निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरीपण मामी, हा वेगळा प्रकार दिसतोय. मी बघितलेल्या झाडांची पाने पांढरट होती, हि हिरवी दिसताहेत..
इस हरेपन क्या राज है भई ?

मी 'फेनेल'च्या प्रेमात पडलीये. किती गोड दिसतात ती. मध्यंतरी ऑस्ट्रेलियन मास्टरशेफमध्ये या फेनेलच्या एक दोन पाकृ पाहिल्या. पण करून बघण्याचा उत्साह मास्टरशेफ बरोबर संपला. तसंही मास्टरशेफ बघताना आपणही एकामागोमाग एक जगप्रसिद्ध डिशेस बनवतोय अशी स्वप्नं पडत. घरच्यांच्या नशिबाने ती स्वप्नंच ठरत.

पण परवा फुडहॉलमध्ये एक ताजं रसरशीत फेनेल बघून जुनी ज्योत पुन्हा एकवार उजळली. आता मी एका कुंडीत ३-४ बडीशेपेचे दाणे लावून ठेवलेत. बघूयात. Happy

बारामती, वर्‍हाड, नांदेड ,मराठवाडा इ. ठिकाणची शेतकरी कुटुंबं पुण्याला बहिणीच्या शेजारी राहतात.

त्यांच्या कडून ही मजेशीर माहिती समजली कि येथील शेतांना लक्ष्मी, पर्वती आणी विहीरी, बोर वेल्स ना खंडोबा

अशी नावं दिलेली असतात . आणी गहू, ज्वारी, ऊस अशी पिकं काढली कि शेतकरी जमिनींची खण, नारळ,

बांगड्यांनी ओटी भरतात, पूजा करतात.. आणी ,' हे लक्षुमे तुला खणलं , तुला त्रास दिला असं म्हणून माफी

मागतात, तर विहिरींची , बोर वेल ची पूजा करून त्याला ही पागोटं, हळद कुंकू वाहतात आणी त्याचं नाव

घेऊन पाणी घेतल्या ची माफी मागतात .

( त्या वाहिलेल्या वस्तू नंतर गरीब गुरीब लोकं घेऊन जातात)

जमीन, पाणी इ. च्या प्रति कृतज्ञता प्रकट करण्याची ही प्रथा मला खूप आवडली .

आपली संस्कृती ही ,' पागान' संस्कृती शी मिळती जुळती आहे का??

वॉव..दिनेश फेनेल चा फारच सुरेख फोटो आणी माहिती..

पूर्वी वाचली होती तुझ्याच लेखा मधे.. परत वाचली.. सुप्पर्ब!!

वर्षुताई, ही निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याची पद्धत किती छान आहे. आता आपल्याला भाबडी वाटेल कदाचित पण पाणी आणि शेती यांभोवती ज्यांचं जीवन बांधलं आहे त्यांच्या मनात अपार कृतज्ञताच असणार.

या माहितीबद्दल धन्यवाद.

अरे देवा! माझा प्रेमभंग झाला की मेधाच्या त्या बाफावरच्या या पोस्टमुळे

हे वर लिहिलेले बल्ब्स आहेत ते बडिशेपेच्या एका स्पेसिफिक Species चे आहेत. घरची बडिशेप पेरली तर ते उगवणार नाहीत. इकडे बर्पी वगैरे सीड कॅटलॉग मधून असल्या फेनेलच्याबिया मिळतात. (मी कधी लावल्या नाहीत.)

सुरण आणि ओव्याची फुले प्रथमच पाहिली. अतिशय सुंदर. >> सेम असेच म्हणते.
सरिवा, इथे तुला पाहुन बरं वाटलं कसा आहे आता हात?

सुरण, ओवा.. पहिल्यांदाच पाहायला मिळाली ही फुलं.. जय नि ग..

मामे..प्रेमभंग Lol Rofl Biggrin यू आर टू मच्च!!!!!!!!!!

सरिवा....... किती दिवस हाताला कंपलसरी आराम???? गुड टू सी यू Happy

हा बघा काय बरं म्हणूया याला ? जुळाआंबा ? यापेक्षा चांगलं नाव सुचवा ना
परवा को़कणात गेले होते तेव्हा आमच्या बागेत मिळाला. जेंव्हा खूप जवळ जवळ फळधारणा होते तेंव्हा कधी कधी ते एकमेकाना असे चिकटले जातात. त्यातला एक पूर्ण वाढ्ला आणि एक रहिली बिटकी. अर्थात अशा गोष्टी अगदी अपवादात्मकच ! निसर्गाचा चमत्कारच म्हणा ना ! म्हणूनच इथे शेअर करते आहे.

From mayboli

मनीमोहोर,जोडआंबा खूप आवडला.

तुला,वर्षुला भेटून मलाही अगदी मस्त वाटतंय.हाताला अजून किमान ३ आठवडे विश्रांती द्यावी लागेल,पण तोपर्यंत डावा हात करतोय मला मदत.

Atlanta botanical garden चा माझा जुना धागा मी कालच पुन्हा संपादित केला आहे.फारशी माहिती नसल्याने तो बरेच महिने अर्धवट होता. गुलमोहोर प्रकाशचित्रणात(७२ तासातील लेखन) तो पाहता येईल.

मी भाग १ ते १८ वाचत होते. आता लिहिनार आहे.
शशान्क निग वर काहि दिवस नवह्ते तर मला वात्तले कि
ते कोथेतरि फिरायाला गेले असतिल. आल्यावर छान फोतो
पहायला मिलेल.

suraNaachee mee paahilelee phule sonchaaphyaachyaa raMgaasaarakhee pivaLee hotee. suraNaachaa daaMDyaachee poorNa vaaDha jhaalee kee tyaachee paane pivaLee paDoo laagataat aaNi daaMDyaachyaa Tokaapaasoon ek chhoTyaa talavaareesaarakhe paate ugavate. he paate shevaLaaMsaarakhe aaNi maaMsal asate. te shevaLaaMsaarakhecha neeT karoon tasheech bhaajee karataat. aLoolaasuddhaa asheecha paatee phuTataat aaNi tyaachee paN bhaajee hevaLaaMsaarakheecha hote.

सुरणाला आपण यॅम म्हणतो कधी कधी पण नायजेरियात एक वेगळाच यॅम मिळतो. सहा इंच व्यासाचा आणि दोन फूट लांबीचा ( हो मापं बरोबर आहेत ) कंद असतो. त्याचा वेल असतो. तो तसा वर्षभरही टिकतो. आतून पांढरा असतो आणि चवीला बराचसा बटाट्यासारखा लागतो. खाज अजिबात नसते. शिजतोही पटकन. आपल्याकडे यायला हवा तो,

आफ्रिकेतले शेतकरी शेतात फार राबत नाहीत. ती पिके ( कसावा, मका, टॅरो ) आपोआप निसर्गच वाढवतो. त्यामानाने आपल्याकडे पिकांसाठी फार मेहनत घ्यावी लागते.

<<<जमीन, पाणी इ. च्या प्रति कृतज्ञता प्रकट करण्याची ही प्रथा मला खूप आवडली .
आपली संस्कृती ही ,' पागान' संस्कृती शी मिळती जुळती आहे का??
अगदी काही रांगाच्या वा धूनांच्या मागेही निसर्ग आहेच. >>>> वर्षू नील रा.चिं. ढेरे यांनी आपल्या संशोधनात हे सांगितलं आहे.की अशा प्रकारच्या पूजा प्रथा आपल्याकडेही पहायला मिळतात. रेणूका, सातेरी इ. पूजा ह्या पृथ्वी पूजाच आहेत. ढगो-मेघो पूजा पाणी म्हणजे पाणी पूजा इ.

वर्षुताई मस्त पोस्ट. निसर्गाबद्दलची कृतज्ञता छान व्यक्त करतात.

जुळा आंबा छान आहे.

जागू, मामी मस्त फोटो. सुरणाचे फूल आधी पाहिले होते पण ओव्याची पहिल्यांदाच पाहतोय. माझ्याकडच्या ओव्याला अजुन कधीच फुलोरा आला नाही. Sad

जुळांबा (हे मेथांबा, रातांबा सारखं वाचावं :फिदी:) मस्तच Happy

दिनेश इथे याम स्वीट पोटेटो च्या प्रकारात मोड्तो.
आपला स्वी.पो. म्हण्जे रताळं....जे बाहेरून ब्राउनिश , आत पांढरट. त्याच्याच जोडीने अग्दी रताळ्यासारखा पण आतून पिवळा असा .....हाही स्वीट पोटॅटो च्याच रॅकमधे अस्तो. पण तिथे याम लेबल असते.
एकदा आण्लं होतं चुकीने पण चवीला काहीच फरक नाही. अगदी रताळंच.

दोन फुटाचा याम.. वॉव.. फोटो घेऊन टाक बरं दिनेश...

अन्जू, अंजली.. थांकु Happy

सरिवा.. डाव्या हाताने छान सराव होतोय ना टायपायचा???? गुड गुड!!!

जिप्स्या जय महाराष्ट्र!!! सुपर्ब ओळी..

जुळांबा,रातांबा,मेथांबा Biggrin

इथे अंगोलातही आपल्या रताळ्याचा खुप वापर आहे. हे लोक त्याची पानेही खातात. आपल्याकडे मात्र पाने खायची टाळतात. खायचीच झाली तर आधी तव्यावर भाजून घेतात.
इथे अगदी रेतीतही रताळे छान होते. वेल माजतोच त्याचा.

ते आतून केशरी रंगाचे असते ते आणखी वेगळे.

वर्षू.. नायजेरियात ते. अगदी मुद्दाम सांगायचे म्हणजे दिल्लीची जी नायजेरियन एम्बसी आहे तिथल्या अधिकार्‍यांसाठी हे यॅम खास लेगॉसवरून आणले जातात. हे पिक आपल्याकडे आले पाहिजे.

Pages