तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.
आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !
कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.
आज त्यांना कोर्टाने परत एकदा सुनावले की हया केसला प्रेस्टिज इश्यू तुम्ही का बनवत आहात? भुषण पितापुत्रांनी मग तिहार कडे धाव घेऊन एकदाचे केजरीवालांना समजावून सांगीतले आणि ड्राम्यावर पाणी पडले.
ह्या चालीत त्यांना वाटले की ते जेल मध्ये जाऊन महात्मा गांधी होतील. भारतीय जनतेचे दुर्दैव की त्यांना केजरीवालसारख्या लोकांना डोक्यावर घ्यावे लागले कारण पुढे कोणीही नव्ह्ते.
दरम्यान आपच्या नेत्यांमध्ये बेबनाव झाला आहे आणि दोघांनी (शाजिया इल्मी आणि कॅप्टन गोपीनाथ) राजीनामे पण दिले.
"आप" प्रयोग फसणे हे दुर्दैवी आहे पण ज्या रितीने अण्णांपासून वेगळे होऊन आप निर्मिली गेली, त्यातच तिच्या अपयशाची बीजे रोवली होती.
तरी एवढे फुटेज का द्यायचे? तर भारतीय राजकारणात आप खरच आप सारखी वागली असती तर त्या पार्टीला खूप मोठे भविष्य होते.
तर भारतीय राजकारणात आप खरच आप
तर भारतीय राजकारणात आप खरच आप सारखी वागली असती तर त्या पार्टीला खूप मोठे भविष्य होते >>> +१. केजरीवालला ADHD झाल्यासारखे वागत आहेत. आप स्थापन करण्याचा मूळ हेतू काय होता, आता वागतात काय... सगळंच चीपो. त्या राखी सावंतनेही केजरीवालपेक्षा कमी नौटंकी केली या निवडणुकीत. स्वतःचं हसं करून घेण्यापलिकडे आपच्या काहीही हाती लागलं नाही.
केजरिवाल स्वतःचं हंसू करून
केजरिवाल स्वतःचं हंसू करून घेताहेत त्याचं दुख नाहीं पण लोक ज्या आशेने, गांभीर्याने व ज्या हेतूने त्यांच्या पाठीशीं उभे राहिले त्या लोकांना व त्या हेतूला ह्यामुळे ते हास्यास्पद ठरवताहेत, हें खरंच अक्षम्य आहे.
केजरिवाल स्वतःचं हंसू करून
केजरिवाल स्वतःचं हंसू करून घेताहेत त्याचं दुख नाहीं पण लोक ज्या आशेने, गांभीर्याने व ज्या हेतूने त्यांच्या पाठीशीं उभे राहिले त्या लोकांना व त्या हेतूला ह्यामुळे ते हास्यास्पद ठरवताहेत, हें खरंच अक्षम्य आहे. >> +१
खरयं भाऊ !
खरयं भाऊ !
खरं तर मिडीयांनी त्याना नको
खरं तर मिडीयांनी त्याना नको तितक्या ऊंचीवर नेऊन ठेवले, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मग त्या अपेक्षांना ते पुरे पडले नाहीत.
मिडियाला पण असे पोकळ ठोकळे हवेच असतात, त्यांचा टी आर पी वाढल्याशी कारण आणि लोकांना पण विंचू मारण्यासाठी दुसर्याचीच वहाण हवी असते.
माझ्या मते हा सब्जेक्ट
माझ्या मते हा सब्जेक्ट लोकांसाठी विस्मरणात जात आहे आणि लवकरच आउट ऑफ मिडीया कव्हरेज होइल.
नि.पा... मला अगदी शिकागो
नि.पा... मला अगदी शिकागो म्यूझिकल आठवला... नवा बकरा मिडीयाला मिळाला कि जून्याचे पोतेरे होते.
खुजलीवालचे आप हे अग्रवाल(
खुजलीवालचे आप हे अग्रवाल( गोयंका) ग्रुप व अंबानी ग्रुपच्या कॉर्पोरेट भांडणाचे अपत्य आहे.त्यापेक्षा त्याला जास्त महत्व नाही.
केजरिवाल स्वतःचं हंसू करून
केजरिवाल स्वतःचं हंसू करून घेताहेत त्याचं
दुख नाहीं पण लोक ज्या आशेने, गांभीर्याने
व ज्या हेतूने त्यांच्या पाठीशीं उभे राहिले
त्या लोकांना व त्या हेतूला ह्यामुळे ते
हास्यास्पद ठरवताहेत, हें खरंच अक्षम्य आहे.
>> +१
केजरिवाल स्वतःचं हंसू करून
केजरिवाल स्वतःचं हंसू करून घेताहेत त्याचं दुख नाहीं पण लोक ज्या आशेने, गांभीर्याने व ज्या हेतूने त्यांच्या पाठीशीं उभे राहिले त्या लोकांना व त्या हेतूला ह्यामुळे ते हास्यास्पद ठरवताहेत, हें खरंच अक्षम्य आहे.>> भाऊ +1
हे बऱ्याच जणांच्या दिल्ली फियास्को नंतर लक्षात आले पण माझे काही मित्र मैत्रिणी इथे (अमेरिकेत) बसून आआप चा प्रचार करत होते. मला वाटते त्यांचे डोळे आता तरी उघडावेत!
>> लोक ज्या आशेने,
>> लोक ज्या आशेने, गांभीर्याने व ज्या हेतूने त्यांच्या पाठीशीं उभे राहिलेत्या लोकांना व त्या हेतूला ह्यामुळे ते
हास्यास्पद ठरवताहेत, हें खरंच अक्षम्य आहे. <<
भाऊ, हेतूला अक्षम्य ठरवणे चूक समजू शकतो. पण लोकांना हास्यास्पद ठरवण्यात काय चूक आहे? लोकांचं चुकलं की ते वाहवत यांच्या मागे गेले. लोकांनी चुकीच्या ठिकाणी आशा ठेवली. यापुढे 'आपला तारणहार' भावनेतून समाज बाहेर पडला तर चांगलं आहे. त्यावेळी सुद्धा मला टीव्हीवर अण्णांच्या धरसोड वृत्तीवर १-२ लोकं ज्यांनी पूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेले यांची मुलाखत पाहिल्याचं आठवतं.
आआपा ला कायदा, नियम/ कायदे
आआपा ला कायदा, नियम/ कायदे काय आहेत, कशासाठी असतात हे माहित नाही, आणि माहिती करवुन घ्यावी असेही वाटत नाही.
दिल्ली राज्यात सरकार स्थापन केल्यावर स्वत: न्याय मन्त्री रात्री कॅमेर्याच्या आणि शेकडो कार्यकर्त्यान्च्या समोर पोलिसान्ना आदेश देत होते... अक्षरश: पोर खेळ होता... मन्त्र्याला कायदा माहित नसणे एकवेळा समजतो, पण त्यानन्तर चार दिवसात मुख्यमन्त्र्यान्ना कायदा काय आहे हे जाणुन घेता आले असते (अचुक माहिती देण्यासाठी सचिव हाताशी होते ना?). कायदा जाणायचा नाही, पाळायचा नाही आणि माहिती करवुन घ्यायची नाही... पण निषेध म्हणुन राजघाटावर उपोषणाला बसायची तयारी करायची...
राज्यपालाना मध्यस्थी करायला सान्गुन चार तासात उपोषणाचा गाशा गुन्डाळावा लागला... त्यानन्तर राजिनामा दिला... आता परत दिल्लीत सरकार स्थापण्यासाठीचे प्रयन्त करत आहेत. पाठिम्बा देणार कोण कशासाठी?
IRS सारख्या अधिकार्याला निवडणुक आचार सन्हिता जाहिर झाल्यवर कारभारातील बदल काय असतात याची माहिती नसणे सखेद आश्चर्य वाटते.
विरोधात राहुन टिका करणे खुप सोपे असते पण सरकार स्थापन करायला मिळाल्यावर काहीतरी करुन दाखवायचे होते, एक चालुन आलेली अमुल्य सन्धी सोडली. आणि आता जनतेचा विश्वासही गमावुन बसलेत.
<< ... पण लोकांना हास्यास्पद
<< ... पण लोकांना हास्यास्पद ठरवण्यात काय चूक आहे? >> कारण, मिडीयाच्या रेट्यामुळे नाही तर 'भ्रष्टाचार निर्मूलन' व 'पारदर्शकता' हा अजेंडा घेवून लढणारा पक्ष म्हणून लोकानी उत्स्फुर्तपणे 'आप'ला प्रतिसाद दिला, असं मला तीव्रतेने वाटतं. 'आप'च्या निमित्ताने कां होईना पण लोकांच्या मनात ह्या गोष्टीना किती अग्रक्रम आहे याचा संदेश सर्वच पक्षाना निश्चितपणे गेला आहे,हेंही जाणवतं. नविन मंत्रीमंडळाचा पहिलाच महत्वाचा निर्णय काळ्या पैशाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा असावा, ही देखील लोकांच्या मनातील या अग्रक्रमाची दखल घेणंच आहे, असं म्हणणंही वावगं ठरूं नये.
उदय, >> आणि आता जनतेचा
उदय,
>> आणि आता जनतेचा विश्वासही गमावुन बसलेत
केजरीवाल या माणसाला फक्त मोदींची मतं खायची होती. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हा त्यांच्या मार्गातील धोंडा ठरलं. केजरीवालने दिल्लीत जो ४९ दिवसांचा तमाशा मांडला तो जर नसता तर आआपचे १० खासदार तरी आले असते. अशा रीतीने राष्ट्रीय पातळीवर केजरीवाल सुस्थापित झाला असता. शिवाय मोदींची मतं खाल्ली असती ती वेगळीच.
आ.न.,
-गा.पै.
भाऊकाकांच्या पोष्ट्स >
भाऊकाकांच्या पोष्ट्स > +१
बाकी आपला भाजपाची मते खायची होती हा कल्पनाविलासच आहे.
>>बाकी आपला भाजपाची मते खायची
>>बाकी आपला भाजपाची मते खायची होती हा कल्पनाविलासच आहे
कल्पना नाही अन विलास नाही. जर असे नसते तर त्यांचे टारगेट जास्त करून भाजपच का होते ?
ऑरोबिन्दोबाबू बनारस मधेच का गेला ? अमेठीत का नाही गेला ?
महेश, आप आणि काँग्रेसची
महेश, आप आणि काँग्रेसची मैत्री कशी पटकन ओळखू येते नाही?!
आआप ने भारतिय राजकारणात एक
आआप ने भारतिय राजकारणात एक गोष्ट आनायचा प्रामाणिक प्रयत्न केला
तो म्हणजे क्लिन पोलिटिक्स
पण आप भरकटलि हे भारतियांचे दुर्दैव
आपचा स्टॅन्ड नेहमी "आम्ही
आपचा स्टॅन्ड नेहमी "आम्ही म्हणले ते बरोबर, आमच्या विरोधात ते देशाच्या विरोधात" असा असतो.
शिवाय आप नेहमी न्यायाधिशाचा स्टॅन्ड घेऊन असते.
(अर्थात मायबोलीवर पण बरेच न्यायाधिश आहेत ती गोष्ट अलहिदा ! )
(अर्थात मायबोलीवर पण बरेच
(अर्थात मायबोलीवर पण बरेच न्यायाधिश आहेत ती गोष्ट अलहिदा ! )>>>
केदार
नुकतेच प्राथमिक शाळेत दाखल
नुकतेच प्राथमिक शाळेत दाखल झालेल्याने पीएचडी साठी अर्ज करण्यासारखेच सारे
करायलाही हरकत नाही. पण आजकाल रियाझ करायची तयारी कोणाचीच नाही.
पहिल्या दिवशी आंदोलन, दुसर्या दिवशी राज्यात सत्ता आणि तिसर्या दिवशी केंद्रात सत्ता
असे चट मंगनी पट ब्याह पाहिजे आहे.
ही प्रवृत्ती केवळ राजकारणातच नव्हे तर सगळीकडेच फोफावत चालली आहे देशात
लवकरच या विषयावर एक धागा येणार आहे. तो पर्यंत कुठेही जाऊ नका पहात रहा बाकीचे धागे.
तो म्हणजे क्लिन पोलिटिक्स>>>
तो म्हणजे क्लिन पोलिटिक्स>>> आपने नक्की कशा प्रकारे क्लीन पॉलिटीक्स केले ते समजू शकेल का?
माझ्या स्पष्ट मतानुसार, आप हे एकंदरीत लोकशाहीसाठी अत्यंत घातक वळण होते. ते लवकर संपले ते एका अर्थाने बरेच झाले. आम्हाला विरोध करायचा आहे, तो आम्ही जोरकसपणे करणार. पण आम्हाला कसलीही जबाबदारी नको. आम्ही असलेले कायदे मानत नाही. आम्ही कुणालाही काय वाट्टेल ते बोलणार. आम्हाला कोण काय बोललं की आम्ही रडीचा डाव खेळणार. आम्ही मुख्यमंत्री झालो तरी धरण्याला, उपोषणाला बसणार. पण आम्ही कारभार करणार नाही. सगळंच अत्यंत बालिश आणि हास्यास्पद. दिल्लीच्या जनतेने आपला उत्तम संधी देऊ केली होती. त्याचे नक्की काय लोणचे घातले? कॉम्ग्रेसचा पाठिंबा घेतला ही एकवेळ समजू शकतो पण अवघे ४९ दिवस सरकार चालवून नंतर लहान पोरागत गळा काढून राजिनामा देऊन जनतेची एका अर्थाने मस्करी केली. यासाठी जनतेने निवडून दिले होते का? की दिल्ली राज्य सरकार ही काय फार महत्त्वाची बाब्च नव्हती. आणि लगोलग धावले मोदींविरूद्ध निवडणूक लढायला. तुमचा स्टॅन्ड काये? भ्रष्टाचाराविरोधात लढणे, मग ज्यावर ऑलरेडी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, केसेस चालू आहेत. तिथे निवडणूक लढव ना. तिथे तुझा काय तो मुद्दा मांड की. मोदींच्या विरोधात उभं राहिलं तर टीआरपी जास्त मिळेल हे न समजण्याइतकी देशातली जनता काय *** आहे?? गुजरातमधे अवघे काही तास काढून "तिथे काय बी प्रगती नाय झाली, जिथे हाय तिथे वीज नाय" हे ट्विटरवरून सटासट टाकत सुटतोस, ते काय लोकांना समजत नाही? आचार संहिता लागू झाल्यावरचे प्रोटोकॉल समजून न घेता त्यानुसार न वागता बोंबाबोंब करत सुटायचं. बाकीचे काय चर्खमू आहेत?? गडकरीचं नाव भ्रष्ट नेत्यांमध्ये घ्यायचं, पण त्याने डिफेमेशनची केस फाईल केल्यावर "आमी नाय देत ज्जा" म्हणत कोर्टात भांड्त सुटायचं. देशभरामधेय पैसे घेऊन ४३२ उमेदवार उभे करायचे. पण त्यांचा त्या मतदारसंघाशी काहीही संबंध नसला तरी चालेल. त्यांनी केवळ "आम आदमी" म्हणत लोकांपुढे मते मागायची. उमेदवाराला "तुम्ही कोण?" हा प्रश्न विचारायचा नाही. (आधी प्रश्न विचारायला त्यातले किती उमेदवार मतदारसंघात गेले हा वेगळाच मुद्दा आहे!!!) पण निवडून आलं नाही तरी बोंबाबोंब करण्यासाठी नवीन नाटकं शोधायची.
या देशाच्या निवडणुका, राज्य चालवणारे, विरोधी पक्ष, न्यायव्यवस्था या सर्वांचा चक्क मजाक बनवला होता या आपने. एक दोनदा ही फिल्मी नाटकं भावतात नंतर ती केवळ हास्यास्पद होत जातात. लोक असली पिक्चह्र थेटरात बघणं पसंद करतात, देशामध्ये नव्हे!! साला घडी घडी नौटकी करता है.
नंदिनी, तुमच्या संपूर्ण
नंदिनी,
तुमच्या संपूर्ण पोस्ट ला प्रंचंड अनुमोदन ....
अगदी मनातले
हिंदुस्तानासारख्या अवाढव्य
हिंदुस्तानासारख्या अवाढव्य देशाची राजधानी प्रशासनाच्या दॄष्टीने दिल्लीऐवजी मध्यवर्ती ठीकाणी असणं योग्य , हा विचार शहाणपणाचा होता पण तो अंमलात आणताना जी घिसाडघाई झाली त्यामुळे महंमद तुघलक 'वेडा महंमद'च ठरला; केजरिवाल व 'आप' यांचं नेमकं हेंच झालं !!! त्यामुळे, त्यांच्यावरच्या इतर हेत्वारोपांत कितपत तथ्य आहे याचा उहापोह करण्याची गरजच नसावी.
नंदिनी, तुमच्या पोस्टला
नंदिनी, तुमच्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन. खर्याखुर्या आम आदमी च्या मनातला सात्विक संताप तुम्ही व्यवस्थित प्रकट केला आहे.
आणि नॉन्दिनी यांच्या पोस्टला
आणि नॉन्दिनी यांच्या पोस्टला मिळाले आहेत १० पैकी १० गुण
मला आधी राज आणि नंतर आप हे आशेचे किरण वाटत होते, पण हाय रे कर्मा !
आआप स्थापण होण्यापूर्वी
आआप स्थापण होण्यापूर्वी त्यातल्या मंडळींचा स्टँड काही वेगळा नसायचा. प्रोझेक्युटर, जज, ज्युरी आपणच आहोत असाच त्यांचा बाणा असायचा. आआपला आता नावे ठेवणार्यांचा तेव्हा स्टँड काय होता हे पाहणे मनोरंजक ठरेल. (मनोरंजनार्थ मायबोलीवरचे जुने धागे वर काढावेत काय? )
याचा अर्थ मी आपचे समर्थन करतोय असा नसून आप-चमुचे समर्थक किती fickle minded आहेत हे यत्र तत्र सर्वत्र अनुभवास येते आहे ते नोंदवतोय. माझ्या एका एक्स-कलीगने केजरीवाल आणि अर्णव यांच्यावर २०१३ चे इंडियन इ.इ. म्हणून स्तुतिसुमने उधळली होती, तोच आता केजरीवालना फेसबुकवर हे वर लिहिले गेलेले प्रश्न विचारतोय.
दिल्लीत विधानसभेत आपला यशाची चव चाखायला मिळाली, एकंदरित दुसर्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या, तिथे लोकसभेत आपचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर होते. मग त्यांनी पहिल्या क्रमांकावर असलेल्याकडे लक्ष केंद्रित करायचे की तिसर्या? दिल्लीवरून त्यांनी देशाचा अंदाज बांधला तर काय चुकले?
स्वतः शीला दीक्षित यांच्याविरोधात उभे राहून निवडून आलेल्या केजरीवालनी वाराणसीतून उभे राहणे चूक ठरते असे म्हणणारे मोदींच्या विरोधात ते काँग्रेसच्या बाजूने (आणि राष्ट्रहिताच्या विरोधात असेच म्हणत नाहीत का? मग त्यांच्यात आणि आपमध्ये फरक तो काय राहिला?
मुळात २००९ पासून सरकारी पक्षाच्या विरोधातच एक मोठी पोकळी होती, ती आपच्या आंदोलनाने भरून निघाली. ते जोवर फक्त आंदोलन करत होते, लोकपाल कायद्यासाठी लढत होते तोवर भाजप, त्यांना तुम्हे लढा आम्ही कपडे सांभाळतो असेच सांगत होते. आपने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरताच मात्र भाजप-समर्थकांची मने फिरली. की त्यांना 'मेरी बिल्ली मुझहीसे म्यांव' असे जाणवू लागले?
(जनलोकपालवाल्यांनी स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरावे म्हणजे त्यांना पाणी किती खोल आहे आणि आपला वकूब काय आहे हे कळेल हे मी सुरुवातीपासून लिहीत आलो आहे.)
अस्स्सं
अस्स्सं
मयेकर, येथे मी तुमच्याशी काही
मयेकर, येथे मी तुमच्याशी काही अंशी सहमत आहे.
आपकडे मी देखील कुतुहलयुक्त आशेने पहात होतो. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने समीकरणे बदलली.
एक दबावगट निर्माण झाला, आधीचे पक्ष दबकून वागू लागले, इ. चांगले बदल झालेच ते कोणी नाकारू शकत नाही.
पण असे झाल्याने लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या.
दिल्लीत आपने सत्ता मिळविल्यावर सुद्धा विरोधात बोलणारे सामान्य लोक कमीच होते.
पण नंतर जसा भ्रमनिरास होऊ लागला तसे लोक विरोधात बोलू लागले की जे साहजिकच आहे.
<संपादित> एकच प्रतिसाद दोन
<संपादित> एकच प्रतिसाद दोन वेळा आला !!!
Pages