युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोललेला नारळ घरी कसा फोडायचा ? .....तुम्ही किती नशीबवान आहात.नारळ रोजच्या जेवणात लागत नाही म्हणून!

कोयता वापरत नाही का ? मयेकरांनी सांगितल्याप्रमाणे नारळ फोडायचा.

Brown Jasmine Rice खुप आहे घरात. डोश्या साठी वापरता येऊ शकेल का?

सुगरणींनो लवकर मदत करा प्लिज.......

आमच्या मातोश्रींनी मेथिचे लाडु करण्यासाठी तुपामधे मेथी पावडर भिजवण्या ऐवजी पाकिट भरुन बडीशेप पावडर भिजवली. त्याचे आता काय करता येईल?

Brown jasmine rice>>> रोजच्या भातात थोडा थोडा ढकला. काहीही समजणार नाही पब्लिकला. मध्ये मध्ये तांबडी शितं दिसतील तेव्हाढाच काय तो फरक. मी असा brown basmatee rice सध्यासंपवते आहे. तीन भाग नेहमीचा तांदुळ : एक भाग ब्रा ज रा असं करून बघा.

रिमझिम, बापरे! रोज जेवनानंतर थोड़े थोड़े चाटण म्हणून खा!

हो ते आहेच!
पण ताजे तुप कढवुन त्यात हे प्रताप झाल्यावर माता जरा जास्तच नाराज आहे. आता ते चाटण प्रकार काही फारसा खाल्ला नाही जाणार म्ह्णुन मग जर आता यातच मेथी पावडर टाकता येईल का?
रच्याकने माझ्याएअ‍ॅक्सिडेंट नंतर अजुनही उजव्या रिब्ज खुपच दुखतात ई ई कारणास्तव देशात जाण्याआधी मेथी लाडु करुन ठेवायच्या विचारात हा प्रकार झाल्याने काही दुसर्‍या उपायाने सुधारता एतील का हे पहात आहे.

धन्यवाद मंजु.

आता तरी त्या तुपातिल बडिशेपे मधेच भाजुन कणिक घालुन लाडु ट्राय करत आहे. कसे झाले लगेच पोस्टेन Happy

इन्ना मी ब्राऊन बिया हाता नेच काढते. लहान फोडी करून ताटात घेते आणि काट्याने बिया काढते. लगेच निघतात. सफेद बिया वरवर्च्या काढून आत राहिलेल्या मिक्सर ला लावल्या तरी चालतील.

रिमझिम,

तुपातली बडीशेपपावडर आणि त्यात योग्य प्रमाणातल्या धणे-जिरे-मिरे-लवंग-दालचिनी पावडरी मंद आचेवर एकत्र भाजल्या तर अप्रतिम मसाला होईल. मसूर आमटी, मसालेभात, रस्से, आमट्या यात घालता येईल. मसाला भरपूर टिकेलही.

रिमझिम, सॉरी!
मी ते 'तुपात' भिजवलेले वाचलेच नाही म्हणजे वाचले पण युक्ती सुचवण्याच्या घाईत दुर्लक्षिले गेले Wink
तुपात भिजवलेली बडिशेपेची पावडर सरबताच्या उपयोगाची नाही.

कच्च्या कैरीचा रस काढायची काही सोपी/ फास्ट वगैरे कृती आहे का? शिजवलेली कैरी नकोय.
मी कैरी किसून, मिक्सरमधून काढून हाताने दाबून मग फडक्यातून गाळून घेतला रस. पण नारळाचा चव दाबून सहजपणे ना दू निघते. तेवढे कैरी प्रकरण सोपे नाही.
तर याहून सोपी कृती असू शकेल का?

किसू नकोस. तुकडे थोडं पाणी घालून मिक्सरमधून काढ. सालं काढली की ती प्युरी तुरट होत नाही. मग ती गाळून घे. अर्थात कच्च्या कैरीचं सरबत करायला वापरते मी ही कृती त्यामुळे तितपत कॉन्सन्ट्रेटेड पुरते मला.

बटाटा वडे करायचे म्हणून बटाटे उकडले आणि आपल्याकड्च्या लादीपावासारखा पाव पण आहे. अचाऩ़क वेळेचं गणित गडबडलंय. याच वस्तु वापरून झटपट बनवणार (travellable) काय बनवता येईल.

पंधरा मिन्टात योग्य उत्तर देणार्या आय डीस ख़ास बक्षिस Wink
आभार्स Happy

१३ मिनिटांत उत्तर दिलंय. अयोग्य वाटलं तर उत्तेजनार्थ बक्षीस आहे का? Proud

नी, कच्च्या कैरीचा रस गोड पदार्थाला वापरायचा नसेल तर सालं काढून, किसून बर्‍यापैकी मीठ-साखर लावून ठेवायचा. साधारण १५-२० मिनिटांनी मिक्सरमधून वाटून, फडक्यात बांधून पिळून घ्यायचं. नंतर त्या चोथ्यात पाणी घालून आणखी एकदा मिक्सरमधून फिरवून डायल्यूट झालेला का होईना पण रस काढता येतो.

भाजलेला पाव सकाळी घरून केल्यावर लंचला बरा लागेल का? मी याआधी दाबेली करून लगेच खाल्ली आहे पण प्रवास?
ब ची भा हा शेवटचा पर्याय म्हणून आहेच फक्त आधीच बवडे करण्याचं डिक्लेअर केल्यामुळे पब्लिक आशा लावून बसणार. आता आली का कंबख्ती Uhoh

कुणीतरी पिकनिकला आणलेली दाबेली खाल्ली आहे. चांगली लागली होती. कच्चा कांदा घातला नव्हता. चटण्या वेगळ्या आणल्या होत्या. भाजलेले गार पाव अजीबात वाईट लागले नाही. "बटाटेवड्यांच्या आशेचं राहू द्या. आणलंय ते गपगुमान खा" म्हणून सांगून टाका. Proud

मृण,
झाला पण. पर्वा मार्गारिटासाठी हवा होता. कैरीची सालं काढून, तुकडे करून (किसापेक्षा तुकड्यांनी चव चांगली राहील असे शर्मिलाचे म्हणणे जे बरोबर ठरले!) ते मिक्सरमधे अगदी गंधासारखं वाटण होईतो फिरवले आणि मग कापडातून गाळले. बेसिक गाळप झाल्यावर सरळ चक्क्यासारखे बांधून ठेवले. तेवढ्यात बराच रस उतरला खाली पातेल्यात. मग तासाभराने पुरचुंडी पिळून घेतली. बराच रस आला. अजून तासभर ठेवला तरी चाललं असतं. रस बाटलीत भरून बाटली फ्रिजात.
मला मार्गारिटामधे ग्लासांना लावलेल्या मीठाशिवाय इतर मीठ-साखर चव आवडत नाही त्यामुळे मीठ साखर काही नको होती. Happy

तर त्या दिवशी बटाट्याचं पुरण बटर तापवून परतलं आणि त्यात थोडा चाट मसाला, हळ्द, मीठ, धणाजीरा पूड वगैरे (बाकी काही घातलं असल्यास आठ्वत नाही) घालून त्या पावाच्या मध्ये ते आणि थोडं चीज (त्यादिवशी ़किसलेल्या चीजचं जे पाकीट गावलं ते) घालून आणि थोडं बटर घालून पाव भाजून घेतला (पुन्हा वर बटर आहेच) हे सगळे पाव गरम राहाय्च्या कॅसेरोल मध्ये भरून नेले. इतक्या बटरमुळे का काय माहित नाही पण पब्लिकने ब वड्याची आठवण न काढता दहा मिनिटांत चट्टामट्टा केला Happy
"मृण्मयी" यांना ब़क्षिस आवडल्या गेले असेल अशी अपेक्षा Happy

.

प्रीती कच्छी दाबेली (त्या दिवशी) करुन न न्यायची कारणे हा नवा धागा केव्हातरी उघडेन.
Happy
अब हम शक्य असेल तर आगे बढते है Happy

आभार्स.

Pages