केलं की नाही?

Submitted by साती on 15 April, 2014 - 01:28

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-

अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मराठी वृत्तवाहिन्यांवर शाब्बास मुंबई , अर्धशतक केले (गेल्यावेळपेक्षा ९-१० टक्के वाढलेत)
तर इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर मुंबईकर मतदानाबाबत उदासीन.

दक्षिण मुंबईनेही चक्क ५४ टक्के गाठले.

ठाण्यात एका निवडणूक कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला Sad

दक्षिण मुंबईनेही चक्क ५४ टक्के गाठले. > या ५४% मधे चार मायबोलीकर आहेत. Happy

या निवडणुकांचा एक फायदा असा की, दर निवडणुकीला विभागातील जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतात.

दक्षिण मुंबईनेही चक्क ५४ टक्के गाठले. > या ५४% मधे चार मायबोलीकर आहेत.

>>>>>>>>>

त्या ४ मध्ये मला धरले नसेल तर ५ करा. Happy

mi paN

मतदान करता आलं नाही. पण ड्युटी व्यवस्थित पार पडली. <<< कहर आहे. Angry
जे नागरिक ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून रातोरात राबतात त्यांच्यासाठी त्यांचे स्वतः चे मतदान करण्यासाठीची तरतूद केली जाऊ नये?

जे नागरिक ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून रातोरात राबतात त्यांच्यासाठी त्यांचे स्वतः चे मतदान करण्यासाठीची तरतूद केली जाऊ नये?

>>>

mazya aai chya matadan krendrat (ward mhanatat ka tyala? ) keli hoti soy, tine hi viting kel

रिया, त्याच मतदारसंघात ड्युटी असेल तर EDC देऊन मतदान करता येते ताबडतोब EVM वरच. माझी लांबच्या मतदारसंघात होती ड्युटी. पोस्टल बॅलेट्सचा अ‍ॅप्लिकेशन जमा करुन घेतलाच नाही. खूप गर्दी गडबड असते आणि मध्येच कधीतरी त्यांना हे आठवतं. मग कुणाला तरी एका टेबलावर बसवतात काहीतरी जमा करुन घ्यायला. नेमकं त्या वेळेस आपण तिथे असू तर जमा केलं जाऊ शकतं. आमचे आय्डी कार्ड्स द्यायला बसलेली महिला कर्मचारी चक्क रडायला लागली होती कारण इतकी प्रचंड गर्दी झाली की टेबल तिच्या अंगावर चेपलं गेलं आणि तिला सहन होईना.

एकदा सांगितल्या रुममध्ये गेले तर रुमला कुलुप होतं अन नंतर २-३दा विचारुन काही कळलंच नाही त्यामुळे पोस्टल बॅलेटसाठीचा फॉर्म अजून माझ्याजवळच आहे. फार थोड्या जणांचे भरले गेले.

पण ही अ‍ॅक्टिव्हिटीच एवढी अफाट आहे की सगळा त्रास फक्त राष्ट्रिय कर्तव्याकडे पाहून सहन करायचा.

आमचे आय्डी कार्ड्स द्यायला बसलेली महिला कर्मचारी चक्क रडायला लागली होती कारण इतकी प्रचंड गर्दी झाली की टेबल तिच्या अंगावर चेपलं गेलं आणि तिला सहन होईना.

आपल्याकडे कुठेही रांग लावली जात नाही याचा मला खुप राग येतो. आज हे अश्विनीचे वाचुन ठरवलेय की मी आजपासुन कुठेही गेले आणि जर तिथे रांग नसेल तर मी जोरात आरडाओरडा करुन सगळ्यांना रांग लावायला भाग पाडेन.

भलेही माझा त्या रांगेत सगळ्यात शेवटचा नंबर येवो, मला चालेल पण आजपासुन गप्प राहुन मीही त्या धक्केखोर गर्दीत सामिल होणार नाही.

साधना, टिम अ‍ॅलोकेशन ऑर्डर्स घेण्यासाठी रांगा होत्या पण आयडी घेताना सगळा वेड्याचा कारभार होता. मधेच अनाउंसमेंट करत की आता सगळ्यांनी हॉलमध्ये जमा. मग आयडी घेण्यासाठी चाललेली मारामारी थांबून सगळे हॉलमधे पळत.

सगळेच हताश. आमच्या खालचे अधिकारी हताश, आम्ही हताश, आमच्या वरचे अधिकारी हताश...त्यांच्या वरचे हताश.... शेवटी हे सगळं कश्यासाठी चाललंय तेच कळेनासं होतं कारण आलेली सरकारं पाहून वाटतं की ह्याचसाठी का केला होता अट्टाहास? पण परत.....खरा देश म्हणजे लोक. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ही संकल्पना खरी ठरवायची तर निवडणूका हव्यातच. पण लोक हे सिरियसली घेतील तेव्हाच ना!

६२ जणांनी मतदान केलंय.
अजून एक दोन महत्त्वाच्या ठिकाणी राहीलंय वोटिंग.
जास्तीत जास्त ३ जणं अजून करतील समजूया.
एकंदर तावातावाने राजकारणावर बोलणारे आपण मत देताना मात्रं चिडीचूप होतोय असं दिसतंय.

एकंदर तावातावाने राजकारणावर बोलणारे आपण मत देताना मात्रं चिडीचूप होतोय असं दिसतंय. >>> असे नसावे साती. मतदान करणारे बरेच असतात पण मतदान केल्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर फोटो टाकणारे कमी जण असतात ना, तसेच असेल हे. Wink

काल पुण्याहुन येताना एक गृप भेटला जो फक्त वोटींग करण्यासाठी गुजरातला जात होता. यावेळी बाकि कॅन्व्हासिंग मस्त झालेय. Happy

यावेळी बाकि कॅन्व्हासिंग मस्त झालेय. >>>> खरोखर. एक किस्सा सांगतो. गेल्या २४ तारखेला अलीबागला मतदान होत त्याच्या दोन तीन दिवस आधी आप वाली काही मंडळी आमच्या कॉलनीत आली. चिरंजीव नुकतीच दहावीची परिक्षा संपल्यामुळे बाहेर जवळच उंडारत फिरत होते. वयाच्या मानाने जरा जास्तच उंच असल्याने आप वाल्यांना हा यंग व्होटर वाटला . त्या पोरापोरींनी याला आम आदमी ची टोपी वगैरे घातली मिठ्याबिठ्या मारल्या व म्हणाले तू आमचा या कॉलनीतला रिप्रेझेन्टेटिव ! सगळ्यांना आप ला वोट द्या अस सांगायच. तुझ्या घरापासूनच सुरुवात कर. तोंडभर हासून चिरंजीव म्हणाले ओ के !... घरी आले... ऐटीत आईला डोक्यावरची टोपी दाखवत म्हणाले ........ आई आई.... अबकी बार ... मोदी सरकार !! इतक्या फास्ट पक्षांतर करणारा राजकारणी कुणी पाहीला आहे का? Lol

done!

फक्त ती स्लिप नेलीत तरी चालेल Happy EPIC असेल तर मात्र अवश्य न्या. कारण EPIC दाखवून किती जणांनी मतदान केलं ह्याची वेगळी नोंद केली जाते.

Pages