निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!
तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?
घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?
लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?
येणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?
पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?
आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?
हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!
अपोझिशन मध्ये बसणार्यांच्या जागा पलिकडे आहेत.
रॉबिनहुड, नंदन निलकेणी? उनका
रॉबिनहुड, नंदन निलकेणी? उनका क्या होगा?
ते आधार कार्डाचं काय करायचं
ते आधार कार्डाचं काय करायचं आता???
रॉबिनहूड. सदानंद गौडांसाठी अनुमोदन.
व्ही. के. सिन्ग यांना पर
व्ही. के. सिन्ग यांना पर राष्ट्र व्यवहाराचे राज्य मंत्रि पद दीले आहे. पर-राष्ट्रीय धोरणात सामरीक कुटनितीचा समावेश हा एक निश्चितच चांगला निर्णय आहे.
(जनरल व्ही. के. सिन्ग बद्दल बरेच वाद आहेत हा भाग वेगळा पण पर्-राष्ट्र व्यवहारात माजी लष्कर प्रमुखांचा समवेश नक्कीच फयद्या चा असेल.)
आधार कार्डाला तशीही सुप्रीम
आधार कार्डाला तशीही सुप्रीम कोर्टाने पाचर मारलेलीच आहे. कर्नाटक सरकारच्या एका स्कीमचा अभ्यासासाठी गेलो असता तेथे पाहण्यात आलेल्या सदानन्द गौडा यांच्या आदेशाने निघालेल्या 'सकाल' या सर्विसेस डिलिव्हरी कायद्याच्या अम्मलबजावणी मुळे सामान्याना मोठाच दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारला आपसातल्या लठ्ठालठ्ठीत सामान्य माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
<<अवजड खाते कमी महत्वाचे कसे
<<अवजड खाते कमी महत्वाचे कसे काय झाले हे काही लक्षात येत नाही.>> सहमत
शिवसेना खरोखर संभ्रमित आहे की उद्धव टीम कडे पुरेशी परिपक्वता नाही?
देशाचा कारभार चालवणे हे एखाद्या प्रान्तिक पक्षाचे राजकारण खेळण्याएवढे साधे-सोपे नसते !
रुसवे-फुगवे आणि कुरबुरी करून उपयोग नाही !त्यातून सेनेला मिळालेल्या भव्य -दिव्य यशामागे "मोदी-लाटे"चाही मोठा प्रभाव अन सहभाग आहे, हे विसरू नये!
आज बाळासाहेब असते तर वेगळी परिस्थिती असती!
<< भाजप-मनसे युती>> अशक्य वाटते. पोकळ भाषणबाजी ला लोक भुलणार नाहीत . सोशल मीडिया मध्ये यावेळी राज ठाकरे यांचेबद्दल लोकांचा राग उफाळून आला होता . "बोलबच्चन"गिरी बस्स झाली ... नाशिक मध्ये काय करून दाखवलेत ?
हुडांना बरीच थेट माहिती आहे
हुडांना बरीच थेट माहिती आहे (अर्थातच). हूड, बाकीच्या सगळ्याच मंत्र्यांवर तुमचा काय टेक आहे ते लिहा की
आणि पाकिस्तान कशाला, तुमचे परममित्र झक्की अमेरिकेला बोलावतील ना तुम्हाला वेळ पडल्यास
रॉबिनहूड सध्याच्या परिस्थितीत
रॉबिनहूड
सध्याच्या परिस्थितीत जर काही सगळ्यात महत्त्वाचे स्थित्यंतर गरजेचे आहे आणि तशी चिन्हेही दिसून येत आहे तर ते आहे मंत्र्यांची राजकीय ईच्छाशक्ती. असतील थरूर प्रचंड अनुभवी, असेल त्यांच्याकडे युनोचा दांडगा अनुभव पण ईच्छाशक्तीचे काय ?
जनतेला भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ पंजापेक्षा जास्त आवडले म्हणून नाही, मोदींचे व्यक्तिमत्व राहूल गांधींपेक्षा वजनदार आहे म्हणून नाही तर फक्त आणि फक्त मोदींनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय ईच्छाशक्ती व्यक्त केली आणि त्याबद्दल जनतेचा विश्वास संपादन केला म्हणूनच त्यांना बहूमत मिळाले ना? हीच ईच्छाशक्ती काँग्रेसने दाखवली असती आणि तुमच्या मते अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी आणि प्रचंड आवाका असलेल्या थरूर सारख्या नेत्यांनी ती ईच्छाशक्ती प्रत्यक्षात ऊतरवली असती तर काल राहूल गांधी श्यपथ घेतांना दिसले असते.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते फक्त काही लाखात असतील पण शेकडो कोटींची सामान्य जनता जिला फक्त विकास आणि समस्यांवर ऊपाय ह्याच्याशी देंंघेणं आहे तिला भाजप की कॉग्रेस सत्तेवर आहे त्याने फरक पडत नाही, तिला फक्त परफॉर्मरची अपेक्षा असते.
शिवसेना खरोखर संभ्रमित आहे की
शिवसेना खरोखर संभ्रमित आहे की उद्धव टीम कडे पुरेशी परिपक्वता नाही?>>> नसणारे उपद्रव मुल्य जोखताहेत.
पण सामान्य जनता जिला फक्त
पण सामान्य जनता जिला फक्त विकास
आणि समस्यांवर ऊपाय ह्याच्याशी देंंघेणं
आहे तिला भाजप की कॉग्रेस सत्तेवर आहे
त्याने फरक पडत नाही, तिला फक्त
परफॉर्मरची अपेक्षा असते.>>>>> you said it !
या मुळेच मोदी जिंकले आहेत
09:23 PMअवजड उद्योग मंत्रालय
09:23 PMअवजड उद्योग मंत्रालय स्वीकारायचं की नाही, यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या निर्णय घेतील; केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचं स्पष्टीकरण
>>> खासदाराने मंत्रीपद स्वीकारायचे कि नाही हे पक्षप्रमुख ठरवणार. परत येरे माझ्या मागल्या.... नाही स्विकारल तर मला आश्चर्य वाटेल. receiving end does not have choice.
ते आधार कार्डाचं काय करायचं
ते आधार कार्डाचं काय करायचं आता??? >>> आधार कार्डाची वाट मनमोहनसिंगांनी लावली आहे.
निलकेणी आणि चिदंबरम हे मनमोहनांना एकदा भेटले तेंव्हा निलकेणी म्हणाले की हाच सिटिझन डिबी असायला हवा. ( जे मी एका दुसर्या बाफ मध्ये मांडले, पण तेंव्हा ते आर्टिकल वाचले नव्हते) आणि चिदंबरम म्हणाले की नाही, निलकेणी ह्या विषयासाठी चिंदबरम ह्यांना घेऊन काही तरी उपाय निघेल म्हणून मनमोहनांना भेटले तर त्यांनी काय उत्तर द्यावे? तुमचे तुम्ही पाहून घ्या अन तोडगा काढा म्हणे ! चिदंबरम आणि मनमोहन ह्या दोघांनी वाट लावली पण मनमोहन हे पंतप्रधाण होते त्यांनी निलकेणी जे म्हणत होते त्याला समजून घ्यायला हवे होते. आणि आपल्या अधिकारात जे देशासाठी योग्य आहे तो निर्णय घ्यायला हवा होता. त्यांच्या कुणाला दुखवू नये, मौन साधावे अन वेळ मारून न्यावी ह्या धोरणाने खूप नुकसान झाले अन्यथा आज आधार कार्ड डिबी हा सिटिझन डिबी झाला असता अनेक गोष्टी (गुंडागिरी ते पेन्शन) ह्यावरन ट्रॅक करता आले असते.
हे आर्टिकल टाईम्स ऑफ इंडिया मध्ये ३ आठवड्यांपूर्वी संडे टाईम्स मध्ये आले आहे. ते वाचून मला मग मीच काढलेल्या बाफवर लिहायची इच्छा झाली नाही.
असो.
थरूर जागरूक अन हुशार म्हणून इतर सर्व हुशार नसतील असे कश्यावरून समजायचे? काही काळ द्या की कोण कसे आहे ते पाहायला.
(बाकी थरूर ह्यांचे सामान्य जनतेबद्दलचे बोलणे काहींना पटते ह्यावरून आश्चर्य वाटले, ते असोच)
09:23 AMअखेर शिवसेनेचे नाराज
09:23 AMअखेर शिवसेनेचे नाराज खासदार अनंत गीते पदभार स्वीकारण्यासाठी राजी झाले. आज पदभार स्वीकारणार.>>>>
झकास .... देर आये दुरुस्त आये. ९.२३ PM ते ९.२३ AM
मोदी काही शिवसेनेला बधणारे
मोदी काही शिवसेनेला बधणारे नाहीत. त्यामुळे सेने कडे तसाही पर्याय नव्हता. युती फुटली तर भाजपा स्वबळावरही येऊ शकते हे सेनेलाही माहिती झाले आहे.
>>>>> खासदाराने मंत्रीपद
>>>>> खासदाराने मंत्रीपद स्वीकारायचे कि नाही हे पक्षप्रमुख ठरवणार. परत येरे माझ्या मागल्या.... नाही स्विकारल तर मला आश्चर्य वाटेल. receiving end does not have choice. <<
आणी स्विकारलं तर मला आश्चर्य वाटेल, शिवसेनेचा बदलता स्टँड बघुन...
अहो घेतल कि. न घेउन सांगतात
अहो घेतल कि. न घेउन सांगतात कुणाला. आज घेतल नस्त तर आठवलेंना मिळालं असत मंत्री पद, शिवसेनेच्या कोट्यातुन आणि हे मंत्री बसले असते बिन खात्याचे होउन.
मोदी काही शिवसेनेला बधणारे नाहीत. त्यामुळे सेने कडे तसाही पर्याय नव्हता. >>> +१ पर्याय नाही आणि नसेल. विधानसभा निवड्णुन्कित शिवसेना पक्षप्रमुखांच्या मुत्सद्दीगिरीची कसोटी लागणार.
आता थोड्याच वेळात अधिकृत पणे
आता थोड्याच वेळात अधिकृत पणे मंत्रीमंडळाच्या विस्तारात मिळणार्या स्थानाबद्दल बातमी येइल.
उद्धवची अगदि गोची झालेली
उद्धवची अगदि गोची झालेली आहे... विधानसभानिवडणुकांच्य्ा वेळेला अमीत शहाला कसं हँडल करतात ते पाहुया.
अजय माकन ह्यांनी सुरुवात
अजय माकन ह्यांनी सुरुवात केलेली आहे...
अजय माकनचा पाॅइंट वॅलिड आहे.
अजय माकनचा पाॅइंट वॅलिड आहे. मंत्री कमीतकमी पदवीधर तरी असावा. इराणीबाई एव्हढ्या बीझी होत्यी की त्यांना एखादि पदवी सुद्धा घेता येउ नये?
बाकी अच्छे दिन खरच आले असे
बाकी अच्छे दिन खरच आले असे दिसुन येते
निवडणुक जिंकली नाही तरी कॅबिनेट मिनिस्टर ते ही दोन दोन खाती
अंधा मांगे एक आंख मिले दो दो.
राज, यशवंतराव चव्हाण तर अवघे
राज,
यशवंतराव चव्हाण तर अवघे चौथी पास होते. याची संगती कशी लावायची? पुस्तकी शिक्षण काय कामाचं!
आ.न.,
-गा.पै.
सुशिक्षित असून काँग्रेसच्या
सुशिक्षित असून काँग्रेसच्या मंत्र्यांनी काय दिवे लावले? इथे शशी थरुरचे अवास्तव कौतुक चालले आहे, पण त्याचे कर्तृत्व काय? घंटा? हेअरस्टाईल मिरवत कॅटल क्लास सारखे हिणकस शेरे मारत फिरणे एवढंच!
मनमोहन सिंग मोठ्ठे अर्थतज्ञ होते..........१० वर्षात काय दिवे लावले? घंटा!!
शिक्षण आणि कर्तृत्व यांचा असा संबंध लावणार्या अजय माकन यांच्या बद्दल न बोललेलेच बरे.
इडलीवाला, हिमालयाच्या मदतीला
इडलीवाला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला तेही चाटूगिरीमुळेच का?
आ.न.,
-गा.पै.
<यशवंतराव चव्हाण तर अवघे चौथी
<यशवंतराव चव्हाण तर अवघे चौथी पास होते. याची संगती कशी लावायची?>
लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार यशवंतराव चव्हाणांचे महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्येही त्यंचे शिक्षण झाल्याचे म्हटले आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेकांनी आंदोलनात उतरताना आपल्या शिक्षणावर पाणी सोडले होते; उशिराने पूर्ण केले होते.. वसंतदादा पाटलांसंबंधीची एक आठवण वाचल्याचे आठवते. विधानसभेत विरोधी पक्षाकडून ते मॅट्रिकही नसल्याचा हीन उल्लेख झाला, तेव्हा अन्य एका विरोधी आमदारानेच त्यांचे शिक्षण अपुरे का राहिले ते सांगितले.
कृपया यशवंतराव चव्हाण यांचं
कृपया यशवंतराव चव्हाण यांचं 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र वाचा.
मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध - http://kharedi.maayboli.com/shop/Krishnakath.html
रुपये तीनशेपेक्षा अधिक खरेदीवर शिपिंग मोफत.
कृष्णाकाठ त्यांनी कोणाकडून
कृष्णाकाठ त्यांनी कोणाकडून तरी लिहून घेतले असेल.
चिनूक्स, माझ्या माहितीप्रमाणे
चिनूक्स, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अॅडमिन आहात, आणि इथे येवुनही गेला आहात.
<<<<यशवंतराव नेहरुचा चाट्या होता. त्याचे कसलेही कर्तृत्व नव्हते.>>> हे शेलके प्रतिसाद चालतात का इथे?
निवांत पाटील, मी व्यवस्थापक
निवांत पाटील,
मी व्यवस्थापक आहे, प्रशासक नव्हे. अॅडमिन यांना या प्रतिसादाबद्दल सांगितले आहे.
मी व्यवस्थापक आहे, प्रशासक
मी व्यवस्थापक आहे, प्रशासक नव्हे. > ओके.
केदार, आधार कार्ड बद्दल
केदार,
आधार कार्ड बद्दल अनुमोदन,
आधार कार्ड असे असावे कि ज्यात चीप असुन त्या नागरीकाची सर्व माहीती एकाच वेळी उपलब्ध व्हावी.
बाकी सर्व आखाती देशात असे एक कार्डच असते ज्याच्या शिवाय कोणालाही कुठचाही व्यवहार करताच येत नाही.
आपल्या कडे,
१. अॅड्रेसप्रूफ साठी
२. फोटॉ प्रूफ साठी
३. रेल्वे साठी
४. बस साठी
वेगवेगळे आय कार्ड देतात,
आधार कार्ड तर सर्वात मोठा जोक आहे. ज्याचे पैसे ही सरकारच देते.
Pages