निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!
तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?
घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?
लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?
येणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?
पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?
आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?
हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!
अपोझिशन मध्ये बसणार्यांच्या जागा पलिकडे आहेत.
ओह्ह अतिरिक्त भार म्हणजे मेन
ओह्ह अतिरिक्त भार म्हणजे मेन भार कोणीतरी उचललाय लक्षातच नाही आले. धन्यवाद.
उमा भारतीला जल संसाधन आणि
उमा भारतीला जल संसाधन आणि गंगा शुद्धीकरण असे खाते दिल्याचे टीव्हीवर वाचले.
आता शिरोळ्याना मुळा-मुठा
आता शिरोळ्याना मुळा-मुठा शुद्धीकरण मिळणार बहुतेक.
amitav dr harshvardhan has
amitav
dr harshvardhan has got Health, munde has got rural developement, venkiah naidu- parliamentary affairs.
कलराज मिश्र- अवजड उद्योग
कलराज मिश्र- अवजड उद्योग
मंत्रीमंडळ छोटे करुन मोदींनी
मंत्रीमंडळ छोटे करुन मोदींनी पायावर दगड पाडून घेतला आहे. राज्यात आता युती सरकार येणे अवघड आहे.
सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा .....
मोदींच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप पुढीलप्रमाणे :
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
संपादित,,
संपादित,,
(No subject)
अच्छा कॉर्पोरेट अफेयर्स जेटली
अच्छा कॉर्पोरेट अफेयर्स जेटली ना मिळाले तर !
लेट्स सी आता MCA काय करते ते
कंपनी कायद्यातल्या तरतुदी बदला ही मुख्य मागणी
हे फायनल आणि फिक्स आहे का?
हे फायनल आणि फिक्स आहे का? कारण सगळीकडे संभाव्य असेच म्हणत आहेत.. सकाळ मध्येही संभाव्य असेच म्हणले आहे..
मनेका गांधी असे नाव नसून मेनका गांधी असेच आहे.. काल शपथ घेताना त्यांनी स्वतःच तसा उल्लेख केलेला आहे..
नजमा हेपतुल्ला ह्या १० वर्षांपासून भाजपच्या नेत्या आहेत.. त्या प्रकृती अस्वस्थतेमुळे दिसल्या नसाव्यात निवडणुकांमध्ये.. काल पण शपथ घेताना त्यांचा आवाज कापतच होता..
हिम्या.. नजमा हेपतुल्ला २००४
हिम्या.. नजमा हेपतुल्ला २००४ साली भाजपात आल्या..
त्या आधी "कैक" वर्ष त्या काँग्रेसमध्ये होत्या..
She steadily climbed up in the Indian National Congress party, heading several divisions of the party's grassroots organizations. She was the General Secretary of Congress during 1986 with the additional responsibility of youth activities of the All India Congress Committee and the NSUI.[10] Since 1980, she has been a member of the Rajya Sabha from Maharashtra for four terms at 1980, 1986, 1992, 1998 as Congress candidate.[11] Najma was the Deputy Chairperson of the Rajya Sabha from January 1985 to January 1986 and from 1988 to July 2004.[12]
संदर्भ विकी : http://en.wikipedia.org/wiki/Najma_Heptulla
.
.
वेंकय्या नायडू भरभक्कम
वेंकय्या नायडू भरभक्कम पर्सनॅलिटीला 'विकास' वालं खातं आलं. अजून कितीक प्रसरण पावणार देव जाणे
शर्मिला+१. स्मृती इराणीचं नाव पाहून आनंद झाला.
नंदिनी, >> स्मृती इराणीने
नंदिनी,
>> स्मृती इराणीने राहुल गांधीला टफ फाईट दिली होती, त्यामुळे तिला काहीतरी अपेक्षित होतेच पण चक्क मानव
>> संसाधन मिळाल्याने जबरी खुश झालीअसेल.
मानव संसाधन देण्यामागे मला वेगळं कारण दिसतं. भारत तरुणांचा देश आहे असं मोदी नेहमी भाषणांतून सांगतात. या तरुणाईची शक्ती योग्य दिशेने कार्यरत व्हावी असा त्यांचा आग्रह आहे. त्याकरिता मनुष्यबळ संसाधन हे यथोचित (वा सर्वोत्तम) खाते आहे. म्हणून ते सर्वात तरुण मंत्र्याकडे दिलेले आहे. हे एक प्रकारचे तरुणांचे प्रतिनिधित्व आहे.
आ.न.,
-गा.पै.
स्मृती ईराणींच्या शैक्षणिक
स्मृती ईराणींच्या शैक्षणिक अर्हतेमुळे (फक्त १२ वी पास) त्यांच्या संभाव्य कामगिरी विषयी प्रश्नचिन्ह ऊभी केली जात आहेत पण माझ्यामते सध्या राजकारणात शैक्षणिक अर्हतेपेक्षाही सामाजिक प्रश्नांची जाण, त्यांच्यावरच्या ऊपायांसाठी लागणारी ईच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवायची धमक हे सगळे महत्त्वाचे आहेत.
नाहीतर मनमोहन सिंगांसारख्या अर्थतज्ञाच्या नेतृत्वाखाली भारत दहा वर्षात आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतांना दिसला असता.
संरक्षण मंत्रीपद जेटलींकडे तात्पुरते आहे ना, काही आठवड्यांसाठीच ?
स्मृती इरानी बद्दल खुप बोलत
स्मृती इरानी बद्दल खुप बोलत आहेत सर्व... पन खरच शैक्षणिक अहर्ता हा एकच मापदन्ड असु शकतो का... आणि आता कॉग्रेस जर याच्या बद्दल बोलत असेल तर वेग वेगळ्या घतक पक्षा ना खुश ठेवन्या साठी जी मन्त्रि पदे दिलि ती काय हा सर्व विचार करुन दिलि होति असे म्हनायचे आहे का ?
कंपनी कायद्यातल्या तरतुदी
कंपनी कायद्यातल्या तरतुदी बदला ही मुख्य मागणी>>
काय अपेक्षित आहे? कायदा आलाच आहे. नियमसुद्धा लागू झालेत. आता काय उरले? आणि हे (म्हणजे नवीन सरकार) करणार तरी काय आहेत? त्यांना उलट कंपन्यांना 'अनिर्बंध' स्वातंत्र्य द्यायचे आहे! आपुन की तो वाट ऑलरेडी लगैली है -
जेटली तर निवडूनहि नाही आला.
जेटली तर निवडूनहि नाही आला. मग कसा मंत्री?
म्हणजे आता कुणाला तरी राजिनामा द्यावा लागेल नि तिथे निवडणूक भरवून जेटली जिंकला असे जाहीर करावे लागेल, त्या नंतर मग मंत्रीपद. तोपर्यंत मंत्र्याला द्यायचे पैसे कुणाला देणार? मला द्या! दहा दिवसात माझ्या उरलेल्या आयुष्याची चांदी होईल.
झक्कीसाब! ही प्रथा इथे
झक्कीसाब! ही प्रथा इथे पूर्वापार चालत आली आहे! प्रफुल्ल पटेल विमानमंत्री होते आणि कुणीतरी पडलेला "पाटील" (मी सुद्धा पाटीलच आहे बर का!) तर गृहमंत्री झाला होता.
वाट लागली आहे ते माहीत आहे
वाट लागली आहे ते माहीत आहे शरद
मुळातच ती लावली गेलीये
ते सुधारायला हव आहे
कसे ते इंस्टिट्यूट मेंबर्स सुचवत आहेत
. नव्या मंत्र्याकडून अपेक्षा आहेत म्हणून म्हटल
नाहीतर आहेतच सर्व सादर !
असो !
झक्की, जेट्ली व स्मृती इराणी
झक्की, जेट्ली व स्मृती इराणी हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. लोकसभेच्या वर निवडून आले नाहीत तरी राज्यसभेवर असल्याने त्यांना कॅबीनेट वा राज्यमंत्री होता येते.
जेटली तर निवडूनहि नाही आला.
जेटली तर निवडूनहि नाही आला. मग
कसा मंत्री?>>>>> जेटली हे राज्यसभेचे सदस्य आहेत
राज्यसभा लोकसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य मंत्री होऊ शकतात
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आसाम मधून राज्यसभेवर निवडून गेलेले होते
सचिन तेंडुलकरला क्रिकेटमंत्री
सचिन तेंडुलकरला क्रिकेटमंत्री का केले नाही?
भारताला क्रिकेटमंत्री नसावा? क्रिकेट नसेल तर अर्थमंत्र्याची जागा असून उपयोग काय?
मेनका गांधीला महिला नि बालकल्याण ऐवजी भटके कुत्रे मंत्री करायला पाहिजे होते. कुणा अविवाहित व निपुत्रिक पुरुषाला महिला व बालकल्याण मंत्री करावे म्हणजे तो भावना आड येऊ न देता निर्णय घेईल.
या मंत्रीमंडळात मुसलमान व ख्रिश्चन किती? निदान भारतात त्यांची जितकी टक्केवारी आहे तेव्हढ्या टक्केवारीने मंत्रीमंडळात त्यांना घ्यायला नको का?
म्हणजे माहित आहे तुम्ही हिंदुत्ववादी वगैरे आहात - पण अहो, देशात आहेत ते लोक, नागरिक आहेत. त्यांचे पण प्रश्न आहेत नि ते सोडवले नाहीत तर नुसत्या दंगलीच होत रहातील भारतात. हिंदूंपेक्षा जगात ख्रिश्चन व मुसलमान संख्येने जास्त, पैशाने जास्त आहेत. इतिहास सांगतो की केवळ मूठभर लोक परक्या देशातून येउन त्यांनी हजार वर्षे हिंदूंवर राज्य केले! म्हणजे त्यांचे कर्तुत्व कळते तेंव्हा गाफिल राहू नका!! हुषारीने वागा! कृष्णासारखे छल करायला घाबरू नका.
एच आर डी मध्ये डॉ पल्लम राजू
एच आर डी मध्ये डॉ पल्लम राजू (कॅबिनेट) व डॉ शशी थरूर (राज्यमम्त्री) यांच्या चर्चा आणि भाषणात सहभागी होण्याची संधी बर्याचदा मिळाली.अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी आणि प्रचंड आवाका असेच म्हनता येईल. स्मृती इराणी म्हणजे ..... अवघडच आहे !::अओ:
इथे एवढा उत्साह फसफसून चालला आहे की भाजपच्या मंत्र्यांबद्दल शंका घ्यायची सोयच राहिली नाही. बहुधा पाकिस्तानचे तिकीटच हातात मिळेल असे दिसते तुका म्हणे उगी रहावे, जेजे होइल तेते पहावे !
त्यांना काही दिवस काम तर करू
त्यांना काही दिवस काम तर करू दे! नसतील थरूर ई यांच्याएवढ्या तज्ञ. पण थरूर सारखे सामान्य लोकांना तुच्छही लेखणार नाहीत कदाचित. ते कॅटल क्लास वगैरे.
मात्र स्मृती इराणींना कॅमेरा एकाच अँगल मधे आपल्यावर राहतो. मोदी किंवा इतर कोण काही म्ह्णले की प्रत्येक मंत्र्याची रिएक्शन झूम इन आउट करून धक्कादायक रीतीने दाखवत नाहीत याची सवय करून घ्यावी लागेल
चला राज्यकारभार सुरु झाला.
चला राज्यकारभार सुरु झाला. शिवसेना प्रचंड संभ्रमित आहे. मला वाटतय त्यांना 'चाणक्यनीती' सुचेना झालिय. धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था झालिय. मिडीया समोर काही बोलावे तर पाप न बोलावे तर लोकांच्यात काय संदेश जाइल?
अवजड खाते कमी महत्वाचे कसे काय झाले हे काही लक्षात येत नाही. काल वसुंधरा राजेंना देखिल योग्य रितीने कन्व्हिन्स करता आले. एक एक गोष्टी फर्म आणि क्लिअर होत चालल्या आहेत.
बाकि काळा पैसा शोधुन काढण्याची कामगिरी सुरु झालिय. वाजपेयी सरकारने 'डिक्लेअर' ची स्किम राबविली होती त्यावेळी ३०००० कोटी काहीतरी डिक्लेअर झाले होते, रितसर फक्त ३० % टॅक्स भरुन .
अवांतरः
बाकि विधानसभेला महाराष्ट्रात म न से आणि भाजप युती बघायला मिळाली तर आता मला आश्चर्य वाटणार नाही , जर शिवसेना बाजुला गेली तर.
फा स्मृती इराणी कदाचित
फा
स्मृती इराणी कदाचित अननुभवी असेल, पण अॅट लिस्ट काहीतरी सकारात्मक काम करेल अशी आशा तर ठेवता येऊ शकते. वाईट काम केले तर आपोआप उचलबांगडी होइलच.
बाकी, नुकतीच फेसबूकवर स्मृती इराणीसंदर्भात अतिशय विकृत पोस्ट वाचली. स्वतःला "फॅसिझमचे" विरोधक म्हणवणारे आणि दर पोस्टीमध्ये "आता देशाची अक्कल टिकवण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याचे" आव आणून इतरांना मूर्खात काढणारे असली घाणेरडी पोस्ट लिहितात ते पाहून किळस आली.
ह्या सगळ्या लफड्यात आणखी एक
ह्या सगळ्या लफड्यात आणखी एक दुर्दैवी आणि नुकसानीची उचलबांगडी होइल ती नॉलेज कमिशनचे सॅम पित्रोडा यांची
सदानन्द गौडा हे एक या
सदानन्द गौडा हे एक या मंत्रीमंडलातले आश्वासक नाव आहे
Pages