निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!
तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?
घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?
लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?
येणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?
पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?
आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?
हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!
अपोझिशन मध्ये बसणार्यांच्या जागा पलिकडे आहेत.
मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री
मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री बनेल तरच महाराष्ट्रात परत येईन
बहूतेक ती आशा नसल्याने मंत्रीपद च्या मागे
बाकी मेनका परत मंत्री तर भटक्या कुत्र्यांचे प्रश्न बोंबलणार
मला कॉर्पोरेट अफेयर्स ची
मला कॉर्पोरेट अफेयर्स ची उत्सुकता आहे कोणाला मिळ्तेय त्याची !
ते जेटलींकडेच असणार असं वाचलं
ते जेटलींकडेच असणार असं वाचलं बहुतेक इकॉनॉमिक ताईम्स वर,,
जाई. मलापण माणुस कोणीका
जाई. मलापण
माणुस कोणीका येईना.. आधी भ्रष्टाचार कमी करुन दाखवा.
जेटली ? ह्म्म्म मागे अनुराग
जेटली ?
ह्म्म्म
मागे अनुराग ठाकुर च नाव चर्चेत होते
मी रवीशंकर प्रसाद यांचं नाव
मी रवीशंकर प्रसाद यांचं नाव ऐकलंय.
सगळे पंतप्रधान असे चिकटून एका
सगळे पंतप्रधान असे चिकटून एका रांगेत बसलेले बघुन एकदम वेगळेच वाटत आहे!
मी मोदींचा समर्थक बनेल
मी मोदींचा समर्थक बनेल .............................. जर मेनका गांधी यांना कॅबिनेट मधे नाही घेतले तर
गडकरींना लॉटरी ..... रेल्वे
गडकरींना लॉटरी .....
रेल्वे बरोबर दळणवळण खाते........ चला मुंबईसाठी खास करुन लोकल गाड्यांसाठी काहीतरी होईल इतकी तरी आशा ठेवायला हरकत नाही. संख्या वाढवु नका फेर्या वाढवा आणि वेळेवर लोकल चालवा इतके केले तरी पुरेसे आहे
लॉटरी तर स्म्रिती इरानी ला
लॉटरी तर स्म्रिती इरानी ला लागली आहे.. एचारडी मिनिस्ट्री! अडतिसाव्या वर्षी, तेही निवडणुकीत न जिंकता..
हे राज्य मंत्री म्हणजे काय
हे राज्य मंत्री म्हणजे काय असते?
कुणीतरी मला सांगा.
स्मृती इराणीने राहुल गांधीला
स्मृती इराणीने राहुल गांधीला टफ फाईट दिली होती, त्यामुळे तिला काहीतरी अपेक्षित होतेच पण चक्क मानव संसाधन मिळाल्याने जबरी खुश झालीअसेल.
नितीन गडकरी शिपिंगदेखील बघणार हे पाहून आमच्या कोकणात परतायच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्य आहेत. आग लागो त्या नारायण राणेला!!!
मंत्रीमंडळात ब्राह्मण कमी
मंत्रीमंडळात ब्राह्मण कमी आहेत. संघाने प्रयत्न करायला हवेत.
कुठे आहे हे खाते वाटप? मी
कुठे आहे हे खाते वाटप?
मी पहिल्या दहा बारा मंत्र्यांचे शपथविधी लाईव पाहिला त्यात कुठे खातेवाटप दिसले नाही.
मेनका गांधी ला मुळातच
मेनका गांधी ला मुळातच मन्त्रिपद कशाला ?
गान्धी घराण्याचे भूत अजून उतरत नाही का?
नजमा हेपतुला यांचे नाव बघून मात्र आश्चर्य वाटले.... कदाचित उत्तम प्रशासकीय अनुभव म्हणून त्याना घेतले असावे . मुख्तार अब्बास नकवी किंवा रविशंकर प्रसाद / यशवन्त सिन्हा / सुब्रह्मण्यम स्वामी यांचे नाव येण्याची अपेक्षा होती!
असो!
माननीय पन्तप्रधान नरेन्द्रजी मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमण्डळास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्री
श्री
मनेका गांधीला विमेन अॅन्ड
मनेका गांधीला विमेन अॅन्ड चाइल्ड केअर मिळाले. पर्यावरण आणि वनखाते तसंच आयबी मिळाले आहे पुण्याच्या प्रकाश जावडेकरांना.
स्मृती इराणीला मंत्रीमंडळात पाहून मलाही आनंद झाला. चांगलं काम करेल ती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाला उत्तम कारभाराकरीता मनःपूर्वक शुभेच्छा.
मंत्री मंडळात तरुण आणि नवीन
मंत्री मंडळात तरुण आणि नवीन चेहरे बघून आनंद झाला.
समारंभाला सगळे सार्क देशांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते बघून समारंभाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित झाले.
भारताचे नविन पंतप्रधान म्हणून मोदी उत्तम काम करतील अशी आशा वाटते.
रावणराज जाऊन रामराज्य येईल.
रावणराज जाऊन रामराज्य येईल.
आग लागो त्या नारायण
आग लागो त्या नारायण राणेला!!!>>>>> कोकण बिघडवल राणेने
अगदी बिहार करून सोडलेला
संरक्शण मोदिंकडे कि
संरक्शण मोदिंकडे कि जेटलींकडे?
पियू हे पाहा
पियू हे पाहा
www.wikipedia.org/wiki/Minister_of_State
इथे यादी पाहता येईल
इथे यादी पाहता येईल
www.maharashtratimes.indiatimes.com/nation/Modi-Cabinet/articleshow/3562...
नंदिनी, शर्मिला अगदी, अगदी !
नंदिनी, शर्मिला अगदी, अगदी ! स्मृती इराणीला पाहून मलाही फार आनंद झाला
मटा ऑनलाइन वृत्त । नवी
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शाही सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचवेळी, 'टीम मोदी'मधील २३ कॅबिनेट, १० राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १२ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सात महिलांचा समावेश असून स्मृती इराणी सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत.
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंह - गृह
सुषमा स्वराज - परराष्ट्र व्यवहार
अरुण जेटली - अर्थ आणि संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार
व्यंकय्या नायडू - नगरविकास
नितीन गडकरी - परिवहन आणि जहाज बांधणी
सदानंद गौडा - रेल्वे
उमा भारती - अजून खातेवाटप नाही
नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्याक
गोपीनाथ मुंडे - अजून खातेवाटप नाही
रामविलास पासवान - अन्न आणि नागरी पुरवठा
कलराज मिश्र - अजून खातेवाटप नाही
मेनका गांधी - महिला आणि बालविकास
अनंत कुमार - संसदीय कार्य अधिक अतिरिक्त कार्यभार
रविशंकर प्रसाद - दूरसंचार, विधी आणि न्याय
अशोक गजपतीराजू पुसपती - अजून खातेवाटप नाही
अनंत गिते - अजून खातेवाटप नाही
हरसिमरतकौर बादल - अजून खातेवाटप नाही
नरेंद्रसिंग तोमर - अजून खातेवाटप नाही
ज्युवेल ओराम - अजून खातेवाटप नाही
राधामोहन सिंग - कृषी
थावरचंद गेहलोत - अजून खातेवाटप नाही
स्मृती इराणी - मनुष्यबळ विकास
हर्षवर्धन - अजून खातेवाटप नाही
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
व्ही. के. सिंह - अजून खातेवाटप नाही
इंद्रजितसिंग राव - अजून खातेवाटप नाही
संतोष कुमार गंगवार - अजून खातेवाटप नाही
श्रीपाद नाईक - अजून खातेवाटप नाही
धर्मेंद्र प्रधान - अजून खातेवाटप नाही
सर्वानंद सोनवाल - अजून खातेवाटप नाही
प्रकाश जावडेकर - माहिती आणि प्रसारण
पियुष गोयल - ऊर्जा
डॉ. जितेंद्र सिंग - अजून खातेवाटप नाही
निर्मला सीतारामन् - वाणिज्य
राज्यमंत्री
जी. एम. सिद्धेश्वर - अजून खातेवाटप नाही
मनोज सिन्हा - अजून खातेवाटप नाही
निहाल चंद - अजून खातेवाटप नाही
उपेंद्र कुशवाह - अजून खातेवाटप नाही
पोन राधाकृष्णन - अजून खातेवाटप नाही
किरण रिजीजू (अरुणाचल प्रदेश) - अजून खातेवाटप नाही
श्रीकृष्ण पाल गुज्जर (हरियाणा) - अजून खातेवाटप नाही
डॉ. संजीवकुमार बालियान (उत्तर प्रदेश) - अजून खातेवाटप नाही
मनसुखभाई वसावा (गुजरात) - अजून खातेवाटप नाही
रावसाहेब दानवे (महाराष्ट्र) - अजून खातेवाटप नाही
विष्णू देवसाई (छत्तीसगड) - अजून खातेवाटप नाही
सुदर्शन भगत (झारखंड) - अजून खातेवाटप नाही
म्हणजे गृह, संरक्षण, अर्थ,
म्हणजे गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार, HRD यापैकी मोदींनी स्वतः कडे काहीच नाही ठेवलं तर.
लोकसभा स्पीकर म्हणून जोशी का
लोकसभा स्पीकर म्हणून जोशी का अडवाणी?
आशू आता वाटले सगळे
आशू आता वाटले सगळे
अमित लोकसभा अध्यक्ष म्हणून
अमित लोकसभा अध्यक्ष म्हणून अड़वाणी आणि सुमित्रा महाजन ही नावे चर्चेत होती
संरक्षण मोदी स्वतःकडे ठेवतील
संरक्षण मोदी स्वतःकडे ठेवतील कदाचित. जेटलींकडे "संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार" सोपविला आहे.
Pages