kalnirnay Katha 2013.
http://www.kalnirnay.com/katha2012/03%20Ti%20Punha%20Dislich%20Nahi.pdf
How can I read other stories from this site?
For your 4 questions the answer is Yes and Yes. This was just a case of wrong link. When I realised this, it was too late. My bad luck it got published first (twice).
I wrote to Radhika1 too.
(काय राव उगाच खुसपट काढायला म्हणून प्रश्न विचारतात लोकं अ ओ, आता काय करायचं)
It was a genuine mistake. I do not criticise any one or point fingers. Because we were taught, if you point a finger at someone always remember three are pointing at you.
Let the writer decide when and how she wants to write. Good luck Wel
जूजूलि - धन्यवाद. कोणत्या
जूजूलि - धन्यवाद.
कोणत्या साईटवरच्या इतर स्टोरीज वाचायच्या आहेत? माबो की कालनिर्णय? http://www.kalnirnay.com/katha2012/
अशीच एक कथा पुर्वी मनोगत वर
अशीच एक कथा पुर्वी मनोगत वर वाचली होती. ती बहुदा सत्य घटना होती आणि नायीका परत भारतात येऊ शकली नाही.
भाग जरा लवकर आले तर जास्त बरं
भाग जरा लवकर आले तर जास्त बरं होईल. >> +१
Thanks for the link. I try to
Thanks for the link.
I try to read as much as possible.
नाहि नाही म्हणता २० प्रतिसाद
नाहि नाही म्हणता २० प्रतिसाद झालेच , वेल.
वेल , मला वाटत कथा र.न्गत असतानाच तु मोठ्ठा ब्रेक घेतलास , आणि मग कथा पूर्ण करायच्या नादात उगाचच भरकटली ती.
अग, अशा कितितरी कथा ईकडे अर्धवट पडल्या आहेत , त्यात आणखी एक
सावकाश विचार करून दोन-चार भाग तरी एकत्र टाकायचेस .
वेल ... सो फार , वेल डन .
तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है .
लोका.न्च इतक मनावर नाही घ्यायच .
पुलेशु .. वाट बघतेय पुढिल भागाची
रिअली व्हेरी सॉरी
रिअली व्हेरी सॉरी joojooly1
तुमचा प्रतिसाद समजून घेण्यत चूक झाली होती
वेल तुम्ही नंदिनीचा कथालेखन
वेल तुम्ही
नंदिनीचा कथालेखन आणि चर्चा हा बीबी पहा
भरपूर इनपुट्स मिळतिल कथेच्या एकुण तंत्राविषयी
ज्याचा फायदा पुढील लिखाणाला होईल
भरपूर इनपुट्स मिळतिल कथेच्या एकुण तंत्राविषयी
ज्याचा फायदा पुढील लिखाणाला होईल
ह्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास कथा अनावश्यक रेंगाळते आहे असे दिसते
मग इंटरेस्ट राहत नाही वाचनात
मी येथे रोज नाही पण
मी येथे रोज नाही पण हप्त्यातून चार वेळा येतो ! फक्त कथालेखन वाचण्यासाठी !मला इथल्या कथा आवडतात पण मी टिप्पणी लिहायला घाबरतो .......
<<< ईन्टरफेल | 6 June, 2014 -
<<<
ईन्टरफेल | 6 June, 2014 - 11:35
मी येथे रोज नाही पण हप्त्यातून चार वेळा येतो ! फक्त कथालेखन वाचण्यासाठी !मला इथल्या कथा आवडतात पण मी टिप्पणी लिहायला घाबरतो .......
>>>
ईन्टरफेल भौ - असली टिप्पणी करण्याची तुमची हिम्मतच कशी झाली म्हणतो मी
ईन्टरफेल, अत्यंत महत्वाचा
ईन्टरफेल, अत्यंत महत्वाचा प्रतिसाद!
ह्याबद्दल सविस्तर लिहायची इच्छा होत आहे पण ती पुढे ढकलतो.
(वेल - अवांतराबद्दल क्षमस्व. तुमची कथा मी वाचली नसली तरी हा धागा काढण्याऐवजी तुम्ही कथेखालीच ही चर्चा घडवून आणली असतीत तर उत्तम मतमतांतरे वाचायला मिळाली असती)
शुभेच्छा!
हि कथा कोमातुन कधी बाहेर
हि कथा कोमातुन कधी बाहेर येणारे?
(No subject)
ह्या कथेचे सर्व भाग एकत्र
ह्या कथेचे सर्व भाग एकत्र वाचायला कुठे मिळतील? कथा पूर्ण झाली?????
ह्या कथेचे सर्व भाग एकत्र
ह्या कथेचे सर्व भाग एकत्र वाचायला कुठे मिळतील? कथा पूर्ण झाली????? हा अजुन एक जोक.....:P
Pages