निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!
तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?
घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?
लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?
येणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?
पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?
आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?
हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!
अपोझिशन मध्ये बसणार्यांच्या जागा पलिकडे आहेत.
स्मृती इराणीने २००४ मधे खोटी
स्मृती इराणीने २००४ मधे खोटी माहिती दिली होती?
काहीही अहो ते टनल
काहीही
अहो ते टनल पंतप्रधानांच्या हालचाली सोप्या व्हाव्यात आणि त्यांचा ताफ्याचा आणि सुरक्षाकवचाचा त्रास लोकांना होऊ नये, वाहतूकीवर ताण पडू नये म्हणून बांधला आहे. त्याचे कामही मागच्या ४ वर्षांपासून चालू आहे.
त्यात गोपनीयतेचा आणि टनलची खरंच गरज होती का वगैरे प्रश्नांचा काय संबंध?
खोटी शैक्षनिक अर्हता सान्गणे
खोटी शैक्षनिक अर्हता सान्गणे हा गुन्हा आहे असे मी लिहिले >>> ओके.
मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही! १० वर्ष सत्ता आणि ५ वर्ष विरोधी पक्षाचं नेतेपद, तेव्हा कुठं गुन्हा नव्हता का! केंब्रिज विद्यापीठातुन पदवी आणि रागा M. Phil!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/corrupt-minister-in-cabine...
त्यात गोपनीयतेचा आणि टनलची
त्यात गोपनीयतेचा आणि टनलची खरंच गरज होती का वगैरे प्रश्नांचा काय संबंध?>> +१
मला अचानक असं वाटायला लागलंय की लोकांना काही गोष्टी पहिल्यांदाच समजल्यासारखं त्यावर रीअॅक्ट होत आहेत.
उदा: मानव संसाधन खातं हे शिक्षणासंदर्भात आहे म्हटलं की लगेच स्मृती इराणीच्या शिक्षणामुळे अख्ख्या भारतातलं शिक्षण बोंबलणार आहे. बाबांनो, ती केंद्र सरकारमधली मंत्री आहे. ति एकटी कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. तिला मदत करायला, सल्ले द्यायला नोकरशहा आहेत (जे उच्चशिक्षितच असतात) प्रत्येक राज्यासाठी वेगळा मंत्री आहे, आयआयटी वगैरे साठी गव्हर्निंग काऊन्सिल वगैरे बॉडी आहेत अस्तित्वात. ते काय मूर्ख लोकं नाहीत. आधी तिला काम तर करू द्यात. नाही चांगलं काम केलं तर २०१९ला दाखवता येईलच इंगा. त्याआधी फारच गडबड केली तर पंतप्रधान तिची उचलबांगडी देखील करतील अशी आशा ठेवूयात की.
श्रीयू यांनी लिंक दिलेल्या
श्रीयू यांनी लिंक दिलेल्या बातमीत जर तथ्य असेल आणि त्यातल्या सत्यासत्यतेची पडताळणी ह्याआधी पक्ष म्हणून भाजपाने केलेली असेल तर मोदी आणि थिंकटँकला त्याकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही असे वाटते.
ईराणींच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल ऊठलेले वादळ चहाच्या पेल्यातीलच ठरण्याचे शक्यता जास्त आहे.
अहो तो बोगदा पंप्रच्या
अहो तो बोगदा पंप्रच्या वाहतुकीसाठी बांधत आहेत, तो काय बंकर नाही आहे एखादा.
असो, कोर्स बद्दल जी चर्चा चालू होती, त्यामधे एक आवर्जुन सांगण्यासारखे म्हणजे,
प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने भाजपने एक संस्था निर्माण केली आहे अशा प्रकारच्या राज्यकारभार संबंधित शिक्षणासाठी. त्याचे नाव आहे "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी".
http://rmponweb.org/
आधी तिला काम तर करू द्यात.
आधी तिला काम तर करू द्यात. नाही चांगलं काम केलं तर २०१९ला दाखवता येईलच इंगा. त्याआधी फारच गडबड केली तर पंतप्रधान तिची उचलबांगडी देखील करतील अशी आशा ठेवूयात की. +१००
सचिन तेंडुलकरला क्रिकेटमंत्री
सचिन तेंडुलकरला क्रिकेटमंत्री का केले नाही?
भारताला क्रिकेटमंत्री नसावा? क्रिकेट नसेल तर अर्थमंत्र्याची जागा असून उपयोग काय?
मेनका गांधीला महिला नि बालकल्याण ऐवजी भटके कुत्रे मंत्री करायला पाहिजे होते. कुणा अविवाहित व निपुत्रिक पुरुषाला महिला व बालकल्याण मंत्री करावे म्हणजे तो भावना आड येऊ न देता निर्णय घेईल.
हा हा हा
या महाशयांच्या शैक्षणिक
या महाशयांच्या शैक्षणिक पात्रतेचं काय? : आव्हाडांकडे वैद्यकीय शिक्षण खाते
-गा.पै.
Jitendra Awhad was born to
Jitendra Awhad was born to Smt. Lilavati and Shri Satish Awhad. He went to St John Baptist High School, Thane . In 1981, he completed his HSC in science.jitendra awhad consider shri. sharad pawar as his mentor.
He then went to the B.N Bandodkar College. While in college, he was chosen as Gymkhana Secretary, and became secretary of the All India Students' Organization, a non-political outfit. In the year 1982 he successfully launched a campaign against a rise in tuition fees. Awhad completed his marine engineering studies in 1984-85. He continued to take graduate degree in personnel management. He worked in Kores India Limited, Thane as Asst labour Officer from 1988 to 1995..
http://en.wikipedia.org/wiki/Jitendra_Awhad
----------------
गामा विचारायच्या आधी शोधुन घ्यावे ....
उदयन.., राष्ट्रवादी
उदयन..,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्खलित इंगजी बोलू शकणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींपैकी एकजण जितेंद्र आव्हाड आहे. मात्र माझा आक्षेप वेगळाच आहे. माझ्या माहीतीप्रमाणे या खात्यावर वैद्यकीय डॉक्टर नेमला जातो.
आ.न.,
-गा.पै.
अच्छा....आता तुमचा "आक्षेप"
अच्छा....आता तुमचा "आक्षेप" वेगळा झाला व्हय असो बिचार्यांकडे डाक्टर नसल .. इब्लिस ला येळ न्हाई म्हणुन जे हाईत त्यांच्यातला पकडला
आणि तुमच्या माहीती साठी
आणि तुमच्या माहीती साठी स्मृती इराणी यांनी दिलेलेल्या दोन प्रतिज्ञापत्रात दोन शैक्षणिक उल्लेख केला आहे त्यावर आक्षेप घेतलेले आहे.. त्यांच्या क्षमतेवर अथवा त्यांच्या कामगिरीवर नाही.
पण काय आहे काही जणांना स्वतःवर ओढवुन घ्यायची सवयच आहे बघा ..अश्यांबद्दल काय बोलायचे ?
हायला, अस्खलित की काय
हायला, अस्खलित की काय इंग्रजीची काळजी तुम्हाला कधी वाटायला लागली? एतेन!
>>त्यांच्या क्षमतेवर अथवा
>>त्यांच्या क्षमतेवर अथवा त्यांच्या कामगिरीवर नाही>>
उदयन, त्याच्यावर नंतर आक्षेप घेतले गेले. आधी त्यांचे शिक्षणच काढले होते. बाकी चालुद्या
हो मी पण तेच म्हणतोय
हो मी पण तेच म्हणतोय "शिक्षणच" काढलेले आहे
मोदी पंतप्रधानांच्या अधिकृत
मोदी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात रहायला गेले. तिथे जाण्याआधी त्यांनी तिथे काहीही बदल करायला सांगितले नाहीत, याबद्दल तिथल्या कर्मचार्यांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
NEW DELHI: Narendra Modi on Friday moved into 7 Race Course Road, the official residence of the Indian Prime Minister. Modi didn't asked for any changes to be made before he shifts, something that's surprised officials who are used to incoming occupants of government homes seeking several modifications.
बहुदा मोदींना २०१९ ची जास्त
बहुदा मोदींना २०१९ ची जास्त काळजी आहे. मिडियातुन आपल्या विरोधात कोणतही कारण मिळू नये याची चांगलीच खबरदारी घेत आहे.
दरम्यान "जिवंत व्यक्तीवर पाठ्यपुस्तकात धडा असू नये" असं ट्वीट केलय ते महाराष्ट्र सरकारसाठी होतं का? सचिन काँग्रसकडुन राज्यसभेवर आहे का? का हा योगायोग म्हणावा.
"जिवंत व्यक्तीवर
"जिवंत व्यक्तीवर पाठ्यपुस्तकात धडा असू नये" >> हे बहुदा मध्यप्रदेश भाजपा शिक्षणमंत्र्याला कानपिचक्या असाव्या. ते मोदींवरच धडा घालणार होते.
आवडलं
http://timesofindia.indiatimes.com/india/Dont-include-my-life-in-school-...
आगाऊ, >> हायला, अस्खलित की
आगाऊ,
>> हायला, अस्खलित की काय इंग्रजीची काळजी तुम्हाला कधी वाटायला लागली? एतेन!
मला काळजी नाही. तुम्हाला का तसं वाटतं?
आ.न.,
-गा.पै.
माझ्यामते कायदा
माझ्यामते कायदा मंत्रालयापुढेही प्रचंड कामे आहेत. खटले लवकरात लवकर निकालात कसे काढता येतील, दिरंगाई आणि भ्रष्टाचार कसा टाळता येईल, पोलिसातील आणि कचेर्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षेसाठी न्यायव्यवस्थेत ऊपाययोजना असे बरेच गंभीर प्रश्न आवासून ऊभे आहेत.
कोण आहेत कायदा मंत्री आणि संबंधित राज्यंत्री? प्रशासकीय स्तरावर काही बदल घडून आले आहेत का? त्याबद्दल काही चर्चा चालू आहेत का?
लोकपाल्/जन लोकपाल बद्दल सध्या काहीच ऐकू येत नाही. मोदींचा त्याबद्दल काय विचार आहे?
लोकपाल्/जन लोकपाल बद्दल सध्या
लोकपाल्/जन लोकपाल बद्दल सध्या काहीच ऐकू येत नाही. मोदींचा त्याबद्दल काय विचार आहे?>>>
लोकपाल बिल मागच्या लोकसभेने पास केले ना ?
Pages