युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या तुपा मधे भिजवलेल्या बडिशेपे च्या पावडर मधेच कणिक भाजुन घातली आणि त्याचे लाडु केले.
चव मस्त झाली आहे.

रगडा ड्राय करून सैंडविच फीलिंग,
मिसळीसारखे वरून कांदा, कोथिंबीर, शेव, फरसाण इ. घालून. पावासोबत.

रुममेटनी नेहमीचे पोहे न घेता पातळ पोहे आणले नि मी न बघता पोह्यासाठी भिजवले .. लगदा झालाच सगळा.. Sad
तर ह्या पातळ पोह्यांचे काय करु? दडपे पोहे नि कटलेट हे ऑप्शन आहेत .. अजुन काय करता येईल?

माझ्याकडे बर्यापैकी सातूचं पीठ आहे. जवळपास १/२ किलो तरी असेल. त्याचं भिजवून खाण्याव्यतिरीक्त, अन पोहे याव्यतिरीक्त अजून काय करता येईल?

सँडविचेस साठी थोडा रगडा काढून ठेवून बाकीचा फ्रीज करुन टाकला, आता काही दिवसांनी रगडा पॅटीस करेन.
सगळ्यांना धन्यवाद. Happy
सुमेधाव्ही, ऊन आहे इथे.

mavaa...unh asel tar...bhijalelya harabaryachi dal mirachi mith ani jire pani n ghalata vatun tyat he mix Karun tyache hatane plastic chya kagadavar sandge ghalata yetil. aamhi uralelya vatalelya daliche kele ahet ekda tevha tyat uraleli shijaleli dal pan mix keli hoti....

ragada pav bhajit pan mix karata yeto...baki bhajya nehamisarkhya ghalayachya fakt matar n ghalata ragada ghalayacha.

प्रकृतीला उष्ण पडणार नाही, असे लाडू सुचवू शकाल? पोरांना लाडू खूप्प्प्प्प आवडतात पण सध्या उन्हाळ्याने अंगावर घामोळे खूप झाले आहेत. रोज लाडूसाठी हट्ट असतो. मी सध्या तरी पोळीच्या/कुरमुर्‍याच्या लाडूवर भागवतेय पण बेसन/रवा लाडू टाईप फीलवाले लाडू असतील तर सोपं जाईल.
[नाचणीच्या पिठाच्या लाडूचा विचार केला होता. पण नाचणी सत्व थंड असतं, आणि नाचणी पीठ मात्र उष्ण असं ऐकलं, त्यामुळे परत बेत रद्द केला. सातूच्या पीठाचे होतील का लाडू? ते थंड असतं ना, म्हणे?]

कणकेचे लाडू, राजगिर्‍याचे लाडू चालतात उन्हाळ्यात. जाडसर गव्हाचं पिठ आणि लाडवाचं बेसन एकत्र करुन करता येतील. रवा-बेसन लाडूही चालतील की.

कणकेचे लाडू
फुटाण्याचे / पंढरपुरी डाळ्याचे (पीठ करून) लाडू
जागूच्या कृतीने हिरवे मूग व पोह्याचे लाडू
पिवळी मुग डाळ लाडू
रवा नारळाचे लाडू
मनुकांचे लाडू
रवा रताळे लाडू

धन्यवाद शर्मिला आणि अकु.
बेसनची अ‍ॅलर्जी आहे, हे आताशा लक्षात आलंय, म्हणून बेसन टाळतेय. पंढरपुरी डाळ पण हरभर्‍याच्या डाळीपासून म्हणजे बेसन बनते त्याच डाळीपासूनच बनते ना?

हो धारा, मग ते टाळलेलेच बरे! मुगाच्या पीठाचा पर्याय वापरता येईल.
दाण्याच्या कुटाचा लाडू पण लगेच होणारा!

कणिक हि उष्णच असते. म्हणून चपातीला तूप लावतात, लोणी लावतात.
बेसन/कणकेपेक्षा बारली/हिरवे मूग पीठाचे लाडू छान राह्तील. जागूने मूगाचे लाडू लिहिलेले वाटतं , मला आठवत नाही. पण शोधा म्हणजे सापडेल. Happy

Pages