तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.
आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !
कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.
आज त्यांना कोर्टाने परत एकदा सुनावले की हया केसला प्रेस्टिज इश्यू तुम्ही का बनवत आहात? भुषण पितापुत्रांनी मग तिहार कडे धाव घेऊन एकदाचे केजरीवालांना समजावून सांगीतले आणि ड्राम्यावर पाणी पडले.
ह्या चालीत त्यांना वाटले की ते जेल मध्ये जाऊन महात्मा गांधी होतील. भारतीय जनतेचे दुर्दैव की त्यांना केजरीवालसारख्या लोकांना डोक्यावर घ्यावे लागले कारण पुढे कोणीही नव्ह्ते.
दरम्यान आपच्या नेत्यांमध्ये बेबनाव झाला आहे आणि दोघांनी (शाजिया इल्मी आणि कॅप्टन गोपीनाथ) राजीनामे पण दिले.
"आप" प्रयोग फसणे हे दुर्दैवी आहे पण ज्या रितीने अण्णांपासून वेगळे होऊन आप निर्मिली गेली, त्यातच तिच्या अपयशाची बीजे रोवली होती.
तरी एवढे फुटेज का द्यायचे? तर भारतीय राजकारणात आप खरच आप सारखी वागली असती तर त्या पार्टीला खूप मोठे भविष्य होते.
भाऊ नमस्कार प्रचन्द अनुमोदन
भाऊ नमस्कार प्रचन्द अनुमोदन !! तुम्ही अक्षरश: माझ्या मनातील शब्द न शब्द type केला आहात असा वाटल. परवाच फेसबुकवर कुठेतरी TOI का इंडिया Times चा एक लेख पहिला 'Lets all hate केजरीवाल ' अगदी खर आहे कि जोपर्यंत केज्री कॉंग्रेस च्या विरोधात अण्णा हजारे यांच्याबरोबर भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन करत होते तेव्हा सर देख पेटून उठून त्यंच्या मागे होता पण त्यांनी मोदी विरोधात पावलं टाकायला सुरुवात केली आणि सार गणित चूकल. मां-बेटा बद्दल एकही शब्द न उच्चारता मोदींना टार्गेट केल्याने संशयात अशिकच भर पडली खरी.
अधिक काही बोलत नाही पण या चुकन्मधुन वेडा ठरलेला महम्मद काही शिकला तर सेकंड इनिंग मध्ये तो 'तुघलक' होऊ शकेल हे नक्कि.
केजरीवाल यांना राजनीती कळली
केजरीवाल यांना राजनीती कळली नाहीच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्याचा बाजुची चा. चौकडी आणि स्वतः त्याचा स्वभाव यावर कुणाचा कंट्रोल नसल्याने वाहत गेले.
पहिल्या प्रयत्नात ४ खासदार निवडुन आले याला देखील दुर्लक्ष करुन चालणार नाही
मनसेचा तर दुसरा प्रयत्न असुन देखील त्यांचे डिपोझिट जप्त होण्याची वेळ आली तिथे आप चा पहिला प्रयत्न अगदीच वाया गेला का ?
बाकी नौटंकी हे तर सगळ्यांनीच केले आहे "मुंडन करुन संसदेत बसेन" ही धमकी बहुतेक नौटंकि मधे येत नाही
नंदिनी, वेलकम बॅक! बरेच दिवस
नंदिनी,
वेलकम बॅक! बरेच दिवस दिसला नाहीत. आल्यावर एकदम दणदणीतपणे सुरुवात.
तुमच्या इथल्या संदेशास १००% अनुमोदन.
आ.न.,
-गा.पै.
भाऊराव, अच्छे दिन आल्याने
भाऊराव,
अच्छे दिन आल्याने एकदम सक्रीय झालात की! इथला संदेश ज्याम पटला.
असेच राहा!
आ.न.,
-गा.पै.
नंदिनी, छान प्रतिसाद.....
नंदिनी,
छान प्रतिसाद.....
केवळ एका माणसाच्या
केवळ एका माणसाच्या आडमुठेपणामुळे 'आप'ची ही दशा व्हावी याचं दु:ख आहे !
लोल भाऊ! आआपला आता नावे
लोल भाऊ!
आआपला आता नावे ठेवणार्यांचा तेव्हा स्टँड काय होता हे पाहणे मनोरंजक ठरेल. >>
मला देखील आप काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवेल अशी आशा होती. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले आणि लगेच धरणे धरल तिथून माझी निराशा होत गेली.
मी वर लिहिल्यासारखे की भारताचेच दुदैव असे की आप निदान आज तरी फेल गेली असे वाटत आहे. पण ती निर्माण झाल्यावर ती फेलच जाणार अश्या न्यायाधिशाच्या अणि निराशाजनक भुमिकेत मी कधी शिरत नाही. संधी देऊन आजमावल्यावर माझ मत त्यांच्याबाबतीत निगेटिव्ह झाले आहे. संधी देणे मात्र महत्वाचे होते. आणि त्यामूळेच भारतीय राजकारणात आप खरच आप सारखी वागली असती तर त्या पार्टीला खूप मोठे भविष्य होते. असे मी वर लिहिले आहे.
केदारजी, तुम्ही म्हणतां त्यात
केदारजी, तुम्ही म्हणतां त्यात बरंच तथ्य आहे, असं मलाही वाटतं. 'आप'ला असंतोषाचा जनक होण्याचा मान जात नसला तरी असंतोषाला वाचा फोडण्यास 'आप' निदान निमित्त तरी ठरला होता, हें अमान्य करण्यात अर्थ नाही. Let us give devil its due !!
केदार ,
केदार ,
१०००००००००००००००००००००००००००% अनुमोदन ,
आआप ने सर्व सामान्य जनतेचा सपोर्ट घालवलाय !!
काल दिल्लीत रिक्षाने दिल्लीत, रिक्षा चालकाला विचारल तेंव्हा म्हणाला मी झाडुला मत टाकल, पण आता
पसतावतोय.
आपाप चा मोटीव्हः
३ महिन्यात दिल्लीत सरकार, ६ महिन्याच्या आत देशाच सरकार !!
दिल्लीच्या अभुतपुर्व यशाने हुऱळून गेले आणि देशाच्या राज्यावर येण्याची स्वप्ने पडायला लागली !!
केदार, >> ती निर्माण झाल्यावर
केदार,
>> ती निर्माण झाल्यावर ती फेलच जाणार अश्या न्यायाधिशाच्या अणि निराशाजनक भुमिकेत मी कधी शिरत नाही.
आआप निर्माण झाल्यावर त्याचा हेतू काय ते उघड दिसत होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आआपचं बीज शुद्ध नव्हतं. तस्मात गोमट्या फळांची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
मोदीजी, शप्पथ !!!!!
मोदीजी, शप्पथ !!!!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आपला /जनलोकपालला आधी
आपला /जनलोकपालला आधी अतिउत्साहाने पाठिंबा दिला तिथेच/ही fickle mind दिसले असे आय अॅम म्हणिंग. वॉट से?
एकादा राजिनामा दिला ( दिल्ली
एकादा राजिनामा दिला ( दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा ) त्याची माफी मागितली की लगेच दुसरी चुक करायला मोकळे. त्यांचे गुरु श्री अण्णा हजारे यांनाही पुराव्या शिवाय आरोप करायची खोड होती. हा आरोप सिध्द होऊन त्यांना येरवड्याला हवा खावी लागली इतका रेडीमेड अनुभव सुध्दा स्विकारण्याची तयारी नाही.
गाडीभर पुरावे देईन म्हणणारे गो रा खैरनार ही पडद्याच्या मागे गेले.
'चेंज बोलर ' म्हणून एक षटक
'चेंज बोलर ' म्हणून एक षटक दिलं , तो डांवपेच यशस्वीही झाला व विकेट मिळाली ; आतां नियमित गोलंदाज करतील ना काय भलं /वाईट करायचं तें. त्या 'चेंज बोलरला' मॅन ऑफ द मॅच' नकोच पण स्कोअरबुकात आलेल्या त्या एका विकेटचं तरी श्रेय द्यायला काय जातं !!! इति आय अॅम म्हणींग !!!
Change bowler is thinking
Change bowler is thinking that the batting team collapsed because of the pressure created by him and that the regular bowler (He was supposed to be partnering with the change bowler, remember?) who got the most wickets is no different as a batsman from the one which was batting earlier.
While the change bowler was bowling, even his wide balls and no balls were getting applauded. The batsmen were totally baffled by the unique and unusual action of this change bowler. Sometimes they got out with stupid actions like hit-wicket or obstructing the field.
मग आता चेंज बोलरला दिलेल्या
मग आता चेंज बोलरला दिलेल्या वेळेत षटक न संपवता, टिवल्या-बावल्या करत राहिल्याने दंड दिला आहे का?
(No subject)
ते लगेच राजीनामा देणे व त्या
ते लगेच राजीनामा देणे व त्या आसपासच्या गोष्टी पटण्यासारख्या नव्हत्याच. पण मूळचे २०११ ऑगस्टचे आंदोलन व "आप" चा एकूण कन्सेप्ट चांगला वाटला होता. डिसेंबर मधे ते दिल्ली व इतरत्र निवडून आले तेव्हाही ते चांगले वाटले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय बजबजपुरीला तोच एक पर्याय दिसत होता.
कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप स्वबळावर एवढ्या जागा मिळवू शकेल व दुसरा पर्याय उभा करू शकेल असे तेव्हा वाटले नव्हते. अनेक पक्षांचे कडबोळे पुन्हा सत्तेवर येउन हजार तडजोडी करत फालतू पक्षनेत्यांना अवास्तव महत्त्व मिळण्यापेक्षा आपचा "प्रयोग" कधीही जास्त चांगला असेच तेव्हा वाटले होते.
तेव्हाच्या उपलब्ध माहितीनुसार तेव्हाचे जे मत होते ते मला आत्ताही चुकीचे वाटत नाही.
नंदिनीची पोस्ट बरोबर आहेच. दिल्लीत निवडून आल्यानंतर त्यांनी जे काही केले ते हास्यस्पद होते. पण त्याआधी काँग्रेसची कडबोळी वा भाजपची कडबोळी या दोन्हीपेक्षा तो एक वेगळा पर्याय म्हणून चांगला वाटत होता. त्यात गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस व भाजप मधला फरक कमीच होत चालला होता. आता स्वबळावर आणि त्यातही मोदींच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारमुळे एक आणखी वेगळा पर्याय मिळाला आहे आणि तो चांगलाच आहे.
फारएण्ड, >> गेल्या अनेक
फारएण्ड,
>> गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस व भाजप मधला फरक कमीच होत चालला होता.
काँग्रेस व भाजपमध्ये फक्त मोदी हाच फरक आहे. अन्यथा काहीच फरक नाही.
आ.न.,
-गा.पै.
उत्तम पोस्ट फा. मी अजून
उत्तम पोस्ट फा.
मी अजून डिटेलमध्ये वाचलेलं नाही सध्या केजरीवालांबद्दल पण वरच्या पोस्ट बघून तरी आताची बेल संदर्भातली वागणूक विचित्र वाटतेय.
>>मग आता चेंज बोलरला दिलेल्या
>>मग आता चेंज बोलरला दिलेल्या वेळेत षटक न संपवता, टिवल्या-बावल्या करत राहिल्याने दंड दिला आहे का?>>
आम आदमी पक्ष हे सेवादल,
आम आदमी पक्ष हे सेवादल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची संयुक्त निर्मिती आहे हे माझं मत झालेलं आहे. >>
आठवले,
अहो सेवादल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांची तुलना आपशी कशी करता येईल. तिथे कार्यकर्ते / समाजसेवक घडतात.
आप मध्ये सगळे नेतेच आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत ते कॅडर बेस्ड नाहीत. वरील दोन्ही संघटना ह्या तश्या आहेत. आपचे कार्यकर्ते हे फेसबुकी / इंटरनेटी नौजवान आहेत.
बाकी प्रत्येकजणच आपचे विश्लेषन करतोय (माझ्यासहीत) त्यामुळे तुमचा मताचा आदर ठेवतो पण खूप फरक आहे.
लोकहो, वीजप्रश्नासाठी आता
लोकहो,
वीजप्रश्नासाठी आता केजरीवाल यांचे मोदींना साकडे (इंग्रजी दुवा) : http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Kejriwal-seeks-meeting-wit...
यावर भाऊ तोरसेकारांची प्रतिक्रिया : http://jagatapahara.blogspot.co.uk/2014/06/blog-post_12.html
आ.न.,
-गा.पै.
अण्णांचे आंदोलन सुरू झाले
अण्णांचे आंदोलन सुरू झाले तेव्हां हू इज अण्णा ही मेल सर्वत्र फॉर्वर्ड होत होती. ही मेल संघाच्या पाठीराख्यांकडूनच मिळत होती असा सर्वांचा अनुभव आहे. १५ ऑगस्टनंतर जेव्हां आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मंडपात बसलेली मंडळी होती ती ही संघाचीच होती. संघाने हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून अपार कष्ट घेतले आहेत. तशी कबुलीही त्यांनी दिलेली आहे, त्यामुळं खरं खोटं करण्याचा प्रश्न येत नाही. स्वतः केजरीवाल यांच्या घरातही संघाची परंपरा आहे. ते स्वतः सेवादलाच्या माध्यमातून विद्यार्थी संघटना, हरियाणा तसेच यूथ फॉर इक्विलिटी, आरक्षणविरोधी मोर्चा अशा माध्यमातून सक्रीय होते. पुढे ते नोकरीत गेले. तिथून पुन्हा बाहेर पडल्यानंतर परीवर्तन संस्थेद्वारे सक्रीय झाले. अण्णा हजारे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले आहेत. नगर मधे ज्या गल्लीत त्यांचे बालपण गेलं ती संघाच्याच लोकांची आहे. तिथे त्यांचा सत्कार झाला तेव्हां या संस्काराबद्दल ते बोललेही होते.
यातल्या अनेक गोष्टी या निरीक्षणाने जाणवलेल्या आहेत ज्यावर विरोधी मतं येऊ शकतात. पण ज्या पद्धतीने नंतर यांच्याट बेबनाव झाला आणि त्याची कारणं ऐकायला मिळाली त्यावरून जी मतं बनतात त्याबद्दल नाईलाज आहे.
संघ आणि अण्णा
संघ आणि अण्णा -
http://indiatoday.intoday.in/story/was-rss-behind-anna-kejriwal-split/1/...
http://news.oneindia.in/2012/09/21/did-the-rss-facilitate-hazare-kejriwa...
ब्रह्मांड आठवले, तुमची पोस्ट
ब्रह्मांड आठवले, तुमची पोस्ट वाचून आमच्या एका जुन्या मित्रवर्यांच्या विस्मयाकारक आठवणी जाग्या झाल्या आणि त्यांच्या ज्ञानाचे किरण कसे चहुकडे पसरायचे त्याचेही स्मरण झाले.
@वरचे तुम्हाला कावीळ झालेली
@वरचे
तुम्हाला कावीळ झालेली आहे असं दिसतंय. मागच्या बाफवर तुम्ह या मिर्ची या आयडीला उद्देशून हीच पोस्ट टाकली होती. तुमचा आयडी हा उपहास म्हणून घेतलाय की जगावर सूड म्हणून हे कळण्यास मार्ग नाही, पण अत्यंत मूर्खपणाचे लिखाण करणारा कुणी अन्य होता / आहे का याचा शोध घ्यावा लागेल. सध्या तरी अशा गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कारण असे अनेक आयडी अनेक फोरम वर विषयांतर करण्यासाठी पगारावर नेमलेले असतात, ज्यांचे कामच विषयांतर हे असते.
कारण असे अनेक आयडी अनेक फोरम
कारण असे अनेक आयडी अनेक फोरम वर विषयांतर करण्यासाठी पगारावर नेमलेले असतात, ज्यांचे कामच विषयांतर हे असते. <<<![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मी लौकरच एक डु आय डी घेनार
मी लौकरच एक डु आय डी घेनार आहे (आधीच सांगून ठेवतो उगीच ताकाला जाऊन गाडगे लपवायचे आपल्याला पसन्त नाही, काय?) विषयांतर करण्यासाठी....
त्याले म्हने पगार भेटनार हय , भौ हो.....
Pages