किन्वा वापरून भेळ

Submitted by दीपांजली on 13 May, 2014 - 01:51

नेहेमीची चुरमुरे वाली भेळ करतो तशी चुरमुर्यां ऐवजी किन्वा वापरून भेळ ..
किन्वा वापरून केलेला माझा सर्वात आवडता चटकदार पदार्थ !
(किन्वा माहित नाही त्यांच्यासाठी:
Quinoa grain : http://en.wikipedia.org/wiki/Quinoa
शिजलेला किन्वा आणि Health benefits बद्दल :
http://besthomechef.com.au/blog/how-to-cook-quinoa/)

लागणारा वेळ :
किन्वा शिजून रेडी असेल तर साधारण १५ मिनिटं .

साहित्यं:
मोकळा शिजवलेला किन्वा (कुठलेही मसाले किंवा भाज्या न घालता शिजवलेला, थंड झालेला.)
मिक्स करण्यासाठी:
फरसाण ( मी 'सूरती ' ब्रँड पंजाबी मिक्स फरसाण वापरलय , यु.एस मधल्या फरसाणा पैकी माझा आवडता फ्लेवर , बर्यापैकी तिखट असतो.)
चटण्या:
चिंच -खजुर भेळ चटणी.
वर्हाडी ठेचा किंवा कुठलाही लाल /हिरव्या मिर्चीचा ठेचा.
चिरलेल्या कच्च्या भाज्या बारीक चिरलेल्या :
कान्दा
टमॅटो
कैरी ( मिळाली नाही म्हणून मी स्किप केली.)
कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक चिरून( पुदिन्याची चटणीही चालेल पण वर्हाडी ठेचा , फरसाण आणि २ चटण्या जरा जास्तं तिखट लागतात )
काकडी
शिजवलेली भाजी : उकडलेला बटाटा छोट्या फोडी .

सजवायला:
आलं (हे लांब चिरायचं बारीक सळई कट ) ,
डाळींबाचे दाणे
चाट मसाला/ जल्जिरा पावडर

कृति:
मोकळ्या शिजवलेल्या थंड ़झालेल्या किन्वा मधे सर्व भाज्या , चवीला आवडेल अशा प्रमाणात चटण्या , फरसाण मिक्स करायचं , serve करताना वरून डाळींबाचे दाणे , आल्याचे बारीक काप आणि चाट मसाला भुरभुरा आणि हादडा !

भाज्या आणि भेळेचा फोटो काढला , मोकळ्या किन्वाचा नाही काढला :).

image_27.jpgअधिक टिप्स :
* भेळेत काही लोकांना इतक्या भाज्या आवडत नाहीत पण किन्वा मधे मात्रं स्किप करु नका , मोअर द मेरिअर !
* घरात रेडी असतील तर थोडे मोड आलेले मुग पण गार्निश करताना टाकु शकता !
* मी भेलपुरी करते तेंव्हा २-३ दही वडे कुस्करुन टाकते कालवताना आणि शेवपुरीच्या चपट्या पापड्याही टाकते , जर हे सगळं घरात असेल तर हे व्हेरीएशन ट्राय करा .

माहितीचा स्त्रोतः
माझी मैत्रीण , 'कांचन '.
तिच्या सॅलेड च्या रेसिपीवरून सुचलेलं भेळेचं व्हर्जन आणि मी केलेले बदल !
मुळ कृतित ती किन्वा शिजवताना ड्राय क्रॅनबेरीज टाकते , सॅलेडच्या भाज्यांबरोबर हिरवी चटणी , लिंबाचा रस टाकते .
(ती फरसाण -चिंच खजुराची चटणी , बटाटे-आलं , वर्हाडी ठेचा वगैरे टाकत नाही , सॅलेड स्टाइल ने करते बाकीच्या भाज्या घालून , ते व्हर्जन पण छान लागतं ).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किन्वा माहित नाही त्यांच्यासाठी थ्रेड अपडेट केलाय , तिथे दिल्यायेत लिंक्स किन्वा बद्दल .

एकदम मस्त पाकृ. अतिशय आवडली. किन्वा चटपटीत रुपात म्हणल्यावर नक्कीच करणार. :). थँक्स.
दोन्ही वर्जन्स ट्राय करेन, पण आधी नंबर भेळेचाच ! मोड आलेले मूग ची आयड्या पण बेस्ट.

दीपांजली, आजच भेळ करुन बघितली, एकदम यम्मी प्रकरण झालं. सोपी, झटपट आणि हेल्दी रेसिपी, आता केली जाईलच. मस्त पाकृ दिल्याबद्दल परत थँक्स. Happy

ही लिस्ट्वर ठेवणार आहे. डाळींबाचे दाणे आणायचा रिमांयडर ठेवायला हवा Happy

मस्त फोटो/रेस्पि कल्पना.

आज चा माझा लन्च .....॑किन्वा वापरून भेळ.....मजा आली .....

दिपाजली --- धन्यवाद ....quinoa.jpg

Back to top