Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धारा, नारली पाकाचे लाडू मस्त
धारा, नारली पाकाचे लाडू मस्त होतात आणि फार वेळही लागत नाही. परवाच केले होते. रेसिपी हवी असल्यास सांग.
ओट थंड असत का? मी ओट वापरून
ओट थंड असत का? मी ओट वापरून एनर्जी बॉल करते. तस काही करता येईल का?
ओट थंड नसेल तर इग्नोअर करा ही पोस्ट.
ओट+खजूर+/बेदाणे+बदाम+गूळ(हवा असेल तर) अस एकत्र फिरवून लाडू किंवा लारा बार करते मी.
योकु सातुच्या पीठाचे
योकु सातुच्या पीठाचे भाजणीसारखे वडे आणी थालिपीठ पण करता येते.
सीमा ओटचं माहित नाही पण
सीमा ओटचं माहित नाही पण बाकीचे सगळे घट़़क ( खजूर+/बेदाणे+बदाम+गूळ(हवा असेल तर) ) उष्ण आहेत
वत्सला...मला दे रेसीपी)
वत्सला...मला दे रेसीपी):-)
माझी आजी उन्हाळ्यात आम्हा
माझी आजी उन्हाळ्यात आम्हा नातवंडांसाठी मूगदळाचे लाडू करायची. मूग भाजून दळायचे आणि बेसनाच्या लाडवाप्रमाणेच लाडू करायचे.
स्वाती२, आईने पण तेच
स्वाती२, आईने पण तेच सुचवलंय.... उद्या करते.
वत्सला, मी पाकाच्या लाडवांमध्ये बिगरीत आहे, तरी नारळाच्या रेसिपी माझ्या विपुत देशील?
अजून तरी मला सालाच्या दाळी, ओटस आणि दलिया मुलांना नीट पचताहेत का, याविषयी शंकाच आहे. मधून मधून खिचडीतून वगैरे देते, पण लाडवातून द्यायला थोडा उशीर करीन म्हणतेय. माबोवरचे झटपट लाडू सुद्धा करून बघीन.
लाडवांच्या प्रकारांबद्दल सगळ्यांना धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओटस उष्ण असतं - इति
ओटस उष्ण असतं - इति डायेटिशियन आणि आयु डॉ.
चार-पाच दिवसांची भांडं भरून
चार-पाच दिवसांची भांडं भरून साय साचली आहे. आणि अचानक पाच दिवसांसाठी गावाला जावं लागणार आहे. जायच्या आधी लोणी काढणं किंवा तुप कढवणं यासाठी अजिबातच वेळ नाहीये. एरवी असं अचानक जावं लागलं तर साय कामवालीला देत असते. पण सध्या कामवालीपण नाहीये. परत येईपर्यंत (२६ ला संध्याकाळी) साय फ्रिजमध्ये खराब होईल का? (पिवळी पडून वास येणं) फ्रिजरमध्ये ठेवली तर?
काय करावं?
अल्पना, साय फ्रीजरमध्ये
अल्पना, साय फ्रीजरमध्ये ठेव.
वैशाली आणि धारा, आज तुमच्या विपुत रेसिपी लिहीते.
धारा, अग मी पण खुप सुगरण नाही. पहिल्यांदाच पाकी लाडु केले पण एकदम सोप्पे वाटले!
अल्पना! मुग्धटली च्या
अल्पना! मुग्धटली च्या रेसिपिने आइसक्रिम!
वत्सला पाकी लाडू काय अगं ..
वत्सला पाकी लाडू काय अगं ..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अल्पना, सायीमध्ये थोडं दही
अल्पना, सायीमध्ये थोडं दही पातळ करून सगळीकडे लागेल असे घाल. घालून पातेलं गोल फिरव. मग झाकण लाऊन फ्रीज कर. पण फ्रीज करण्यापूर्वीच वास लागला असेल तर मात्र काही करणे शक्य नाही.
परवा कॉस्टकोतून ग्रेपफ्रुट ची
परवा कॉस्टकोतून ग्रेपफ्रुट ची मोठी बॅग आणली, आणि काल सायट्रस ज्यूसर ने राम म्हटले. त्या इतक्या ग्रेपफ्रूट्स चे आता काय करावे ? कट करुन वेजेस कापून मिक्सर वर फिरवून ज्यूस करता येईल, पण सोपे काही असेल तर सांगा प्लीज.
थँक्स वत्सला, चिनु. आत्ताच
थँक्स वत्सला, चिनु.
आत्ताच विरजण घातलंय सायीत. आता फ्रिजर मध्ये ठेवून देते.
प्राजक्ता, अगं आजच दोनेक तासांनी गावाला जायजंय. त्यामूळे नुसती घाई आहे. आल्यावर दुसर्या ताज्या सायीचं करेन आईसक्रिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्पना, फ्रिजर नाही, फ्रिज.
अल्पना, फ्रिजर नाही, फ्रिज.
अल्पना, फ्रिजर नाही, फ्रिज
अल्पना, फ्रिजर नाही, फ्रिज +१
प्रिझर मध्ये ठेवू नकोस. विरजण लावले ना ?
ओके. हो विरजण लावलंय.
ओके. हो विरजण लावलंय.
मोठा ब्राऊन ब्रेड एक आणला तर
मोठा ब्राऊन ब्रेड एक आणला तर त्यात बर्याच स्लाईस असतात. १०-१२ तरी. ( लहान मिळत नाही आजकाल :अओ:) एका वेळेस २ पेक्षा जास्ती स्लाईस खाल्ल्या जात नाहीत. उरलेला ब्रेड टिकवायचा असेल तर काय करायचं?
मी फ्रीजात ठेवते ब्रेड. फक्त
मी फ्रीजात ठेवते ब्रेड. फक्त एक्सपायरी डेटच्या अगोदर आठवणीने संपवायचा. ब्रेड त्याच रॅपर मध्ये असतो. वेगळा बाजूला काढत नाही.
ब्रेड ठेवण्यासाठी एक खास
ब्रेड ठेवण्यासाठी एक खास डबा मिळतो त्यात व्यवस्थित राहतो. ब्राऊन ब्रेडच्या घटकात व्हीनीगर आहे का ते पहा. असल्यास तो २/३ दिवस सहज टिकतो ( आमच्या कंपनीच्या ब्रेडमधे असे. ) पण हा डबा नेहमी कोरडा ठेवायचा.
जास्त दिवस टिकवायचा असेल तर फ्रिजमधे ठेवायचा, जरा कडक होतो. तो टोस्ट म्हणून खाता येतो. असे कडक झालेले स्लाईस कूकरच्या वाफेवर धरले तर परत मऊ होतात. तसाही सुकला तर मिक्सरमधून चुरा करायचा. त्या चुर्याचा उपमा / शिरा चांगला होतो. हा चुरा अनेक दिवस टिकतो. पराठ्यात, वड्यात वापरता येतो. पुरी, पॅटीस, कटलेट साठी पण वापरता येतो.
दिनेशदा, सर्वात तळाचे स्लाईस
दिनेशदा, सर्वात तळाचे स्लाईस फ्रीजात कडक होतात. तसेही ते कडकूमियॉं असतातच! वरचे स्लाईस रूम टेम्प ला आले की ओके असतात. फार कडक वगैरे लागत नाहीत.
(No subject)
>>एका वेळेस २ पेक्षा जास्ती
>>एका वेळेस २ पेक्षा जास्ती स्लाईस खाल्ल्या जात नाहीत. उरलेला ब्रेड टिकवायचा असेल तर काय करायचं?
फ्रीज करायचा. ब्रेड फ्रीजरमधे उत्तम टिकतो. थॉ केल्यावर पुन्हा मऊ होतो.
>>त्या इतक्या ग्रेपफ्रूट्स चे आता काय करावे ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मवा, पुढल्या ४ वर्षांना पुरेल इतकं ग्रेपफ्रूट मार्मालेड?
मृ आणि दिनेश. मी पण फ्रिज
मृ आणि दिनेश. मी पण फ्रिज मध्ये ठेवला आणि मावेत गरम करून खाल्ला २० सेकंद. चांगला राहिला होता. फक्त थोडा ड्राय वाटला.
पुर्वी मुंबईत ब्रिटानिया,
पुर्वी मुंबईत ब्रिटानिया, मॉडर्न चे मोठे ब्रेड मिळत असत त्यावेळी अर्धा पण ब्रेड मिळायचा. अर्थात ते काम त्या कंपन्या नव्हे तर विक्रेता करायचा.
अनुभव ( तनुजा ) चित्रपटात, मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड या रेडीओवरच्या जाहीरातीचा मस्त उपयोग केला होता.
मवा, पुढल्या ४ वर्षांना पुरेल
मवा, पुढल्या ४ वर्षांना पुरेल इतकं ग्रेपफ्रूट मार्मालेड? >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ज्यूसर बिघडला नव्ह्ता असं लक्षात आलं आत्ता, तो इल=क्ट्रिक पॉईंटच खराब होता. अता ग्रेपफ्रुट ज्यूस जिंदाबाद!
मवा, ग्रेप फ्रुट्स, मोठी
मवा, ग्रेप फ्रुट्स, मोठी ऑरेंजेस फ्रीजच्या चील ड्रॉवर मध्ये ३ ते ४ आठवडे आरामात रहातात . कॉस्टको मधली तर हमखास.
हो का सीमा, गरज पडली तर
हो का सीमा, गरज पडली तर लक्षात ठेवेन, थँक्स. मोठी ऑरेंजेस पण आणली जातातच कॉस्टकोमधली नेहेमी.
आमच्याकडे whole wheat bread
आमच्याकडे whole wheat bread येतो. . कधीतरी कशावर तरी ब्रेडसाठीचा एक प्लास्टिकचा डबा फ्री मिळाला होता. त्यात ठेवलेला असतो.फ्रीजमध्ये न ठेवताही ३-४ दिवस छान राहतो.
ब्रेड घेताना त्यावरची युज बाय डेट पाहून घ्यायचा.
Pages