माबोवरील समस्त सुगरणांनो आणि सुगरणींनो, पहिल्यांदाच या गटात पोस्टतोय. सांभाळून घ्याच.
लागणारा वेळ: २०-३० मिनिटे
लागणारे जिन्नस -
१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास कढी पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)
२. फोडणीचे साहित्य (जिर्याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)
३. मिरच्या-कोथिंबीर आवडीनुसार
४. तिखट-मीठ-गूळ (हे लिहायचं असतं का?)
कृती -
१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्री ला पंधरा-वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी कच्च्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.
२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.
३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा. (मी चुकून आधी गर एकत्र केला त्यामुळे नंतर बिया काढायला त्रास झाला)
४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)
५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.
६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)
७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावी.
८. कढी रेडी!
विसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ली त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.
अवांतरः मी केलेली कढी चवीलाही उत्तम झाली होती. (आंबटगोड, मध्यम घट्ट)
स्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.
(नुकताच कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला. त्यावेळी दुसर्या दिवशी त्यांच्याकडे जेवणात ही कढी होती.)
फोटो -
उकळून पाणी व गर वेगळे -बेसिक कढीचा हा फोटो. हा फोटो टोमॅटोचे सार म्हणून जरी खपू शकत असला तरी ती करवंदांची कढीच आहे. यात हवे तसे डेकोरेशन करता येईल.
******************
अनुभवी व प्रयोगशील माबोकरांनी यात नवनवीन प्रयोग करून इथे लिहावेत. म्हणजे मलाही नवीन करून बघता येईल.
- नचिकेत जोशी
माबोवरील समस्त सुगरणांनो आणि
माबोवरील समस्त सुगरणांनो आणि सुगरणींनो,
हा उल्लेख त्यांच्याआधी केल्याने खासच आनंद झाला !
या बया! ती डाळ चिमुटभरच आणि
या बया! ती डाळ चिमुटभरच आणि फ़ोडणीसाठी आहे हे लक्षातच नाही आलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम वेगळी पाकृ. सही तोंपासु
एकदम वेगळी पाकृ. सही तोंपासु दिसतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवर्जून पाकृ विचारून घेऊन इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
कुठे काय काय शिकशील याचा नेम
कुठे काय काय शिकशील याचा नेम नाही...पण छान. आवडेश.
नुकताच कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला. त्यावेळी दुसर्या दिवशी त्यांच्याकडे जेवणात ही कढी होती>>>>> सविस्तर वृतांत येऊ द्या .
मस्त!
मस्त!
मस्त दिसतोय फोटो आणि कृतीही.
मस्त दिसतोय फोटो आणि कृतीही. गरम गरम भाताबरोबर भारी लागत असेल.
सही... चला आजुन एक नविन
सही... चला आजुन एक नविन रेसिपी मिळाली...
मस्त रेसिपी नि फोटो!
मस्त रेसिपी नि फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु ! रंगीत संगीत दिसतेय.
तोंपासु ! रंगीत संगीत दिसतेय.
मैत्रेयी+१ मस्त दिसते आहे.
मैत्रेयी+१
मस्त दिसते आहे. अनेक वर्षांपूर्वी उकडलेल्या करवंदांचं गूळ घातलेलं लोणचं खाल्लं होतं ती चव एकदम जिभेवर आली. क्रॅनबेरीजची करून बघणार नक्की.
करवंद म्हटल्यावर इथे मिळत
करवंद म्हटल्यावर इथे मिळत नाहीत तेव्हा फोटोवरच आनंद मानून गप्प रहाणार होते पण क्रॅनबरीजची करायची आयडिया मस्तय. ट्राय करणार नक्कीच.
मस्त! तरीच तुला गझल टायपायला
मस्त!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तरीच तुला गझल टायपायला वेळ मिळेना क्काय?
फोटो मस्तच. क्रॅनबेरीजचं सार
फोटो मस्तच. क्रॅनबेरीजचं सार मस्त लागेल खरंच.
छान फोटो आणि रेसिपी
छान फोटो आणि रेसिपी ..
क्रॅनबेरी वापरण्याची आयडीयाही चांगली आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही पाककृती आहे! फोटोपण
सही पाककृती आहे! फोटोपण भन्नाट!
करवंदाचं लोणचं आणि चटणी खाल्लीय. सार पहिलूनच बघितलं.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र उशीराने वाचली ही पाकृ.. कालच कच्ची करवंदं टाकुन दिलीयेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्तच
मस्तच
कुठे काय काय शिकशील याचा नेम
कुठे काय काय शिकशील याचा नेम नाही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> होना अरे! कुठे आणि कुणाकडे काय शिकायला मिळेल याचा नेम नाही!
ट्रेकवृत्तांतातून संन्यास घेतल्यात जमा आहे आता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ए चिन्नु, टायपायला वेळ आहे, पोस्टायला नाहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चिमुरे अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पजोला आवडली... बास बास कढी
पजोला आवडली...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बास बास कढी जिंकली
कवे, << हाहा, कवे.. तु कसं
कवे, <<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहा, कवे.. तु कसं ओळखलस, मी भंजाळलेले ते!! विश्वेशने सगळी कॉमेंट्री केलेली दिसतेय...
बघ, तो नचिकेतच म्हणतोय... पहिल्या पंगतीला नव्हतं ते!
आणि हो, ते वेगळ्या प्रकारचं पन्हं मिळालं होतं, पेठवाडीत!!
बास बास कढी जिंकली >>>
बास बास कढी जिंकली
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>
फुल्ल गावरान...
फुल्ल गावरान...
पजोला आवडली >>>>>>>>>.
पजोला आवडली >>>>>>>>>. अभिनंदन मित्रा............. तिला भाता पेक्षा इतर ही काही आवडले म्हणायचे .. जिंकलास मित्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती करव म्द घ्यायची
किती करव म्द घ्यायची
क्या बात है! तू आता असेच
क्या बात है! तू आता असेच प्रयोग करून इथे पा.कृ. टाकायला लाग कसा. तुझ्या गझलेवरही इतके प्रतिसाद दिसले नाहीत. कढीच जिंकली म्हणायची!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वा, करून पाहीनच! धन्यवाद.
वा, करून पाहीनच! धन्यवाद.
बास बास कढी जिंकली >> आमच्या
बास बास कढी जिंकली >>:D
आमच्या कडेही कढी जिंकली रे
उद्या नारळाचं दुध घालून करुन बघणार आहे. रिपोर्ट देईनच ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages