निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
Capparis brevispina चा
Capparis brevispina चा फ्लोवर्सऑफ इन्डिया साईटवरचा फोटो श्रीकांत इंगळहळ्ळीकरांनी राणीबागेत काढलेला आहे
मोनाली, मस्त आहेत तुझी फुले.
जिप्सी माझ्याच फु(मु)लाचा ना
जिप्सी माझ्याच फु(मु)लाचा ना की त्याच्या??>>>>>>>>>>>>>>दोघांच्याही
धन्यवाद शशांकजी. मार्खामिया
धन्यवाद शशांकजी.
मार्खामिया बोलल्यावर दाढीवाले गृहस्थ डोळ्यासमोर येतात.
ह्या झाडाचा काही उपयोग वगैरे आहे का?
राणीच्या बागेतले फोटो मस्तच.
राणीच्या बागेतले फोटो मस्तच.
साधने, तुम्ही तिघेच गेला होतात. 'चौथी'ला नव्हत आणलं?
'चौथी'ला नव्हत आणलं? ते
'चौथी'ला नव्हत आणलं?
ते योग्य माणसाला विचार.. अजुन आपले दोनाचे चार झालेले त्याच्या अंगवळणी पडलेले नाहीय, त्यामुळे तो स्वतःला अजुनहि जिप्सीच समजतोय...
अजुन आपले दोनाचे चार झालेले
अजुन आपले दोनाचे चार झालेले त्याच्या अंगवळणी पडलेले नाहीय,>>>>>>>>>>>नया है वह!
ते दोनाचे सहा होईपर्यंत असेच
ते दोनाचे सहा होईपर्यंत असेच राहणार का?
पिंपळाची जिद्द
.........आणि अशा तर्हेने
.........आणि अशा तर्हेने पुन्हा "शोभा" यांनी "निसर्गाच्या गप्पा" ऐवजी "जिप्स्याच्या गप्पा" सुरू केल्या आहेत.
जिस्पी = भटके लोक भटके लोक
जिस्पी = भटके लोक
भटके लोक कुठे भटकणार = अर्थातच निसर्गात... नाय तर मग काय रेल्वे लाइनीवर????
निसर्ग कुठे = निसर्गाच्या गप्पात
मग आता बोला..........
साधने तु.मा.ख.मै. मग आता
साधने तु.मा.ख.मै.
मग आता बोला..........>>>>>>>>>>जिप्स्या, आता बोला.
आता बोलायला काही शिल्लक ठेवलं
आता बोलायला काही शिल्लक ठेवलं का?
(No subject)
जिप्स्या, हे सांग काय आहे ते.
जिप्स्या, हे सांग काय आहे ते.
आज मला माझ्या बेक्क्क्क्कार फोटोग्राफिचं कौतुक वाटतय. (मलाच)
मोनालिप क्यूट आहे तुझी
मोनालिप क्यूट आहे तुझी (सूर्य)फुलं..
शोभा
साधना.. अगं किती चिडवशील जिप्स्या बिच्चार्याला.........
वॉव राबा तील फुलं फारच फुलली आहेत.. सीता अशोक रंग किती स्प्रिंगी ऑरेंज आहे..ब्यूटी..
शशांक.. तू दिलेली लिंक पण मस्त आहे..
ही पिवळी फुलं इतकी सुरेख मखमली दिसतात आणी हवेच्या हलक्या झोताने भुरुभुरु खाली पडतात
आमच्या घरासमोर च्या बागेतील झाडं भरलेली आहेत या फुलांनी सध्या .. बागेच्या कडेने लावलेल्या झुडुपांवर
मुक्तहस्ताने आपल्या फुलांची उधळण करत असतात.. आणी नुसती पानं असलेली ही झुडुपं ही या फुलांना
आपल्या अंगाखांद्यावर घेऊन लेकुरवाळी असण्याचा आनंद लुटताहेत..
राणीबागेत मज्जा आलेली
राणीबागेत मज्जा आलेली दिसते.
मस्त फोटो.
आली का शोभा....सांग ना आता काय ते.......
थोडं मटार शेन्गांबद्दल. या कोवळ्या आहेत म्हणून सालासकट खायच्या असं नाही. देशात कितीही कोवळा मटार असला तरी सालासकट कुठे खातो आपण?
पण जसा आमच्या नगर भागात गुळभेंडी नामक हुरडा बनतो(आठवणीने तोंपासु झालेली बाहुली) , त्याची ज्वारी बनतच नाही.
तशी ही मटारची व्हरायटी आहे.
इथे जनरली होलफूड्स, सेफवे सारख्या ठिकाणातून आण्लेल्या गोष्टीत कीड इ.इ. विचारही तुम्ही करू शकत नाही.
ऑफिसगोअर्स साठी जसे सर्व प्रकारचे रेडी टु ईट असंख्य प्रकार पॅक्ड मिळ्तात त्यातच हा मटारही येतो.
हा धुण्याची गरज नसते. हपिसात पाकीट उघडा मटार धुवा हा सव्यापसव्य कसा करणार ना?
असंच स्वच्छ धुवून बोटाएवढे तुकडे केलेली गाजरंही मिळतात. आधी मला वाट्लं होतं की या गाजरांचा साइझच लहान आहे.
पण तसं नाही.
त्यामुळे हपिसात हे सगळं हेल्दी स्नॅकिन्ग तुम्ही कॅरी करू शकता.
असो....मोनलिप तुझी फुलं गोडंच आहेत . आणि यंदाचा इथला स्प्रिन्ग बघता सूर्य किरण डायरेक्ट अंगावर घेण्यासाठी किती वाट पहावी लागते....आणि एखाद्या दिवशी कड्क ऊन पड्लं की लोक कसे लगेच बाहेर पडतात...अगदी कमी कपड्यात.
कारण जर डिसें ते एप्रिल तुमच्या अंगावर कपड्यांचे ३/४ थर असतील तर ते (जल्लां मेला) डी व्हिटेमिन कधी आणि कसं बनवणार तुमची कातडी?
आपल्या स्किनवर जिथे सूर्यकिरण पडतील तिथे डी व्हिटॅमिन क्रिएट होतं असं आहे ना.......
त्यामुळे इथे डी व्ह्टॅमिनची कमतरता आणि त्यामुळे होणारे परिणामी(रोग) याचं प्रमाण खूप आहे.
या वर्षीचा विन्टर गेल्या ३० वर्षातला वाइट विन्टर आहे. आता गेले कित्येक दिवस पाऊस चालू आहे.
,' डी व्हिटेमिन कधी आणि कसं
,' डी व्हिटेमिन कधी आणि कसं बनवणार तुमची कातडी?.. अगदी!!! अगदी!!!
रम्मी ला ही डी ची कमतरता सांगितलीये त्यामुळे त्यावर औषध सुरुये.. वर्षोन्वर्ष ए सी गाडी, ऑफिस, घराचा
असाही साईड ईफेक्ट
आपला देश सोडून कुठेही किडके मटर आढळले नाहीत.. मग ते लोकं जास्तीचे पेस्टीसाईड वापरतात, आपल्याकडे
नै बुवा असं .. असा गोड गैरसमज करून घ्यावा का ????
स्नो पीज कोवळेच घ्यावे ..म्हंजे त्याना सोलायबिलाय चे , धागे काढण्याची गरजच पडत नाही..
नुसत्या बारीक चिरलेल्या लसणावर किंवा आलं लसणावर , चिमुटभर मीठ टाकून दोन मिनिटं परतल्यावर
सेमी कच्चेच गरमागरम ( हातात चॉप स्टिक्स घेऊन ) खाऊन टाकावे
डी च्या गोळ्या इथे लोक
डी च्या गोळ्या इथे लोक सर्रास घेतात. पण सूर्य किरण डायरेक्ट अंगावर घेणे हा एक बेस्ट उपाय आहे.( अर्थातच)
चॉप्स्ट्किस? त्याने कसं काही खातात विशेष्तः भाताची शितं उडवून उडवून ......़मला तरी कोडंच आहे.
,'विशेष्तः भाताची शितं उडवून
,'विशेष्तः भाताची शितं उडवून उडवून. आईग्गं मानु.. मेले हसून हसून...
ही बाद्लीत बसलेली व खिडकीतुन
ही बाद्लीत बसलेली व खिडकीतुन आलेल्या उन्हातुन 'ड' जीवसत्व घेणारी आमच्या घरची फुले >>>>छान आहेत ग!
जिप्सी,
कदंबच्या फोटोच्या खाली kalam झाले आहे,ते नक्की कदंबच आहे ना?
कदंबच्या फोटोच्या खाली kalam
कदंबच्या फोटोच्या खाली kalam झाले आहे,ते नक्की कदंबच आहे ना?>>>>>नाही देवकी, तो "कळम"च आहे.
मो ह्या शेंगा फेबमध्येच
मो ह्या शेंगा फेबमध्येच मिळतात. ह्या देशी शेंगा आखुड टपोर्या गच्च भरलेल्या असतात व किडक्या नसतात.
मोनाली.. काय ती दादाची
मोनाली.. काय ती दादाची ऐट...!
जिप्स्या फुले घरून निवांत बघतो.
मानूषी.. मूळात युरोपियन लोकांना डी जीवनसत्व कमी मिळत गेले म्हणून त्यांची त्वचा गोरी झाली. मूळ सगळे आफ्रिकनच. यू ट्यूबवर द इन्क्रेडीबल ह्यूमन जर्नी, हि सहा भागांची मालिका आहे. त्यात हे असे चेहरेपट्टीत पडत गेलेल्या फरकांना कशी भौगोलिक कारणे होती ते फार छान दाखवलेय.
वर्षू.. किडक्या भाज्यांबद्दल म्हणतेस ते खरे आहे.
मोनालिप तुझी फुलं सर्वात
मोनालिप तुझी फुलं सर्वात गोड.
जिप्सी, फोटो मस्त आलेत. तामण बघून जीव हरखला. माझ खूप आवडतं फूल. आपल्या महाराष्ट्र राज्याचं फूल ही तामणच आहे असं वाटतय. समुद्री अशोक म्हणजे बॅरिंगटोनिया का? तसं असेल तर नरिमन पॉईंट ला खूप आहेत ना किनार्यावर?
मानुषी, मटारच्या अशा शेंगा प्रथमच पाहिल्या.
हं...इन्क्रेडिबल ह्युमन
हं...इन्क्रेडिबल ह्युमन जर्नी...पाहिलं पाहिजे यूट्यूबवर.
मोनालिप तुझी फुलं सर्वात गोड.>>>>>>> ममो....+ १००
नाही देवकी, तो "कळम"च
नाही देवकी, तो "कळम"च आहे............धन्यवाद जिप्सी!
कळम म्हणजेच कळंब का?
कळम म्हणजेच कळंब का?
फोटो मस्तच आहेत
फोटो मस्तच आहेत
सुप्रभात लोक्स!!!! आपल्या
सुप्रभात लोक्स!!!!
आपल्या महाराष्ट्र राज्याचं फूल ही तामणच आहे असं वाटतय>>>>>>हो आपल्या महाराष्ट्राचे राज्यफुल तामणच आहे.
समुद्री अशोक म्हणजे बॅरिंगटोनिया का? तसं असेल तर नरिमन पॉईंट ला खूप आहेत ना किनार्यावर?>>>>>येस्स
कळम म्हणजेच कळंब का?>>>>>हो, बहुतेक कळम आणि कळंब एकच.
सुप्रभात. आता ओळखा! आणि
सुप्रभात.
आता ओळखा! आणि मलाही सांगा!
हा धागा फ़ारच जोरात पळाला. (१
हा धागा फ़ारच जोरात पळाला. (१ महिना ३ दिवसात १००० पोस्ट.)
जागू, नवीन धागा आता अक्षय्य तृतियेला काढ ग. (०२.०५.१४)
Pages