युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु .. आदिती थँक्स परत एकदा ..
काल ब्रेफा म्हणुन थोडेसे पाणी शिंपडलेले पोहे .. त्यात मोड आलेले मुग.. थोडं तिखट्,मीठ्,चाट मसाला नि कोथिंबीर घालुन मावे मधे १ मिनिटं ठेवल .. मस्त चटपटीत हेल्दी पोहे तयार Happy

ब्रेडचा अर्धा पॅकही मिळतो ८-१० स्लाईसचा असतो. विक्रेत्याने कापलेला नव्हे, कंपनीनेच पॅक केलेला...

सामी, ते प्रचंड वेळखाऊ आणि निस्तरपट्टीचं काम होईल असं मला वाटतं.
वेळखाऊ अश्यासाठी की आंब्याचा रस आटवताना त्याचे प्रचंड शिंतोडे उडतात म्हणून गॅसवर/ चुलीवर आटवताना मोठं भांडं घेतात. मायक्रोवेवमधे भांड्याच्या आकारावर मर्यादा येईल, तसेच तो रस खाली लागण्याचीही शक्यता असते त्यामुळे मंद आचेवर ठेवतात. मावेमधे करायचा किती वेळा काढणार/ ढवळणार/ पुन्हा ठेवणार??

अवांतर : कैरीचा इन्स्टन्ट छुंदा, आंब्याचा जॅम/ मोरांबा हे पदार्थ मावेमध्ये छान होतात कमी प्रमाणात करायचे असतील तर.

मंजूडी , मी छुंदा केल्यावरच मला हे सुचले , झाकण ठेवून करता ये ईल का? माझ्याकडे मोठे भांडे आहे, झाकणासहीत.

सामी झाकणासहित ठेवू शकतेस. झाकणाला भोकं असतील जर खास मावेसाठी असतील तर, अन्यथा झाकण थोडं कलतं ठेवायचं.

मंजुडी+१. मागे सुलेखाताईंनी दिलेल्या एक रेस्पीसाठी आमरस आटवला होता. खूप वेळ लागला होता. मावे मध्ये वाफ जमलेली बरी नव्हे. म्हणून एक-एक मिनिटाने मावे उघडून पुन्हा चालु करावा लागतो. थोड्या प्रमाणात करायचे असेल तर ओके.

सातुचं पीठ-

सत्तु के पराठे (बिहारी डेलिकसी)
त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, अला लसुण पेस्ट, मिठ, आणि असल्यास सरसो तेल्/ साध तेल टाका १ टे स्पु.
मग थोड थोडं पाणी टाका- पुरणा इतका घट्ट येउ द्या.

हे सारण भरुन परठे करा! मस्त लगतात.

सामी, झाकण मावेमध्ये ठेवलेले चालते का? Uhoh एकदा त्याच्याबरोबर आलेल्या सूचनांमध्ये पहा. मी तर हमखास (भांडं मावेप्रूफ असलं तरी) 'झाकण मावेमध्ये ठेवू नये' अशीच सूचना वाचलेली आहे.

मला नाही माहीत अरेरे>> अगं म्हणूनच सूचना वाच असं सुचवले ना, किंवा वेबसाईट वगैरे बघ. बेटर सेफ दॅन सॉरी Happy

सूचना बघेनच , पण म्हणूनच दक्षिणा ने झाकण थोडं कलतं ठेवून करायला सांगितले आहे बहुतेक . दक्षिणा प्लीझ रिप्लाय .

भांडे मावे सेफ असले तरी त्याचे झाकण मावे सेफ असतेच असे नाही. नसेल तर ते मावे मधे वापरता येणार नाही... थोडे कलते ठेऊनही वापरता येणार नाही.
मावे सेफ असलेल्या झाकणाला हवा/वाफ बाहेर जाण्यासाठी छोटेसे भोक असते.

माझ्याकडे बोरोसिलचे हे भांडे आहे. त्यावर झाकण मावेमध्ये वापरू नका असे लिहिलेले वाचल्याचे आठवत नाही. (आता खोके नाही). झाकण लावून अनेकवेळा वापरले आहे. माझ्याकडच्या मावे रेसिपींबुकमध्ये : कधी झाकण लावायचे, कधी लावायचे नाही,कधी फट ठेवून लावायचे हे दिलेले आहे.तसेही मावे कुकिंगमध्ये थोड्याथोड्यावेळाने पदार्थ ढवळावा लागतो त्यामुळे वाफ आत साठून राहण्याचा धोका नाही.
या भांड्याच्या आणि माझ्याकडे असलेल्या बोरोसिलच्या कॅसेरोलच्या भांड्याच्या व झाकणाच्या काचेचा दर्जा एकच दिसतोय.

एकदा बासुंदीसाठी मावेमध्ये दूध आटवायला घेतले तेव्हा उकळी आल्यावर बाहेर काढून दूध ढवळण्यासाठी (साय मोडण्यासाठी) लाकडी कालथा घालताच दूध एक मोठी उसळी घेऊन वर आले होते. दॅट वॉज स्केअरी.

भांडे मावे सेफ असले तरी त्याचे झाकण मावे सेफ असतेच असे नाही. >> एक तर असं असू शकत नाही. डबा फक्त मावे सेफ आणि झाकण सेफ नाही? मी प्रयोग करून पाहिला आहे. कोणताही पदार्थ गरम करताना उघडा ठेवून गरम केला आणि झाकून गरम केला तर तो गरम होण्याची पातळी आणि गरम राहण्याचा वेळ दोन्ही वाढतो.

एक तर असं असू शकत नाही.>> असं असतं दक्षिणा. माझ्याकडे सिरॅमिकचे बाऊल आहेत त्यांची झाकणं आहेत त्याला रबरी रिंग आहे, काहींवर स्टीलचं बूच आहे, त्यामुळे ते झाकण लावून मावेत ठेवू शकत नाही.

पातळ पदार्थांच्या बाबतीत थोडी काळजी घेतलेली बरीच असते नेहमी.
भरत तुम्ही टायमिंग जास्ती ठेवलं होतं का दूध उकळताना?

पाच-पाच मिनिटांचाच वेळ देत होतो, पहिल्यांदाच करत असल्याने. तसेच दूध उतू जाईल ही भीतीही होती. दुधाने तशी उसळी घेण्यामागे काहीतरी सरफेस टेन्शनचे तत्त्व असावे (दूध पिणार्‍या गणपतीबाबत होते ते). नंतर (मावे थांबल्यावर काही वेळ देऊन) उकळी कमी झाल्यावर दूध ढवळून घेत होतो.

असं असतं दक्षिणा.+१...माझ्याकडे २ काचेची भांडी आहेत. एका झाकणावर लिहिले आहे मावे सेफ नाही म्हणून आणि एक मावे सेफ आहे

दक्षिणा, मी पूर्णपणे मावेसेफ भांड्यांबद्दलच सांगतेय.

मयेकर, काळजी घ्या असे काही करताना.
आमच्या ऑफिसातला मुलगा डेंजर भाजला होता. गाजर हलवा करण्यासाठी गाजर+दूध एकत्र करून मावेत तीन मि. हाय पॉवरवर ठेवले, मग बाहेर काढून ढवळताना उकळते दूध तोंडावर उडाले होते. भांडं मावेतून बाहेर काढलं की आपली जनरल टेडंसी भांड्याच्या वरून आत बघण्याची असते, भांड्यापासून लांब नसतो आपण, तेव्हा असे अपघात घातक ठरू शकतात.

सगळ्यांचे आभार.
काल मावे मधे आंबा मावा केला,अजिबात आजूबाजूला न उडता मस्त झाला. दक्षिणा ने सांगितल्या प्रमाणे तिरपे झाकण ठेवून बघितले पण लगेच वाफ धरली. मग झाकण न लावताच केला.
2014-05-28-22.52.40.jpg
गॅस वर करताना आजूबाजूला उडतो हे आईकडून ऐकून माहीत होते. थोडी धाकधूक होती पण रिझल्ट मस्त्च.

मंजूडी तु सांगितलेले ऐकून भिती वाटली ग, मी असे खूप वेळा केले आहे. यापुढे काळजी घेईन.

माझ्याकडे मावेबरोबर मिळालेली ३ वेगवेगळ्या मापाची झाकणं आहेत. ती बोरोसिलच्या बोलवर व्यवस्थित बसतात. झाकणांना वाफ जाण्यासाठी २-२ छोटी भोकं आहेत.
माझ्या मावेच्या आतल्या वरच्या बाजूला तेलाचे, हळदीचे डाग पडलेत. म्हणून एकदा कंपनीच्या माणसाला विचारलं, तर त्यानं सांगितलं, की मावेत अन्न गरम करतानाही झाकण टाकूनच गरम करा. म्हणजे असे डाग पडत नाहीत.

पेरु , आंबे कापून एका टोपात घेऊन , गॅस वर ठेवून त्यातला रस आटवायचा. पुर्ण सुकल्यावर साखर घालून पुन्हा आटवायचा. झाला मावा तयार तो फ्रीझर मधे ठेवून आंब्याचा सिझन संपल्यवर वर्षभर खायचा :-). याची चव आंबा पोळी, वडी सारखी लागते.
फोटोतला मावा मी मावे मधे केलाय.

Pages