Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे मलासुद्धा जुनी बालभारतीची
अरे मलासुद्धा जुनी बालभारतीची पुस्तकं हवी आहेत. दहावीच पुस्तक बराच काळ ठेवलं होतं. मग बाकीची पुस्तकं वाढली तशी ते रद्दीत देऊन टाकलं आता वाटतय की सगळी जुनी पुस्तकं ठेवायला हवी होती. मुलाला वाचून दाखवायला मजा आली असती.
गजानन>> बाळू गुन्डू गिलबिले.
गजानन>> बाळू गुन्डू गिलबिले. त्या मुलाचं नाव, त्याला जन्मतः हात नसतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक गोबर गॅस चा पण धडा होता-> त्यात' शेण्,मूत,मैला, शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या' असं काहीसं होतं--> या वर पुर्ण वर्ग खो खो करत हसला होता
म्हातारी, भोपळा आणि
म्हातारी, भोपळा आणि चर्चासत्रे आम्हालाही होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन एक 'नसती उठाठेव'
अजुन एक 'नसती उठाठेव' आठवतो...माकडाची शेपूट ओन्ड्क्यात अडकते, तो करवत काढायला जातो तेव्हा.
'पाड्यावरचा चहा': आदिवासींच्या पाडयाच वर्णन होत त्यात
अजुन एक 'नसती उठाठेव'
अजुन एक 'नसती उठाठेव' आठवतो...माकडाची शेपूट ओन्ड्क्यात अडकते, <<< हो, त्यात शेवटी एक वाक्य होतं - कृती करून विचार करण्यापेक्षा विचार करून कृती करावी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि त्याच इयत्तेत एक चिमणीचा धडा होता. चिमणीचा फुटाणा लाकडाच्या फटीत अडकतो. सुतार तिला तो काढून देत नाही कारण त्याला राजाचे काही महत्वाचे काम पूर्ण करायचे असते. मग तिची तक्रार एक मुंगी ऐकून घेते आणि ती एकेक करून वरच्या अधिकाराच्या व्यक्तीजवळ चिमणीची तक्रार घेऊन जाते. राजाच्या माहूतापर्यंत जाते. तोही ऐकून घेत नाही. म्हणून ती मुंगी राजाची मिरवणूक चालू असताना त्या हत्तीच्या कानात जाऊन कडकडून चावा घेते. मह माहुताला तिचे ऐकावेच लागते. तिथून मग खालीपर्यंत आज्ञा जाते आणि तो सुतार चिमणीचा फुटाणा काढून देतो.
आणखी एक त्याच पुस्तकात होता - राणीची झोप. गुलाबाच्या कळ्यांच्या बिछान्यावरही राणीला झोप येत नाही. पण एके दिवशी तिच्या नशीबातले गृहतारेच असे काही फिरतात की अनपेक्षीतपणे त्या राणीचा अख्खा दिवस काबाडकष्टात जातो. आणि त्या रात्री मात्र तिला गाढ झोप लागते.
आणखी एक -
सर्कशीत काम करणार्या एका मुलीची गोष्ट होती. या धड्यात त्या मुलीने वाघाच्या जबड्यात आपली मान देतानाचे चित्र पण होते.
आणखी एक -
एके दिवशी बैलगाडी वेशीत आल्यावर पाटलांचा बैल अचानक वेशीतच बसकन मारतो. काही केल्या उठत नाही. पाटलीन बाईंनी मिरच्या उतरून टाकल्या, मांत्रिकाला बोलावले, तरी वगैरे. शेवटी जनावराच्या डॉ. ना बोलावले जाते. ते डॉक्टर येतात आणि क्षणभर पायाची तपासणी करून बैलाच्या उजव्या तळपायात घुसलेला चुका (लहान खिळा) चिमट्याने पटकन उपसून काढतात आणि काय आश्चर्य! पाटलांचा लाडका बैल चटकन अंग झटकून उभा राहतो आणि चालायला लागतो.
तेनालीरामाचाही एक धडा होता. त्यात जी गोष्ट तो बंद डोळ्यांनी करून दाखवेल ती प्रतिस्पर्ध्याने उघड्या डोळ्यांनी करून दाखवावी. यात तेनालीरामण एका पातेल्यात रेती आणि लालतिखट यांचे मिश्रण घेतो आणि आपले डोळे बंद करून चेहर्यावरून खाली ते मिश्रण ओततो. प्रतिस्पर्धी हीच गोष्ट डोळे उघडे ठेवून करताना त्याची वाट लागते.
आणखी काही धडे आठवताहेत याच पुस्तकातले पण थोडा वेळ मिळाला की लिहितो.
कोणाला आठवताहेत का हे धडे?
मला आठवताहेत.. 'गारपीट' असा
मला आठवताहेत..
'गारपीट' असा धडा होता का कोणाला?
हे प्रेमाचा गुलकंद कविता
हे प्रेमाचा गुलकंद कविता आठवतीये का कोणाला?? अत्र्यांची कविता होती.
बागेतुनी वा बाजारातुनी कुठुन तरी त्याने
गुलाबपुष्पे आणुन द्यावीत तिजला नियमाने
-संपादीत
My all time favorite poem![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणखी काही धडे आठवताहेत याच
आणखी काही धडे आठवताहेत याच पुस्तकातले पण थोडा वेळ मिळाला की लिहितो.
कोणाला आठवताहेत का हे धडे?>>>>>>>>>.. गजानन हे सर्व धडे २ रीत होते....
माकडाची शेपूट ओंडक्यात अडकते
माकडाची शेपूट ओंडक्यात अडकते तो आम्हाला पण होता.
ससा आणि कासव ह्या गोष्टीचा पुढचा भाग होता का कोणाला? परत शर्यत लावतात आणि ससा जिंकतो ते, बहुतेक पाचवी ते सातवीच्या दरम्यान होता.
अनिश्का., हो हे धडे
अनिश्का., हो हे धडे बदललेल्या अभ्यासक्रमात दुसरीला होते.
आणखी एक होता. देवगिरीवर.
आणखी एक 'साधूचा घोडा'. हाही मला आवडायचा पण आता नीट आठवत नाही त्यातली गोष्ट.
चर्चासत्रात अडकलेली म्हातारी
चर्चासत्रात अडकलेली म्हातारी आणि भोपळा असे नांव होते धड्याचे.
मला नव्हता. माझं ११वी १२वी संस्कृत होतं पण माझ्या ताईला होता.
तिच्या वेळची पुस्तकं वाचून काढली होती मी.
बहुतेक कुसुमाग्रजांची-
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...ही कविताही आठवते आहे.
फार छान कविता.
स्नेहनिल, इथे पुर्ण कविता
स्नेहनिल, इथे पुर्ण कविता लिहिली की प्रताधिकाराचा भंग होतो (म्हणे) चालतेय का बघुन घ्या एकदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्नेहनिल आणि इतर पूर्ण कविता
स्नेहनिल आणि इतर
पूर्ण कविता इथे लिहताना प्रताधिकाराचा भंग होत नाही ना याची काळजी घ्या.
गजानन हे सगळे धडे आठवत आहेत!
गजानन हे सगळे धडे आठवत आहेत! चौथी मध्ये झेल्या नावाचा धडा होता. व्यंकटेश माडगुळकर यांच्या माणदेशी माणसं मधला..तो पूर्ण पाठ होता मला!
फारच nostalgic केलं ह्या धाग्याने!
रणजीत देसाईंच्या कादंबरीतले
रणजीत देसाईंच्या कादंबरीतले एक प्रकरण होते. : निजामाविरुद्धच्या लढाईसाठी जमवाजमव चालू असताना नागपूरकर भोसले सखारामबापूंचा सल्ला मागतात आणि ते बुद्धिबळाची एक चाल सुचवून तो देतात.
'स्वामी'तलं ते. 'राजा दोन घरं
'स्वामी'तलं ते. 'राजा दोन घरं मागे घ्या'.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाजीमहाराजांनी लिहिलेले
शिवाजीमहाराजांनी लिहिलेले पत्र :
रात्री उंदीर दिव्याची वात पळवतील आणि त्यामुळे आगी लागतील, त्याबाबत काळजी घ्या....हे आठवतंय.
हो भरतजी, मला आठवतंय शिवाजी
हो भरतजी, मला आठवतंय शिवाजी महाराजांच्या पत्रातील वाक्य.
प्रेम कर भिल्लासारखं- ही कविता आम्हाला पण होती चैतन्य.
मजा येतेय इथल्या पोस्टी
मजा येतेय इथल्या पोस्टी वाचताना. अजून सगळी पानं वाचून नाही झाली. पण या वाक्याचा रेफरन्स कोणीतरी नक्की दिला असेल असं वाटतंय - "जैसे भडभुंजे लाह्या भाजतात...". 'बखर' मधलं वाक्य होतं. आणि या वाक्यावर हमखास संस्प यायचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरची पोस्ट लिहीली आणि दहाव्या
४४१
४४१
आम्हाला चक्रधर स्वामींच्या
आम्हाला चक्रधर स्वामींच्या मराठीतला एक धडा होता.. बरीच वेगळी मराठी होती ती.
ससा बिळासी रीघाला....असं एकच वाक्य आठ्वतय. आम्ही मैत्रिणी एकमेकींशी या भाषेत बोलायचो.
जैसे भडभुंजे लाह्या
जैसे भडभुंजे लाह्या भाजतात>>>>>>.. आठवलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरीत असताना एक धडा होता कोणता ते नाही आठवत पण त्यात हृदय हा शब्द पहिल्यांदा वाचनात आलेला.. आणि आम्ही सगळे वाचताना हदय वाचायचो....मग बाईंनी सांगितलेलं की ते हदय नाही हृदय आहे.......
कुनाला दुसरीतला "गंमत" म्हनुन
कुनाला दुसरीतला "गंमत" म्हनुन का काहि धडा आठ्वतो का?
त्यात एक मुलगी सांगत असते की ति चिमणी बनेल आनि आरश्यात पाहुन हसेल.आरश्यावर टिकटीक करेल.
आइने वाळत घातलेल धान्य खाईल आणी एका रुममधुन दुसर्या रुम मधे उडत राहिल.आईने तिला हुस्कावल तरि ति जानार नाहि.आनि शेवटी तिचि आई वैतागुन म्हनेल
"मेलीने नुस्ता उच्छाद मांडलाय"
रात्री आईच्या कुशीत झोपताना ति दिवस भरातल्या गमती आठ्वुन नुसती हसत राहिल.तिच्या आईला तिच्या हसन्याच कारण कळ्नार नाहि.
शेवटच वाक्य काहीस अस होत.
"तुला कळ्नारच नाहि माझि गंमत."
एक कुलुपं जमवण्याचा छंद
एक कुलुपं जमवण्याचा छंद असलेल्या तिंबुनानांचा (बहुतेक) धडा होता. [ `बलुचिस्तानातल्या टोळीकडून त्यांनी एक कुलूप घेतल; ते लावायला किल्ली लागत असे पण उघडायला किल्ली लागत नसे !' ]
@देवेन भोळे : हो तो बहुधा
@देवेन भोळे :
हो तो बहुधा पहिलाच धडा होता. नव्याकोर्या पुस्तकाचा छानपैकी सुगंध छातीत भरुन घेत शिकलेला धडा चांगलाच लक्षात आहे.
'हाताची किमया' नावाचा
'हाताची किमया' नावाचा सातवीला एक होता. सामुहिक श्रमदानातून रस्तेबांधणी (?) केली जाते, यावर होता बहुधा.
Sorry Admin Bhavu
Sorry Admin Bhavu![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हो, गम्माडी गम्मत म्ह्णून
हो, गम्माडी गम्मत म्ह्णून धडा होता तो मुलगी चिमणी बनण्याचा विचार करत असते... मस्त होता.
झोपाळु पांडुतात्या (?) धडा
झोपाळु पांडुतात्या (?) धडा आठवतोय का?
तिसरीत की चौथीत होता.
Pages