नेहेमीची चुरमुरे वाली भेळ करतो तशी चुरमुर्यां ऐवजी किन्वा वापरून भेळ ..
किन्वा वापरून केलेला माझा सर्वात आवडता चटकदार पदार्थ !
(किन्वा माहित नाही त्यांच्यासाठी:
Quinoa grain : http://en.wikipedia.org/wiki/Quinoa
शिजलेला किन्वा आणि Health benefits बद्दल :
http://besthomechef.com.au/blog/how-to-cook-quinoa/)
लागणारा वेळ :
किन्वा शिजून रेडी असेल तर साधारण १५ मिनिटं .
साहित्यं:
मोकळा शिजवलेला किन्वा (कुठलेही मसाले किंवा भाज्या न घालता शिजवलेला, थंड झालेला.)
मिक्स करण्यासाठी:
फरसाण ( मी 'सूरती ' ब्रँड पंजाबी मिक्स फरसाण वापरलय , यु.एस मधल्या फरसाणा पैकी माझा आवडता फ्लेवर , बर्यापैकी तिखट असतो.)
चटण्या:
चिंच -खजुर भेळ चटणी.
वर्हाडी ठेचा किंवा कुठलाही लाल /हिरव्या मिर्चीचा ठेचा.
चिरलेल्या कच्च्या भाज्या बारीक चिरलेल्या :
कान्दा
टमॅटो
कैरी ( मिळाली नाही म्हणून मी स्किप केली.)
कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक चिरून( पुदिन्याची चटणीही चालेल पण वर्हाडी ठेचा , फरसाण आणि २ चटण्या जरा जास्तं तिखट लागतात )
काकडी
शिजवलेली भाजी : उकडलेला बटाटा छोट्या फोडी .
सजवायला:
आलं (हे लांब चिरायचं बारीक सळई कट ) ,
डाळींबाचे दाणे
चाट मसाला/ जल्जिरा पावडर
कृति:
मोकळ्या शिजवलेल्या थंड ़झालेल्या किन्वा मधे सर्व भाज्या , चवीला आवडेल अशा प्रमाणात चटण्या , फरसाण मिक्स करायचं , serve करताना वरून डाळींबाचे दाणे , आल्याचे बारीक काप आणि चाट मसाला भुरभुरा आणि हादडा !
भाज्या आणि भेळेचा फोटो काढला , मोकळ्या किन्वाचा नाही काढला :).
अधिक टिप्स :
* भेळेत काही लोकांना इतक्या भाज्या आवडत नाहीत पण किन्वा मधे मात्रं स्किप करु नका , मोअर द मेरिअर !
* घरात रेडी असतील तर थोडे मोड आलेले मुग पण गार्निश करताना टाकु शकता !
* मी भेलपुरी करते तेंव्हा २-३ दही वडे कुस्करुन टाकते कालवताना आणि शेवपुरीच्या चपट्या पापड्याही टाकते , जर हे सगळं घरात असेल तर हे व्हेरीएशन ट्राय करा .
माहितीचा स्त्रोतः
माझी मैत्रीण , 'कांचन '.
तिच्या सॅलेड च्या रेसिपीवरून सुचलेलं भेळेचं व्हर्जन आणि मी केलेले बदल !
मुळ कृतित ती किन्वा शिजवताना ड्राय क्रॅनबेरीज टाकते , सॅलेडच्या भाज्यांबरोबर हिरवी चटणी , लिंबाचा रस टाकते .
(ती फरसाण -चिंच खजुराची चटणी , बटाटे-आलं , वर्हाडी ठेचा वगैरे टाकत नाही , सॅलेड स्टाइल ने करते बाकीच्या भाज्या घालून , ते व्हर्जन पण छान लागतं ).
वाह डीजे! मस्तच आहे पाककृती
वाह डीजे! मस्तच आहे पाककृती आणि चित्र सुद्धा.
थँक्स बी, फोटोज सगळ्या
थँक्स बी,
फोटोज सगळ्या साहित्याचे विसरले पण काढायला :).
किन्वा काय असतं??? (घोर
किन्वा काय असतं??? (घोर अज्ञानी बाहूली)
मस्त की इथे किन्वा मिळालं की
मस्त की इथे किन्वा मिळालं की करून बघेन.
सहीच. दोन्ही व्हर्जन्स
सहीच. दोन्ही व्हर्जन्स आवडतील
मस्त आहे हे किन्वाचं वर्जन.
मस्त आहे हे किन्वाचं वर्जन.
छान आहे!
छान आहे!
मस्त प्रकार . मी साधं सॅलड
मस्त प्रकार .
मी साधं सॅलड नेहमी करते . आता हिरवी चटणी घालून करेन
वॉव! सही .. कधी विचारच केला
वॉव! सही .. कधी विचारच केला नाही भेळेचा .. मस्तच!
मुमा. मी सुद्धा हेच विचारायला
मुमा. मी सुद्धा हेच विचारायला आले होते.
किन्वा quinoa असं गुगल करून
किन्वा quinoa असं गुगल करून पहा.
किन्वा काय असतं??? (घोर
किन्वा काय असतं??? (घोर अज्ञानी बाहूली) >> +१
मस्त!
मस्त!
किन्वा माहित नाही
किन्वा माहित नाही त्यांच्यासाठी थ्रेड अपडेट केलाय , तिथे दिल्यायेत लिंक्स किन्वा बद्दल .
यम्म...
यम्म...
एकदम मस्त पाकृ. अतिशय आवडली.
एकदम मस्त पाकृ. अतिशय आवडली. किन्वा चटपटीत रुपात म्हणल्यावर नक्कीच करणार. :). थँक्स.
दोन्ही वर्जन्स ट्राय करेन, पण आधी नंबर भेळेचाच ! मोड आलेले मूग ची आयड्या पण बेस्ट.
मस्त!
मस्त!
मस्तच.... कुठला किन्वा
मस्तच....
कुठला किन्वा चांगला, लाल , पांढरा का मिक्स?
मी मोस्ट्ली व्हाइट आणते ,
मी मोस्ट्ली व्हाइट आणते , कधीतरी मिक्स !
फोटो मस्त दिसतो आहे भेळेचा!
फोटो मस्त दिसतो आहे भेळेचा!
दीपांजली, आजच भेळ करुन
दीपांजली, आजच भेळ करुन बघितली, एकदम यम्मी प्रकरण झालं. सोपी, झटपट आणि हेल्दी रेसिपी, आता केली जाईलच. मस्त पाकृ दिल्याबद्दल परत थँक्स.
हे प्रकरण बरचसं ज्वारी सारखं
हे प्रकरण बरचसं ज्वारी सारखं दिसतंय.
भारीये!! किन्वा उपमा किंवा
भारीये!! किन्वा उपमा किंवा पुलाव करते बर्याचदा पण अशी भेळ पण मस्तच लागेल.
किन्वा सलाड आवडते आहे. आता
किन्वा सलाड आवडते आहे. आता भेळ करुन बघेन, छान आहे आयडीयेची कल्पना
छाने. करुन बघेन.
छाने. करुन बघेन.
भारी प्रकार आहे, धन्यवाद
भारी प्रकार आहे, धन्यवाद दिपांजली!
ही लिस्ट्वर ठेवणार आहे.
ही लिस्ट्वर ठेवणार आहे. डाळींबाचे दाणे आणायचा रिमांयडर ठेवायला हवा
मस्त फोटो/रेस्पि कल्पना.
खरंच मस्त प्रकार आहे! मी
खरंच मस्त प्रकार आहे! मी दोनदा करून खाल्ली!
मस्त!
मस्त!
आज चा माझा लन्च
आज चा माझा लन्च .....॑किन्वा वापरून भेळ.....मजा आली .....
दिपाजली --- धन्यवाद ....