http://www.maayboli.com/node/55743
फातिमा माझ्या हातात तिकिट आणि पासपोर्ट ठेवून गेली आणि मला हर्षोल्हासाने नाचावसं वाटू लागलं. ओरडून सगळ्या जगाला सांगावसं वाटू लागलं की मी परत जाणार. मी माझ्या देशात परत जाणार. माझ्या सागरबरोबरच्या लग्नाचं भविष्य काय असेल मला माहित नव्हतं तरी मला माझ्या माणसात परत जायला मिळणार ह्याचा आनंद खूप जास्त होता. आज मी तो आनंद शब्दात मांडूच शकत नाही. अति आनंदाने मी ओक्साबोक्शी रडू लागले. जेनी तिथे आहे तिला काही सांगावं हे माझ्या लक्षातच नाही आलं.
भाग ३३ - http://www.maayboli.com/node/55393
"आता?" मी विचारलं.
"आता म्हणजे काय?" रफिक मध्येच बोलला.
"माझं आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? " मी पुन्हा अधिक स्पष्टपणे विचारलं.
"तुझं काय करायचं म्हणजे?" रफिक थोडा वरच्या आवाजात बोलला.
मी फक्त फातिमाकडे पाहिलं.
"सरीताने जर मला मदत केली ह्या प्रकरणातून सुटायला तर मीदेखील तिला मदत करेन असं मी तिला म्हटलं होतं"
"तू मदत करशील तिला आणि ते नक्की कशासाठी?"
"तिला परत पाठवण्यासाठी." हे ऐकताच रफिक कृद्ध होऊन फातिमाच्या अंगावर धावून गेला.
भाग ३२ - http://www.maayboli.com/node/54832
***************************************************
"सागर तसा मनाने वाईट नव्हता. पण थोडासा"
आणि फातिमा पुढे काही बोलण्यापूर्वी रफिक खोलीत आला. आणि फातिमा बोलायची थांबली.
"तू विसरलीस का ह्या खोलीत माईक बसवला आहे आणि इथे जे काही बोलले जाते ते मला सगळे ऐकू येते?" रफिकने फातिमाच्या जवळ जाऊन तिच्या दंडाला पकडले आणि क्रुद्ध आवाजात तो तिच्याबरोबर बोलू लागला. "खबरदार तू काही बोललीस तर. तुलासुद्धा सोडणार नाही मी."
भाग २९ - http://www.maayboli.com/node/49170
***********************************
"व्हाय डू यु क्राय ऑल टाईम? डिड यु ईट? डिड यु हॅव युर ज्युस? काण्ट यु स्टे काम अँड क्वाएट? जस्ट बिकॉज ऑफ यु अॅम आन्सरिंग सो मेनी पीपल." फातिमाला एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नव्ह्तं. आणि तिला इतकं व्यवस्थित इंग्लिश बोलताना मी कधीच ऐकलं नव्हतं. त्यानंतरही ती काही वेळ स्वतःशीच काही तरी बोलत होती.
**********************************
ह्यापूर्वी कोणत्याही कथेवर असा चर्चा धागा निघाला होता की नाही मला कल्पना नाही.
पण मी लिहिलेल्या आधुनिक सीता ह्या कथेवर अनेकांची वेगवेगळी मते आहेत. ती मते प्रत्येकाला मोकळेपणाने मांडता यावीत आणि त्या सर्व मतांबद्दलची चर्चा एकाच जागी व्हावी म्हणून हा वेगळा धागा.
कथेचे २९ भाग लिहून झाल्यावर मी हा चर्चा धागा काढला आहे.
भाग २७ - http://www.maayboli.com/node/47410
************************************************************************************
आता दर दोन दिवसांनी मला आजी सोबत बोलता येऊ लागलं. अर्थात रफिक पुढ्यात असतानाच.
bhaag 26 - http://www.maayboli.com/node/47220
रफिकच्या नातेवाईक बायकांचा आनंदोत्सव चालूच होता. माझे जेवून आणि प्रार्थना करून झाल्यावर बडी अम्मीने मला झोपायला जाण्यास सांगितले. गरोदर असल्याने फार जागरण करू नये, याउलट सकाळी लवकर उठावे असे तिचे मत होते. माझे मत काय होते, मला काय हवे होते हे व्यक्त करण्याची संधी कुठेच नव्हती. सोन्याच्या पिंजर्यातला पक्षी झाले होते मी. पुन्हा एकदा विचार करून करून माझे डोके दुखू लागले. डोके चेपून पाहिले, पण दुखायची थांबेनाच. मग फातिमाची वाट पाहात बसले, ती आली की तिच्याकडे डोकेदुखीसाठी काहीतरी गोळी मागायची.