Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही, जखमेवर मीठ नव्हतं
नाही, जखमेवर मीठ नव्हतं चोळायचं. ते अओ १ कि. हरभरे कसे संपवायचे यासाठी होतं.>>>> अरे नाही नाही...मंजूडी, कुणी तरी दुसर्या व्यक्तीने माझ्या जखमेवर मीथ चोळण्याविषयी बोलत होते. ते अओ १किसाठी होते, हे आलं होतं लक्षात. घोळाबद्दल सॉरीच.
सगळ्या पर्यायांसाठी खरंच धन्यवाद.
हरभरे मीठ घालून उकडायचे आणि
हरभरे मीठ घालून उकडायचे आणि (कोमट असतानाच) त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घालायची. लाल तिखट, मीठ, चाट मसाला घालून ही 'भेळ' कालवायची. भाहारीही लागते. पूर्वी दादर स्टेशनला मिळायची, आताचं माहीत नाही.
Fry that chaitra gauri dal in
Fry that chaitra gauri dal in vada shape / bhaji shape. It tastes awesome.
sandge Karun valavun theva.
sandge Karun valavun theva.
फ्रीजमध्ये पीनट बटरची एक बरणी
फ्रीजमध्ये पीनट बटरची एक बरणी आहे. पावाबरोबर लावून लवकर संपेल असं वाटत नाही. उगाच आणली मी. तर आता त्याचं दुसरं काही करता येईल का?
वेदिका, पीनट बटर कुकीज किंवा
वेदिका,
पीनट बटर कुकीज किंवा पिनट बटर+ थाई करी पेस्ट + नारळाचे दूध घालून सॉस
वेदिका , पीनट बटर मधे थोडा
वेदिका , पीनट बटर मधे थोडा गुळ आणि क्वीक ओट्स (किंवा रेग्युलर ओट बेक करून) टाका. आणि छोटे लाडु करा. स्नॅकला एकदम मस्त. (यातच खजुर, नट्स वगैरे पण घालता येईल.)
चॉकोलेट लव्हर असाल तर पीनट बटर मधे मेल्ट केलेल चॉकोलेट घालून मिक्स करा. नुटेला सारख लगेच खपून जाईल.
घरी लिंब (अनेकवचनी) कशी
घरी लिंब (अनेकवचनी) कशी साठवायची? भाजीबरोबर २-३ आणली तरी ती पटकन संपत नाहीत. वरणभात क्वचित होतो. पोह्यांवर, उपीटावर, कोशिम्बिरीत वापरून सुद्धा एकावेळी अर्धच लिंबू वापरलं जातं चौघांच्या घरात. पण हाताशी असावं उन्हाळ्याच्या दिवसांत म्हणून आणते २-३. लिंबाचा रस काढून अगदी काचेच्या बाटलीत फ्रीज मध्ये ठेवला तरी काही दिवसांनी त्याला वेगळी चव येते. नुसती लिंब न चिरता फ्रीज मध्ये ठेवली तरी श्रींक होतात किंवा चोकलेटी डाग पडतात. वर ठेवली तर कुडकुडीत होतात! काय बरं करावं!
amachya fridge madhye limb
amachya fridge madhye limb changali athavadabhar changali rahatat
2-3 limb sampat nahit?
amachya ghari diwasala 2-3 limb lagatat (4 lokanchi family asunahi)
sarabat Karun thevat ja. unhatun alyawar pyayala... its good for health
टपरवेअर डब्यात चांगली राहतात
टपरवेअर डब्यात चांगली राहतात लिंबं फ्रीजमध्ये. डबा मात्र कोरडा असल्याची खात्री करून घ्या.
काचेच्या बरणीत घालुन फ्रीज
काचेच्या बरणीत घालुन फ्रीज मधे ठेवायची. अगदी महिनाभर सुध्दा छान राहतात, रसरशीत.
धन्यवाद अरुंधती आणि प्राची!
धन्यवाद अरुंधती आणि प्राची!
धारा - ऊन असेल तर हरबारे
धारा - ऊन असेल तर हरबारे परत वळवता येतील, ऊन मात्र कडकडीत हवे.
धन्यवाद स्वाती व सीमा बघते
धन्यवाद स्वाती व सीमा
बघते करुन यापैकी काहीतरी
वेदिका- आज एका चॅनेलवर
वेदिका- आज एका चॅनेलवर तुपावर बेसन भाजून त्यात पीब गूळ व चाॅकलेट टाकून वड्या दाखवल्या होत्या.
लिंबाचा रस अन साखर एकत्र करुन
लिंबाचा रस अन साखर एकत्र करुन ठेवु शकता आणि पाहिजे तेव्हा थोडे पाणि टाकुन सरबत बनवायचे.
सोललेला नारळ घरी कसा फोडायचा
सोललेला नारळ घरी कसा फोडायचा ? (ओट्याच्या कडेचा उपयोग करू नये! )
बत्ता, वरवंटा असली हत्यारे
बत्ता, वरवंटा असली हत्यारे वापरा की रावी..
हिम्सकूल, दोन्ही ही नाहीत ना
हिम्सकूल, दोन्ही ही नाहीत ना म्हणूनच तर :(. एक लहान दगडी ठेचणी आहे पण ती उपयोगाची नाही.
रावी, जमिनीला फरशी आहे की
रावी, जमिनीला फरशी आहे की लाकूड?
नाहीतर कुठूनतरी दगड पैदा करा, आणि प्रवासाला निघायच्या आधी दगडावर आपटून नारळ फोडतो तसा नारळ फोडा.
you can use poliche laatne.
you can use poliche laatne. to hack the naral. just beat it.
फरशीच आहे लाकूड नाहीये पण
फरशीच आहे लाकूड नाहीये पण टोकदार पाहिजे ना काहीतरी. लाटणं नाजुक आहे जरा. नुस्ता बत्ता विकत मिळतो का ते पहाते आता.
दगडी ठेचणी आहे ना. एका हातात
दगडी ठेचणी आहे ना.
एका हातात ठेचणी धरा & दुसर्या हातात नारळ घेवून ठेचणीवर जोरात मारा, हवेतच.
एक दोन वेळा मारले कि फुटतो नारळ. .
माझ्याकडे १ -२ मुठीत मावेल एवठी ठेचणी आहे त्यावर मी हा प्रयोग करते.
ही चर्चा वाचून घामाघूम होऊन
ही चर्चा वाचून घामाघूम होऊन लाटणे, फरशी, ठेचणीवर नारळ आपटणारी रावी आणि तिला संगणक/मोबाइल स्क्रीनमधून सूचना, सल्ले व प्रोत्साहन देणारे माबोजन माझ्या डोळ्यांसमोर आले!!
जाऊदे रावी नकोच फोडू नारळ
जाऊदे रावी नकोच फोडू नारळ
साणशीनी फोडता येत, पण नारळ
साणशीनी फोडता येत, पण नारळ हातात धरावा लागतो. साध्या फरशीवरच फोडते, उभ्या तीन रेघा असतात ना त्यापैकी एक फरशीवर आपटली जाईल असे बघायचे.
अरुंधती कुलकर्णी > . नारळ
अरुंधती कुलकर्णी > . नारळ फोडून झालाय ( पण त्याबरोबर अजुनही काहीतरी फुटले आहे !)
ठेचणी वापरून बघते. धन्स सर्वांन्नाच .
साणशीनी फोडता येत, >> नको
साणशीनी फोडता येत, >> नको तुटते सांडशी
मी हातोडा वापरते.
मी हातोडा वापरते.
कोयते संपावर आहेत का? नारळ
कोयते संपावर आहेत का? नारळ एका हातात धरून कोयत्याच्या मागच्या बाजूने नारळाच्या मधोमध घाव घालायचा.
त्याआधी नारळ भिजवून घेतला तर तो सरळ रेषेत फुटतो.
Pages