सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!
आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-
अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन
भरत +१ माझे पण नाव नव्हते. मी
भरत +१
माझे पण नाव नव्हते. मी ९ मार्चच्या शिबिरात अर्ज दिला आणि २ एप्रिलला माझे व्होटर कार्ड आले. spelling mistake होती. ती नंतर दुरुस्त करुन घेता येइल.
अरे कित्ती चर्चा....? जरा
अरे कित्ती चर्चा....?
जरा 'फेविकोल खुर्चीची नविन जाहिरत बघा! इंटरनेटवर.मस्तय!!!
मी मतदान करणारच....कारण तो माझा कायदासिद्ध अधिकार आहे!
केलं!
केलं!
जानेवारीत नाव होतंआणि आज
जानेवारीत नाव होतंआणि आज नाही. निवडणुक अधिकारी म्हणे माझं पण नाव उडालंय !!!! (त्याचं ) सकाळपासून तीन मतदान केंद्रे, मनपात निवडणुक अधिकारी आणि नाव का नाही हे सांगणारे बूथ(यांना कारण सांगता आले नाही.) येवढी वणवण करून शेवटी मतदान नाहीच![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
केलं. अज्जिबात गर्दी नव्हती
केलं.
अज्जिबात गर्दी नव्हती कारण एकाच सेंटरमध्ये पाच बूथ होते.
कर्नाटकातलं माझं पहिलं वहिलं मतदान!
~ आज सकाळी ७.०० पासून लोकसभा
~ आज सकाळी ७.०० पासून लोकसभा मतदार सुरू झाले...माझ्या कोल्हापूर शहर भागाचे. मी आज पहाटे फिरायला जाण्याचा रस्ता मुद्दाम बदलून बरोबर ६.५० वाजता केन्द्रावर पोचलो. एकूण २० उपकक्ष होती असे दिसले.... विशेष म्हणजे दोन मिनिटातच माझे मतदान ज्या कक्षावर होते तिथे बाहेर यादीसह सारी माहिती होती....यादीतील माझा क्रमांक १५ होता, पण ज्यावेळी मी कक्षात आलो तेव्हा पाहिले की मीच प्रथम मतदाता..... ग्रेट ! फार आनंद झाला.
तिथल्या नियुक्त कर्मचार्यांना मी हार्दिक शुभेच्छा दिल्या....त्यानाही मतदानाची सुरुवात अशी आल्हाददायक झाली हे पाहून आनंद दिसला (हे फार महत्त्वाचे असते....). मी यादीतील क्रमांकही सांगितला....ओळखपत्र दाखविले... ते एका कर्मचार्याने लागलीच तपासून दिले व बोटाला शाई लावली.....मग पुढील कर्मचार्याने मला नावाची एक स्लीप दिली..जी मी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनजवळ बसलेल्या एका स्त्री अधिकार्याला दिली.....त्यानी मशिनकडे जायला सांगितले....यादी पाहिली...अभिप्रेत उमेदवाराची निशाणी पाहिली....आणि बटन दाबले.... छानशी बीप ची शिट्टी ऐकू आली....आणि अशारितीने माझे २०१४ लोकसभा निवडणूक मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण झाले.
केलं! सकाळीच गेल्यामुळे गर्दी
केलं! सकाळीच गेल्यामुळे गर्दी नव्हती, ५ मिनिटात सर्व पार पडलं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण 'साहेबांनी' शाई काढण्यासाठी कोणत्या ब्रॅंडचा रिमुव्हर (हे ट्रेड सिक्रेट का काय म्हणतात ते असावं ) वापरायचा हे न सांगितल्यामुळे बराच प्रयत्न करुनही शाई काही निघाली नाही
केलं बुवा! पयला लंबर..!! सलाम
केलं बुवा!
पयला लंबर..!!
सलाम त्या मतदान केंद्रावरिल कर्मचार्यांन्ना व त्या पाठीमागे खंबिर पणे उभ्या असलेल्या यंत्रणेला जे कि बरोबर सात च्या ठोक्याला आमच्या स्वागताला हजर होत्या. सलाम त्यांच्या ह्या पुर्व तयारिस केलेल्या कष्टांन्ना ज्याचि आपण फक्त कल्पना करू शकतो. काही काही कर्मचारी तर बरेच किलोमिटर पायी जावून आदल्या रात्री मुक्कामास असतात.
ह्यावेळेस मात्र आपल्या लोकशाही यंत्रणांचा अभिमान वाट्तो!
केले केले
केले केले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करायचयं ब्वॉ
करायचयं ब्वॉ
सक्काळी सक्काळी मॉर्निंग
सक्काळी सक्काळी मॉर्निंग वॉकहून परततानाच केलं.
निवडणूक आयोगातर्फे स्लिपा वाटल्या होत्या त्या घरी आल्या. (एक सोडून दोन कॉप्या आल्या).
माझ्या भावाची स्लिप सापडत नव्हती ती वाटणार्या कर्मचार्याने फोनाफोनी, शोधाशोधी करून आणून दिली.
मतदान केंद्रात बरीच गर्दी होती. पण बर्याच खोल्यांमध्ये मतदान सुरु असल्याने लाईन फारशी नव्हती.. १० मिनीट उभं रहावं लागलं रांगेत.
पोलिस बंदोबस्त खूप होता.
यंदा जाणवलेली बाब म्हणजे, स्लिपा वाटायला आलेले कर्मचारी, मतदान केंद्रावरचे कर्मचारी, पोलिस, याद्यांमध्ये नावं शोधायला बसवलेले कर्मचारी अतिशय व्यवस्थित बोलत होते, त्यांना काम करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची खरोखरच इच्छा आहे हे जाणवत होतं (निव्वळ पाट्या टाकणं सुरु नव्हतं). त्यांना सगळ्या प्रोसिजरवगैरेची पूर्ण माहिती होती... रांगांमध्ये उभ्या असलेल्या वृद्ध तसच अपंग व्यक्तिंना ते स्वतः होऊन पुढे घेऊन जाऊन आधी मतदान करू देत होते.
एकंदरीत एकदम प्रोफेशनल सर्व्हिस !!
बेफिकीर, तुम्ही कोथरूडात
बेफिकीर, तुम्ही कोथरूडात नक्की कुठे रहाता माहित नाही, पण हा भाग पुणे शहर मतदार संघात येतो की.. बारामतीत नाही..
अजुन केले नाही, पण करणार हे
अजुन केले नाही, पण करणार हे नक्की.
यंदा जाणवलेली बाब म्हणजे,
यंदा जाणवलेली बाब म्हणजे, स्लिपा वाटायला आलेले कर्मचारी, मतदान केंद्रावरचे कर्मचारी, पोलिस, याद्यांमध्ये नावं शोधायला बसवलेले कर्मचारी अतिशय व्यवस्थित बोलत होते, त्यांना काम करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची खरोखरच इच्छा आहे हे जाणवत होतं (निव्वळ पाट्या टाकणं सुरु नव्हतं). त्यांना सगळ्या प्रोसिजरवगैरेची पूर्ण माहिती होती... रांगांमध्ये उभ्या असलेल्या वृद्ध तसच अपंग व्यक्तिंना ते स्वतः होऊन पुढे घेऊन जाऊन आधी मतदान करू देत होते.>>>>
खरंय.
या कर्मचार्यांचे अभिनंदन करु तितके कमी.
बेफिकीर, तुम्ही कोथरूडात
बेफिकीर, तुम्ही कोथरूडात नक्की कुठे रहाता माहित नाही, पण हा भाग पुणे शहर मतदार संघात येतो की.. बारामतीत नाही..<<<
मी वृंदावर हाउसिंग काँप्लेक्सच्या वृंदवन हाईट्समध्ये राहतो. चक्रमपणा म्हणजे ह्या काँप्लेक्समधील अर्धा भाग पुणे मतदारसंघात तर आमचा अर्धा बारामतीत येतो.
आज प्रथमच नोटा साठी एक बटन पाहून मनाला बरे वाटले. अर्थात, त्याचा वापर मात्र करावा लागला नाही.
पहिले १० अल्पना मुक्तेश्वर
पहिले १०
अल्पना
मुक्तेश्वर कुलकर्णी
mandard
बेफिकीर
साती
अशोक.
अग्निपंख
यक्ष
वर्षा म
पराग
अभिनंदन.
मितान , तू करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन!
आमच्याकडे चोवीस एप्रिलला
आमच्याकडे चोवीस एप्रिलला आहे
मतदान
एक धागा काढून स्वतःच स्वतःचे
एक धागा काढून स्वतःच स्वतःचे अभिनंदन करायची अभिनव पद्धत काढू नका उगाच![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
अरे माझे नाव नाही. मी १० ला
अरे माझे नाव नाही. मी १० ला केले.:-) येथे काल लिहिले होते. असो.
आज सकाळी सकळी पिंप्ळे सौदगर
आज सकाळी सकळी पिंप्ळे सौदगर मधे मतदार केन्द्रावर 7 च्या आधी प्रचंड गर्दी होती..आम्ही 7 च्या आधी गेलेलो तरी 10/12 वा नंबर लागला..जे आजोबा सगळ्यात आधी आत गेलेले त्यानी अगदी मतदान पेटीच्या पाया पडून मत दिल .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मासोळी, ही एक चांगली बाब आहे.
मासोळी,
ही एक चांगली बाब आहे. जितके अधिक मतदान होईल तितके अधिक देशमत पुढे येणार, त्यामुळे अधिक अचूक कौल समजणार!
एकुण उत्साह दिसत आहे खरा!
मगाशी मनात येऊन गेले की पुण्यात कदाचित विक्रमी मतदान होईल की काय!
सलाम त्या मतदान केंद्रावरिल
सलाम त्या मतदान केंद्रावरिल कर्मचार्यांन्ना व त्या पाठीमागे खंबिर पणे उभ्या असलेल्या यंत्रणेला जे कि बरोबर सात च्या ठोक्याला आमच्या स्वागताला हजर होत्या. सलाम त्यांच्या ह्या पुर्व तयारिस केलेल्या कष्टांन्ना ज्याचि आपण फक्त कल्पना करू शकतो. काही काही कर्मचारी तर बरेच किलोमिटर पायी जावून आदल्या रात्री मुक्कामास असतात.
ह्यावेळेस मात्र आपल्या लोकशाही यंत्रणांचा अभिमान वाट्तो!>>>>>
यंदा जाणवलेली बाब म्हणजे, स्लिपा वाटायला आलेले कर्मचारी, मतदान केंद्रावरचे कर्मचारी, पोलिस, याद्यांमध्ये नावं शोधायला बसवलेले कर्मचारी अतिशय व्यवस्थित बोलत होते, त्यांना काम करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची खरोखरच इच्छा आहे हे जाणवत होतं (निव्वळ पाट्या टाकणं सुरु नव्हतं). त्यांना सगळ्या प्रोसिजरवगैरेची पूर्ण माहिती होती... रांगांमध्ये उभ्या असलेल्या वृद्ध तसच अपंग व्यक्तिंना ते स्वतः होऊन पुढे घेऊन जाऊन आधी मतदान करू देत होते.>>>>
ही जाणीव ठेवल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्यांनी मतदान केले त्यांचे अभिनंदन. बाकीच्यांनी प्लिज प्लिज प्लिज मतदान करा.
मलाही २४ तारखेसाठी शुभेच्छा द्या प्लिज
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अश्विनी के, तुम्हाला
अश्विनी के,
तुम्हाला मतदानासाठी शुभेच्छा!
एकुण उत्साह दिसत आहे खरा!
एकुण उत्साह दिसत आहे खरा! >>
बेफिजी..उत्साह आहेच.. पण
'लोगोंमे गुस्सा बहुत है'
बेफिकिर, मला मतदान करताच
बेफिकिर, मला मतदान करताच येणार नाहिये. माझी जबाबदारी सुरळीत पार पडू दे म्हणून शुभेच्छा मागतेय, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२००९ साली आपल्या अधिपत्याखालील मतदान केंद्राची आणि सामानाची कस्टडी घेऊन आदल्या रात्री केंद्रातच पथारी पसरलेल्यांमध्ये मी आणि अजून एक मायबोलीकरीण होतो.
जे आजोबा सगळ्यात आधी आत
जे आजोबा सगळ्यात आधी आत गेलेले त्यानी अगदी मतदान पेटीच्या पाया पडून मत दिल >>>
जाणिव असेल त्यांना की हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं, मतदानाची खरी किंमत कदाचित थोड्या मताने पडलेल्या उमेदवाराला जास्त कळत असेल.
केलं केलं... अत्यंत शिस्तबद्ध
केलं केलं... अत्यंत शिस्तबद्ध आणि खेळीमेळीचे विरळा वातावरण..कोल्हापूर जगात भारी..
केश्विनी, तुला इलेक्शन ड्यूटी
केश्विनी, तुला इलेक्शन ड्यूटी का? अरेरे !
माझ्या आईला मुंबईत आली होती मागे दोन तीनदा.. लय काम पडतं त्याचं !
इलेक्शन ड्युटीवाल्याना मतदान
इलेक्शन ड्युटीवाल्याना मतदान करता यावे म्हणून काही वेगळी सोय असायची ना पूर्वी?
फेसबूकवरून साभार! >>>पुण्याला
फेसबूकवरून साभार!
>>>पुण्याला कलमाडी स्कूल मध्ये मतदान थांबवल्याची बातमी आहे. कारण कुठलेही बटन दाबले तरी कॉंग्रेसलाच मत जातंय म्हणे!... बिच्चारे!!...काहीच दुसरा उपाय उरु नये का यांच्या जवळ?<<<
Pages