नवे सरकार - नवे मंत्रीमंडळ

Submitted by हायझेनबर्ग on 16 May, 2014 - 10:00

निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!

तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?

घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?

लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?

येणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?

पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?

आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?

हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!

अपोझिशन मध्ये बसणार्‍यांच्या जागा पलिकडे आहेत. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोपीनाथ मुंडे - कृषी मंत्री (असा त्यांचा प्रचार होता, बहुतेक मिळेल पण ते खातं त्यांना)
नितीन गडकरी - रेल्वे मंत्री / दळणवळण (असं काळ कुठेतरी न्यूज मध्ये वाचलं होतं)

बरेच नविन विचार आणत आहेत,

लिमीटेड केंद्रीय मंत्रालय व त्यांच्या भौवती त्या त्या क्षेत्रातले जाणते व्यक्तीमत्व उपमंत्री म्हणुन.

उदा. कोकण रेल्वे प्रकल्पाला सत्यात उतरवणारे आणि दिल्ली मेट्रो प्रकल्पाचे प्रभारी श्रीधरन यांची वर्णी रेल्वे
मंत्रालयात लागण्याची शक्यता आहे.

माझ्या मते जेटली अर्थ मंत्रालय सांभाळतील.
गृहमंत्रीपद पहिले काही काळ (पहिला मंत्रमंडळ विस्तार होईपर्यंत) मोदींनी स्वतःकडेच ठेवलं पाहिजे.
मुंडेंना कृषीसारखं मह्त्त्त्वाचे पद मिळेल असे वाटत नाही.
गडकरींना पायाभुत सुविधांसंबंधितच पद मिळेल.

संरक्षण्,विदेश , व्यापार आणि आय टी साठी कोण अनुभवी आहेत?

प्रशासकीय पदांवरही फेरफार अपेक्षित आहेत. शिवसेना आणि तेलगू देसमचे किती आणो कोण कॅबिनेट मध्ये येतील ह्याबद्दल काही अंदाज?

विदेश साठि सुषमा स्वराज असं ऐकलं...
सेनेचे आनंद अड्सुळ, शिवाजीराव आढळराव जातील मंत्रिमंडळात असं वाटतं आहे...
जेटली अर्थ खातं घेतील आणि नमो गृह खातं स्वतःकडे ठेवतील असं वाटतं... कोकण रेल्वेचे श्रिधरन ह्यांच्याकडे रेल्वे दिलं जाऊ शकतं आणि माजी लष्कर प्रमुखांकडे (नाव विसरलो) संरक्शण अशी दुपारी चर्चा होती...

मुंडेना गृहमंत्रीपद मिळेल असा जाणकारांचा होरा होता. त्यांनी कृषी मागितलाय म्हणून कृषी देत आहेत म्हणे.

महाराष्ट्रात होणार्या निवडणुका लक्षात घेऊन आणि मुंडेंचा मास अपील लक्षात घेता मोठ खातं मिळणं त्यांना काहीच अवघड नाहीये.

स्मृती इराणींसाठी मोदी वाराणसी सोडतील अस ऐकलय. आणि जेटली राज्यसभेतच राहतील.

कृषीमंत्री मात्र शरद पवारच असतील. कुणाची हिंमत आहे त्यांना नाही म्हणायची?

आणि एक दोन मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध शीख यांना पण मंत्रीपदे द्या - बिनखात्याचे मंत्री, सांस्कृतिक मंत्री, इ.
म्हणजे हिंदुत्ववाद म्हणून रडणार्‍या लोकांना थप्पड बसेल.
आता कोण राजीनामा देणार म्हणजे जेटलीला तिथे उभे करून निवडून आणता येईल? नि मग मंत्री करता येईल?

नको, नको, नको. परत या डोकेउठाड चमत्कारीक आक्रस्ताळ्या बाया अजीबात नको. ती ममता तर जाम विक्षीप्त बाई आहे.

मनेका गांधीला प्राणी मंत्रालय द्या ब्वॊ! म्हणजे कार्पोरेशनला कुत्र्यांच्या नसबंदीला निधी मिळेल. पेशवे पार्क व इतर प्राणी संग्रहालये पुन्हा चैतन्यमय होतील. माणूस पण प्राणीच आहे ना? त्याचेही कल्याण होईल.

मुंडेंना कुठलेही मंत्री पद मिळु नये. पार खावुन संपवतील.

महाराष्ट्रातुन गडकरी, सोमय्या सोडुन कोणी लायकीचा नाहीये केंद्रीय मंत्री बनण्याचा.

मुंडेंना मिळाले आहे.

आटोपशिर आणि तुलनेने तरूण आणि छोटे मंत्रीमंडळ निवडल्या बद्द्ल मोदींचे अभिनंदन ! ६ वाजता बाकी सर्व कळेलच.

कॅबिनेट

राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितिन गडकरी, सुषमा स्‍वराज, वेंकैया नायडू, सदानंद गौडा, उमा भारती, नजमा हेपतुल्‍ला, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, कलराज मिश्र, मेनका गांधी, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, अशोक गजापति राजू, अंनत गीते, हरसिमरत कौर बादल, नरेंद्र सिंह तोमर, जुअल ओरम, राधा मोहन सिंह, थंवर चंद गहलोत, स्‍मृति ईरानी आणि डॉ. हर्षवर्धण.

राज्‍य मंत्री

वीके सिंह, राव इंद्रजीत सिंह, संतोष कुमार गंगवार, श्रीपद नायक, धर्मंद्र प्रधान, सरबानंद सोनोवाल, प्रकाश जावेड़कर, पीयूष गोयल, डॉ. जितेंद्र सिंह, निर्मला सीतारमण, जीएम सिद्धेश्‍वरा, मनोज सिन्‍हा, उपेंद्र कुशवाहा, पोन राधाकृष्‍णनन, किरेन रिजुजु, कृष्‍ण पाल गुर्जर, संजीव बालियान, मनसुख भाई वसावा, रावसाहब दादाराव पाटिल, विष्‍णुदेव साय, सुदर्शन भगत

कुणाला काय हे अजून नक्की नाही.

संरक्षण मात्र नमो कडेच आहे.
गृह : राजनाथ
विदेश बहुदा सुषमा स्वराज.

७५ वर्षांवरील कुणीही नेता मंत्री होणार नाही आणि भाजपा मधील कोण्याही नेत्याच्या मुलाला / मुलीला मंत्रीपद दिले जाणार नाही.

नजमा हेपतुल्‍ला निवडीणूकीच्या काळात कुठेच दिसल्या नाहीत.. त्या होत्या का प्रचारात ? खरतर गेल्यावेळी लोकसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतरच कुठे दिसल्या नाहीत..
अचानक मंत्रीमंडळात कश्या काय ?

डॉ. हर्षवर्धण आणि मुंडे केंद्रिय मंडळात गेले तर आगामी विधानसभा निवडणूंकामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेद्वार बनवता येणार नाही (म्हणजे नमो अशी धरसोड करू देतील असं वाटत नाही).. खरतर मुंड्यांना मुख्यमंत्रीपदात जास्त रस असेल असं वाटलं होतं.

Pages