माबोवरील समस्त सुगरणांनो आणि सुगरणींनो, पहिल्यांदाच या गटात पोस्टतोय. सांभाळून घ्याच.
लागणारा वेळ: २०-३० मिनिटे
लागणारे जिन्नस -
१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास कढी पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)
२. फोडणीचे साहित्य (जिर्याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)
३. मिरच्या-कोथिंबीर आवडीनुसार
४. तिखट-मीठ-गूळ (हे लिहायचं असतं का?)
कृती -
१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्री ला पंधरा-वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी कच्च्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.
२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.
३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा. (मी चुकून आधी गर एकत्र केला त्यामुळे नंतर बिया काढायला त्रास झाला)
४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)
५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.
६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)
७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावी.
८. कढी रेडी!
विसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ली त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.
अवांतरः मी केलेली कढी चवीलाही उत्तम झाली होती. (आंबटगोड, मध्यम घट्ट)
स्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.
(नुकताच कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला. त्यावेळी दुसर्या दिवशी त्यांच्याकडे जेवणात ही कढी होती.)
फोटो -
उकळून पाणी व गर वेगळे -
बेसिक कढीचा हा फोटो. हा फोटो टोमॅटोचे सार म्हणून जरी खपू शकत असला तरी ती करवंदांची कढीच आहे. यात हवे तसे डेकोरेशन करता येईल.
******************
अनुभवी व प्रयोगशील माबोकरांनी यात नवनवीन प्रयोग करून इथे लिहावेत. म्हणजे मलाही नवीन करून बघता येईल.
- नचिकेत जोशी
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मस्त छान... शिकलास की शिकवला
मस्त छान...
शिकलास की शिकवला ?
छान. एक शंका यात पीठ(बेसन ,
छान.
एक शंका यात पीठ(बेसन , तांदळाचे) लावले नसल्याने कढी का बरे म्हणावे?? करवंदाचे सार का म्हणू नये.
छानच!!! बाकी शुकुला सेमपिंच
छानच!!! बाकी शुकुला सेमपिंच रेस्पी वाचुन मी ही हेच लिहिणार होते. (हे तर सार)
ह्यात डाळीचं वरण घातलंय
ह्यात डाळीचं वरण घातलंय म्हणजे ही तर आमटी!
आनंदयात्री, वेगळाच गावरान पदार्थ
भारीच !
भारीच !
थांबा. विचारून लिहितो.
थांबा. विचारून लिहितो.
हा हा शुद्ध अन्याय आहे. सावंत
हा हा शुद्ध अन्याय आहे. सावंत काकुंनी तुला कशी काय ही कढी वाढली?? आम्हाला तर नव्हती!!
आणि कढी करण्याइतकी करवंदही तुला मिळाली???? भारीच्चे!
बाकी रेसिपी मस्त हो! पुरेशी करवंद मिळाली की करुन बघणेत येइल.
वा छान, वेगळाच पदार्थ.
वा छान, वेगळाच पदार्थ.
हा हा शुद्ध अन्याय आहे. सावंत
हा हा शुद्ध अन्याय आहे. सावंत काकुंनी तुला कशी काय ही कढी वाढली?? आम्हाला तर नव्हती!!
>>> काय सांगतेस?? तरीच पहिल्या पंगतीला बसलेलं पब्लिक म्हणतंय की त्यांनाही नाही मिळाली. दुसर्या तिसर्या पंगतीमध्ये होती..
वा! मस्त! पण अशी कढी
वा! मस्त!
पण अशी कढी करण्याइतकी करवंदं शिल्लकच राहत नाहीत. आधीच विकत घ्यावी लागतात म्हणून जीव जळत असतो, जी मिळतात ती कधी संपतात हेच कळत नाही.
Yess nachi ekdam tompasu
Yess nachi ekdam tompasu kadhi. Amhi gelo hoto tevha tya vahinini kacchya karvandanchi keli hoti
pan tyaveli besan lavla hota ek chamcha
shuku tu soupe mhan hakanaka. Sar mhanayla naralach dudh lavav lagel
Gavkari kadhich mhantat. Tumhi tithe jaun sar kimva soup magal tar milnar nahi ghari kay vattel te nav de tu
कविन +१ आता हेडर फक्त अपडेट
कविन +१
आता हेडर फक्त अपडेट करतो.
Arya tujha pahilach trek hota
Arya tujha pahilach trek hota tu adhich bhanjalalelis. Samor ala te svaha kel asashil nav gav n vicharta
Tula veglya prakarch panha tari milal ka?
कवे हो.. पन्हं होतं
कवे
हो.. पन्हं होतं पेठवाडीत. (आंबिवलीत नाही)
Ho pethwaditla panha vegla
Ho pethwaditla panha vegla asta
मस्त वाटतेय कढी. बिया
मस्त वाटतेय कढी. बिया वेगळ्या करणे हे कितपत किचकट असते?
Madhav te kam algad outsource
Madhav te kam algad outsource karav
ह्यात डाळीचं वरण घातलंय
ह्यात डाळीचं वरण घातलंय म्हणजे ही तर आमटी!>> केश्वे, डाळीचं वरण?
बिया वेगळ्या करणे हे कितपत किचकट असते?>>> सूप गाळायच्या गाळणीवर शिजलेली करवंदं घालून हाताने घोळल्यास बिया गाळणीवर राहतील आणि गर गाळला जाईल.
ह्यात डाळीचं वरण
ह्यात डाळीचं वरण घातलंय
>>
अश्वे, फोडणीत घातलिये ग डाळ. वरण नाही घातले.
असोच जे दिसतय ते जबरी दिसतय मला गरम गरम भाताबरोबर ओरपायला आवडेल. कवे नारळाचे दुध लावुन सार करायला हरकत नाही वरील सामग्रीचे.
कवे तू का इंग्रजाळलियेस?
कवे तू का इंग्रजाळलियेस?
Te udid dal masur dal ahe na
Te udid dal masur dal ahe na ingredients madhe mhanun lihilay ashwine tasa
Hindi input install karaychay
Hindi input install karaychay phone madhe mhanun ga gubbe
सूप गाळायच्या गाळणीवर शिजलेली
सूप गाळायच्या गाळणीवर शिजलेली करवंदं घालून हाताने घोळल्यास बिया गाळणीवर राहतील आणि गर गाळला जाईल.
>> रंग लागतो गाळण्याला करवंदाचा... निघता निघत नाही... चवही राहत असावी थोडी.
(नैतर मग आपला हात जगन्नाथ!)
आंद्या, सूप गाळायची गाळणी
आंद्या, सूप गाळायची गाळणी स्टीलचीपण असते थोडी मोठी (चहाच्या गाळणीपेक्षा) जाळी असलेली.
ह्म्म ओके!
ह्म्म ओके!
कविता, तिच तर मेख आहे. मी घरी
कविता, तिच तर मेख आहे. मी घरी ही पाकृ सांगितली तर ते काम माझ्याकडेच आऊटसोर्स्ड होणार आहे म्हणून आधीच विचारून ठेवतोय.
छानच. उपलब्ध असेल त्यातून
छानच. उपलब्ध असेल त्यातून चवदार पदार्थ करायची आपल्या मराठी स्त्रियांची खासियत.
करवंद! एव्हढच वाचू शकले! य
करवंद! एव्हढच वाचू शकले!
य वर्ष झाली खाऊन!
काय मस्त दिसतोय फोटो !! छान
काय मस्त दिसतोय फोटो !! छान लागेल असं वाटतंय !! इकडे क्रॅनबेरीज ची करून पहायला हरकत नाही.
Pages