जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हसून हसून फुटायची बाकी होते. हिचाच चॉईस आहे ना? हिलाच हौस आहे ना आन कडे जायचा?>>>+१००
आणि आदे समोर पण त्या आन ला सारखं आदु आदु काय? राग डोक्यात जातं ते.>>>+१११११११११११११

मेघनाची विधात्याकडून/ नियतीकडून / कॉसमॉसकडून नक्की काय अपेक्षा आहे ? आकाशवाणी व्हावी, की " मेघने बाळे, अदू नगरकरच / आदित्य देसाईच (व्हॉटएव्हर द केस मे बी) तुझा जन्मजन्मांतरीचा नवरा आहे आणि ह्या जन्मीही तोच होणार" आणि मग ह्या बयेची ट्युब पेटणार ? तेव्हा मेघनाबाई आता गोगलगाईपेक्षाही संथ वेगाने चालणार्या आपल्या मेंदूला कामाला लावा आणि ठरवून सोक्षमोक्ष लावून एका कुठल्यातरी आदित्यला मोकळं करा. पाणी पडून पडून इतकी कंटाळवाणी झाली आहे ही मालिका, की सद्ध्या कुणालाही फारसा फरक पडणार नाही, कुठल्या आदित्यचा नंबर लागतोय. फक्त
सु.मो. आणि गि.ओ. एव्हढेच सुसह्य आहेत.

बिचार्‍याला मध्यरात्री जागवत ठवून अदूच्या गोष्टी सांगतेय..<<< Proud

आणि आदे समोर पण त्या आन ला सारखं आदु आदु काय? राग डोक्यात जातं ते<<<

ती माबोकरांना अशी लाडाने हाका मारायला लागली तर काय एकेका आय डी ची हालत होईल नाही?

बेफिकीरडू
दक्षू
झंपू
झक्कू
अ‍ॅडमीनू
प्रमोद तांबू
वैवकुकू
सखू जनू
रश्मू
आबासाहेबू
सारिका चितळू
गोगू

वगैरे!

त्या मेघनाला म्हणव कि चान्गला नवर,प्रेमळ जोडीदार वगैरे ठिक आहे. पण एवढी चन्गली सासू मिळालीये. चन्गलि सासू आणी दान्ड्या न मरणरी बाइ मिळयलाप्फार फार भाग्य लागत.

मेघनाची विधात्याकडून/ नियतीकडून / कॉसमॉसकडून नक्की काय अपेक्षा आहे ? आकाशवाणी व्हावी, की " मेघने बाळे, अदू नगरकरच / आदित्य देसाईच (व्हॉटएव्हर द केस मे बी) तुझा जन्मजन्मांतरीचा नवरा आहे आणि ह्या जन्मीही तोच होणार" आणि मग ह्या बयेची ट्युब पेटणार ? >>:D Lol Lol

सु.मो. आणि गि.ओ. एव्हढेच सुसह्य आहेत.>>++११

बेफी...डू
फुटाणे आवडले..
बाकी तुम्ही या शिरेली बघता का..

झी टीव्हीवर एकूणच ष्टो-याना उचल कशी ती नाहीच...
झीटिव्ही गिरण्या चालवणा-यांची टीम आहे की काय? सारख्खे आपले दळतायत..

जरा त्या मेघनाच आणि आदित्यच काही बर व्हायला लागल तर त्या मेघनाचा मूड घालवायला काहीतरी घडलेलं दाखवताहेत. बोअर होतंय हा Happy

बापरे बेफिकीर हसून हसून डोळ्यात पाणी आणता तुम्ही.:हहगलो:

गेल्या चार-पाच दिवसात मेघनाचा सुतकी चेहेरा आणी आदेचा देवदास टाईप चेहेरा पहायला वेळ झालाच नाही, इथले अपडेट्स पण घाईत वाचले होते. पण दक्षिणा, झन्पी, सखी आणी बाकी मुली जाम विनोदी लिहीतात, तेवढाच विरन्गुळा.:फिदी:

त्या मेघनाला म्हणव कि चान्गला नवर,प्रेमळ जोडीदार वगैरे ठिक आहे. पण एवढी चन्गली सासू मिळालीये. चन्गलि सासू आणी दान्ड्या न मरणरी बाइ मिळयलाप्फार फार भाग्य लागत.>>>>> धानी तुझ्या या वाक्यासाठी भरपूर टाळ्या. माझ्या साबा चान्गल्या आहेत, बाई पण बिचारी दान्ड्या मारताना नक्कीच सान्गुन जाते.:फिदी:

मला आदित्य आवडतो, मेघना नाही आवडत, ती थोराड वाटते आणि सारखं सारखं काय आदु, आदु करत असते नवऱ्यासमोर. बरं झालं परवा सासूने झापलं तिला नाहीतर नेहेमीच घरच्यांना गृहीत धरून त्याच त्याच चुका करत असते. तरी तिला आदित्यने सांगितलं की तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होता कामा नये. माझ्याशी कशीही वाग.

ती प्राजक्ता माळी आधी सुवासिनी सिरीयलमध्ये होती, जरा फ्रेश चेहरा घ्यायला हवा होता.

ह्या मालिकेत मला आवडणारी गोष्ट म्हणजे सुना ड्रेस घालतात, नाहीतर कुठलीही हिंदी-मराठी सिरीयल असो लग्न झालं की फक्त साड्याच नेसतात त्यापण झगमगीत. इथे जरातरी रियालिटी दाखवलीय.

Biggrin

सासुबाई सध्या इथे असल्याने ही सिरीयल बघावी/ ऐकावी/ यु tube वर शोधावी लागते Wink
त्यांना फार आवडते जुयेरेगा!
मी पण बघावी असे त्यांना वाटते. मला सिरीयल प्रकरणात सिरीयसली इंटरेस्ट नसल्याने मी स्वयंपाक वगैरे करत असताना फक्त ऐकते. त्यामुले वरच्या पोस्टीनचा अंदाज आला. सध्या त्या त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे गेल्याने रोजचा तू नली रतीब बंद आहे.
रच्याकने, you tube वर प्रत्येक एपिसोड भारतीय प्रमाण वेळे नुसार साधारण कधी लोड होतो हे कुणी सांगू शकेल का?
म्हणजे किती वाजता शोधायचा ते समजेल! Tia!

मुग्धा, धन्यवाद धागा सार्वजनिक केल्यापद्धल.

मोबाईलवरून माबो वाचत असताना सदस्य म्हणुन लॉगइन करणे अवघड असते. त्यावेळी इतर बाफवरच्या पोष्टी वाचता येत होत्या. पण फक्त हाच बाफ सार्वजनिक नसल्यामुळे सदस्य म्हणुन लॉगइन केल्याशिवाय पोष्टी वाचणे जमत नव्हते.

वात आणला आहे झी मराठीच्या सर्व सिरिअल्स नी. ती प्राजक्ता माळी तर डोक्यात जाते. सगळी देसाई वाडी बधीर झाली आहे आणि कोणालाही आपल्याला जे प्रश्न पडतात ते प्रश्न यांना पडत नाहित.

प्राजक्ता माळीचं कास्टींग बरोबरच नाही, मला आधीपासूनच वाट्तंय, आदित्य लहान वाटतो तिच्यापुढे. मुख्य नायिका म्हणून ती शोभत नाही, तिने आता मोठी वहीनी वगैरे कामं करावीत, कीती थोराड आहे.

बादवे ती मेघना काय शिकतेय बघाव तेंव्हा पी एच डी साठी रिसर्च करावा तस प्रत्येकजण तिच्या पाठी लागलेला असतो अभ्यास कर म्हणुन??

तिने आता मोठी वहीनी वगैरे कामं करावीत, कीती थोराड आहे
>>>> Rofl

Pages